ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन पिंपरी चिंचवड ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन September 15, 2026 Editor पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव अमृतराव शिर्के (वय ८१ वर्षे) यांचे मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) निधन झाले. शिवाजीराव शिर्के यांनी पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, फुगेवाडी ज्येष्ठ नागरिक संघ आदी संस्थांचे अध्यक्षपद भूषवले आहे. पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के यांचे ते वडील होत. तसेच ओबीसी कल्याण विभागाचे सहसंचालक प्रशांत शामराव शिर्के यांचे ते चुलते होत. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शिवाजीराव शिर्के यांनी प्रवीण प्रकाशन या संस्थेच्या माध्यमातून “महाराणी येसूबाई यांचा इतिहास” हे पुस्तक प्रकाशित केले असून या पुस्तकाला ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ हे पारितोषिक मिळाले आहे. तसेच ‘राजे शिर्के घराण्याचा इतिहास’, ‘कृष्णाकाठ ते पवनाकाठ’ हे आत्मचरित्र कालभैरव, शिरकाण आदी पुस्तके आणि अनेक कवितासंग्रह प्रकाशित केले आहेत. सातारा जिल्ह्यातील उद्योजकांचा परिचय करून देणारे ‘सातारचे रत्न’ हे देखील त्यांचे गाजलेले पुस्तक आहे. ‘पराचा कावळा’, ‘ही पैशाची किमया’ आदी नाटकांचेही त्यांनी लेखन केले आहे. शिवाजीराव शिर्के यांचा अंत्यविधी उद्या बुधवारी सकाळी १०:३० वाजता, फुगेवाडी स्मशानभूमी येथे होणार आहे.

- मदन बाफनांच्या निधनाने मावळच्या राजकीय सामाजिक क्षेत्राची मोठी हानी - वळसे पाटील... पिंपरी चिंचवड : माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनाने मावळच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अल्पसंख्याक समाजातून पुढे येत त्यांनी मावळात काँग्रेसची विचारधारा जपली. पंचायत समिती सभापती ते जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि राज्याचे मंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली. सर्व समाजघटकांशी आपुलकीचे संबंध असलेले मदन बाफना शेवटपर्यंत समाजकार्यात सक्रिय होते. त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत दिलीप वळसे पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली... : दिलीप वळसे पाटील - राष्ट्रवादी नेते #मदनबाफना #दिलीपवळसेपाटील #मावळ #मावळराजकारण #मावळबातम्या #राजकीयबातम्या #सामाजिकक्षेत्र #श्रद्धांजली #माजीमंत्री #काँग्रेस #पिंपरीचिंचवड #पुणेबातम्या #महाराष्ट्रराजकारण #Thenayaknews #TheNayakNews1
- वडगाव बुद्रुक मध्ये बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. नमस्कार क्षत्रिय कार्यालय सिंहगड रोड, आयुक्त साहेब यांस, 16 Sept 2026 नमस्कार.. विषय . वडगाव बुद्रुक मध्ये बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. नमस्कार साहेब मी आपणाला 12 तारखेला सांगितले होते वडगाव बुद्रुक मध्ये स्वच्छता मोहीम राबवणे राबवण्यात यावी.. आज आमच्या दारामध्ये एक बेवारशी कुत्र तडफडत आहे. कृपया आपण गावांमधील बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अजूनही आपले कर्मचारी आजूबाजूच्यांनी टाकलेला दारातला कचरा घेऊन गेलेले नाहीत. माझा पत्ता... पोतनीस, 51/2A गुरुकृपा निवास, वडगाव बुद्रुक ,पांचाली स्वीट्स दुकानाच्या मागे, नारायण जनरल स्टोअर जवळ. पुणे 411041.3
- "दुष्काळाच्या ज्या उपायोजना कराव्या लागतात त्याची तयारी आम्ही सुरू केली...!"1
- को.ढव्यात घरफोडी करणाऱ्या ५९ वर्षीय महिलेच्या मुसक्या आवळल्या; ₹३.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त1
