logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कांद्याला भाव नाही; संतप्त शेतकऱ्याने कांद्यावरच पिकअप फिरवले! कांद्याला भाव नाही; संतप्त शेतकऱ्याने कांद्यावरच पिकअप फिरवले! शेतकऱ्याच्या घामाची किंमत शून्य; बाजार समितीत संतापाचा स्फोट छत्रपती संभाजीनगर : शेती म्हणजे जुगारच बनली आहे, अशी परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. लासूर बाजार समिती येथे कांद्याला अत्यंत कमी दर मिळाल्याने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या कांद्यावरच पिकअप वाहन चालवून तो पूर्णतः नष्ट केला. शेतकऱ्याच्या या कृतीमागे केवळ राग नव्हता, तर अनेक दिवसांचा साचलेला संताप होता. शेती पिकवण्यासाठी खत, बियाणे, कीटकनाशके यांचे वाढलेले प्रचंड दर, त्यात वाढती महागाई आणि दिवस-रात्र केलेली मेहनत—या सर्वांचा शेवटी काहीच मोबदला मिळत नसल्याची वेदना या घटनेतून स्पष्ट दिसून आली.

5 hrs ago
user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
पत्रकार ओमप्रकाश उढाण
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
5 hrs ago

कांद्याला भाव नाही; संतप्त शेतकऱ्याने कांद्यावरच पिकअप फिरवले! कांद्याला भाव नाही; संतप्त शेतकऱ्याने कांद्यावरच पिकअप फिरवले! शेतकऱ्याच्या घामाची किंमत शून्य; बाजार समितीत संतापाचा स्फोट छत्रपती संभाजीनगर : शेती म्हणजे जुगारच बनली आहे, अशी परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. लासूर बाजार समिती येथे कांद्याला अत्यंत कमी दर मिळाल्याने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या कांद्यावरच पिकअप वाहन चालवून तो पूर्णतः नष्ट केला. शेतकऱ्याच्या या कृतीमागे केवळ राग नव्हता, तर अनेक दिवसांचा साचलेला संताप होता. शेती पिकवण्यासाठी खत, बियाणे, कीटकनाशके यांचे वाढलेले प्रचंड दर, त्यात वाढती महागाई आणि दिवस-रात्र केलेली मेहनत—या सर्वांचा शेवटी काहीच मोबदला मिळत नसल्याची वेदना या घटनेतून स्पष्ट दिसून आली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पैठणचा कालवा फुटला..! खडका-मडका परिसरात पाणीपुरवठा तात्पुरता खंडित.. पैठण येथून माजलगावकडे जाणारा उजवा कालवा आज ३६ एप्रिल रोजी रात्री फुटल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे खडका-मडका परिसरात पाण्याचा पुरवठा कमी होणार असून खालच्या शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. तसे प्रशासनास शेतकऱ्यांनी कळवले आसल्याची माहिती असून दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे असे समजते.
    1
    पैठणचा कालवा फुटला..! खडका-मडका परिसरात पाणीपुरवठा तात्पुरता खंडित..
पैठण येथून माजलगावकडे जाणारा उजवा कालवा आज ३६ एप्रिल रोजी रात्री फुटल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे खडका-मडका परिसरात पाण्याचा पुरवठा कमी होणार असून खालच्या शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. तसे प्रशासनास शेतकऱ्यांनी कळवले आसल्याची माहिती असून दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे असे समजते.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • जालन्यात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेचा हातोडा! नूतन वसाहत, अंबड चौफुली, इंदेवाडी रोडवर कारवाई नियम तोडणाऱ्यांवर दंड व गुन्हा दाखल करण्याचा इशारा
    1
    जालन्यात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेचा हातोडा!
नूतन वसाहत, अंबड चौफुली, इंदेवाडी रोडवर कारवाई
नियम तोडणाऱ्यांवर दंड व गुन्हा दाखल करण्याचा इशारा
    user_जालना आंदोलन
    जालना आंदोलन
    मुख्य संपादक - जालना आंदोलन जालना, जालना, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • बार्शीत भक्तीरसाचा महापूर..... शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाला महिलांचा विक्रमी प्रतिसाद..!
