logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गुटखा माफियांवर एस्कॉर्ट पथकाची कारवाई ; ९५ हजारांचा माल जप्त वाडी-मानकापुरात मध्यरात्री चार ठिकाणांवर छापे; तिघांवर गुन्हे नागपूर, ता. १७ : शासनाने बंदी घातलेल्या सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचे पुन्हा समोर आले आहे. एस्कॉर्ट पथकाने वाडी आणि मानकापुरात धडाकेबाज कारवाई करीत गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि खर्रा बनविण्याच्या मशिनीसह तब्बल ९५ हजार १६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाडीतील सोनबा नगर, खडगाव रोडवरील गोडावूनवर मध्यरात्री छापा टाकण्यात आला. तेथून विमल, राजश्री, पानपराग, केपी ब्लॅक, किंग, डबल ब्लॅक आदी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ तसेच ११ हजार रुपये रोख असा ३२ हजार ९५६ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. अशोक गोपालराव कडू (६४) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर मानकापुरातील बोखारा रोडवरील गोलू पान सेंटर आणि कान्हा पान पॅलेसवर छापा टाकण्यात आला. दुर्गादास मलवे आणि योगेश बोंद्रे यांच्या ताब्यातून गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ व खर्रा बनविण्याच्या मशिनीसह ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोलू पान सेंटरचा मालक प्रफुल्ल भिष्णुरकर कारवाईपूर्वी पसार झाला. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 hr ago
user_Cb
Cb
नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
1 hr ago
4d783d15-b97b-48e3-92a6-9b406718db61

गुटखा माफियांवर एस्कॉर्ट पथकाची कारवाई ; ९५ हजारांचा माल जप्त वाडी-मानकापुरात मध्यरात्री चार ठिकाणांवर छापे; तिघांवर गुन्हे नागपूर, ता. १७ : शासनाने बंदी घातलेल्या सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचे पुन्हा समोर आले आहे. एस्कॉर्ट पथकाने वाडी आणि मानकापुरात धडाकेबाज कारवाई करीत गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि खर्रा बनविण्याच्या मशिनीसह तब्बल ९५ हजार १६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाडीतील सोनबा नगर, खडगाव रोडवरील गोडावूनवर मध्यरात्री छापा टाकण्यात आला. तेथून विमल, राजश्री, पानपराग, केपी ब्लॅक, किंग, डबल ब्लॅक आदी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ तसेच ११ हजार रुपये रोख असा ३२ हजार ९५६ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. अशोक गोपालराव कडू (६४) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर मानकापुरातील बोखारा रोडवरील गोलू पान सेंटर आणि कान्हा पान पॅलेसवर छापा टाकण्यात आला. दुर्गादास मलवे आणि योगेश बोंद्रे यांच्या ताब्यातून गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ व खर्रा बनविण्याच्या मशिनीसह ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोलू पान सेंटरचा मालक प्रफुल्ल भिष्णुरकर कारवाईपूर्वी पसार झाला. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वर्धा ट्राफिक टीम आर्वी दाखल 18 वयापेक्षा कमी गाडी चालवणारे यांना चालन
    1
    वर्धा ट्राफिक टीम आर्वी दाखल 18 वयापेक्षा कमी गाडी चालवणारे यांना चालन
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    59 min ago
  • राजा गांव ग्रामीण अस्पताल का कारनामा आया सामने, जनप्रतिनिधियों का ध्यान नहीं !
