logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात; दोघे जागीच ठार, एक गंभीर जखमी कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात; दोघे जागीच ठार, एक गंभीर जखमी सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील दुर्दैवी घटना सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. १०) दुपारी उमरगा शहराजवळील चौरस्ता परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील एक कुटुंब तुळजापूर तालुक्यातील श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन आपल्या गावी परत जात होते. उमरगा चौरस्त्याजवळील भारत टायर दुकानासमोर कार (क्र. टीएस 34 एफ 4706) भरधाव वेगाने जात असताना अचानक टायर फुटले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या स्टॉलवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात चहाच्या स्टॉलवर बसलेले उमरगा येथील माजी नगरसेवक बळी पवार आणि एका अर्थमुव्हर्सचे मालक लाडनशहा मुर्शद यांचा जागीच मृत्यू झाला. तर मेकॅनिक सचिन कुठार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेमुळे उमरगा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे.

1 hr ago
user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
पत्रकार ओमप्रकाश उढाण
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
1 hr ago
6ece59b4-8e87-4d68-9c0c-33dd71ed5720

कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात; दोघे जागीच ठार, एक गंभीर जखमी कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात; दोघे जागीच ठार, एक गंभीर जखमी सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील दुर्दैवी घटना सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. १०) दुपारी उमरगा शहराजवळील चौरस्ता परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील एक कुटुंब तुळजापूर तालुक्यातील श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन आपल्या गावी परत जात होते. उमरगा चौरस्त्याजवळील भारत टायर दुकानासमोर कार (क्र. टीएस 34 एफ 4706) भरधाव वेगाने जात असताना अचानक टायर फुटले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या स्टॉलवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात चहाच्या स्टॉलवर बसलेले उमरगा येथील माजी नगरसेवक बळी पवार आणि एका अर्थमुव्हर्सचे मालक लाडनशहा मुर्शद यांचा जागीच मृत्यू झाला. तर मेकॅनिक सचिन कुठार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेमुळे उमरगा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन आमदार हिकमत उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हिकमत दादा उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना त्यांनी प्रादेशिक असमतोल दूर करण्याची जोरदार मागणी केली. घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे अधोरेखित केले. नदीजोड प्रकल्पांतर्गत वैतरणा व उल्हास खोऱ्यातील वाढीव पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रस्तावाचे त्यांनी स्वागत केले. मात्र असे मोठे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत स्थानिक लघु सिंचन प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “२५-३० वर्षांपूर्वी उभारलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे (KT Weirs) आज जीर्ण अवस्थेत असून अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे चांगला पाऊस पडूनही पाणी साठत नाही. या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून जायकवाडी धरणातून वाहून जाणारे पाणी अडवले, तर परिसरातील ३० ते ३५ गावांचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो,” असे त्यांनी सभागृहात नमूद केले. तसेच तब्बल १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हतवन प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. रस्त्यांच्या विषयावर बोलताना आमदार हिकमत दादा उढाण यांनी मुंबईसारख्या शहरांना माेठ्या प्रमाणात निधी तर ग्रामीण भागासाठी तुलनेने कमी निधी मिळत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. समृद्धी महामार्ग किंवा शक्तीपीठ महामार्ग यांसारखे मोठे प्रकल्प महत्त्वाचे असले तरी ग्रामीण भागातील ओडीआर (ODR) व एमडीआर (MDR) रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी भरीव निधी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना सिमेंट काँक्रीट रस्त्यांनी जोडण्याच्या शासनाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले; मात्र यासाठी करण्यात आलेली साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद अपुरी असल्याचेही त्यांनी नमूद केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडताना आमदार उढाण यांनी साखर कारखान्यांवरील २५ किलोमीटर हवाई अंतराच्या नियमावर जोरदार टीका केली. “जगात असा कोणताही उद्योग नसेल जिथे नवीन युनिट सुरू करण्यासाठी इतके कडक निर्बंध असतील. या नियमामुळे ज्या भागात ऊस उत्पादन जास्त आहे, त्या ठिकाणी नवीन कारखाने उभे राहू शकत नाहीत आणि शेतकऱ्यांची कोंडी होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा २५ किमीचा नियम रद्द करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. तसेच ऊस खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कारखान्यांवरील काटामारी रोखण्यासाठी सरकारने डिजिटल काटे उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार हिकमत दादा उढाण यांनी मांडलेल्या या मुद्द्यांमुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाडा आणि ग्रामीण महाराष्ट्रातील प्रश्नांवर सभागृहात व्यापक चर्चा झाली
    1
    महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन
आमदार हिकमत उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले
महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हिकमत दादा उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना त्यांनी प्रादेशिक असमतोल दूर करण्याची जोरदार मागणी केली.
घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे अधोरेखित केले. नदीजोड प्रकल्पांतर्गत वैतरणा व उल्हास खोऱ्यातील वाढीव पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रस्तावाचे त्यांनी स्वागत केले. मात्र असे मोठे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत स्थानिक लघु सिंचन प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
“२५-३० वर्षांपूर्वी उभारलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे (KT Weirs) आज जीर्ण अवस्थेत असून अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे चांगला पाऊस पडूनही पाणी साठत नाही. या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून जायकवाडी धरणातून वाहून जाणारे पाणी अडवले, तर परिसरातील ३० ते ३५ गावांचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो,” असे त्यांनी सभागृहात नमूद केले. तसेच तब्बल १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हतवन प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
रस्त्यांच्या विषयावर बोलताना आमदार हिकमत दादा उढाण यांनी मुंबईसारख्या शहरांना माेठ्या प्रमाणात निधी तर ग्रामीण भागासाठी तुलनेने कमी निधी मिळत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. समृद्धी महामार्ग किंवा शक्तीपीठ महामार्ग यांसारखे मोठे प्रकल्प महत्त्वाचे असले तरी ग्रामीण भागातील ओडीआर (ODR) व एमडीआर (MDR) रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी भरीव निधी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना सिमेंट काँक्रीट रस्त्यांनी जोडण्याच्या शासनाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले; मात्र यासाठी करण्यात आलेली साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद अपुरी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडताना आमदार उढाण यांनी साखर कारखान्यांवरील २५ किलोमीटर हवाई अंतराच्या नियमावर जोरदार टीका केली. “जगात असा कोणताही उद्योग नसेल जिथे नवीन युनिट सुरू करण्यासाठी इतके कडक निर्बंध असतील. या नियमामुळे ज्या भागात ऊस उत्पादन जास्त आहे, त्या ठिकाणी नवीन कारखाने उभे राहू शकत नाहीत आणि शेतकऱ्यांची कोंडी होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा २५ किमीचा नियम रद्द करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.
तसेच ऊस खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कारखान्यांवरील काटामारी रोखण्यासाठी सरकारने डिजिटल काटे उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
आमदार हिकमत दादा उढाण यांनी मांडलेल्या या मुद्द्यांमुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाडा आणि ग्रामीण महाराष्ट्रातील प्रश्नांवर सभागृहात व्यापक चर्चा झाली
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • इसराइल और ईरान के युद्ध में भारत पर क्या असर पड़ सकता है देखें पूरी खबर नकारात्मक और सकारात्मक प्रभाव क्या हो सकते हैं
    1
    इसराइल और ईरान के युद्ध में भारत पर क्या असर पड़ सकता है देखें पूरी खबर नकारात्मक और सकारात्मक प्रभाव क्या हो सकते हैं
    user_Imran Siddiqui
    Imran Siddiqui
    Jalna, Maharashtra•
    53 min ago
  • भोकरदन शहरातील फुलेनगर येथे दिलीप मामा पगारे, शुभम पगारे,सागर पगारे यांच्या गृहप्रवेश सोहळा आणि सान्वी शुभम पगारे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 🎂💐देताना माजी नगरसेवक दीपक भाऊ बोर्डे, मिथुन पगारे, किरण वाघमारे,पत्रकार कमलकिशोर जोगदंडे आदी.
