लिंबागणेश येथे शेतकरी विरोधी भारत-अमेरिका कृषी कराराची प्रतिकात्मक होळी; दिशाभूल करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध. :- डॉ.गणेश ढवळे --------------- --------------- (प्रतिनिधी):- अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार कराराबाबत राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळी येथे आयोजित महा एक्स्पो- २०२६ पशुप्रदर्शनात भारत-अमेरिका व्यापार कराराचे स्वागत करत अमेरिकेची मोठी बाजारपेठ भारतासाठी खुली झाल्याचे सांगितले होते. कृषी क्षेत्रात कोणत्याही अमेरिकन मालाला भारतात खुली सूट दिलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, या वक्तव्याला विरोध करत डॉ.गणेश ढवळे यांनी प्रत्यक्षात अमेरिकन कृषी प्रक्रिया मालावर शून्य टक्के आयात शुल्क देण्यात आल्याचा, तर भारतीय कृषी मालावर १८ टक्के शुल्क कायम असल्याचा आरोप केला. या निषेधार्थ किसान सभेच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज मंगळवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारत-अमेरिका कृषी कराराची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. या वेळी सरपंच बालासाहेब जाधव, माजी पंचायत समिती सदस्य राजाभाऊ गिरे, सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, शिवशक्ती भिमशक्ति विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, ग्राम पंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ, दामोदर थोरात, शेख समीर, लेनाजी गायकवाड, सुरेश निर्मळ, अँड.गणेश वाणी, विक्रांत वाणी, सर्पमित्र अशोक जाधव, संतोष भोसले, विक्रम दाभाडे, संभाजी वाणी, अंकुश जाधव, दगडु ढवळे, सर्जेराव घरत, सिताराम कदम, भगवान लगास, विलास ढवळे, आसाराम जाधव, सुधीर क्षीरसागर आदी सहभागी होते. सोयाबीन, इथेनॉल, जीएम सोयाबीनपासून तयार खाद्यतेल, पशुखाद्य, सुकामेवा, फळे-भाज्या व पोल्ट्री उत्पादनांवरील सवलतीमुळे भारतीय बाजारपेठेवर विपरीत परिणाम होणार असल्याचा दावा डॉ.गणेश ढवळे यांनी केला. सोयाबीनचा हमीभाव ५३३०/- रुपये असताना शेतकऱ्यांना सुमारे साडेतीन हजार रुपयांत विक्री करावी लागत असल्याचे सांगत भावांतर योजनेतून नुकसान भरपाई देणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कापसाचे दर हमी भावाखाली गेल्याबद्दलही त्यांनी सरकारवर टीका केली. सीसीआयमार्फत खरेदी केलेला कापूस बाजार भावापेक्षा कमी दरात विक्रीस काढल्याने दर घसरल्याचा आरोप करत उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भावासह संपूर्ण खरेदीची कायदेशीर हमी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

- (प्रतिनिधी):- मराठा सेवा संघ बीड व अंतर्गत सर्व कक्ष यांच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षीही शिवजन्मोत्सव सोहळा दिनांक २०/०२/२०२६ शुक्रवार वार रोजी ठीक-सांय. ०७:००वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत समाजातील तळागाळातील व्यक्तीसाठी योगदान देणाऱ्या समाज रत्नांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्यात मराठा भूषण पुरस्काराने सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे शिवश्री डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे प्रसिद्ध बाल रोगतज्ञ शिवश्री डॉ.प्रदीप शेळके, सामाजिक व उद्योग क्षेत्रातील शिवश्री अँड.प्रकाश कवठेकर, महिला मधून जिजाऊ रत्न पुरस्काराने शिवमती जयश्रीताई पांडुरंग सावंत तसेच विशेष गौरव पुरस्काराने समाज प्रबोधनकार शिवश्री संतोष डोंगरे व प्रशासकीय क्षेत्रातून शिवश्री मधुकर शेळके यांना मान्यवरांच्या हस्ते मराठा समाज भूषण पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. या वेळी प्रसिद्ध व्याख्याते शिवश्री हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीडचे तहसीलदार मा.चंद्रकांत शेळके साहेब हे राहणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शिवमती प्रियाराणी पाटील, शिवश्री अजय पाटील (अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज नागरी सहकारी बँक बीड), बीड जिल्हा हिवताप अधिकारी शिवश्री विजयसिंह शिंदे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष शिवश्री अशोक ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. या सर्व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये मान्यवरांना मराठा समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरी सर्व शिवप्रेमींनी शिवजन्मोत्सव व मराठा भूषण पुरस्कार सोहळयास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मराठा सेवा संघ बीड, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व अंतर्गत सर्व कक्षाच्या वतीने करण्यात येते.1