    1
    राजा गांव ग्रामीण अस्पताल का कारनामा आया सामने, जनप्रतिनिधियों का ध्यान नहीं !
    user_Nitesh Babu Agase
    Nitesh Babu Agase
    Local News Reporter तिरोडा, गोंदिया, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, महागाव तालुक्यातील शिरपुली व परिसरात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन कापूस यासह खरीप पिके करपू लागली आहेत. पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने यवतमाळ जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी सचिन उबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे
    1
    शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी,
शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी,
महागाव तालुक्यातील शिरपुली व परिसरात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन कापूस यासह खरीप पिके करपू लागली आहेत. पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने यवतमाळ जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी सचिन उबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • साकरीटोला येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये गणित शिक्षिका नसल्याने 'तालाठोको' आंदोलन; पालकांच्या तीव्र रोषानंतर मार्ग निघाला नमस्कार, 'सत्य को जानो न्यूज' मध्ये आपले स्वागत आहे. सालेकसा / साकरीटोला : सातगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साकरीटोला येथील जिल्हा परिषद हायस्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात गणित विषयाच्या शिक्षिका धुवाधपाडे मॅडम यांची चार महिन्यांपूर्वी अन्यत्र बदली करण्यात आली होती. त्यानंतर शाळेत नियमित गणित शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. आगामी १५ दिवसांत प्रथम सत्र परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या विरोधात आज संतप्त विद्यार्थी, पालक, शाळा सुधार समिती व व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेला कुलूप लावून 'तालाठोको' आंदोलन पुकारण्यात आले. प्रतिक्रिया व भूमिका: वंदनाताई काळे (जिल्हा परिषद सदस्य, कारूटोला क्षेत्र): आंदोलनादरम्यान प्रतिक्रिया देताना जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई काळे म्हणाल्या की, धुवाधपाडे मॅडम या साकरीटोला शाळेत ९ वी आणि १० वीच्या गणित विषयासाठी कार्यरत असताना त्यांना नियमबाह्यरीत्या जाम्यातिम्या हायस्कूल येथे नेण्यात आले. शिक्षण सेवकाने किमान तीन वर्षे एका ठिकाणी सेवा देणे बंधनकारक असताना अवघ्या काही महिन्यांत अशी तदर्थ बदली करणे नियमबाह्य आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या आदेशाचीही शाळेच्या मुख्याध्यापकांनी अंमलबजावणी न केल्यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले, असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षण अधिकारी, पंचायत समिती कार्यालय सालेकसा: या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, साकरीटोला शाळेत पालक व व्यवस्थापन समितीने आंदोलन करून शाळा बंद केल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने दखल घेतली. धुवाधपाडे मॅडम यांची सेवा यापूर्वी जाम्यातिम्या येथील हायस्कूलमध्ये संलग्न करण्यात आली होती, परंतु पालकांच्या तीव्र मागणीनुसार त्यांचे ते आदेश रद्द करण्यात आले असून, त्या लवकरच साकरीटोला शाळेत पुन्हा रुजू होणार आहेत. पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे मनोगत: आंदोलनानंतर प्रशासनाकडून तात्काळ दखल घेतल्यामुळे आणि पालकांच्या व शाळा समितीच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या गणित विषयाच्या शिक्षक नियुक्तीची मागणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. याबद्दल पालक वर्ग व शाळा समितीच्या वतीने समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानण्यात आले. – अमगाव तालुका प्रतिनिधी, स्वराज्यदूत / संपादक, सत्य को जानो न्यूज
    1
    साकरीटोला येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये गणित शिक्षिका नसल्याने 'तालाठोको' आंदोलन; पालकांच्या तीव्र रोषानंतर मार्ग निघाला
नमस्कार, 'सत्य को जानो न्यूज' मध्ये आपले स्वागत आहे.
सालेकसा / साकरीटोला : सातगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साकरीटोला येथील जिल्हा परिषद हायस्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात गणित विषयाच्या शिक्षिका धुवाधपाडे मॅडम यांची चार महिन्यांपूर्वी अन्यत्र बदली करण्यात आली होती. त्यानंतर शाळेत नियमित गणित शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. आगामी १५ दिवसांत प्रथम सत्र परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या विरोधात आज संतप्त विद्यार्थी, पालक, शाळा सुधार समिती व व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेला कुलूप लावून 'तालाठोको' आंदोलन पुकारण्यात आले.
