“सबसिडीसाठी व्यवसाय करू नका; बाजारपेठेचा अभ्यास करून उद्योजक बना” समृद्धीचे चेअरमन सतीश घाटगे यांचे आवाहन ; वडीगोद्री येथे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण उत्साहात रामकिसन अवधूत ( जालना प्रतिनिधी ): “तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनण्याचा विचार करावा. आपल्या कल्पनांना प्रत्यक्ष व्यवसायाचे स्वरूप देताना योग्य पद्धत,बाजारपेठेचा अभ्यास,सातत्य आणि ग्राहकांशी संवाद या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.केवळ सबसिडी मिळते म्हणून व्यवसाय करू नका.सबसिडी ही व्यवसायाला पुढे नेणारी मदत समजा,”असे प्रतिपादन समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी केले. अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED),जालना,शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठान व शांताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पशुसंवर्धन आधारित शेळीपालन,कुक्कुटपालन,गाय-म्हैस पालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सतीश घाटगे बोलत होते. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ग्राहकांची मागणी,बाजारपेठ,पुरवठा,उत्पादनाची गुणवत्ता आणि विक्री व्यवस्था यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.दूध व्यवसायाला सध्या चांगली संधी असून दुग्ध व्यवसायासोबत शेळीपालन व शेळीच्या दुधालाही बाजारपेठ निर्माण होऊ शकते.शासनाच्या अनुदानावर अवलंबून न राहता स्वतःच्या कष्टातून आणि योग्य नियोजनातून व्यवसाय उभा करण्याची गरज आहे,असे घाटगे यांनी सांगितले. “राजकारणाच्या मागे फिरण्यापेक्षा रोजीरोटी आणि आर्थिक स्वावलंबनाकडे लक्ष द्या.शासन प्रत्येकाला पुरेसे देऊ शकत नाही.शासनाच्या योजनांचा योग्य उपयोग करून स्वतःच्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे,” असा संदेशही त्यांनी दिला.यावेळी शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.आर.व्ही.छल्लारे म्हणाले की,या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करावा,हा आहे.शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन तरुणांनी रोजगारनिर्मितीबरोबरच स्वतःची आर्थिक उन्नती आणि आत्मनिर्भरता साधावी,यासाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिरुद्ध झिंझुर्डे म्हणाले की,शेती आणि शेतीशी संबंधित उद्योग केल्याशिवाय ग्रामीण भागातील तरुणांसमोर पर्याय नाही.तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळून स्वतःच्या पायावर उभे राहावे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी राज्यात दुग्ध व्यवसायाला मोठी संधी निर्माण झाली असून जिल्ह्यात धवलक्रांती घडविण्याची गरज असल्याचे सांगितले. जिल्हा अग्रणी बँकेचे कैलास तावडे यांनी विविध योजनांच्या माध्यमातून पशुपालन व्यवसाय सुरू करता येतो.व्यवसायासाठी आवश्यक कर्ज व आर्थिक सहकार्यासाठी बँकशेतकरी व तरुणांच्या पाठीशी राहील, असे मार्गदर्शन केले.मार्गदर्शक विष्णू पिवळ यांनी शेळीपालन हा शेतकऱ्यांसाठी “एटीएम”सारखा पूरक व्यवसाय ठरू शकतो, असे सांगत शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनाचे महत्त्व स्पष्ट केले.मात्र व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. व्यावसायिक व्यवस्थापक अशोक काकडे म्हणाले की, “शेतकरी पिकवू शकतो.मात्र अनेकदा विक्री व्यवस्थापनात कमी पडतो.त्यामुळे उत्पादनासोबत त्याचे योग्य मार्केटिंग करता आले पाहिजे.”बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहकांशी संवाद आणि विक्री व्यवस्थापन हे व्यवसायाच्या यशासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास भाजप ज्येष्ठ नेते भगवान बर्वे,शिवसेना उपतालुकाप्रमुख बंटी आटोळे,सरपंच बंडू मुंढे,ग्रामपंचायत सदस्य नारायण वायाळ,हनुमान भगत,अधीक्षक संभाजी काळे,पत्रकार कीर्तिनंद गांगुर्डे,ॲड.राजेंद्र पवार,मुकेश डुचे,ॲड.मोहन रोटे,राहुल कणके,अशोक कणके,विलास मस्के,नारायण कणके,माऊली ठोंबरे,भागवत महाराज, प्रेम उढाण,नाईकवाडे,तान्हाजी धुमाळ,अजय गावडे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक, शेतकरी व मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
