धर्माचार्य ह.भ.प. महेंद्र महाराज मस्के यांची महाराष्ट्र विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती करण्याची मागणी धर्माचार्य ह.भ.प. महेंद्र महाराज मस्के हे महाराष्ट्रातील एक प्रभावी, अभ्यासू व बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून त्यांनी आपले संपूर्ण जीवन धर्म, समाज व राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले आहे. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही सनातन धर्माचा प्रभावी प्रचार व प्रसार केला आहे. एक युवा कीर्तनकार म्हणून वारकरी संप्रदायात त्यांचा विशेष दबदबा असून, त्यांच्या प्रखर व विचारप्रवर्तक भूमिकेमुळे ते समाजात प्रेरणास्थान बनले आहेत. “सुप्रिया सुळे यांनी माझा विठ्ठल” या संदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीत त्यांनी वारकरी म्हणून अत्यंत जबाबदारीची व संयमी भूमिका बजावत सामाजिक संतुलन राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. महेंद्र महाराज मस्के हे धनगर समाजातून येत असल्यामुळे महाराष्ट्रातील तांड्या-वाडीतील धनगर समाजाशी त्यांचा थेट व जिव्हाळ्याचा संपर्क आहे. तसेच वंजारी, मराठा व इतर ओबीसी समाजघटकांमध्येही त्यांचा प्रभावी जनसंपर्क असून हजारो युवकांशी त्यांचा सातत्यपूर्ण संवाद आहे. महाराष्ट्रातील येलदरी, सिद्धेश्वर आणि इसापूर या धरण प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या सुमारे साडेआठ हजार कुटुंबांच्या न्यायासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केले आहे. धरणग्रस्तांच्या हक्कांसाठी त्यांनी उभा केलेला लढा हा त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा उत्तम नमुना आहे. भाजपाचे कार्य ते पूर्णतः निरपेक्ष व निष्ठेने करत असल्यामुळे अनेकदा त्यांना विरोधालाही सामोरे जावे लागले आहे. विशेषतः, त्यांच्या ठाम भूमिकेमुळे व निस्वार्थ कार्यपद्धतीमुळे काही विरोधी घटकांकडून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला देखील करण्यात आला होता. तथापि, अशा गंभीर प्रसंगानंतरही त्यांनी कोणतीही भीती न बाळगता समाजसेवा, धर्मकार्य व जनहितासाठीची आपली वाट अविरतपणे सुरू ठेवली. त्यांच्या या धैर्य, निष्ठा व समर्पणामुळे ते समाजासाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरले आहेत. तसेच विविध सामाजिक, धार्मिक व संघटनात्मक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत त्यांनी समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कार्य केले आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व संयमी, प्रेमळ व अभ्यासू असून त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करत संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केले आहे. अशा या समर्पित, निस्वार्थी व कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्र विधान परिषदेसारख्या व्यासपीठावर संधी दिल्यास त्यांच्या अनुभवाचा व कार्यक्षमतेचा राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा उपयोग होईल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. म्हणून आपणांनी या निवेदनाची सहानुभूतीपूर्वक दखल घेऊन धर्माचार्य ह.भ.प. महेंद्र महाराज मस्के यांची महाराष्ट्र विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती करण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा, आशी मागणी होत आहे
धर्माचार्य ह.भ.प. महेंद्र महाराज मस्के यांची महाराष्ट्र विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती करण्याची मागणी धर्माचार्य ह.भ.प. महेंद्र महाराज मस्के हे महाराष्ट्रातील एक प्रभावी, अभ्यासू व बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून त्यांनी आपले संपूर्ण जीवन धर्म, समाज व राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले आहे. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही सनातन धर्माचा प्रभावी प्रचार व प्रसार केला आहे. एक युवा कीर्तनकार म्हणून वारकरी संप्रदायात त्यांचा विशेष दबदबा असून, त्यांच्या प्रखर व विचारप्रवर्तक भूमिकेमुळे ते समाजात प्रेरणास्थान बनले आहेत. “सुप्रिया सुळे यांनी माझा विठ्ठल” या संदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीत त्यांनी वारकरी म्हणून अत्यंत जबाबदारीची व संयमी भूमिका बजावत सामाजिक संतुलन राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. महेंद्र महाराज मस्के हे धनगर समाजातून येत असल्यामुळे महाराष्ट्रातील तांड्या-वाडीतील धनगर समाजाशी त्यांचा थेट व जिव्हाळ्याचा संपर्क आहे. तसेच वंजारी, मराठा व इतर ओबीसी समाजघटकांमध्येही त्यांचा प्रभावी जनसंपर्क असून हजारो युवकांशी त्यांचा सातत्यपूर्ण संवाद आहे. महाराष्ट्रातील येलदरी, सिद्धेश्वर आणि इसापूर या धरण प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या सुमारे साडेआठ हजार कुटुंबांच्या न्यायासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केले आहे. धरणग्रस्तांच्या हक्कांसाठी त्यांनी उभा केलेला लढा हा