प्रतिक्रिया व भूमिका:
वंदनाताई काळे (जिल्हा परिषद सदस्य, कारूटोला क्षेत्र): आंदोलनादरम्यान प्रतिक्रिया देताना जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई काळे म्हणाल्या की, धुवाधपाडे मॅडम या साकरीटोला शाळेत ९ वी आणि १० वीच्या गणित विषयासाठी कार्यरत असताना त्यांना नियमबाह्यरीत्या जाम्यातिम्या हायस्कूल येथे नेण्यात आले. शिक्षण सेवकाने किमान तीन वर्षे एका ठिकाणी सेवा देणे बंधनकारक असताना अवघ्या काही महिन्यांत अशी तदर्थ बदली करणे नियमबाह्य आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या आदेशाचीही शाळेच्या मुख्याध्यापकांनी अंमलबजावणी न केल्यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले, असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
शिक्षण अधिकारी, पंचायत समिती कार्यालय सालेकसा: या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, साकरीटोला शाळेत पालक व व्यवस्थापन समितीने आंदोलन करून शाळा बंद केल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने दखल घेतली. धुवाधपाडे मॅडम यांची सेवा यापूर्वी जाम्यातिम्या येथील हायस्कूलमध्ये संलग्न करण्यात आली होती, परंतु पालकांच्या तीव्र मागणीनुसार त्यांचे ते आदेश रद्द करण्यात आले असून, त्या लवकरच साकरीटोला शाळेत पुन्हा रुजू होणार आहेत.
पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे मनोगत: आंदोलनानंतर प्रशासनाकडून तात्काळ दखल घेतल्यामुळे आणि पालकांच्या व शाळा समितीच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या गणित विषयाच्या शिक्षक नियुक्तीची मागणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. याबद्दल पालक वर्ग व शाळा समितीच्या वतीने समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानण्यात आले.
– अमगाव तालुका प्रतिनिधी, स्वराज्यदूत / संपादक, सत्य को जानो न्यूज
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • भजियापार टोला येथे गणेशोत्सवानिमित्त समाजप्रबोधनातून एकतेचा संदेश गोंदिया आमगांव:भजियापार टोला, ता. आमगाव, जि. गोंदिया : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त भजियापार टोला येथील भजियापार नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने विविध सार्वजनिक व समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये एकता, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचा संदेश देण्यात आला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा मजबूत करण्यासोबतच विविध सामाजिक विषयांवर नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष गौरव रहांगडाले, उपाध्यक्ष मोहित रहांगडाले, सचिव आदित्य रहांगडाले यांच्यासह गावातील ज्येष्ठ नेते राधेलाल रहांगडाले, शितल चौधरी, तीलकचंद कटरे, मेघराज चौधरी ,केशरी रहांगडाले तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘एकता आणि सामाजिक जनजागृती’ हा संदेश देण्याचा मंडळाचा उपक्रम ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला.
    1
    भजियापार टोला येथे गणेशोत्सवानिमित्त समाजप्रबोधनातून एकतेचा संदेश
गोंदिया आमगांव:भजियापार टोला, ता. आमगाव, जि. गोंदिया : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त भजियापार टोला येथील भजियापार नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने विविध सार्वजनिक व समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये एकता, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचा संदेश देण्यात आला.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा मजबूत करण्यासोबतच विविध सामाजिक विषयांवर नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष गौरव रहांगडाले, उपाध्यक्ष मोहित रहांगडाले, सचिव आदित्य रहांगडाले यांच्यासह गावातील ज्येष्ठ नेते राधेलाल रहांगडाले, शितल चौधरी, तीलकचंद कटरे, मेघराज चौधरी ,केशरी रहांगडाले तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘एकता आणि सामाजिक जनजागृती’ हा संदेश देण्याचा मंडळाचा उपक्रम ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला.
