logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पिंपरी चिंचवड येथील हिंजवडी आयटी पार्क फेज २ मधील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या जॉब प्लेसमेंट कंपनीने रातोरात गाशा गुंडाळल्याने एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे तब्बल ७०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून, त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. २०२५ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने नोकरी देण्याच्या आमिषाने प्रत्येक कर्मचाऱ्याकडून १५ हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घेतल्याचा आरोप आहे. कंपनीने काही महिने पगार दिल्यानंतर, जानेवारी २०२६ पासून वेतन थकवले. विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांना दिलेले चेकही बाऊन्स झाल्याचे समोर आले आहे. पगाराबाबत विचारणा करण्यासाठी कर्मचारी कंपनीत पोहोचले असता, कार्यालयाला कुलूप लावलेले आढळले. कंपनीचे संचालक फरार झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या फसवणूक झालेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनी संचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली असून, हिंजवडी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयटी फोरमचे अध्यक्ष पवनजीत माने यांनीही या प्रकरणाकडे लक्ष वेधले असून, सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

9 hrs ago
user_Thenayak
Thenayak
हवेली, पुणे, महाराष्ट्र•
9 hrs ago

पिंपरी चिंचवड येथील हिंजवडी आयटी पार्क फेज २ मधील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या जॉब प्लेसमेंट कंपनीने रातोरात गाशा गुंडाळल्याने एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे तब्बल ७०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून, त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. २०२५ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने नोकरी देण्याच्या आमिषाने प्रत्येक कर्मचाऱ्याकडून १५ हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घेतल्याचा आरोप आहे. कंपनीने काही महिने पगार दिल्यानंतर, जानेवारी २०२६ पासून वेतन थकवले. विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांना दिलेले चेकही बाऊन्स झाल्याचे समोर आले आहे. पगाराबाबत विचारणा करण्यासाठी कर्मचारी कंपनीत पोहोचले असता, कार्यालयाला कुलूप लावलेले आढळले. कंपनीचे संचालक फरार झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या फसवणूक झालेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनी संचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली असून, हिंजवडी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयटी फोरमचे अध्यक्ष पवनजीत माने यांनीही या प्रकरणाकडे लक्ष वेधले असून, सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पिंपरी चिंचवडमध्ये पुणे विधान परिषदेच्या उमेदवारीवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तीव्र नाराजी उफाळून आली आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी पक्षावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, विक्रम काकडे यांना ‘आर्थिक निकष पाहून’ उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी डावलल्यानंतर, लांडेंनी पक्ष नेतृत्वावर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. त्यांनी खंत व्यक्त केली की, “आज अजित दादा असते तर प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळाली असती.” विशेष म्हणजे, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी उमेदवारीचे ‘बर्थडे गिफ्ट’ मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरल्याने त्यांची नाराजी स्पष्टपणे समोर आली आहे.
    1
    पिंपरी चिंचवडमध्ये पुणे विधान परिषदेच्या उमेदवारीवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तीव्र नाराजी उफाळून आली आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी पक्षावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, विक्रम काकडे यांना ‘आर्थिक निकष पाहून’ उमेदवारी देण्यात आली आहे.

उमेदवारी डावलल्यानंतर, लांडेंनी पक्ष नेतृत्वावर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. त्यांनी खंत व्यक्त केली की, “आज अजित दादा असते तर प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळाली असती.” विशेष म्हणजे, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी उमेदवारीचे ‘बर्थडे गिफ्ट’ मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरल्याने त्यांची नाराजी स्पष्टपणे समोर आली आहे.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या 'ट्रायबेका हायस्ट्रीट' मॉलबाहेर लावण्यात आलेले 'नो-पार्किंग'चे फलक केवळ नावापुरतेच उरले आहेत. वाहनचालकांकडून या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असून, बेबंद पार्किंगमुळे वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. या परिस्थितीमुळे सामान्य जनतेचा जीव टांगणीला लागला असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांकडून केली जाणारी कारवाई फक्त 'दाखवण्यापुरती' असून, त्याचा कोणताही ठोस परिणाम दिसत नसल्याचा आरोप होत आहे, जणू 'डोळे असून आंधळे' अशी ही परिस्थिती असल्याची टीका करण्यात येत आहे.
    1
    पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या 'ट्रायबेका हायस्ट्रीट' मॉलबाहेर लावण्यात आलेले 'नो-पार्किंग'चे फलक केवळ नावापुरतेच उरले आहेत. वाहनचालकांकडून या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असून, बेबंद पार्किंगमुळे वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. या परिस्थितीमुळे सामान्य जनतेचा जीव टांगणीला लागला असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांकडून केली जाणारी कारवाई फक्त 'दाखवण्यापुरती' असून, त्याचा कोणताही ठोस परिणाम दिसत नसल्याचा आरोप होत आहे, जणू 'डोळे असून आंधळे' अशी ही परिस्थिती असल्याची टीका करण्यात येत आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • केशव सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना वीज समस्येचा सामना करावा लागत आहे. या वीज समस्येमुळे शेतकरी सध्या त्रस्त आहेत.
    1
    केशव सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना वीज समस्येचा सामना करावा लागत आहे. या वीज समस्येमुळे शेतकरी सध्या त्रस्त आहेत.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    9 min ago
  • पिंपरी-चिंचवड येथील भोसरी परिसरातून तृतीयपंथी समाजसेविका सोनी बाबू वाघमारे यांनी काही व्यक्तींविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी खंडणीची मागणी, मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या, बदनामी आणि मानसिक छळ अशा गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तींकडून वाघमारे यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करण्यात येत असून, ती पूर्ण न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या दिल्या जात आहेत. याशिवाय, तक्रारदार, त्यांच्या कुटुंबीयांना आणि शिष्यांना त्रास देणे, त्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये अडथळे निर्माण करणे आणि त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वाघमारे यांनी काही व्यक्तींची नावे नमूद करत त्यांच्याकडून संघटित पद्धतीने छळ केला जात असल्याचा दावा केला आहे. या प्रकारामुळे स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे सांगत, सोनी बाबू वाघमारे यांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांची पोलीस प्रशासनाकडून पडताळणी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच यातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले आहे.
    1
    पिंपरी-चिंचवड येथील भोसरी परिसरातून तृतीयपंथी समाजसेविका सोनी बाबू वाघमारे यांनी काही व्यक्तींविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी खंडणीची मागणी, मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या, बदनामी आणि मानसिक छळ अशा गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तींकडून वाघमारे यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करण्यात येत असून, ती पूर्ण न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या दिल्या जात आहेत. याशिवाय, तक्रारदार, त्यांच्या कुटुंबीयांना आणि शिष्यांना त्रास देणे, त्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये अडथळे निर्माण करणे आणि त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वाघमारे यांनी काही व्यक्तींची नावे नमूद करत त्यांच्याकडून संघटित पद्धतीने छळ केला जात असल्याचा दावा केला आहे.

