बदनापुर पोलीसांची मोठी कारवाई घातक शस्त्राने मारहाण करूण जबरी चोरी करणारे टोळीवर मोक्का अन्वये कारवाई पुढेही अशीच कारवाई चालू राहील एम.टी. सुरवसे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे बदनापुर बदनापुर पोलीसांची मोठी कारवाई घातक शस्त्राने मारहाण करूण जबरी चोरी करणारे टोळीवर मोक्का अन्वये कारवाई पुढेही अशीच कारवाई चालू राहील एम.टी. सुरवसे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे बदनापुर दिनांक 13/06/2026 रोजी रात्री 12.30 वाजताचे सुमारास दावलवाडी ता. बदनापुर शिवारातील हॉटेल विसावा येथे येत चोरटयांनी कार मध्ये येवून घातक शस्त्राचा धाक दाखवून फिर्यादी नामे आकुंश निवृत्ती बोचरे यांच्या डोक्यात धारदार तलवारीने वार करूण खिशातील 26,000/- रूपये जबरीने हीसकावून पळून गेले होते. सदर दिवशी बदनापुरचे पोलीस निरीक्षक हे रात्र गस्तवर आसतांना त्यांना सदर घटणे बाबतची माहीती मिळताच पोलीस स्टाफ घेवून घटणेच्या ठिकाणी जाऊन CCTV व्हीडीओची पहाणी करूण त्यांनी वापरलेच्या कारच्या नंबर वरून सदर चोरट्यांची ओळख पटवली असता त्यांचे नावे 1) पप्पू कचरू घोरपडे वय 32 वर्ष 2) नवनाथ शिवदास नाईकवाडे वय 32 वर्ष दोन्ही रा. खादगाव ता. बदनापुर जि. जालना असे आसल्याचे समजले सदर आरोपीस गुन्हयात आटक करूण त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेले वाहण, हत्यार व रक्कम जप्त केली तसेच फिर्यादीची ओळख परेड केली आसता फिर्यादीने आरोपीस ओळखले आहे. सदर आरोपीस अटक केल्यानंतर त्यांचा गुन्हेगारी ईतीहास चेक केला आसता त्यांनी मागील 10 वर्षात एकूण 14 गुन्हे केलेले आसुन त्यांच्यावर विवीध पोलीस स्टेशन मध्ये गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामध्ये टोळी तयार करूण त्यांच्या आर्थीक फायदयासाठी धारदार शस्त्राचा वापर करूण जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, धारदार शास्त्राने मारहाण व दहशत निर्माण करून खंडणी वसुल करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, घातक हत्याराने जबर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, घरफोडी करणे असे गंभीर गुन्हे केलेले आहेत. आरोपी नामे पप्पु कचरू घोरपडे रा. खतगाव याने ईतर आरोपी सोबत संयुक्त पणे संघटीत गुन्हेगारी टोळी स्थापन करून विवीध ठिकाणी गंभीर गुन्हे केले आहेत. याचे गंभीर दखल घेवुन मा.श्री. तेघबीर सिंह संधू पोलीस अधीक्षक, जालना यांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे बदनापुर यांनी मोक्काचा प्रस्ताव पाठविला. आज रोजी मा.श्री. विरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांनी मंजूरी दिल्याने आज रोजी सदर आरोपी विरूध्द मोक्का दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन बदनापुर हददीत जर कोनी शस्त्रांचा वापर करूण दहशत निर्माण करूण मारहाण करूण जनतेमध्ये गुंड किंवा दादा बनू पहात आसतील अशा गुंडावर या पुढेही अशीच कारवाई चालू राहील असे एम.टी. सुरवसे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे बदनापुर यांनी कळविले आहे. सदरची कारवाई ही मा. श्री. तेघबीर सिंह संधू, पोलीस अधीक्षक जालना, मा.श्री. विक्रम साळी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक जालना, मा.श्री. अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली एम.टी. सुरवसे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे बदनापुर, श्री. एस. आर. कुकलारे, पोउपनि, पोकॉ/494 परमेश्वर ढगे, पोकॉ/1600 विकास घाटगे, पोकॉ/342 पी. के. गोलवाल, पोकॉ/1699 एस.जे. तडवी, चालक पोकॉ/887 रामेश्वर सानप यांनी सदरची कारवाई केली आहे.