    1
    बार्शीत भक्तीरसाचा महापूर..... शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाला महिलांचा विक्रमी प्रतिसाद..!
    user_राजश्री दत्तात्रय गवळी
    राजश्री दत्तात्रय गवळी
    Advertising agency सिंदखेड राजा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • बदनापूर जिल्हा जालना बदनापूर येथील कॅनरा बँकेत बँक अधिकाऱ्यांनी चोरी केली व 22 लोकांनी बनावट सोने गहाण ठेऊन फसवणूक केली त्या बावीस लोकांची चौकशी करून त्यांना अटक केली जाणार असल्याची शक्यता असून नियमानुसार त्यांना अटक अटळ असल्याचे बोलले जाते.
    1
    बदनापूर जिल्हा जालना 
बदनापूर येथील कॅनरा बँकेत बँक अधिकाऱ्यांनी चोरी केली व 22 लोकांनी बनावट सोने गहाण ठेऊन फसवणूक केली त्या बावीस लोकांची चौकशी करून त्यांना अटक केली जाणार असल्याची शक्यता असून नियमानुसार त्यांना अटक अटळ असल्याचे बोलले जाते.
    user_सय्यद नजाकत
    सय्यद नजाकत
    बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • *एमआयडीसीच्या २२० केव्ही मधून मोतीबाग ३३ केव्ही कडे जाणारी वीज खंडित, २४ तास जालना शहर ठप्प; वीज यंत्रणेतील हलगर्जीपणावर आमदार बबनराव लोणीकरांचा संताप* *वीज वितरण अधिकारी, कंत्राटदारांच्या निष्क्रियतेमुळे जालना त्रस्त; शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत - आमदार बबनराव लोणीकर* *३०० कोटी रुपये निधी मंजूर असताना केंद्र-राज्य लोककल्याणकारी योजनांचा लाभ अंमलबजावणीत अडखळतोय - आमदार बबनराव लोणीकर* *आठवडाभरात मोतीबाग ३३ केव्ही येथील १० एमव्हीए ट्रांसफार्मर बसवण्याचे काम सुरू करू, लोणीकरांच्या संतापानंतर अधिकाऱ्यांची माहिती* प्रतिनिधी - जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमधून २२० केव्ही लाईनद्वारे मोतीबागसह शहरातील विविध ३३ केव्ही फीडरला वीज पुरवठा केला जातो. मात्र २३ तारखेपासून तारा तुटल्यामुळे संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली असून शनी मंदिर, माऊली नगर, यशवंत नगर, समर्थ नगर तसेच शासकीय कार्यालय परिसर आणि लगतच्या भागात मागील २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित आहे. या परिस्थितीमुळे लाखो नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आणि प्रशासनाविरोधात रोष वाढत आहे. व्यापारी, रुग्णालये व लघुउद्योगांनाही याचा मोठा फटका बसला आहे. संपूर्ण शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे असे आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर आमदार बबनराव लोणीकर यांनी कंत्राटदार आणि वीज वितरण अधिकाऱ्यांच्या उदासीनतेवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, जालना जिल्ह्यासाठी वीज वितरण विभागाकडून ३०० कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मोतीबाग परिसरात ३० केवी अंतर्गत नवीन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्मर उभारणीचे टेंडर व वर्क ऑर्डरही पूर्ण झालेले आहेत. मात्र संबंधित कंत्राटदारांनी कामात ढिलाई केल्यामुळे ही कामे रखडली आहेत. कामांची गुणवत्ता आणि गती या दोन्ही बाबतीत गंभीर त्रुटी दिसून येत आहेत. वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे. आमदार बबनराव लोणीकर यांच्या संतापानंतर येत्या आठवड्याभरात मोतीबाग ३३ केव्ही येथील १० एमव्हीए ट्रांसफार्मर बसवण्याचे कामकाज सुरू करू अशा अधिकाऱ्यांनी म्हटले असल्याचे देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले. लोणीकर यांनी पुढे सांगितले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांद्वारे वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जात आहे. प्रधानमंत्री सहज वीज हर घर योजना, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, पुनर्रचित वीज वितरण क्षेत्र योजना तसेच स्मार्ट मीटर राष्ट्रीय कार्यक्रम या माध्यमातून वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे. तसेच प्रधानमंत्री कुसुम योजना, राष्ट्रीय सौर मिशन आणि प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना यांसारख्या उपक्रमांद्वारे नागरिकांना