“सबसिडीसाठी व्यवसाय करू नका; बाजारपेठेचा अभ्यास करून उद्योजक बना” समृद्धीचे चेअरमन सतीश घाटगे यांचे आवाहन ; वडीगोद्री येथे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण उत्साहात रामकिसन अवधूत ( जालना प्रतिनिधी ): “तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनण्याचा विचार करावा. आपल्या कल्पनांना प्रत्यक्ष व्यवसायाचे स्वरूप देताना योग्य पद्धत,बाजारपेठेचा अभ्यास,सातत्य आणि ग्राहकांशी संवाद या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.केवळ सबसिडी मिळते म्हणून व्यवसाय करू नका.सबसिडी ही व्यवसायाला पुढे नेणारी मदत समजा,”असे प्रतिपादन समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी केले. अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED),जालना,शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठान व शांताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पशुसंवर्धन आधारित शेळीपालन,कुक्कुटपालन,गाय-म्हैस पालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सतीश घाटगे बोलत होते. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ग्राहकांची मागणी,बाजारपेठ,पुरवठा,उत्पादनाची गुणवत्ता आणि विक्री व्यवस्था यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.दूध व्यवसायाला सध्या चांगली संधी असून दुग्ध व्यवसायासोबत शेळीपालन व शेळीच्या दुधालाही बाजारपेठ निर्माण होऊ शकते.शासनाच्या अनुदानावर अवलंबून न राहता स्वतःच्या कष्टातून आणि योग्य नियोजनातून व्यवसाय उभा करण्याची गरज आहे,असे घाटगे यांनी सांगितले. “राजकारणाच्या मागे फिरण्यापेक्षा रोजीरोटी आणि आर्थिक स्वावलंबनाकडे लक्ष द्या.शासन प्रत्येकाला पुरेसे देऊ शकत नाही.शासनाच्या योजनांचा योग्य उपयोग करून स्वतःच्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे,” असा संदेशही त्यांनी दिला.यावेळी शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.आर.व्ही.छल्लारे म्हणाले की,या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा उद्योग-व्यवसाय
सुरू करावा,हा आहे.शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन तरुणांनी रोजगारनिर्मितीबरोबरच स्वतःची आर्थिक उन्नती आणि आत्मनिर्भरता साधावी,यासाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिरुद्ध झिंझुर्डे म्हणाले की,शेती आणि शेतीशी संबंधित उद्योग केल्याशिवाय ग्रामीण भागातील तरुणांसमोर पर्याय नाही.तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळून स्वतःच्या पायावर उभे राहावे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी राज्यात दुग्ध व्यवसायाला मोठी संधी निर्माण झाली असून जिल्ह्यात धवलक्रांती घडविण्याची गरज असल्याचे सांगितले. जिल्हा अग्रणी बँकेचे कैलास तावडे यांनी विविध योजनांच्या माध्यमातून पशुपालन व्यवसाय सुरू करता येतो.व्यवसायासाठी आवश्यक कर्ज व आर्थिक सहकार्यासाठी बँकशेतकरी व तरुणांच्या पाठीशी राहील, असे मार्गदर्शन केले.मार्गदर्शक विष्णू पिवळ यांनी शेळीपालन हा शेतकऱ्यांसाठी “एटीएम”सारखा पूरक व्यवसाय ठरू शकतो, असे सांगत शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनाचे महत्त्व स्पष्ट केले.मात्र व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. व्यावसायिक व्यवस्थापक अशोक काकडे म्हणाले की, “शेतकरी पिकवू शकतो.मात्र अनेकदा विक्री व्यवस्थापनात कमी पडतो.त्यामुळे उत्पादनासोबत त्याचे योग्य मार्केटिंग करता आले पाहिजे.”बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहकांशी संवाद आणि विक्री व्यवस्थापन हे व्यवसायाच्या यशासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास भाजप ज्येष्ठ नेते भगवान बर्वे,शिवसेना उपतालुकाप्रमुख बंटी आटोळे,सरपंच बंडू मुंढे,ग्रामपंचायत सदस्य नारायण वायाळ,हनुमान भगत,अधीक्षक संभाजी काळे,पत्रकार कीर्तिनंद गांगुर्डे,ॲड.राजेंद्र पवार,मुकेश डुचे,ॲड.मोहन रोटे,राहुल कणके,अशोक कणके,विलास मस्के,नारायण कणके,माऊली ठोंबरे,भागवत महाराज, प्रेम उढाण,नाईकवाडे,तान्हाजी धुमाळ,अजय गावडे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक, शेतकरी व मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
- कै.सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांचे किर्तन संपन्न वडवणी प्रतिनिधी : वडवणी येथील प्रतिष्ठित कुरकुटे परिवारातील कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त चौंडेश्वरी मंगल कार्यालय, वडवणी येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवकीर्तनकार ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या “शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी । विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥” या अभंगावर निरूपण करत उपस्थितांना भक्ती, संतविचार आणि जीवनाचे मर्म समजावून सांगितले. आपल्या किर्तनातून महाराजांनी संत तुकाराम महाराजांची विठ्ठल चरणी असलेली अखेरची विनवणी अत्यंत भावपूर्ण पद्धतीने मांडली. “हे देवा, माझा तुम्हाला कधीही विसर पडू देऊ नका. मी तुमच्या चरणी आहे, तुमची सेवा करणे एवढेच मला ठाऊक आहे,” असा या अभंगाचा भावार्थ त्यांनी उपस्थितांसमोर उलगडला. त्यांच्या रसाळ वाणीतून संतविचार ऐकताना उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. गंगापूजनानिमित्त कुरकुटे परिवाराच्या वतीने उपस्थितांसाठी गोड जेवणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या स्मृतीस दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “गंध असा जन्म लाभावा, देहाचा चंदन व्हावा; गंध संपला तरी, गंध दरवळत राहावा...” या भावनेतून कै. सौ. शांताबाई कुरकुटे यांच्या प्रेमळ आठवणींना उपस्थितांनी उजाळा दिला. कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या पश्चात हनुमंत कुरकुटे, दत्तात्रय कुरकुटे, डिगांबर कुरकुटे अशी तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुरकुटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील. कार्यक्रमास कुरकुटे परिवारातील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- मुप्टा बीड जिल्हा च्या वतीने तीव्र निदर्शने : शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहा: प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव) मुप्टा बीड जिल्हा च्या वतीने तीव्र निदर्शने : शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहा: प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव) बीड: (महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टिचर्स असोसिएशन.)मुप्टा चे संस्थापक सचिव प्रा. सुनील मगरे यांच्या आदेशाने व बीड जिल्हाध्यक्ष शरदराव मगर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय जिल्हा परिषद, बीड येथे तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. *प्रमुख मागण्या:* 1)कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त करण्यास कारणीभूत ऑनलाइन संच मान्यतेत टाकण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता देण्यात याव्यात. 2) इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान वर्गाच्या प्रात्यक्षिक बॅच चा कार्यभार 30 विद्यार्थ्या ऐवजी प्रति 20 विद्यार्थ्या ची बॅच प्रचलित पूर्वीसारखे कायम करावी. 