Shuru
Apke Nagar Ki App…
अल्पवयीन मुलाने रिक्षा चालवला; मुलाच्या बापाला काय करावे लागले...
NEWS 24 MAHARASHTRA
अल्पवयीन मुलाने रिक्षा चालवला; मुलाच्या बापाला काय करावे लागले...
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- Pune RTO Action: रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या निवेदनाची दखल; १०० खासगी बसांवर कारवाई, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दणका पुणे : शहरातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) सुमारे १०० खासगी बसांवर दंडात्मक कारवाई केली आहे. रुग्ण हक्क संघर्ष समिती, महाराष्ट्र पुणे यांच्या निवेदनाची दखल घेत ही मोहीम राबविण्यात आली असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा मोठा निर्णय मानला जात आहे. शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असून, रेल्वे आणि एसटीसोबतच खासगी ट्रॅव्हल्सकडे मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गांवर धावणाऱ्या खासगी बसांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. रुग्ण हक्क संघर्ष समितीचे संस्थापक प्रमुख डॉ. विश्वासराव पंडित आणि प्रदेशाध्यक्ष संजय बवळेकर यांनी दिनांक १३/०३/२०२६ रोजी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते. या निवेदनात पुणे शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. निवेदनात असे नमूद करण्यात आले की, काही वाहन वितरकांकडून नवीन वाहने नोंदणी न करता थेट ग्राहकांच्या ताब्यात दिली जात आहेत. तसेच बाहेरील राज्यातील नोंदणी असलेल्या वाहनांद्वारे (ट्रॅव्हल्स) पुणे शहर व जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. या प्रकरणात Dhone Automobile Pune यांच्याविरोधातही तक्रार करण्यात आली होती. संबंधित प्रकरणात २०१६ मध्ये वाहन नोंदणी न करता ग्राहकाला वाहन देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली होती. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे (डॉ. आंबेडकर रोड, संगम पुलाजवळ, पुणे – ४११००१) यांनी दिनांक २०/०४/२०२६ रोजी आदेश काढत संबंधित प्रकरणात तपासणी करून दोषी वाहनांवर मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले. या आदेशानुसार, पुणे शहर व जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच बाहेरील राज्यातील नोंदणी असलेल्या ट्रॅव्हल्स वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे १०० खासगी बसांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, या कारवाईमुळे खासगी ट्रॅव्हल्स व्यवसायात खळबळ उडाली असून, पुढील काळातही अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तसेच संबंधित वाहन वितरक आणि नियम मोडणाऱ्या घटकांवरही कारवाई करण्याची मागणी रुग्ण हक्क संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी RTOची ही मोहीम महत्त्वाची ठरत असून, नागरिकांकडूनही या कारवाईचे स्वागत केले जात आहे.1
- पिंपरी चिंचवड :- महापालिका शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आरटीई RTE प्रवेश प्रक्रिया गेल्या आठ दिवसांपासून संथगतीने सुरू आहे. शहराचे तापमान ४२ अंशांवर गेलेले असताना, भर उन्हात ताटकळत उभे राहूनही पालकांच्या पदरी निराशा पडत आहे. आतापर्यंत केवळ ३० टक्के अर्जांचा निपटारा झाला असून, या विलंबाबाबत राज्य शासनाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे... आकुर्डीतील कै. फकीर भाई पानसरे उर्दू शाळा आणि पिंपरीतील कर्मवीर भाऊराव पाटील केंद्र या दोन्ही ठिकाणी कागदपत्र पडताळणीमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दोन केंद्रांवर मिळून केवळ १,१९४ अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. समितीने मोठ्या संख्येने अर्ज प्रलंबित ठेवल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. दरम्यान राज्य शिक्षण विभागाने याची दखल घेतली असून, महापालिकेला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता प्रशासकीय स्तरावर हालचाली होऊन पालकांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....2
- शासनाचे टँकर जनतेसाठी नहीं तर पत्रकारांच्या घरात झोपडीत आलेले टँकर प्रायव्हेट सोसायटी मधे विकले जातात विकले जातात भर उन्हाळा मधे जनतेला पाणी नहीं गरिबांच्या हक्काचे टँकर विकले जातात1
- Solitaire PANAMER TOWER GANGA DHAM pune आत पार्किंग असताना बाहेर लावायला सांगितले मनोज पाटील सर या सोसायटी वाल्यामुळे अशा गाड्या बाहेर लागत असेल तर पुढे ट्रॅफिक चं खूप अवघड आहे. आणि आमच्या गाडी बाहेर लावून आम्ही पार्सल द्याला गेलो चलन टाकला किंवा गाडी उचलून नेली किंवा ऑर्डर कोणी उचलून नेला जबाबदार कोण घेणार आहे. सोसायटी वाले किंवा वोचमन नुकसान भरपाई देणार आहे का? सोसायटी वाले जबाबदारी घेणार आहे का? सोसायटी वाले चलन चे पैसे भरणार आहे का? सोसायटी वाले ओर्डर चे नुकसान भरपाई देणार आहे का? याचा उत्तर मनोज पाटील सरांनी द्यावा लागेल गाड्या बाहेर लावण्याऱ्या सोसायटीचे नाव 1)TREASURE PARK अर्नेश्वर 2)Solitaire PANAMER TOWER GANGA DHAM 3)Kohinoor Jeeva, बिबवेवाडी 4)GAGAN GALAXY opp GANGA DHAM PHASE-2, 5)GANGA DHAM PHASE-1, 6)shimmer shine सिंहगड रोड 7)RajGruhi Residency कोंढवा 8)Sunshree Gold, NIBM Road, Kondhwa 9) Sangam Park mahrshi Nagar 10) Gagan Vihar Ganga Dham Phase 2 11) Meghsparsh Society Ambegaon BK, Pune 12) Familia Telco Colony Datta Nagar 13)Basil Amora, Jambhulwadi 14)Raghunandan Hingane Hkurd 15) Raheja vistas Premiere Phase 4 Mohammed Wadi 16) TCG Panorama Ambegaon 17) Bharati Vidyapeeth hospital katraj भारती विद्यापीठ हॉस्पिटल च्या आत मध्ये फक्त कर्मचारी ची गाड्या असेल किंवा रुग्णवाहिका असेल तरच आत पार्किंग दिली जाते. नाही तर पेशंट नातेवाईक ची गाड्या किंवा पार्सल वाले म्हणा त्यांना पार्किंग दिली जात नाही. पार्सल वाल्यांना दोन मिनिटे सुद्धा गाडी सोडता येत नाही. अशी परिस्थिती आहे. भारती विद्यापीठ हॉस्पिटल सोडून इतर हॉस्पिटलच्या आत मध्ये पार्किंग देतात1
- भोर शहरातील वाघजाईनगर मागील डोंगराला अज्ञाताने लावली आग भोर दि.२३ भोर शहराच्या दक्षिणेकडील वाघजाई नगर ,संजय नगर रहिवासी वस्ती मागील डोंगराला अज्ञाताने आज संध्याकाळी 7 च्या दरम्यान आग लावल्याचे निदर्शनास आले.तासाभरात आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग दूरवर पसरल्याने आगीत जैवविविधता धोक्यात आल्याने अनेक पशू पक्षी मृत पावल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.मात्र रहिवासी वस्ती जवळ आग लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून आग लावणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- Post by मन्सूर शेख1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1