- हलवाई चौक गणेश मंडळातर्फे चार शिक्षकांचा ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्काराने सन्मान शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}समाजात विधायक परिवर्तन घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानदानाबरोबरच समाजहिताच्या उपक्रमांत शिक्षकांचा सहभाग मोलाचा असतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती शिक्षक पुरस्काराने सन्मानित आदर्श शिक्षक हरिभाऊ नाथू पानसरे यांनी केले. श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हरिभाऊ पानसरे, साधना संजय शितोळे, संजय पंढरीनाथ वेदपाठक आणि जयश्री ज्ञानेश्वर दांडगे यांना ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे व शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष सुकुमार बोरा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पानसरे म्हणाले, “यशासाठी कष्ट, अभ्यास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. शिस्त, नियमित व्यायाम अंगीकारून आळसापासून दूर राहिले पाहिजे.” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार व शिष्यवृत्तीची दिशा देत तसेच मुलींच्या शिक्षणासाठी जनजागृती, शाळा उभारणी व समाजकार्याला हातभार लावणाऱ्या पानसरे यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. साधना शितोळे यांनी शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन असून शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात, असे सांगितले. संजय वेदपाठक यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर माफक प्रमाणात करावा तसेच दैनंदिन जीवनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करावा, असे मार्गदर्शन केले. संगणक शिक्षण क्षेत्रात ३५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थ्यांनी संगणक शिक्षण घेतले आहे. सुकुमार बोरा म्हणाले, ज्ञानदान केल्याने ज्ञान वाढते. शिक्षकांनी सतत कार्यमग्न, कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि क्षमाशील राहून विद्यार्थ्यांमध्ये सद्गुणांची पेरणी करावी. परिवर्तनवादी शिक्षणातून विद्यार्थ्यांना जीवनाची योग्य दिशा मिळते. हलवाई चौक गणेश मंडळाचा ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्कार उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर व प्राचार्य डॉ. समीर ओंकार, जयश्री दांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त मंडळाच्या वतीने ३० हून अधिक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला असून, सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रम वर्षभर राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मयूर काळे, माजी उपनगराध्यक्ष डॉ. वसंत पानसरे, माजी नगरसेविका राजश्री पानसरे, माजी सभापती प्रदीप बारवकर, राजेंद्र जाधवराव, माजी अध्यक्ष रणजीत गायकवाड, प्रेम मुसळे, अशोक काळे, सिकंदर मणियार, महेंद्र डेरे, उषादेवी बढे, डॉ. क्रांती पैठणकर, राहुल निकुंभ, विजय शेजवळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शितल ढवळे यांनी केले तर आभार मयूर काळे यांनी मानले.4
- मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना जरांगे पाटील यांच्या मोर्चा मध्ये बहु संख्येने मराठा बांधव मोर्चा मध्ये सामील मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना1
- बारामती शहर पोलिसांनी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले ऑपरेशन मॉक ड्रिल द्वारे बस स्थानकावर झाली धावपळ..1
- ६० वर्षांची साथ तुटली; मदन बाफनांच्या आठवणींना शरद पवारांचा उजाळा... पिंपरी चिंचवड : माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. गेली ६० वर्षे बाफना आपल्यासोबत होते, त्यांच्यासोबतची साथ शेवटपर्यंत लाभली, अशी आठवण पवारांनी सांगितली. सरपंच ते मंत्री असा त्यांचा कर्तृत्ववान प्रवास होता. आता त्यांचे पुत्र गणेश बाफना वडिलांचा वारसा पुढे नेतील आणि त्यांच्या पाठीशी आपण कायम राहू, असंही शरद पवार म्हणाले... : शरद पवार - राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी अध्यक्ष्य #मदनबाफना #शरदपवार #मदनबाफनानिधन #पुणे #पिंपरीचिंचवड #मावळ #राष्ट्रवादीकाँग्रेस #SharadPawar #MadanBafna #MaharashtraPolitics #Thenayaknews #TheNayakNews1