3) शिक्षकांचे प्रलंबित देयके (वैद्यकीय प्रतिपूर्ती, वरिष्ठ वेतन श्रेणी फरक ,निवड श्रेणी फरक आदी.) तात्काळ अदा करावीत. 4) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी प्रस्ताव तात्काळ निकाली काढावीत. 5) 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे बंद केलेले जीपीएफ खाते तात्काळ पूर्ववत करावीत. 6) सातव्या वेतन आयोगामधील पाचवा हप्ता रोखीने अदा करावा. 7) सर्व शिक्षकांचे जीपीएफ खाते तात्काळ ऑनलाइन करून ऑनलाईन स्लिप वितरित कराव्यात . 8) अनुदान प्रचलित टप्पा वाढ देण्यात यावा. 9) सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या न्याय व हक्कासाठी संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हा सचिव प्रा. शशिकांत जावळे , जिल्हा कार्याध्यक्ष भैय्यासाहेब आदोडे ,ज्युनियर विभाग चे जिल्हाध्यक्ष नारायण घोलप, जिल्हा सचिव प्रा.संजय बागुल, माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीणकुमार तरकसे, प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद साळवे, जिल्हा सचिव शैलेश चिलवंत आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.शिक्षकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या निदर्शनास बहुसंख्येने उपस्थित राहावे.1
- *नगर परीषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड व मुख्य अभियंता औ.वि केंद्र यांनी लेखी पत्र दिल्यामुळे तुर्तास अन्नत्याग उपोषण स्थगित- भाई गौतम आगळे *नगर परीषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड व मुख्य अभियंता औ.वि केंद्र यांनी लेखी पत्र दिल्यामुळे तुर्तास अन्नत्याग उपोषण स्थगित- भाई गौतम आगळे* बीड दि. २१ (प्रतिनिधी) रोजंदारी मजदुर सेना मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेशकुमार जोगदंड यांनी बीड जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन व प्रचलित कामगार कायद्याच्या सोई सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी व औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अनुषंगिक लाभ मिळवून देण्यासाठी वीज कंत्राटी कामगार वैजनाथ पिराजी पतंगे यांनी १५ आॅगस्ट २०२६ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली होती . आज आंदोलनाचा 7 वा दिवस सुरू झाला तरी त्यांचे अन्नत्याग उपोषण सुरूच होते, जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर आज ते टोकाची भूमिका घेतील असा इशारा संघटनेच्या वतीने दिला होता. त्याची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी लेखी पत्र दिल्यामुळे सलग सात दिवस सुरू असलेले अन्नत्याग उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले, अशी माहिती कामगार नेते तथा रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत यांच्या अधिनस्थ कंत्राटदाराकडून कंत्राटी कामगारांना किमान वेतन अधिनियम व प्रचलित कामगार कायद्याच्या सोई सवलतीचा लाभ आजतागायत मिळत नाही तो मिळावा, शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासन परिपत्रक / आदेश निर्गमित केले त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करत नसल्याने त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अनुषंगिक लाभ मिळवून देण्यासाठी अन्नत्याग उपोषणाचे हत्यार उपसले होते. अखेर ७ व्या दिवशी लोकशाही मार्गाने आंदोलन केले त्याला यश मिळाले.