शेगांवात श्रीराम जन्मोत्सवाची जोरदार तयारी; 2026 समितीची दमदार घोषणा! शेगांवात आता रामोत्सवाचा जल्लोष रंगणार! शेगावात श्रीराम जन्मोत्सवाची जोरदार तयारी; 2026 समितीची दमदार घोषणा! शेगाव : विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या पुढाकाराने श्रीराम जन्मोत्सव 2026 साठी नव्या समितीची अधिकृत घोषणा करण्यात आली. बालाजी मंदिर येथे पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते विजय यादव यांची अध्यक्षपदी, संदीप काळे यांची कार्याध्यक्षपदी, अनिल डंबरकर यांची सचिवपदी तर ज्ञानेश्वर साखरे यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीच्या घोषणेनंतर रामोत्सव यंदा भव्य, दिव्य आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शहरातील पदाधिकारी व युवकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे रामोत्सवाच्या तयारीला जोरदार सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शेगावात आता रामोत्सवाचा जल्लोष रंगणार!

- राजमाता महोत्सव 2026 ची उत्साहात सांगता; 5 दिवसांत 40 लाखांची विक्री! बुलढाणा : जिजामाता प्रेक्षागार येथे आयोजित राजमाता महोत्सव 2026 ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत सोमवारी महोत्सवाची दिमाखदार सांगता झाली. महिला बचत गटांच्या उत्पादनांना मोठी मागणी मिळून अवघ्या पाच दिवसांत तब्बल 40 लाखांहून अधिक विक्री झाली. महिला उद्योजकांच्या स्टॉल्स, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सव रंगला. उत्कृष्ट उत्पादन गटांचा सन्मान करण्यात आला असून या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला मोठी चालना मिळाल्याचे प्रशासनाने सांगितले. महिलांच्या कष्टाला बाजारपेठ — राजमाता महोत्सव ठरला यशस्वी!1
- Post by Shivaji Bhosale1
- युद्धाचं खरं कारण हे एपस्टीन फाईलच1
- छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ चिरंजीव असलेल्या संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी प्राणाची आहुती दिली. मुघल बादशहा औरंगजेब याने धर्मांतराचा दबाव टाकला, पण संभाजी महाराजांनी तो ठामपणे नाकारला आणि स्वाभिमानासाठी बलिदान दिले. म्हणूनच त्यांना “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज” म्हणून ओळखले जाते. या महान योद्ध्याला आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.1
- स्टंटबाजी बेतली जीवावर: सापाच्या दंशाने ख्यातनाम सर्पमित्राचा खामगावात दुर्दैवी मृत्यू.1
- Post by Sharad Dayedar1
- Post by सारनाथ अवचार1
- खामगाव : पोलीस स्टेशनमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या महिला आणि त्यांच्या लहान मुलांच्या सोयीसाठी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये 'हिरकणी कक्ष' सुरू करण्यात आला आहे. या अद्ययावत कक्षाचे रीतसर उद्घाटन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते पार पडले. या उपक्रमामुळे पोलीस ठाण्यात येणाऱ्या मातांना आता सुरक्षित आणि हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. महिलांच्या समस्यांचे निराकरण करताना त्यांना सन्मानजनक वातावरण मिळावे, या उद्देशाने या 'हिरकणी कक्षा'ची उभारणी करण्यात आली आहे. या कक्षाची रचना करताना विशेषतः स्वच्छता आणि सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये मातांना विश्रांती घेण्यासाठी पलंगाची व्यवस्था करण्यात आली असून, सोबत येणाऱ्या लहान मुलांचे मन रमावे यासाठी विविध प्रकारची शैक्षणिक खेळणी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी शहर पोलीस स्टेशनच्या एकूण कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्हे नियंत्रण आणि जनसेवेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध बाबींवर मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्यासह शहरातील इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या या संवेदनशील उपक्रमाचे शहरात सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.1