त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा उत्तम नमुना आहे. भाजपाचे कार्य ते पूर्णतः निरपेक्ष व निष्ठेने करत असल्यामुळे अनेकदा त्यांना विरोधालाही सामोरे जावे लागले आहे. विशेषतः, त्यांच्या ठाम भूमिकेमुळे व निस्वार्थ कार्यपद्धतीमुळे काही विरोधी घटकांकडून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला देखील करण्यात आला होता. तथापि, अशा गंभीर प्रसंगानंतरही त्यांनी कोणतीही भीती न बाळगता समाजसेवा, धर्मकार्य व जनहितासाठीची आपली वाट अविरतपणे सुरू ठेवली. त्यांच्या या धैर्य, निष्ठा व समर्पणामुळे ते समाजासाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरले आहेत. तसेच विविध सामाजिक, धार्मिक व संघटनात्मक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत त्यांनी समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कार्य केले आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व संयमी, प्रेमळ व अभ्यासू असून त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करत संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केले आहे. अशा या समर्पित, निस्वार्थी व कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्र विधान परिषदेसारख्या व्यासपीठावर संधी दिल्यास त्यांच्या अनुभवाचा व कार्यक्षमतेचा राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा उपयोग होईल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. म्हणून आपणांनी या निवेदनाची सहानुभूतीपूर्वक दखल घेऊन धर्माचार्य ह.भ.प. महेंद्र महाराज मस्के यांची महाराष्ट्र विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती करण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा, आशी मागणी होत आहे
- महापौर सय्यद इकबाल ॲक्शन मोडवर; शंकरनगर डीपी प्रश्न तासाभरात निकाली नागरिकांनी मानले आभार1
- Post by Today One Live1
- वादळी पावसाचा तडाखा; हिमायतनगर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान हिमायतनगर शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. 🌳 अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद ⚡ विजवाहिनी तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित 🌙 नागरिकांना रात्रभर अंधारातच काढावी लागली 🌾 शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान 🥭 आंबा, चिकू फळबागांना फटका 🌾 उन्हाळी ज्वारी, वैरण जमीनदोस्त 🌾 काढणीस आलेले गहू धोक्यात उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांवर संकटाचे ढग दाटले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. 🙏 शेतकऱ्यांना लवकर मदत मिळो हीच अपेक्षा #Himayatnagar #RainAlert #StormDamage #FarmersLoss #Agriculture MaharashtraNews BreakingNews WeatherUpdate SupportFarmers NNLDigitalMedia1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा स्वर्गीय बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार शुक्रवारी प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे यांच्या हस्ते प्रसिद्ध चित्रपट निर्माती दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला हा सोहळा परतुर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी कवी दासू वैद्य, संस्थेचे सचिव कपिल भैया आकात, प्राचार्य भारत खांदारे यांच्यासह सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.1
- छत्रपती संभाजीनगर येथील संपादक व पत्रकार रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा, तसेच संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनानुसार, दरेकर यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्थावर-जंगम मालमत्तेबाबत पुराव्यानिशी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 352, 353(2), 356(2), 67 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप आहे. हा गुन्हा खोटा असून पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणात फिर्यादी पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले असून, हा प्रकार दबावतंत्राचा भाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दरेकर यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे. शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवल्यामुळेच दरेकर यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, त्यांनी विविध प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार उघड केल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित गुन्हा रद्द न केल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा मंठा येथील पत्रकारांनी निवेदनाद्वारे दिला आहे.1
- शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलनाला वाढता पाठिंबा! छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला आता महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ यांचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. महासंघाने अधिकृत पत्र देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना समर्थन दर्शवले असून, “आम्ही तुमच्या सोबत आहोत” असा ठाम विश्वास दिला आहे. यामुळे आंदोलनाला नवी ताकद मिळाली असून, शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जय शिवराय! 🚩 #शिवराय #ShivajiMaharaj #Himayatnagar #Andolan #Maratha KunbiMaratha Support Maharashtra BreakingNews SocialUpdate1
- परभणी महापालिका जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वनाथ गोबाडे यांची निवड1