    user_तामेश्वर पंधरे पत्रकार
    तामेश्वर पंधरे पत्रकार
    Media company आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • १६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;
    1
    १६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • अमरावतीत गणेश विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी; २२ कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था
    1
    अमरावतीत गणेश विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी; २२ कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • पोंभुर्ण्यात मोदींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती! ‘सेवा संकल्प अभियान’ाचा शुभारंभ | Chandrapur Nagari पोंभुर्ण्यात मोदींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती! ‘सेवा संकल्प अभियान’ाचा शुभारंभ | Chandrapur Nagari
    1
    पोंभुर्ण्यात मोदींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती!  ‘सेवा संकल्प अभियान’ाचा शुभारंभ | Chandrapur Nagari
पोंभुर्ण्यात मोदींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती!  ‘सेवा संकल्प अभियान’ाचा शुभारंभ | Chandrapur Nagari
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • वनहक्क दाव्यांना आता गती; १७ सप्टेंबरपासून राज्यभर विशेष अभियान वनहक्क दाव्यांना आता गती; १७ सप्टेंबरपासून राज्यभर विशेष अभियान पात्र वनपट्टेधारकांना ‘७/१२ ई’ उतारे देण्यास शासनाची कालबद्ध मोहीम; २ ऑक्टोबरपर्यंत दावे निकाली काढण्याचे उद्दिष्ट मुंबई : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वनहक्क दाव्यांच्या निपटाऱ्याला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यभर विशेष अभियान हाती घेतले आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत पात्र वनहक्कधारकांना वनहक्क अभिलेख उपलब्ध करून देण्यासह संबंधित नोंदी अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार आहे. वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची अधिकृत नोंद मिळावी, तसेच प्रलंबित दाव्यांचा कालबद्ध पद्धतीने निपटारा व्हावा, यासाठी महसूल यंत्रणेला विशेष कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वनपट्टेधारकांच्या जमिनीशी संबंधित अभिलेख दुरुस्ती आणि हक्क नोंदणीच्या प्रक्रियेला वेग येण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विशेष अभियानाचा निर्णय घेतला आहे. अभियानाच्या कालावधीत संबंधित विभागांकडून प्रलंबित वनहक्क प्रकरणांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांना आवश्यक अभिलेख उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. या मोहिमेमुळे वनहक्कधारकांना आपल्या जमिनीवरील हक्काची अधिकृत कागदोपत्री नोंद मिळण्याचा मार्ग सुकर होणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांना अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील वनहक्कधारकांसाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
    1
    वनहक्क दाव्यांना आता गती; १७ सप्टेंबरपासून राज्यभर विशेष अभियान
वनहक्क दाव्यांना आता गती; १७ सप्टेंबरपासून राज्यभर विशेष अभियान
पात्र वनपट्टेधारकांना ‘७/१२ ई’ उतारे देण्यास शासनाची कालबद्ध मोहीम; २ ऑक्टोबरपर्यंत दावे निकाली काढण्याचे उद्दिष्ट
मुंबई : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वनहक्क दाव्यांच्या निपटाऱ्याला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यभर विशेष अभियान हाती घेतले आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत पात्र वनहक्कधारकांना वनहक्क अभिलेख उपलब्ध करून देण्यासह संबंधित नोंदी अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार आहे.
वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची अधिकृत नोंद मिळावी, तसेच प्रलंबित दाव्यांचा कालबद्ध पद्धतीने निपटारा व्हावा, यासाठी महसूल यंत्रणेला विशेष कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वनपट्टेधारकांच्या जमिनीशी संबंधित अभिलेख दुरुस्ती आणि हक्क नोंदणीच्या प्रक्रियेला वेग येण्याची अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विशेष अभियानाचा निर्णय घेतला आहे. अभियानाच्या कालावधीत संबंधित विभागांकडून प्रलंबित वनहक्क प्रकरणांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांना आवश्यक अभिलेख उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
या मोहिमेमुळे वनहक्कधारकांना आपल्या जमिनीवरील हक्काची अधिकृत कागदोपत्री नोंद मिळण्याचा मार्ग सुकर होणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांना अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील वनहक्कधारकांसाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
    user_Sachin Ingale
    Sachin Ingale
    Local News Reporter Chikhaldara, Amravati•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.