स्वस्त व शाश्वत ऊर्जा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. मात्र स्थानिक पातळीवरील अंमलबजावणीत कमतरता राहिल्यास त्याचा थेट परिणाम जनतेवर होतो असे आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे. राज्य शासनाच्या योजनांबाबत माहिती देताना लोणीकर म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, कृषी पंप वीज जोडणी योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तसेच घरगुती वीज जोडणी सुलभ योजना या माध्यमातून थेट लाभ दिला जात आहे. तसेच मुख्यमंत्री सौर रूफटॉप योजना, सौर पाणी तापक अनुदान योजना आणि लघुउद्योग वीज सवलत योजना यांसारख्या उपक्रमांमुळे नागरिक व उद्योगांना दिलासा मिळत आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत ई-वाहन खरेदी व चार्जिंग सुविधा प्रोत्साहन देखील दिले जात आहे. या सर्व योजना लोककल्याणासाठी राबविल्या जात असून त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाने या योजनांचा वेग वाढवणे आवश्यक आहे असे आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले. वीज पायाभूत सुविधांच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या ग्रीन एनर्जी कॉरिडॉर योजना, राष्ट्रीय वीज प्रसारण योजना आणि राष्ट्रीय स्मार्ट ग्रीड मिशन यांसारख्या मोठ्या प्रकल्पांद्वारे १३२ केवी, २२० केवी व ४०० केवी स्तरावरील जाळे मजबूत केले जात आहे. राज्य स्तरावर महावितरण पायाभूत सुविधा विकास योजना, फीडर सेपरेशन योजना आणि महाराष्ट्र राज्य वीज प्रसारण कंपनीच्या प्रकल्पांद्वारे उपकेंद्रे व लाईन विस्ताराचे काम सुरू आहे. या सर्व योजनांचा उद्देश वीज पुरवठा अधिक स्थिर व विश्वासार्ह करणे हा आहे. पायाभूत सुविधा सक्षम झाल्यास भविष्यात अशा अडचणी टाळता येतील. त्यामुळे या कामांना तातडीने गती देणे आवश्यक आहे असे आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले. दरम्यान, लोणीकर यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, कंत्राटदारांनी तात्काळ काम सुरू करून पूर्ण करावे अन्यथा वीज वितरण विभागाने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी. “तंत्रज्ञान उपलब्ध असूनही काम वेळेत होत नाही, ही गंभीर बाब आहे. योग्य वेळी कारवाई केल्यास कामे जलद गतीने पूर्ण होतील,” असे ते म्हणाले. नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. शहरातील वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांचा संताप अधिक वाढू शकतो असे आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे.
    1
    *एमआयडीसीच्या २२० केव्ही मधून मोतीबाग ३३ केव्ही कडे जाणारी वीज खंडित, २४ तास जालना शहर ठप्प; वीज यंत्रणेतील हलगर्जीपणावर आमदार बबनराव लोणीकरांचा संताप*
*वीज वितरण अधिकारी, कंत्राटदारांच्या निष्क्रियतेमुळे जालना त्रस्त; शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत - आमदार बबनराव लोणीकर*
*३०० कोटी रुपये निधी मंजूर असताना केंद्र-राज्य लोककल्याणकारी योजनांचा लाभ अंमलबजावणीत अडखळतोय - आमदार बबनराव लोणीकर*
*आठवडाभरात मोतीबाग ३३ केव्ही येथील १० एमव्हीए ट्रांसफार्मर बसवण्याचे काम सुरू करू, लोणीकरांच्या संतापानंतर अधिकाऱ्यांची माहिती*
प्रतिनिधी -
जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमधून २२० केव्ही लाईनद्वारे मोतीबागसह शहरातील विविध ३३ केव्ही फीडरला वीज पुरवठा केला जातो. मात्र २३ तारखेपासून तारा तुटल्यामुळे संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली असून शनी मंदिर, माऊली नगर, यशवंत नगर, समर्थ नगर तसेच शासकीय कार्यालय परिसर आणि लगतच्या भागात मागील २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित आहे. या परिस्थितीमुळे लाखो नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आणि प्रशासनाविरोधात रोष वाढत आहे. व्यापारी, रुग्णालये व लघुउद्योगांनाही याचा मोठा फटका बसला आहे. संपूर्ण शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे असे आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर आमदार बबनराव लोणीकर यांनी