प्रशिक्षणार्थी पोलीस शिपायाचा अकस्मात मृत्यू; जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रात खळबळ प्रशिक्षणार्थी पोलीस शिपायाचा अकस्मात मृत्यू; जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रात खळबळ जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलीस शिपायाचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे प्रशिक्षण केंद्रात खळबळ उडाली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, राम बबन काळे (वय २५) असे मृत्यू झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस शिपायाचे नाव आहे. ते यवतमाळ जिल्ह्यातील येथील रहिवासी असल्याचे समजते. सोमवारी (दि. ९) पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात येथे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तत्काळ हालचाल करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- जुने जे प्रकल्प आहेत ते बंद पडले आहेत त्यांना सुरू करण्यात यावे अशी मागणी हिकमत दादा उढान यांनी केली1
- Post by Parmeshor Khoje1
- जालना शहरातील आझाद मैदान परिसरात असलेल्या अंकुश कोचिंग क्लासेस येथे विजेचा धक्का लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवारी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करण मोरे (वय १८, रा. खरपुडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक कोचिंग क्लासच्या इमारतीवर टँकरद्वारे पाणी चढवण्याचे काम करत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. या प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत काही नागरिकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यातही गर्दी केली. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तसेच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.1
- जालन्यात विजेचा धक्का लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू; अंकुश कोचींग क्लासेस आझाद मैदान परिसरातील दुर्दैवी घटना1
- इसराइल और ईरान के युद्ध में भारत पर क्या असर पड़ सकता है देखें पूरी खबर नकारात्मक और सकारात्मक प्रभाव क्या हो सकते हैं1
- मां-बहन की गाली देने वालों की अब खैर नहीं! देश के भीतर इस जगह लागू हुई सख्त व्यवस्था, बच्चाें की पढ़ाई के दौरान मोबाइल-टीवी रहेंगे बंद महाराष्ट्र के अहिल्यानगर जिले के कोलगांव गांव ने एक अनोखा नियम लागू किया है. यानी अब अगर कोई व्यक्ति मां-बहन से जुड़ी गालियां देता है तो उस पर 500 रुपये का जुर्माना लगाया जाएगा. ग्राम सभा में पास हुए इस प्रस्ताव का मकसद गांव में सम्मानजनक माहौल बनाना और महिलाओं की गरिमा की रक्षा करना है. जिसकी खूब चर्चा हो रही है.समझते हैं पूरी बात.1
- तालुक्यातील मौजे बेलोरा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या फळबाग, पोखरा योजना तसेच सामाजिक वनीकरण योजनेत गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदेशीर अर्ज सादर करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, गावातील ग्रामरोजगार सहाय्यक व कृषी सहाय्यक यांनी संगनमत करून शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर फळबाग, पोखरा योजना व सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत झाडे प्रत्यक्षात न लावता अनुदान काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाची योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असताना संबंधित अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे, खोटी हजेरी व काल्पनिक अहवाल तयार करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासनाची फसवणूक होण्यासोबतच शेतकऱ्यांचाही विश्वासघात झाल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. शासनाच्या निधीचा अपहार करणे हा भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याने संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी तात्काळ चौकशी समिती नेमून सर्व कागदपत्रे व नोंदींची पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे अनुदान तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेण्यात टाळाटाळ झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.1
- मोतीबागेत कचरा जाळण्याचा प्रकरणात मानपाने कर्मचाऱ्यांवर केली करवाई पाच हजार चा दंड ठोकला1