- रास्ता रोको आणि पोलिसांची.....1
- संजीवनी समाधी सोहळा... घनसावंगी तालुक्यातील तीर्थपूरी येथील एस. पी. पाटील इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात शेतकरी गीत, देशभक्तीपर गितांवर विद्यार्थ्यांचे धम्माल सादरीकर1
- भोकरदन मराठी पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध, अध्यक्ष पदी सांडू पाटील नामदे, सचिव पदी दिपक सोळंके, तर उपाध्यक्ष पदी सुरेश शेळके, शेख सलीम यांची निवड Bharat 24taas News1
- Post by YUVA JALNA NEWS1
- नागपुर से वर्धा जा रही ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन में लगी भीषण आग, सामने आया खौफनाक वीडियो। महाराष्ट्र के वर्धा से एक बड़ी खबर सामने आ रही है। यहां ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन की एक बोगी में भीषण आग लग गई। आग लगने की सूचना मिलटे ही ट्रेन को रुकवा गया और सभी यात्रियों को बाहर निकाला गया। इस हादसे में किसी यात्री के घायल होने की खबर नहीं है। ट्रेन में आग लगने का वीडियो भी सामने आया है। वीडियो में साफ देखा जा सकता है कि ट्रेन की बोगी से आग की लपटें निकल रही है। ट्रेन रेलवे ट्रैक पर खड़ी है और आग बुझाने की कोशिश की जा रही है। जानाकरी के अनुसार, यह ट्रेन नागपुर से वर्धा जा रही थी। हेलोडी के पास अचानक ट्रेन की एक बोगी में आग लग गई। फिलहाल आग पर काबू पा लिया गया है।1
- शरद मोरे यांची तारीख 16 समोर रोजी स्वीकृत नगरसेवक म्हणून मुख्याधिकारी सुरज बिस्किटे यांचे उपस्थितीत निवड करण्यात आली.1
- --------------- (प्रतिनिधी):- अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार कराराबाबत राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळी येथे आयोजित महा एक्स्पो- २०२६ पशुप्रदर्शनात भारत-अमेरिका व्यापार कराराचे स्वागत करत अमेरिकेची मोठी बाजारपेठ भारतासाठी खुली झाल्याचे सांगितले होते. कृषी क्षेत्रात कोणत्याही अमेरिकन मालाला भारतात खुली सूट दिलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, या वक्तव्याला विरोध करत डॉ.गणेश ढवळे यांनी प्रत्यक्षात अमेरिकन कृषी प्रक्रिया मालावर शून्य टक्के आयात शुल्क देण्यात आल्याचा, तर भारतीय कृषी मालावर १८ टक्के शुल्क कायम असल्याचा आरोप केला. या निषेधार्थ किसान सभेच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज मंगळवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारत-अमेरिका कृषी कराराची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. या वेळी सरपंच बालासाहेब जाधव, माजी पंचायत समिती सदस्य राजाभाऊ गिरे, सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, शिवशक्ती भिमशक्ति विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, ग्राम पंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ, दामोदर थोरात, शेख समीर, लेनाजी गायकवाड, सुरेश निर्मळ, अँड.गणेश वाणी, विक्रांत वाणी, सर्पमित्र अशोक जाधव, संतोष भोसले, विक्रम दाभाडे, संभाजी वाणी, अंकुश जाधव, दगडु ढवळे, सर्जेराव घरत, सिताराम कदम, भगवान लगास, विलास ढवळे, आसाराम जाधव, सुधीर क्षीरसागर आदी सहभागी होते. सोयाबीन, इथेनॉल, जीएम सोयाबीनपासून तयार खाद्यतेल, पशुखाद्य, सुकामेवा, फळे-भाज्या व पोल्ट्री उत्पादनांवरील सवलतीमुळे भारतीय बाजारपेठेवर विपरीत परिणाम होणार असल्याचा दावा डॉ.गणेश ढवळे यांनी केला. सोयाबीनचा हमीभाव ५३३०/- रुपये असताना शेतकऱ्यांना सुमारे साडेतीन हजार रुपयांत विक्री करावी लागत असल्याचे सांगत भावांतर योजनेतून नुकसान भरपाई देणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कापसाचे दर हमी भावाखाली गेल्याबद्दलही त्यांनी सरकारवर टीका केली. सीसीआयमार्फत खरेदी केलेला कापूस बाजार भावापेक्षा कमी दरात विक्रीस काढल्याने दर घसरल्याचा आरोप करत उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भावासह संपूर्ण खरेदीची कायदेशीर हमी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.1