सेवा संकल्प अभियानांतर्गत पंचायत समिती जव्हार परिसरात स्वच्छता अभियान ‘सेवा सहभाग विकास’ या भावनेतून सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी पंचायत समिती जव्हार परिसरात स्वच्छता अभियान उत्स्फूर्तपणे राबविण्यात आले. गटविकास अधिकारी अक्षय पगार यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीतील विविध विभागांचे अधिकारी, विभागप्रमुख तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी झाले. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन पंचायत समिती कार्यालय परिसराची स्वच्छता केली. कार्यालयाच्या आवारातील कचरा, अनावश्यक वस्तू तसेच परिसरातील अस्वच्छता दूर करून स्वच्छ व नीटनेटका परिसर निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष श्रमदान करण्यात आले. केवळ कार्यालयीन परिसराची स्वच्छता करणे हा या अभियानाचा उद्देश नसून स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करून त्याचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. स्वच्छता ही केवळ एखाद्या व्यक्तीची किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून त्यासाठी नागरिकांचा सामूहिक सहभाग आवश्यक असल्याचा संदेशही या अभियानातून देण्यात आला. पंचायत समिती ही ग्रामीण भागातील नागरिकांशी सातत्याने संपर्कात असलेली प्रशासकीय यंत्रणा असल्याने कार्यालयीन परिसर स्वच्छ आणि आदर्श ठेवण्याबरोबरच नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यावरही भर देण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, परिसर स्वच्छ ठेवणे, नियमित स्वच्छता करणे आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः प्रत्यक्ष स्वच्छता अभियानात सहभागी होत स्वच्छतेबाबतचा सकारात्मक संदेश कृतीतून दिला. ‘स्वच्छ परिसर सुंदर परिसर निरोगी परिसर’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पंचायत समिती जव्हार परिसरात स्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून प्रशासन आणि कर्मचारीवर्गाकडून सामाजिक बांधिलकी जोपासण्याबरोबरच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सामूहिक सहभागातून राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानाने ‘सेवा सहभाग विकास’ या संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली.

- देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचा तालिबान करायचा ठरवले आहे का? सुप्रसिद्ध अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांना पुण्यात गावगुंडांकडून रोखले जाते, धमकावले जाते आणि लुटण्याचा प्रयत्न केला जातो. ही घटना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कायदा-सुव्यवस्थेवरील अपयशाचे उदाहरण आहे. अभिनेत्री असलेली महिला आज महाराष्ट्रात सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्य महिला कशी सुरक्षित असेल? हा तार्किक प्रश्न निर्माण होतो. पुणे शहर आणि परिसरात दररोज किमान एक तरी अशी घटना घडते, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. फडणवीस स्वतःची प्रतिमा चमकवण्यासाठी जितका प्रयत्न करतात, तितकाच प्रयत्न नागरिकांच्या सुरक्षेसाठी का करत नाहीत? हा सर्वसामान्य पुणेकरांचा आणि एकूणच महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने काँग्रेस पक्षाचा सवाल आहे. फडणवीस, तुम्हाला जमत असेल तर खुर्ची खाली करा आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्या!1
- नाशिकमध्ये दुभाजकातील ५५ झाडांची कत्तल; २.७५ लाखांचे नुकसान......चौघांविरुद्ध गुन्हा; गंगापूर रोडवरील प्रकार नाशिक गंगापूर रोडवरील जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात महानगरपालिकेने सावली व सुशोभीकरणासाठी लावलेल्या विदेशी प्रजातीच्या ५५ झाडांची विनापरवाना कत्तल करून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अभिमन्यू खैरनार व त्याच्या तीन साथीदारांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी पहाटे २ ते २.४५ वाजेच्या दरम्यान जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात लावलेली टर्मिलिया मादागास्कर (इंडियन क्रिसमस ट्री) प्रजातीची झाडे तोडण्यात आली. संशयितांनी कटकारस्थान करून विनापरवाना ही झाडे कापून नेल्याचा आरोप आहे. या झाडांची अंदाजे किंमत २ लाख ७५ हजार रुपये असून, महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी श्रीकांत किसन इरणक (३२, रा. करंजकर नगर, जेलरोड) यांनी तक्रार दिली. त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी रात्री ७.५२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेसह महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.1
- ब्रेकिंग न्यूज आप लोगों bhai tu Aashirwad ek Naya Andaaz mein aap logon ka favourite show देखिये रोज भाई तू जा आशीर्वाद 10:00 बजे स्टार प्रवाह खूब मस्ती1
- *गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन* कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात *गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन* कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल झाल्याने घरकुलवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक3