कंत्राटदार आणि वीज वितरण अधिकाऱ्यांच्या उदासीनतेवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, जालना जिल्ह्यासाठी वीज वितरण विभागाकडून ३०० कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मोतीबाग परिसरात ३० केवी अंतर्गत नवीन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्मर उभारणीचे टेंडर व वर्क ऑर्डरही पूर्ण झालेले आहेत. मात्र संबंधित कंत्राटदारांनी कामात ढिलाई केल्यामुळे ही कामे रखडली आहेत. कामांची गुणवत्ता आणि गती या दोन्ही बाबतीत गंभीर त्रुटी दिसून येत आहेत. वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे. आमदार बबनराव लोणीकर यांच्या संतापानंतर येत्या आठवड्याभरात मोतीबाग ३३ केव्ही येथील १० एमव्हीए ट्रांसफार्मर बसवण्याचे कामकाज सुरू करू अशा अधिकाऱ्यांनी म्हटले असल्याचे देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
लोणीकर यांनी पुढे सांगितले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांद्वारे वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जात आहे. प्रधानमंत्री सहज वीज हर घर योजना, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, पुनर्रचित वीज वितरण क्षेत्र योजना तसेच स्मार्ट मीटर राष्ट्रीय कार्यक्रम या माध्यमातून वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे. तसेच प्रधानमंत्री कुसुम योजना, राष्ट्रीय सौर मिशन आणि प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना यांसारख्या उपक्रमांद्वारे नागरिकांना स्वस्त व शाश्वत ऊर्जा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. मात्र स्थानिक पातळीवरील अंमलबजावणीत कमतरता राहिल्यास त्याचा थेट परिणाम जनतेवर होतो असे आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे.
राज्य शासनाच्या योजनांबाबत माहिती देताना लोणीकर म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, कृषी पंप वीज जोडणी योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तसेच घरगुती वीज जोडणी सुलभ योजना या माध्यमातून थेट लाभ दिला जात आहे. तसेच मुख्यमंत्री सौर रूफटॉप योजना, सौर पाणी तापक अनुदान योजना आणि लघुउद्योग वीज सवलत योजना यांसारख्या उपक्रमांमुळे नागरिक व उद्योगांना दिलासा मिळत आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत ई-वाहन खरेदी व चार्जिंग सुविधा प्रोत्साहन देखील दिले जात आहे. या सर्व योजना लोककल्याणासाठी राबविल्या जात असून त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाने या योजनांचा वेग वाढवणे आवश्यक आहे असे आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले.
वीज पायाभूत सुविधांच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या ग्रीन एनर्जी कॉरिडॉर योजना, राष्ट्रीय वीज प्रसारण योजना आणि राष्ट्रीय स्मार्ट ग्रीड मिशन यांसारख्या मोठ्या प्रकल्पांद्वारे १३२ केवी, २२० केवी व ४०० केवी स्तरावरील जाळे मजबूत केले जात आहे. राज्य स्तरावर महावितरण पायाभूत सुविधा विकास योजना, फीडर सेपरेशन योजना आणि महाराष्ट्र राज्य वीज प्रसारण कंपनीच्या प्रकल्पांद्वारे उपकेंद्रे व लाईन विस्ताराचे काम सुरू आहे. या सर्व योजनांचा उद्देश वीज पुरवठा अधिक स्थिर व विश्वासार्ह करणे हा आहे. पायाभूत सुविधा सक्षम झाल्यास भविष्यात अशा अडचणी टाळता येतील. त्यामुळे या कामांना तातडीने गती देणे आवश्यक आहे असे आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
दरम्यान, लोणीकर यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, कंत्राटदारांनी तात्काळ काम सुरू करून पूर्ण करावे अन्यथा वीज वितरण विभागाने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी. “तंत्रज्ञान उपलब्ध असूनही काम वेळेत होत नाही, ही गंभीर बाब आहे. योग्य वेळी कारवाई केल्यास कामे जलद गतीने पूर्ण होतील,” असे ते म्हणाले. नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. शहरातील वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांचा संताप अधिक वाढू शकतो असे आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे.