या प्रकारामुळे स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे सांगत, सोनी बाबू वाघमारे यांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांची पोलीस प्रशासनाकडून पडताळणी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच यातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले आहे.
    user_वरद महाराष्ट्र वार्ता
    वरद महाराष्ट्र वार्ता
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील कर्डे घाट परिसरात सोमवारी सायंकाळी भररस्त्यात झालेल्या थरारक गोळीबार आणि हल्ल्यात शिरूर येथील विशाल काळे (वय ३०) याचा मृत्यू झाला असून, केदार झाडगे जखमी झाला आहे. या घटनेमुळे शिरूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदवाडी गावच्या हद्दीत न्हावरा फाटा-न्हावरा मार्गावरील राजस्थान ढाब्यासमोर सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. विशाल काळे, उमेश अनिल जगदाळे (वय २६) आणि केदार झाडगे हे तिघे जण टोयोटा टायझर (एमएच १२ एक्सक्यू ५१०४) या कारमधून न्हावऱ्याकडून शिरूरकडे जात होते. त्यावेळी न्हावरा फाटा बाजूकडून आलेल्या किया सोनेट (एमएच १४ एलए ११२८) या कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर सोनेटमधून उतरलेल्या चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी टोयोटा कारच्या पुढील काचेवर चार राउंड गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यानंतर तिघेही कारमधून उतरून जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांपैकी रेकॉर्डवरील आरोपी सनी यादव आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर पुन्हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी विशाल काळे हा मृतावस्थेत आढळून आला, त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मोठ्या दगडाने मारहाण केल्याच्या गंभीर जखमा दिसून आल्या. मृतदेहाजवळ दोन रिकामी काडतुसे आणि काही मोठे दगड आढळले आहेत. केदार झाडगे याच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शिरूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उमेश जगदाळे हा घटनेच्या वेळी घटनास्थळावरून पळून गेला होता; मात्र तो नंतर पोलिसांसमोर हजर झाला. घटनेनंतर आरोपी किया सोनेट कार आणि मोटारसायकलवरून पसार झाले. शिरूर पोलिसांची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली असून फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. आरोपी सनी यादव आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत विशाल काळे तसेच संशयित आरोपी सनी यादव हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, या घटनेमागील नेमके कारण आणि पूर्ववैमनस्याचा तपास सुरू आहे. या निर्घृण हत्येमुळे शिरूर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढविला आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात या हल्ल्यामागील सूत्रधार आणि अन्य सहभागी आरोपींची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
    2
    शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील कर्डे घाट परिसरात सोमवारी सायंकाळी भररस्त्यात झालेल्या थरारक गोळीबार आणि हल्ल्यात शिरूर येथील विशाल काळे (वय ३०) याचा मृत्यू झाला असून, केदार झाडगे जखमी झाला आहे. या घटनेमुळे शिरूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदवाडी गावच्या हद्दीत न्हावरा फाटा-न्हावरा मार्गावरील राजस्थान ढाब्यासमोर सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. विशाल काळे, उमेश अनिल जगदाळे (वय २६) आणि केदार झाडगे हे तिघे जण टोयोटा टायझर (एमएच १२ एक्सक्यू ५१०४) या कारमधून न्हावऱ्याकडून शिरूरकडे जात होते. त्यावेळी न्हावरा फाटा बाजूकडून आलेल्या किया सोनेट (एमएच १४ एलए ११२८) या कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर सोनेटमधून उतरलेल्या चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी टोयोटा कारच्या पुढील काचेवर चार राउंड गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यानंतर तिघेही कारमधून उतरून जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांपैकी रेकॉर्डवरील आरोपी सनी यादव आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर पुन्हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनास्थळी विशाल काळे हा मृतावस्थेत आढळून आला, त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मोठ्या दगडाने मारहाण केल्याच्या गंभीर जखमा दिसून आल्या. मृतदेहाजवळ दोन रिकामी काडतुसे आणि काही मोठे दगड आढळले आहेत. केदार झाडगे याच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शिरूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उमेश जगदाळे हा घटनेच्या वेळी घटनास्थळावरून पळून गेला होता; मात्र तो नंतर पोलिसांसमोर हजर झाला. घटनेनंतर आरोपी किया सोनेट कार आणि मोटारसायकलवरून पसार झाले. शिरूर पोलिसांची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली असून फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. आरोपी सनी यादव आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत विशाल काळे तसेच संशयित आरोपी सनी यादव हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, या घटनेमागील नेमके कारण आणि पूर्ववैमनस्याचा तपास सुरू आहे.