वीज कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर मुख्य अभियंता यांनी दि . २४ ऑगस्ट २०२६ रोजी संयुक्त बैठक आयोजित केली , तर घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना येत्या १५ दिवसात त्यांचे मूलभूत अधिकार व हक्क मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद/ नगरपंचायत यांना जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी लेखी पत्र देऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाईचा प्रस्ताव आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांच्याकडे सादर केला जाईल असे लेखी पत्र दिले. नगरपरिषद बीड च्या सफाईची निविदा काढून कामगारांना लवकरच कामावर रुजू करण्यात येईल असे लेखी पत्र मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांनी दिल्यामुळे सलग ७ दिवस सुरू असलेले भाई राजेश कुमार जोगदंड यांचे अन्नत्याग उपोषण स्थगित करण्यात आले. अपर जिल्हादंडाधिकारी यांचे प्रतिनिधी महसूल सहायक शिवाजी पाटील यांनी वीज कंत्राटी कामगार वैजनाथ पतंगे यांना लिंबू सरबत दिले तर जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांचे प्रतिनिधी सुधाकर नागरगोजे, किशोर डमाले यांनी रोजंदारी मजदुर सेना मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड तथा सफाई कामगारांचे प्रतिनिधी यांना जलपान देऊन अन्नत्याग उपोषणाची सांगता केली, सदरील आंदोलनास भारतीय दलित पँथर चे संस्थापक अध्यक्ष अंबादास शिंदे सर, बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड यांनी पाठिंबा दिला होता. अशी माहिती रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.1
- शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात; राजकीय झेंडे बाजूला ठेवून हक्कांसाठी एकजूट होऊन लढा- उत्तमराव माने *शेतकरी भावा, जागा हो; कष्ट शेतकऱ्यांचे, नफा इतरांचा- उत्तमराव माने* *शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात; राजकीय झेंडे बाजूला ठेवून हक्कांसाठी एकजूट होऊन लढा- उत्तमराव माने* *शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम नाही; नफा मात्र इतरांच्या खिशात : उत्तमराव माने* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शेतीमध्ये कष्ट करून उत्पादन घेतलेल्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नसून, त्यांच्या मालाचा भाव सरकार आणि व्यापारी ठरवतात. मात्र हाच कच्चा माल प्रक्रिया करून पक्का झाल्यानंतर त्या मालाची किंमत कारखानदार आणि व्यापारी ठरवतात. ही केवळ भावनिक बाब नसून भारतीय शेती व्यवस्थेतील विसंगतीचे वास्तव उदाहरण आहे, असे मत शेतकरी नेते उत्तमराव माने यांनी व्यक्त केले. शेतकरी बाप व भाऊ पिढ्यान्पिढ्या आपल्या वडिलोपार्जित जमिनीत रात्रंदिवस कष्ट करून शेतीमाल पिकवतो. वर्षभर निसर्गाच्या संकटांचा सामना करून स्वतःजवळील भांडवल तसेच बँक व सावकार यांचे कर्ज घेऊन शेतीत गुंतवणूक करतो. त्याच्या उत्पादनातून अनेक घटकांना उत्पन्न मिळते; मात्र शेती उद्योगाचा पाया असलेल्या शेतकऱ्यालाच स्वतःकष्ट करून काढलेल्या उत्पादनाचा योग्य भाव मिळत नाही, ही भारतीय शेतकऱ्यांसमोरील मोठी शोकांतिका आहे. जमिनीची मशागत, बियाणे खरेदी, लागवड खर्च, खते, औषधे, वीज, खुरपणी व तण नियंत्रण, सिंचन, मजुरी आणि स्वतःची मेहनत यांचा हिशोब केला, तर शेतकऱ्याला शेती करणेही कठीण होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही शेतकऱ्याची हीच वास्तविक परिस्थिती असल्याचे सांगितले. अनुदान, कर्जमाफी, वीज सवलत आणि विविध योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांवर उपकार केल्याचे चित्र निर्माण करते. मात्र शेतकऱ्याला कायमस्वरूपी स्वावलंबी करण्याऐवजी त्याला मदतीवर अवलंबून ठेवण्याचे धोरण केंद्र व राज्य सरकारांकडून राबवले जात असल्याची आजतागयात परिस्थिती आहे. ऊस उत्पादक शेतकरी साखर कारखान्याचा कागदोपत्री मालक असला, तरी प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत त्याला डावलले जात आहे. कारखान्याच्या व्यवहाराबाबत शेतकऱ्यांना पुरेशी माहिती दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी जागरूक होणे गरजेचे आहे. देशातील उद्योगपतींच्या कर्जाचे पुनर्गठन केले जाते, कर्जावरील व्याज कमी केले जाते आणि विविध सवलती दिल्या जातात. वेळप्रसंगी कर्जमाफीही केली जाते. मात्र जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या कर्जाबाबत निर्णय घेताना सरकार हात आखडता घेत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “शेतकरी भावांनो, आपल्या शेतात मेहनत व कष्ट करून पिकवलेल्या मालाच्या घामाचा योग्य आर्थिक मोबदला मिळवायचा असेल, तर राजकीय झेंडे बाजूला ठेवा आणि आपल्या हक्कांसाठी एकजुटीने लढा. अन्यथा पिढ्यान्पिढ्या सरकार कोणत्याही पक्षाचे आले, तरी शेतीमालाची लूट थांबणार नाही. या फसव्या व्यवस्थेविरोधात शेतकरी भावांनो जागे होण्याची गरज आहे,”असे मत शेतकरी नेते उत्तमराव माने यांनी व्यक्त केले.3
