दिव्यांग भवन फाउंडेशनच्या द्विवार्षिक विशेषांकाचे दिव्यांग आज झाले प्रकाशन पिंपरी ता. १५ पिंपरी-चिंचवड शहरात दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन हे एकाच छताखाली सर्व प्रकारच्या थेरपी व पुनर्वसन सुविधा देणारे हक्काचे ठिकाण ठरले आहे. महापालिकेच्या वतीने दिव्यांगांना बळ देण्यासाठी दिव्यांग भवनच्या माध्यमातून निरंतर प्रयत्न सुरू आहेत. या कार्यासाठी महापालिकेकडून आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य करण्यास मी सदैव तत्पर आहे." असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले व दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या. दिव्यांग व्यक्तींच्या सर्वसमावेशक विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असलेल्या ‘दिव्यांग भवन फाउंडेशन’च्या वतीने तयार करण्यात आलेल्या द्विवार्षिक विशेषांकाचे प्रकाशन आज महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाले,त्यावेळी ते बोलत होते. दिव्यांग भवन,पिंपरी येथील कार्यक्रमास आयुक्त डाॅ.विजय सूर्यवंशी,अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख,सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे,व्यवस्थापक परेश गांधी,मानसशास्त्रज्ञ अपर्णा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. "दिव्यांग भवन हे केवळ सेवा देणारे केंद्र नसून दिव्यांगांच्या विचारांना व आकांक्षांना दिशा देणारे व्यासपीठ आहे. दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी दिव्यांग भवनचे कार्य कौतुकास्पद आहे. हे मॉडेल राज्यातील इतर सर्व महानगरपालिकांसाठी अत्यंत मार्गदर्शक आणि अनुकरणीय ठरेल."असे आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी म्हणाले. "या द्विवार्षिक विशेषांकासाठी राज्याचे मुख्यमंत्री, दिव्यांग विभागाचे कल्याण मंत्री आणि मुख्य सचिव यांच्याकडून मिळालेले शुभेच्छा संदेश हे दिव्यांग भवनच्या कार्याची दखल घेणारे आणि पाठीवर कौतुकाची थाप देणारे आहेत, हे शुभेच्छा संदेश दिव्यांग भवन आणि संपूर्ण टीमसाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत."अशा शब्दात ओमप्रकाश देशमुख यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

- खासदारांच्या ताफ्याला अडथळा आणल्याच्या आरोपावरून पुणेकराविरुद्ध गुन्हा; युवक काँग्रेसचा सवाल1
- मदन बाफनांच्या निधनाने मावळच्या राजकीय सामाजिक क्षेत्राची मोठी हानी - वळसे पाटील... पिंपरी चिंचवड : माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनाने मावळच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अल्पसंख्याक समाजातून पुढे येत त्यांनी मावळात काँग्रेसची विचारधारा जपली. पंचायत समिती सभापती ते जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि राज्याचे मंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली. सर्व समाजघटकांशी आपुलकीचे संबंध असलेले मदन बाफना शेवटपर्यंत समाजकार्यात सक्रिय होते. त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत दिलीप वळसे पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली... : दिलीप वळसे पाटील - राष्ट्रवादी नेते #मदनबाफना #दिलीपवळसेपाटील #मावळ #मावळराजकारण #मावळबातम्या #राजकीयबातम्या #सामाजिकक्षेत्र #श्रद्धांजली #माजीमंत्री #काँग्रेस #पिंपरीचिंचवड #पुणेबातम्या #महाराष्ट्रराजकारण #Thenayaknews #TheNayakNews1
- वडगाव बुद्रुक मध्ये बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. नमस्कार क्षत्रिय कार्यालय सिंहगड रोड, आयुक्त साहेब यांस, 16 Sept 2026 नमस्कार.. विषय . वडगाव बुद्रुक मध्ये बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. नमस्कार साहेब मी आपणाला 12 तारखेला सांगितले होते वडगाव बुद्रुक मध्ये स्वच्छता मोहीम राबवणे राबवण्यात यावी.. आज आमच्या दारामध्ये एक बेवारशी कुत्र तडफडत आहे. कृपया आपण गावांमधील बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अजूनही आपले कर्मचारी आजूबाजूच्यांनी टाकलेला दारातला कचरा घेऊन गेलेले नाहीत. माझा पत्ता... पोतनीस, 51/2A गुरुकृपा निवास, वडगाव बुद्रुक ,पांचाली स्वीट्स दुकानाच्या मागे, नारायण जनरल स्टोअर जवळ. पुणे 411041.3
- "दुष्काळाच्या ज्या उपायोजना कराव्या लागतात त्याची तयारी आम्ही सुरू केली...!"1
- गदिमा रोडवर दोन दुचाकींची धडक; युगेंद्र पवारांची तत्परता, जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल1
- यवतमाळ मध्ये साखरेचा ट्रक पलटी लोकांनी साखरेची पोती केली लंपास.1
- 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेवून येणारी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना घडली आहे.. यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.. या अपघातानंतर संबंधित विद्यार्थ्यांना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधत विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत सुचना केल्या..1
- ६० वर्षांची साथ तुटली; मदन बाफनांच्या आठवणींना शरद पवारांचा उजाळा... पिंपरी चिंचवड : माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. गेली ६० वर्षे बाफना आपल्यासोबत होते, त्यांच्यासोबतची साथ शेवटपर्यंत लाभली, अशी आठवण पवारांनी सांगितली. सरपंच ते मंत्री असा त्यांचा कर्तृत्ववान प्रवास होता. आता त्यांचे पुत्र गणेश बाफना वडिलांचा वारसा पुढे नेतील आणि त्यांच्या पाठीशी आपण कायम राहू, असंही शरद पवार म्हणाले... : शरद पवार - राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी अध्यक्ष्य #मदनबाफना #शरदपवार #मदनबाफनानिधन #पुणे #पिंपरीचिंचवड #मावळ #राष्ट्रवादीकाँग्रेस #SharadPawar #MadanBafna #MaharashtraPolitics #Thenayaknews #TheNayakNews1