या निर्घृण हत्येमुळे शिरूर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढविला आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात या हल्ल्यामागील सूत्रधार आणि अन्य सहभागी आरोपींची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    5 min ago
  • पोस्टमध्ये एक तीव्र आणि विचारात पाडणारा प्रश्न विचारण्यात आला आहे, ज्यात अशी कल्पना केली आहे की जर छत्रपतींच्या स्वराज्यात कोणी राजमाता जिजाऊ यांच्यावर 'गरळ ओकली' असती तर काय झाले असते. या प्रश्नातून राजमाता जिजाऊंबद्दलची आदरभावना आणि त्यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांवर काय परिणाम झाला असता, याबद्दलची तीव्र संताप आणि चेतावणी स्पष्ट होते.
    1
    पोस्टमध्ये एक तीव्र आणि विचारात पाडणारा प्रश्न विचारण्यात आला आहे, ज्यात अशी कल्पना केली आहे की जर छत्रपतींच्या स्वराज्यात कोणी राजमाता जिजाऊ यांच्यावर 'गरळ ओकली' असती तर काय झाले असते. या प्रश्नातून राजमाता जिजाऊंबद्दलची आदरभावना आणि त्यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांवर काय परिणाम झाला असता, याबद्दलची तीव्र संताप आणि चेतावणी स्पष्ट होते.
    user_संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    Local Politician जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पिंपरी चिंचवड येथील हिंजवडी आयटी पार्क फेज २ मधील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या जॉब प्लेसमेंट कंपनीने रातोरात गाशा गुंडाळल्याने एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे तब्बल ७०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून, त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. २०२५ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने नोकरी देण्याच्या आमिषाने प्रत्येक कर्मचाऱ्याकडून १५ हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घेतल्याचा आरोप आहे. कंपनीने काही महिने पगार दिल्यानंतर, जानेवारी २०२६ पासून वेतन थकवले. विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांना दिलेले चेकही बाऊन्स झाल्याचे समोर आले आहे. पगाराबाबत विचारणा करण्यासाठी कर्मचारी कंपनीत पोहोचले असता, कार्यालयाला कुलूप लावलेले आढळले. कंपनीचे संचालक फरार झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या फसवणूक झालेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनी संचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली असून, हिंजवडी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयटी फोरमचे अध्यक्ष पवनजीत माने यांनीही या प्रकरणाकडे लक्ष वेधले असून, सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
    1
    पिंपरी चिंचवड येथील हिंजवडी आयटी पार्क फेज २ मधील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या जॉब प्लेसमेंट कंपनीने रातोरात गाशा गुंडाळल्याने एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे तब्बल ७०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून, त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

२०२५ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने नोकरी देण्याच्या आमिषाने प्रत्येक कर्मचाऱ्याकडून १५ हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घेतल्याचा आरोप आहे. कंपनीने काही महिने पगार दिल्यानंतर, जानेवारी २०२६ पासून वेतन थकवले. विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांना दिलेले चेकही बाऊन्स झाल्याचे समोर आले आहे. पगाराबाबत विचारणा करण्यासाठी कर्मचारी कंपनीत पोहोचले असता, कार्यालयाला कुलूप लावलेले आढळले. कंपनीचे संचालक फरार झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

या फसवणूक झालेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनी संचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली असून, हिंजवडी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयटी फोरमचे अध्यक्ष पवनजीत माने यांनीही या प्रकरणाकडे लक्ष वेधले असून, सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • अकोला स्थानिक गुन्हे शाखेने सिंदखेड मोरेश्वर येथे मोठी कारवाई करत २.०१ लाख रुपये किमतीची हातभट्टी उद्ध्वस्त केली आहे.
    1
    अकोला स्थानिक गुन्हे शाखेने सिंदखेड मोरेश्वर येथे मोठी कारवाई करत २.०१ लाख रुपये किमतीची हातभट्टी उद्ध्वस्त केली आहे.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.