    1
    भोकरदन शहरातील फुलेनगर येथे दिलीप मामा पगारे, शुभम पगारे,सागर पगारे यांच्या गृहप्रवेश सोहळा आणि सान्वी शुभम पगारे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 🎂💐देताना माजी नगरसेवक दीपक भाऊ बोर्डे, मिथुन पगारे, किरण वाघमारे,पत्रकार कमलकिशोर जोगदंडे आदी.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • महिला दिनानिमित्त जालन्यात वीर सावरकर चौक येथील मुस्कान ज्यूस सेंटरचे गोड उपक्रम; 500 ग्लास ज्यूसचे मोफत वाटप..
    1
    महिला दिनानिमित्त जालन्यात वीर सावरकर चौक येथील मुस्कान ज्यूस सेंटरचे गोड उपक्रम; 500 ग्लास ज्यूसचे मोफत वाटप..
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • यादरम्यान ६० किलोमीटर मध्ये शिरपूर आणि खलघाट (सेंदवा) असे दोन टोल आहेत. या महामार्गावरील हे खड्डे दुरुस्त करण्यासाठी परिवहन विभागाने 26 लाखाचा निधी मंजूर केलेला होता. अनेकवेळा निवेदने देऊन आंदोलने करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने आज शिरपूर फर्स्टच्या वतींने अनोखे आंदोलन करण्यात आले. महामार्गावरील खड्ड्यामध्ये बसून '२६ लाखाच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा' करून निषेध नोंदवला. यानंतर परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना शिरपूर फर्स्टचे चेतन मोरे, धम्मदीप मोरे, हंसराज चौधरी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. व त्वरित दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
    1
    यादरम्यान ६० किलोमीटर मध्ये शिरपूर आणि खलघाट (सेंदवा) असे दोन टोल आहेत. 
या महामार्गावरील हे खड्डे दुरुस्त करण्यासाठी परिवहन विभागाने 26 लाखाचा निधी मंजूर केलेला होता.
अनेकवेळा निवेदने देऊन आंदोलने करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने आज शिरपूर फर्स्टच्या वतींने अनोखे आंदोलन करण्यात आले. महामार्गावरील खड्ड्यामध्ये बसून '२६ लाखाच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा' करून निषेध  नोंदवला.
यानंतर परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना शिरपूर फर्स्टचे चेतन मोरे, धम्मदीप मोरे, हंसराज चौधरी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. व त्वरित दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • विलास बारहाते मानवत : येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व काही पालकांच्या सहभागातून ८ मार्च २०२६ रोजी सकाळी सहा वाजता ११ एसटी बसने निघाले जवळपास ५०० विद्यार्थी सहावी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी या सहली मध्ये होते. प्रथम लोणार येथील जगप्रसिद्ध उल्काजन्य लोणार सरोवर पाहिले. हे पर्यटकांसह  अभ्यासकांसाठी एक उत्तम सहलीचे ठिकाण आहे. ५० हजार वर्षांपूर्वीच्या या खऱ्या पाण्याच्या विवराच्या सभोवताली ऐतिहासिक मंदिरे व अद्वितीय जैवविविधता पर्यटकांना भुरळ घालतेय. येथील १२ व्या शतकातील प्राचीन मंदिरे, जसे की कमळजा माता मंदिर, स्थापत्यकलेचा उत्तम नमुना पाहवयास मिळतोय. लोणार सरोवर हे जगातील एकमेव बेसॉल्ट खडकातील आघाती सरोवर आहे. जे भूगर्भ शास्त्रज्ञांसाठी संशोधनाचा विषय आहे. या तलावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल आणि अनेक पक्षी पाहायला मिळतात. नंतर खामगाव येथील नामांकित कंपनीचा बिस्किट कारखाना पाहिला. कश्या प्रकारे बिस्किटे निर्माण करतात हे पाहिल्यानंतर सर्वांना बिस्किट पुडे देण्यात आले. हा प्रकल्प स्थानिक रोजगार निर्मितीत मोलाची भूमिका बजावतो असं कामगारासोबत चर्चा केल्यानंतर समजलंय. त्यानंतर ही सहल शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी गेली. हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आणि विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. १९ व्या शतकात प्रकट झालेल्या महाराजांचे हे समाधी स्थळ असून, येथील संस्थानाचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध, स्वच्छ आणि भक्तांसाठी सेवाभावी आहे. हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र असून, येथे दररोज मोठ्या प्रमाणावर मोफत महाप्रसाद वाटप केला जातोय. मंदिर परिसराच्या मध्यभागी श्री गजानन महाराजांचे अत्यंत आकर्षक संगमरवरी समाधी मंदिर आहे. श्री गजानन महाराज संस्थान हे भारतातील सर्वात मोठे आणि शिस्तप्रिय ट्रस्टपैकी एक आहे. जे सामाजिक व आध्यात्मिक कार्य करते. दर्शन व प्रसाद घेतल्या नंतर सहल मानवत च्या दिशेने वाटचाल करत शाळेत रात्री उशिरा दिड च्या सुमारास सुखद सहलीचा अनुभव घेत पोहोचली.
