बदनापूर येथील कॅनरा बँकेत ७.३१ कोटींचा डल्ला; मॅनेजरसह सुवर्णकार गजाआड जालना: जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यातील मर्चंट बँक आणि पूर्णवादी बँकेतील घोटाळ्याची चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच, आता बदनापूर येथील कॅनरा बँकेत तब्बल ७ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट सोने गहाण ठेवून आणि मूळ सोन्याची चोरी करून ही मोठी फसवणूक करण्यात आली आहे. नेमका प्रकार काय? बदनापूर येथील कॅनरा बँकेत दागिन्यांच्या बदल्यात कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू असताना हा मोठा गैरव्यवहार झाला. बँकेच्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन (Quarterly Re-evaluation) प्रक्रियेदरम्यान दागिन्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी बँकेच्या लॉकरमधील सोन्याचे दागिने गायब असल्याचे आणि त्यांच्या जागी बनावट सोने ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. असा फुटला घोटाळ्याला वाचा: बँकेच्या धोरणानुसार नियमित तपासणी सुरू होती. तपासणीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे आणि काही ठिकाणी बनावट सोने असल्याचे आढळले. बँकेचे अधिकृत सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे यांनी बनावट सोन्याला 'खरे सोने' असल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन बँकेची फसवणूक करण्यास मदत केली. पोलिसांची कारवाई: या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आहेत: बँक मॅनेजर: पोलिसांच्या ताब्यात. सुवर्णकार (प्रवीण बुऱ्हाडे): पोलिसांच्या ताब्यात. एक अधिकारी: अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. "बनावट सोने ठेवून आणि पदाचा गैरवापर करून बँकेचा विश्वासघात करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ७ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक झाली असून, आम्ही दोघांना ताब्यात घेतले आहे. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे." — मच्छिंद्र सुरवसे (पोलीस निरीक्षक, बदनापूर पोलीस ठाणे)

- बदनापूर येथील कॅनरा बँकेत ७.३१ कोटींचा डल्ला; मॅनेजरसह सुवर्णकार गजाआड जालना: जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यातील मर्चंट बँक आणि पूर्णवादी बँकेतील घोटाळ्याची चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच, आता बदनापूर येथील कॅनरा बँकेत तब्बल ७ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट सोने गहाण ठेवून आणि मूळ सोन्याची चोरी करून ही मोठी फसवणूक करण्यात आली आहे. नेमका प्रकार काय? बदनापूर येथील कॅनरा बँकेत दागिन्यांच्या बदल्यात कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू असताना हा मोठा गैरव्यवहार झाला. बँकेच्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन (Quarterly Re-evaluation) प्रक्रियेदरम्यान दागिन्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी बँकेच्या लॉकरमधील सोन्याचे दागिने गायब असल्याचे आणि त्यांच्या जागी बनावट सोने ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. असा फुटला घोटाळ्याला वाचा: बँकेच्या धोरणानुसार नियमित तपासणी सुरू होती. तपासणीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे आणि काही ठिकाणी बनावट सोने असल्याचे आढळले. बँकेचे अधिकृत सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे यांनी बनावट सोन्याला 'खरे सोने' असल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन बँकेची फसवणूक करण्यास मदत केली. पोलिसांची कारवाई: या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आहेत: बँक मॅनेजर: पोलिसांच्या ताब्यात. सुवर्णकार (प्रवीण बुऱ्हाडे): पोलिसांच्या ताब्यात. एक अधिकारी: अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. "बनावट सोने ठेवून आणि पदाचा गैरवापर करून बँकेचा विश्वासघात करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ७ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक झाली असून, आम्ही दोघांना ताब्यात घेतले आहे. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे." — मच्छिंद्र सुरवसे (पोलीस निरीक्षक, बदनापूर पोलीस ठाणे) 1
- कांद्याला बाजारात किंमत नाही; शेतकऱ्यांची भयानक आपबीती समोर कांदा विक्रीस आणल्यानंतर व्यापाऱ्यांकडून अत्यल्प दर दिला जात असल्याने शेतकऱ्याचा संयम सुटला. “इतका खर्च करून शेती केली, पण शेवटी मालाला भावच नाही, मग हा माल ठेवून काय उपयोग?” असा संतप्त सवाल करत त्याने कांद्याचा ढीगच चिरडून टाकला. याबरोबरच अनेक शेतकऱ्यांचे हाल1
- Post by राजश्री दत्तात्रय गवळी1
- खासदार संजय जाधव , माजी आमदार सुरेशराव वरपूडकर यांच्या हस्ते Hotel ORBIT चे उदघाटन1
- जालन्यात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेचा हातोडा! नूतन वसाहत, अंबड चौफुली, इंदेवाडी रोडवर कारवाई नियम तोडणाऱ्यांवर दंड व गुन्हा दाखल करण्याचा इशारा1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- कांद्याला भाव नाही; संतप्त शेतकऱ्याने कांद्यावरच पिकअप फिरवले! शेतकऱ्याच्या घामाची किंमत शून्य; बाजार समितीत संतापाचा स्फोट छत्रपती संभाजीनगर : शेती म्हणजे जुगारच बनली आहे, अशी परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. लासूर बाजार समिती येथे कांद्याला अत्यंत कमी दर मिळाल्याने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या कांद्यावरच पिकअप वाहन चालवून तो पूर्णतः नष्ट केला. शेतकऱ्याच्या या कृतीमागे केवळ राग नव्हता, तर अनेक दिवसांचा साचलेला संताप होता. शेती पिकवण्यासाठी खत, बियाणे, कीटकनाशके यांचे वाढलेले प्रचंड दर, त्यात वाढती महागाई आणि दिवस-रात्र केलेली मेहनत—या सर्वांचा शेवटी काहीच मोबदला मिळत नसल्याची वेदना या घटनेतून स्पष्ट दिसून आली.1
- पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ‘पालकमंत्री चषक’ ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण ⚽🏆1
- पोलीस कॉम्प्लेक्स जवळ दुकानाला भीषण आग; आगीमध्ये संपूर्ण साहित्य जळून खाक दुकान मालकाचे लाखोचे नुकसान.. दुकानाच्या आगीने जवळच असलेल्या विद्युत रोहीत्राला सुध्दा लागली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळवले आगीवर नियंत्रण1