दौलताबाद अब्दीमंडीच्या डोंगराला आग वनसंपदा जळून खाक. ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याच्या पूर्व दिशेला असलेल्या अब्दीमंडी येथील डोंगराला शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. वाऱ्याच्या वेगामुळे आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केल्याने परिसरातील लाखमोलाची वनसंपदा आणि जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आप्पावाडीपासून सुरू होऊन दौलताबाद घाटाखालील मोमबत्ता तलावापर्यंत पसरलेल्या ४ ते ५ किलोमीटरच्या या डोंगररांगेत अज्ञात व्यक्तीने जळती विडी किंवा सिगारेट टाकल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.या आगीत डोंगररांगेतील मौल्यवान औषधी वनस्पती, सरपटणारे प्राणी आणि पक्ष्यांची घरटी जळून खाक झाली आहेत. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.वनपाल सुधीर धवन, वनरक्षक पुरुषोत्तम वायाळ, मयूर चौधरी, प्रभुदास हजारे, विनयते आणि विजय चौहान हे रात्री उशिरापर्यंत संबंधित आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांच्यापरीने शर्थीचे प्रयत्न करीत होते. मात्र, रात्र झाल्यामुळे आणि जोरदार वाऱ्यासह डोंगरातील कपारी आणि वाळलेल्या मोठ्या झाडांमुळे आग नियंत्रणाच्या कामात मोठा अडथळा निर्माण होत होता. या आगीत डोंगरातील वनसंपदेचे झालेले नुकसान पाहून निसर्गप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.

- वैजापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी शासकीय नियमा विरुद्ध. पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या दालनात A/C त बसून जनतेची सेवा करताना.1
- सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहेत असेच एक दृश्य डोंगरगाव गावामध्ये पाहायला मिळाले पावसा सहित गारपीट ही होत आहे1
- Arun Borde Visit The Soul Of Fashion Opening Ceremony in Kalda Corner1
- आखाती देशाच्या युद्धामुळे छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस टंचाईमुळे रिक्षामध्ये गॅस मिळत नसल्याने आखिरकार रिक्षा चालकांनी रिक्षा बंद पुकारत प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला3
- आज ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात विजांचा मोठा कडकडाट सुरू झाला होता आमठाणा येथे एका झाडावर वीज पडल्याची घटना घडली असून सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे.1
- येवला-कोपरगाव रस्त्यावरील म्हसोबावाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही 'श्री म्हसोबा महाराज यात्रा उत्सव' अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. पाच गावांच्या शिवेवर वसलेले हे देवस्थान पंचक्रोशीत अत्यंत जागृत मानले जाते. यात्रेनिमित्त सकाळी कोपरगाव येथून कावडमध्ये गंगेचे पवित्र पाणी आणण्यात आले. गावाच्या मुख्य भागापासून वाजत-गाजत आणि डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लहान मुलांसह तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत 'म्हसोबा महाराज की जय'च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या कावडच्या पाण्याने महाराजांना विधिवत अभिषेक घालण्यात आला. उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे ह.भ.प. गोरख महाराज काळे (अंगणगावकर) यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. कीर्तनानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. १९८९ पासून सुरू असलेली ही यात्रा परंपरा म्हसोबावाडी, बदापूर, नांदेसर, आडगाव चोथवा आणि पारेगाव या पाच गावांच्या भाविकांकडून मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे. सध्या मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून 'म्हसोबावाडी मित्र मंडळ' व ग्रामस्थ यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. बदापूर येथील तरुण भजनी मंडळाचा आदर्श या यात्रेचे भूषण ठरला. या सोहळ्यासाठी आबालवृद्ध आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला4
- जालन्यातील चंदनझीरा येथे SIR मॅपिंगला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एका दिवसात 500 हून अधिक नोंदी महात्मा फुले चौकात विशेष कॅम्प; जवळपास 60% मॅपिंग पूर्ण, उर्वरित लवकरच – पर्यवेक्षक राहुल मुंडे1
- आज सोमवार 30 मार्च रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर शहरात सिडको परिसरात एलपीजी गॅस नसल्याने रिक्षा चालकांनी संप पुकारला असून मात्र काही रिक्षा चालकांनी सिटी बस मध्ये जाणाऱ्या प्रवासी यांना दादागिरी करत होते सदरील माहिती सिडको पोलिसांना माहिती दादागिरी करणाऱ्या रिक्षाचालकांना ताब्यात घेतली आहे.1