- *‘सड़क के गड्ढे नहीं, सिस्टम का आलस भर रहे हैं’—युवा समाजसेवी प्रभाष सिंह पटेल का वायरल कारनामा!* शंकरगढ़(प्रयागराज) प्रयागराज के शंकरगढ़ में जब जर्जर सड़कों से परेशान जनता और बेपरवाह तंत्र के बीच उम्मीद की कोई किरण नहीं दिख रही थी, तब एक युवा आगे आया और उसने दिखा दिया कि जनसेवा भाषणों से नहीं, कर्मों से होती है। युवा समाजसेवी प्रभाष सिंह पटेल ने किसी सरकारी बजट या प्रशासनिक मंजूरी का इंतजार किए बिना, अपनी जेब से पैसे खर्च कर सड़क के खतरनाक गड्ढों को भरवाने की एक अनूठी और प्रेरणादायक पहल शुरू की है। सोशल मीडिया पर प्रभाष सिंह पटेल के इस कदम की चौतरफा तारीफ हो रही है। लोग उनकी तस्वीरों और वीडियो को शेयर करते हुए लिख रहे हैं—"नेता सिर्फ वादे करते हैं, लेकिन प्रभाष जैसे युवा बदलाव लाते हैं।" *क्या बोले स्थानीय लोग?* इस सड़क से गुजरने वाले दैनिक यात्रियों और ग्रामीणों के चेहरे पर राहत साफ देखी जा सकती है। लोगों का कहना है कि आए दिन इन गड्ढों की वजह से हादसे हो रहे थे। प्रभाष पटेल ने अपने निजी खर्च से गिट्टी और मौरंग मंगवाकर न सिर्फ सड़क को चलने लायक बनाया, बल्कि कई अनमोल जिंदगियों को हादसों से भी बचा लिया। *प्रशासन की नींद कब खुलेगी?* युवा समाजसेवी की इस सराहनीय पहल ने जहां एक तरफ जनता का दिल जीत लिया है, वहीं दूसरी तरफ संबंधित प्रशासनिक अधिकारियों की कार्यशैली पर भी बड़े सवाल खड़े कर दिए हैं। *सामूहिक प्रयास ही असली समाधान* प्रभाष सिंह पटेल की यह पहल एक बड़ा संदेश देती है: अगर समाज का हर नागरिक और प्रशासनिक अमला एक साथ मिलकर कदम उठाए, तो आमजन को सुरक्षित, सुगम और दुर्घटनामुक्त आवागमन मिल सकता है। प्रभाष पटेल का यह जज्बा आज के युवाओं के लिए एक मिसाल बन चुका है। सलाम है ऐसे जनसेवकों को, जो समाज को गड्ढों से निकालकर प्रगति की राह पर ले जाने का दम रखते हैं!1
- निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन. निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026. स्वच्छता निरीक्षकांच्या नियुक्ती, पदोन्नती व सेवा नियमांमधील चौकशीबाबत दिलेल्या निवेदनावर महिनाभर उलटूनही प्रशासनाने लेखी उत्तर न दिल्याने, रिपब्लिकन सेनेने आज लातूर महानगरपालिकेत अनोखे 'गांधीगिरी' आंदोलन केले. निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी आस्थापना प्रमुख अभिमन्यू पाटील यांना थेट पुष्पहार घालून प्रशासनाच्या संथ कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला. रिपब्लिकन सेनेने ३० जुलै २०२६ रोजी प्रशासनाला हे निवेदन दिले होते. परंतु, महिनाभराचा कालावधी उलटूनही महापालिकेकडून कोणतेही लेखी स्पष्टीकरण न मिळाल्याने पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या व संघटनांच्या निवेदनांना प्रशासनाने वेळेत उत्तर देणे बंधनकारक असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे लातूर जिल्हाध्यक्ष रामभाऊ कोरडे, युवक जिल्हाध्यक्ष पंकज गायकवाड, शहराध्यक्ष वैभव सुरवसे, शहर सचिव लखनजी कांबळे, सिद्धार्थ जाकते, अमित गायकवाड आणि सल्लागार पप्पूजी कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या निवेदनावर तात्काळ नियमानुसार कार्यवाही न झाल्यास येणाऱ्या काळात अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.1