    1
    विलास बारहाते
मानवत : येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व काही पालकांच्या सहभागातून ८ मार्च २०२६ रोजी सकाळी सहा वाजता ११ एसटी बसने निघाले  जवळपास ५०० विद्यार्थी सहावी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी या सहली मध्ये होते. प्रथम लोणार येथील जगप्रसिद्ध उल्काजन्य लोणार सरोवर पाहिले. हे पर्यटकांसह  अभ्यासकांसाठी एक उत्तम सहलीचे ठिकाण आहे. ५० हजार वर्षांपूर्वीच्या या खऱ्या पाण्याच्या विवराच्या सभोवताली ऐतिहासिक मंदिरे व अद्वितीय जैवविविधता पर्यटकांना भुरळ घालतेय. येथील १२ व्या शतकातील प्राचीन मंदिरे, जसे की कमळजा माता मंदिर, स्थापत्यकलेचा उत्तम नमुना पाहवयास मिळतोय. लोणार सरोवर हे जगातील एकमेव बेसॉल्ट खडकातील आघाती सरोवर आहे. जे भूगर्भ शास्त्रज्ञांसाठी संशोधनाचा विषय आहे. या तलावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल आणि अनेक पक्षी पाहायला मिळतात. नंतर खामगाव येथील नामांकित कंपनीचा बिस्किट कारखाना
पाहिला. कश्या प्रकारे बिस्किटे निर्माण करतात हे पाहिल्यानंतर सर्वांना बिस्किट पुडे देण्यात आले. हा प्रकल्प स्थानिक रोजगार निर्मितीत मोलाची भूमिका बजावतो असं कामगारासोबत चर्चा केल्यानंतर समजलंय. त्यानंतर ही सहल
शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी गेली. हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आणि विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. १९ व्या शतकात प्रकट झालेल्या महाराजांचे हे समाधी स्थळ असून, येथील संस्थानाचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध, स्वच्छ आणि भक्तांसाठी सेवाभावी आहे. हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र असून, येथे दररोज मोठ्या प्रमाणावर मोफत महाप्रसाद वाटप केला जातोय. मंदिर परिसराच्या मध्यभागी श्री गजानन महाराजांचे अत्यंत आकर्षक संगमरवरी समाधी मंदिर आहे. श्री गजानन महाराज संस्थान हे भारतातील सर्वात मोठे आणि शिस्तप्रिय ट्रस्टपैकी एक आहे. जे सामाजिक व आध्यात्मिक कार्य करते. दर्शन व प्रसाद घेतल्या नंतर सहल मानवत च्या दिशेने वाटचाल करत शाळेत रात्री उशिरा दिड च्या सुमारास सुखद सहलीचा अनुभव घेत पोहोचली.
    user_विलास बारहाते
    विलास बारहाते
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • देश और दुनिया में आज दिन भर कई बड़ी घटनाएँ हुईं। राजनीति, अर्थव्यवस्था, अंतरराष्ट्रीय घटनाक्रम, खेल और मौसम से जुड़ी कई अहम खबरें सुर्खियों में रहीं।
    1
    देश और दुनिया में आज दिन भर कई बड़ी घटनाएँ हुईं। राजनीति, अर्थव्यवस्था, अंतरराष्ट्रीय घटनाक्रम, खेल और मौसम से जुड़ी कई अहम खबरें सुर्खियों में रहीं।
    user_Imran Siddiqui
    Imran Siddiqui
    Jalna, Maharashtra•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.