थकबाकी असलेल्या गाळयांना 31 मे पर्यंत अंतीम मुदत अन्यता 1 जून पासून गाळे सील - आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड कोल्हापूर, ता. 11 : महानगरपालिकेच्या मालकीच्या गाळ्यांचे थकबाकीदार गाळेधारकांनी येत्या दि.31 मे 2026 अखेर थकीत रक्कम भरावी, अन्यथा 1 जून 2026 पासून संबंधित गाळे सील करण्याची मोहीम हाती घेण्याच्या सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या. महानगरपालिकेच्या इस्टेट विभागाची आढावा बैठक आज दुपारी 12 वाजता आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी गाळेधारकांच्या थकबाकीचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या बहुतांश गाळेधारकांची मुदत सन 2015 मध्ये संपलेली आहे. शासन निर्णयानुसार महानगरपालिकेकडून 5 टक्के भाडेवाढ गृहीत धरून भाडे आकारणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, केवळ 20 ते 30 टक्के व्यावसायिकच नियमित भाडे भरत असून उर्वरित गाळेधारकांकडून थकबाकी वाढत आहे. महानगरपालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही तर शहर विकासकामांवर परिणाम होतो. त्यामुळे सर्व थकबाकीदारांना 31 मे 2026 पर्यंत अंतिम संधी देण्यात यावी आणि त्यानंतर थकबाकीदार गाळ्यांवर सीलची कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. ज्या गाळेधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे व ज्यांना कलम 81(ब) अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या आहेत अशा गाळ्यांचा तातडीने लिलाव प्रक्रियेद्वारे पुनर्वाटप करावे अशा सूचना दिल्या. तसेच खुल्या जागेची थकबाकी असलेल्या व्यावसायिकांवरही कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महानगरपालिकेचे हॉल, भाजी मार्केट व पार्किंग व्यवस्था यांचे निविदा प्रक्रिया राबवून तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. याशिवाय हॉकी स्टेडियम परिसरातील गाळे सध्याच्या स्थितीत लिलावाद्वारे एजन्सीला देण्याचा प्रस्ताव सादर करावा. यावेळी उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे व इस्टेट विभागीत लिपीक उपस्थित होते.

- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रवींद्र खेबुडकर यांनी स्वतः बेशिस्तपणे लावलेल्या दुचाकींची हवा काढल्याने खळबळ उडाली आहे. खासदार नारायण राणे यांच्या दौऱ्यापूर्वी पार्किंग शिस्त लावण्यासाठी त्यांनी हे कडक पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.1
- सांगली पोलिसांनी नागठाणे परिसरातून एका अट्टल गुन्हेगाराला देशी बनावटीच्या पिस्तूलसह अटक केली आहे. तपासणीत त्याच्याकडे कोणताही परवाना नसून त्याने हे पिस्तूल जत येथील एका व्यक्तीकडून घेतल्याचे समोर आले. याप्रकरणी पुढील तपास 'जत कनेक्शन'च्या दिशेने सुरू असून आरोपीला पोलीस कोठडी मिळाली आहे.2
- सातारा जिल्ह्यात सरकारी पैशांवरच्या पंचपकवान्नाऐवजी स्वाभिमानाने मिळवलेल्या चटणी-भाकरीची चव खरी असल्याचे म्हटले जात आहे. ही चव केवळ जिभेवरच नाही, तर मेंदूतही कायम रेंगाळत राहते, असे या विचारातून अधोरेखित होते.1
- पंतप्रधान मोदींनी नागरिकांना 'गरज असेल तेव्हाच इंधन वापरा' असे आवाहन केले. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत महत्त्वाचा सल्ला दिला.1
- भोर-कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंटजवळ एका एर्टिगा मोटारीचा अपघात झाला. तीव्र उतार आणि वळणाचा अंदाज न आल्याने गाडी रस्त्याच्या कडेला खड्ड्यात कोसळली. या घटनेत एक जण जखमी झाला असून, गाडीचेही नुकसान झाले आहे.2
- जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आंब्यांची सुंदर सजावट करण्यात आली. यासाठी तब्बल १५१ डझन आंब्यांचा वापर करत आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे.1
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विठ्ठल कांगणे यांचा अंधश्रद्धेवर बोलणारा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यात त्यांनी लोकांना अंधश्रद्धा सोडून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगी बाणवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांची विनोदी आणि शैलीदार मांडणी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.1
- पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार राम पाचकाळे यांनी अनोखे आंदोलन करत जाळीत उडी घेतली. आपल्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याऐवजी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे. त्यांनी दोषींवर कडक कारवाई आणि कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी केली.1
- युवा नेते जय पवार यांनी बारामती येथे 'जनता दरबार' आयोजित केला. या माध्यमातून त्यांनी जनसेवेची परंपरा कायम ठेवत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.1