- वडवणी शहरात रस्ता रोको1
- दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — पाच वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवरून इचलकरंजी पोलिसांची आरोपीच्या बाबतीत हुजरेगिरी? पीडितेच्या आईवर अरेरावी व दादागिरी; इचलकरंजी पोलिसांच्या खाकी वर्दीवर जनतेचा संताप झुंजार S C 37 NEWS OSMANABAD “दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — पाच वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवरून इचलकरंजी पोलिसांची आरोपीच्या बाबतीत हुजरेगिरी? पीडितेच्या आईवर अरेरावी व दादागिरी; इचलकरंजी पोलिसांच्या खाकी वर्दीवर जनतेचा संताप झुंजार S C 37 NEWS OSMANABAD “दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — ५ वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवर इचलकरंजी पोलिसांची अरेरावी? खाकीच्या दादागिरीवर संताप! इचलकरंजीमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलीसोबत कथितरित्या झालेल्या ‘घाणेरड्या स्पर्शा’च्या गंभीर प्रकाराने संतापाची लाट निर्माण झाली आहे. आपल्या चिमुकलीला न्याय मिळावा, यासाठी आई पोलीस ठाण्यात धाव घेते; मात्र तिथे तक्रार ऐकून घेण्याऐवजी पोलिसांकडून कथितरित्या “आम्ही दखल घेणार नाही, कोर्टात जा” असे सांगण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. या कथित प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पाच वर्षांच्या निष्पाप मुलीच्या सुरक्षेचा आणि लैंगिक अत्याचाराच्या संशयाचा प्रश्न असताना, तक्रारदार महिलेची व्यथा ऐकून घेणे आणि कायद्यानुसार आवश्यक ती प्रक्रिया करणे अपेक्षित असताना तिला थेट न्यायालयाचा मार्ग दाखवण्यात आला का, असा सवाल उपस्थित होत आहे. POCSO कायद्यांतर्गत बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांना अत्यंत गांभीर्याने हाताळण्याची गरज असते. अशा संवेदनशील प्रकरणात पीडित बालक आणि तिच्या कुटुंबाला आधार देण्याऐवजी जर पोलीस अधिकाऱ्याकडून अरेरावी झाली असेल, तर ही बाब अधिक गंभीर ठरते. आई आपल्या लेकरासाठी न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचते. तिच्या डोळ्यासमोर केवळ आपल्या पाच वर्षांच्या मुलीची सुरक्षितता आणि न्याय असतो. अशा वेळी खाकी वर्दीकडून तिला धीर, कायदेशीर मार्गदर्शन आणि संरक्षणाची अपेक्षा असते. मात्र, तक्रारच ऐकून घेण्यास नकार दिल्याचा आरोप खरा असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायासाठी दाद मागायची तरी कुणाकडे? हा प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्याने नेमके काय म्हटले, तक्रार घेण्यास नकार देण्यात आला का, घटनेबाबत कायदेशीर प्रक्रिया का सुरू झाली नाही आणि पीडित बालिकेच्या संरक्षणासाठी कोणती पावले उचलण्यात आली, याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणात दोषी कोण आहे, हे तपासातून स्पष्ट होईल; मात्र तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले असेल, तर त्या भूमिकेचीही चौकशी झालीच पाहिजे. बालकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा अरेरावी खपवून घेतली जाऊ नये. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी! विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी या कथित प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे. दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि चिमुकलीच्या कुटुंबाला आवश्यक कायदेशीर मदत मिळवून द्यावी. पाच वर्षांच्या लेकराच्या न्यायाचा प्रश्न आहे. हा प्रश्न दाबण्याचा नाही, तर सत्य बाहेर आणण्याचा आहे! खाकीचा मान राखायचा असेल तर आधी खाकीवरचा विश्वास कायम ठेवावा लागेल. #IchalkaranjiPolice #KolhapurPolice #JusticeForChild #POCSO #PoliceAccountability #KolhapurSP #IGPKolhapur #MaharashtraPolice #JusticeForVictim #ChildSafety1