    user_Suresh D Dawane Patil
    Suresh D Dawane Patil
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by AJINKYA S DAWANE
    1
    Post by AJINKYA S DAWANE
    user_AJINKYA S DAWANE
    AJINKYA S DAWANE
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • ​जालना: जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यातील मर्चंट बँक आणि पूर्णवादी बँकेतील घोटाळ्याची चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच, आता बदनापूर येथील कॅनरा बँकेत तब्बल ७ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट सोने गहाण ठेवून आणि मूळ सोन्याची चोरी करून ही मोठी फसवणूक करण्यात आली आहे. ​नेमका प्रकार काय? ​बदनापूर येथील कॅनरा बँकेत दागिन्यांच्या बदल्यात कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू असताना हा मोठा गैरव्यवहार झाला. बँकेच्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन (Quarterly Re-evaluation) प्रक्रियेदरम्यान दागिन्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी बँकेच्या लॉकरमधील सोन्याचे दागिने गायब असल्याचे आणि त्यांच्या जागी बनावट सोने ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. ​असा फुटला घोटाळ्याला वाचा: ​बँकेच्या धोरणानुसार नियमित तपासणी सुरू होती. ​तपासणीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे आणि काही ठिकाणी बनावट सोने असल्याचे आढळले. ​बँकेचे अधिकृत सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे यांनी बनावट सोन्याला 'खरे सोने' असल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन बँकेची फसवणूक करण्यास मदत केली. ​पोलिसांची कारवाई: ​या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आहेत: ​बँक मॅनेजर: पोलिसांच्या ताब्यात. ​सुवर्णकार (प्रवीण बुऱ्हाडे): पोलिसांच्या ताब्यात. ​एक अधिकारी: अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ​"बनावट सोने ठेवून आणि पदाचा गैरवापर करून बँकेचा विश्वासघात करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ७ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक झाली असून, आम्ही दोघांना ताब्यात घेतले आहे. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे." — मच्छिंद्र सुरवसे (पोलीस निरीक्षक, बदनापूर पोलीस ठाणे)
    1
    ​जालना: जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यातील मर्चंट बँक आणि पूर्णवादी बँकेतील घोटाळ्याची चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच, आता बदनापूर येथील कॅनरा बँकेत तब्बल ७ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट सोने गहाण ठेवून आणि मूळ सोन्याची चोरी करून ही मोठी फसवणूक करण्यात आली आहे.
​नेमका प्रकार काय?
​बदनापूर येथील कॅनरा बँकेत दागिन्यांच्या बदल्यात कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू असताना हा मोठा गैरव्यवहार झाला. बँकेच्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन (Quarterly Re-evaluation) प्रक्रियेदरम्यान दागिन्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी बँकेच्या लॉकरमधील सोन्याचे दागिने गायब असल्याचे आणि त्यांच्या जागी बनावट सोने ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
​असा फुटला घोटाळ्याला वाचा:
​बँकेच्या धोरणानुसार नियमित तपासणी सुरू होती.
​तपासणीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे आणि काही ठिकाणी बनावट सोने असल्याचे आढळले.
​बँकेचे अधिकृत सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे यांनी बनावट सोन्याला 'खरे सोने' असल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन बँकेची फसवणूक करण्यास मदत केली.
​पोलिसांची कारवाई:
​या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आहेत:
​बँक मॅनेजर: पोलिसांच्या ताब्यात.
​सुवर्णकार (प्रवीण बुऱ्हाडे): पोलिसांच्या ताब्यात.
​एक अधिकारी: अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
​"बनावट सोने ठेवून आणि पदाचा गैरवापर करून बँकेचा विश्वासघात करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ७ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक झाली असून, आम्ही दोघांना ताब्यात घेतले आहे. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे."
— मच्छिंद्र सुरवसे (पोलीस निरीक्षक, बदनापूर पोलीस ठाणे)
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • कांद्याला बाजारात किंमत नाही; शेतकऱ्यांची भयानक आपबीती समोर कांदा विक्रीस आणल्यानंतर व्यापाऱ्यांकडून अत्यल्प दर दिला जात असल्याने शेतकऱ्याचा संयम सुटला. “इतका खर्च करून शेती केली, पण शेवटी मालाला भावच नाही, मग हा माल ठेवून काय उपयोग?” असा संतप्त सवाल करत त्याने कांद्याचा ढीगच चिरडून टाकला. याबरोबरच अनेक शेतकऱ्यांचे हाल
    1
    कांद्याला बाजारात किंमत नाही; शेतकऱ्यांची भयानक आपबीती समोर
कांदा विक्रीस आणल्यानंतर व्यापाऱ्यांकडून अत्यल्प दर दिला जात असल्याने शेतकऱ्याचा संयम सुटला. “इतका खर्च करून शेती केली, पण शेवटी मालाला भावच नाही, मग हा माल ठेवून काय उपयोग?” असा संतप्त सवाल करत त्याने कांद्याचा ढीगच चिरडून टाकला. याबरोबरच अनेक शेतकऱ्यांचे हाल
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.