- महावितरणचे दीपक देवरे यांना आपल्या जीव वर खेळून लोकांच्या अंधे दुनियेत प्रकाश केला भर पावसाळ्यात बीच कोल्हापूर चढून दिल्लीचे तार जोडले1
- जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण1
- अभिजीत दिपके यांची प्रकृती स्थिर; डॉक्टरांकडून आवश्यक उपचार सुरू छत्रपती संभाजीनगर | कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी तातडीने तपासणी करून आवश्यक उपचार केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले. विश्रांतीचा सल्ला देत पुढील काही काळ वैद्यकीय देखरेखीखाली राहण्याचा सल्लाही देण्यात आला.1
- सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर.. प्रेस नोट *सिल्लोड येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न* *११ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ* *प्रशासनाने जनतेच्या विश्वासाचे केंद्र बनावे; शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा – आमदार अब्दुल सत्तार* सिल्लोड (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' सिल्लोड शहरातील डोंगरगाव फाटा येथील स्वस्तिक लॉन्स येथे उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. या शिबिरात महसूल, ग्रामविकास, कृषी, एकात्मिक बाल विकास, वन विभाग, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, नगर परिषद आदी विविध विभागांच्या योजनांअंतर्गत सुमारे ११ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्य शासन हे सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेले लोककल्याणकारी सरकार असल्याचे सांगितले. ग्रामसभा व विविध उपक्रमांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. महसूल प्रशासन हे केवळ कागदपत्रांची पूर्तता करणारे कार्यालय नसून जनतेच्या विश्वासाचे केंद्र आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने संवेदनशीलता, पारदर्शकता आणि तत्परता या तत्त्वांवर काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख प्रशासनाचा उल्लेख करताना सांगितले की, महाराजांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून प्रशासनाची उभारणी केली. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व दुर्बल घटकांच्या हिताला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याच विचारांवर राज्य शासन कार्यरत असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून विविध विकासात्मक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मनापासून पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचारामुळे शासनाची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. दिव्यांग, आदिवासी, शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे तसेच सर्व वंचित घटकांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. नागरिकांशी सुसंवाद ठेवून त्यांचे समाधान होईल अशा पद्धतीने प्रशासनाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. ------------- प्रलंबित पीक विमा दाव्यांच्या संदर्भात बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी पीक विमा हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अधिकार असून तो मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे सांगितले. येत्या विधिमंडळ अधिवेशनात या विषयावर शासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न उपस्थित केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ------------ यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध लोकहिताचे निर्णय घेतले जात असल्याचा उल्लेख केला. तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना विनम्र अभिवादन केले. ---------- नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आपल्या भाषणात सिल्लोड शहरातील बेघर नागरिकांसाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून म्हाडा योजनेंतर्गत पाच हजार घरांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती देत नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी प्रास्ताविकात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांचा तसेच निकाली काढलेल्या प्रकरणांचा आढावा सादर केला. तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड) व तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव) यांनी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देत नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी ग्रामविकास विभागाच्या योजनांची माहिती देत पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करून योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार अब्दुल सत्तार व मान्यवरांनी स्वस्तिक लॉन्स परिसरात विविध विभागांनी उभारलेल्या शासकीय स्टॉलची पाहणी केली. तसेच महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची खरेदी करून त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन दिले व नागरिकांनी स्थानिक बचत गटांच्या उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. सिल्लोड नगर परिषदेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक व पुष्पगुच्छाद्वारे मान्यवरांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तहसीलदार अंकिता ताकभाते यांनी मानले. ------ यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड), तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव), गटविकास अधिकारी रत्नाकर पगार (सिल्लोड), गटविकास अधिकारी अमोल जगताप (सोयगाव), नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप (सिल्लोड), भारत कासार ( सोयगाव ), नायब तहसीलदार तुकाराम बनकर ,बळीराम मुंडे , संभाजी पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पाटील तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख (सोयगाव) प्रभाकर काळे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना तालुकाप्रमुख (सोयगाव) धरमसिंग चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन गाडे, जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, अब्दुल आमेर अ. सत्तार, सय्यद नासेर हुसेन, राजू बाबा काळे, माजी जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी सभापती रामदास पालोदकर, विश्वासराव दाभाडे, नगर परिषद शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश ताठे, संदीप राऊत, राजाराम पाडळे, जयराम चिंचपुरे, नानासाहेब रहाटे, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, सुरेखा शिंदे, शिवसेना शहरप्रमुख मनोज झंवर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरसेवक रउफ बागवान, अकील वसईकर, आसिफ बागवान, सिद्धेश्वर आहेर, डॉ. फिरोज पठाण, बबलू पठाण, नूर मोहंमद कुरेशी, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, संजय डमाळे, राजूमिया देशमुख, अंबादास सपकाळ, मोतीराम पाडळे, पंकज जयस्वाल आदींसह शासनाच्या विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, लाभार्थी तसेच विविध गावांतील आजी-माजी सरपंच, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल, ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी राबवली आहे... Bharat 24Taas News1
- मीटर कनेक्शन कमी म्हणून महावितरणने दहा गावांचा वीजपुरवठा केला खंडित! घनसावंगी तालुक्यातील विरेगावसह दहा गावं अंधारात; पूर्वसूचना न देता वीज बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त मीटर कनेक्शन कमी म्हणून महावितरणने दहा गावांचा वीजपुरवठा केला खंडित! घनसावंगी तालुक्यातील विरेगावसह दहा गावं अंधारात; पूर्वसूचना न देता वीज बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त गावांची वीजपुरवठा बंद असल्याने या गावांतील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आज दिनांक 1 शनिवार रोजी दुपारी 1वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : घनसावंगी तालुक्यातील डांबरी सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या विरेगावसह तब्बल दहा गावांचा वीजपुरवठा मीटर कनेक्शनची संख्या कमी असल्याचे कारण देत महावितरणने खंडित केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रात्री सात वाजल्यापासून वीजपुरवठा बंद असल्याने या गावांतील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे.1
- जय भोले मित्र मंडळाच्या 21व्या अमरनाथ यात्रेनिमित्त रक जय भोले मित्र मंडळाच्या 21व्या अमरनाथ यात्रेनिमित्त1
- पार्किंगच्या वादातून पैठण गेटमध्ये तुफान राडा; एकाच कॉलवर टोळके जमले, दुकानात घुसून हाणामारी छत्रपती संभाजीनगर... ANC : छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठण गेट परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादाने हिंसक वळण घेतले. मोहन टॉकीजसमोरील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स दुकानात दोन गट आमनेसामने येत दुकानात घुसून तुंबळ हाणामारी केली. एका कॉलनंतर मोठे टोळके घटनास्थळी पोहोचल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच सिटी चौक पोलिसांनी तत्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. विशेष म्हणजे, या घटनेत कोणताही पक्ष तक्रार देण्यास पुढे आला नाही. त्यामुळे सिटी चौक पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत दोन्ही गटांतील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पार्किंगवरून सुरू झालेला हा वाद पुन्हा उफाळून थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली असून, प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल असगर शेख करत आहेत.1