- प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनपाच्या वतीने अभिवादन उपमहापौर विलास शिंदे, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी केले पुजन नाशिक :-महानगरपालिकेच्या वतीने केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस उपमहापौर विलास शिंदे व उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी कार्यक्रमास सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.जितेंद्र धनेश्वर,विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. चारुदत्त जगताप, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, मनीषा पाटेकर,कनिष्ठ अभियंता तेजल मोरे,साहेबराव भोसले,श्रीकांत भोई,रमेश पागे, संजय मोरे, मनोज गायधनी, रवी पवार आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.1
- NASHIK : नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार : नाशिक शहरात ठेकेदारांच्या चुकीमुळे काही अपघात झाले आहेत. वारंवार सूचना देऊनही नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा विमा काढण्याचा विचार सुरू असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.. NASHIK : नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार : नाशिक शहरात ठेकेदारांच्या चुकीमुळे काही अपघात झाले आहेत. वारंवार सूचना देऊनही नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा विमा काढण्याचा विचार सुरू असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला..1
- निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनोखे आंदोलन नाशिक:निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, अनेक लहान मुले व नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा आरोप आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे व नगरसेविका रूपाली रंधवे यांनी केला. नागरिकांसह आंदोलन करत त्यांनी मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या दालनातील टेबलवर मोकाट कुत्रे आणून निषेध व्यक्त केला. मुख्याधिकारी निविदा प्रक्रियेत व्यस्त असल्याचा आरोप करत टेबलला नोटांचा हार घालून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी रंधवे दाम्पत्याने प्रशासनाला जाब विचारत मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. गणेशोत्सव, नवरात्र व सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले.1
- डेहनोली गावात गणेशोत्सवात साकारला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेहनोलीचा देखावा "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी, येथल्या मनामनात नांदते मराठी"...... या उक्तीप्रमाणे मराठी भाषेचा महिमा आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र सध्याच्या काळात ही मराठी भाषा जी आपली मातृभाषा आहे ती मराठी आणि जिच्यामुळे आमच्या ओठावर मराठी भाषा रेंगाळायला लागली ती मराठी शाळा वाचविणे आज काळाची गरज आहे. महाराष्ट्राची मराठमोळी संस्कृती, मराठी भाषा, मराठी परंपरा टिकविण्याचा सुंदर प्रयत्न ठाणे जिल्ह्यातील सह्याद्री डोंगराच्या खाली असलेल्या मुरबाड तालुक्यातील डेहनोली गावात सध्या गणेशोत्सवाच्या काळात पाहायला मिळत आहे. मराठी शिकूया, मराठी जगूया, मराठी जपूया या ब्रीदवाक्याखाली प्रत्येक गावपाड्याचं प्राण असलेली सुंदर- सुबक -आकर्षक अशी मराठी शाळा गणपती बाप्पाच्या आसनाला वेध घेत साकारली आहे. डेहनोली गावातील लक्ष्मण दगडू आगिवले यांच्या निवासस्थानी २९ व्या वर्षाचा घरगुती गणेशोत्सव साजरा करत असताना 'मराठी शाळा वाचवा',मराठी आपली अस्मिता या धर्तीखाली हा सुंदर देखावा तयार करण्यात आला आहे. या देखाव्यामध्ये इयत्ता १ ली ते ७ वी चे जुने वर्ग, वर्गात बसलेली मुले, क्रीडांगण, जुने पारंपरिक खेळ खेळताना रमलेले विद्यार्थी, मराठी शाळेला शितल गारवा देणारे मोठे झाड, समोर साकारलेलं डेहनोली नावाचे कौलारू घरांचे सुंदर गाव, पथदिवे, शाळेत जाणारी मुले, घराकडे जाणारी मुले, झोपाळा, घसरगुंडी, कोयबा खेळ, टबू असे जुने खेळ खेळणारे विद्यार्थी, गावातला गोठा, गोठ्यातल्या म्हैसी, हंबरणाऱ्या गायी म्हैसी,आजूबाजूला हिरवीगार झाडे- झुडपे अशी सुंदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेहनोलीचा देखावा या गावात बघायला मिळतो. मुरबाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार भरत दळवी यांनी या गणेशोत्सवाला भेट देऊन या सजावटीचे कौतुक केले आणि सजावटकारांचा सत्कारही केला. या गावातील सामाजिक युवा कार्यकर्ते दिगंबर आगिवले यांच्या संकल्पनेखाली हा सुंदर प्रबोधनात्मक देखावा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचं राज्य आहे. त्यामुळे इंग्रजी शिकताना मराठी भाषेला विसरू नका, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, जगल्या पाहिजेत हा मोलाचा संदेश या देखाव्यातून मिळतो. या देखाव्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. वैभव आगिवले, यज्ञा अगिवले , नमन आगिवले यांनी तब्बल आठवडाभर मेहनत घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेहनोली, मराठी शाळा टिकवा -वाचवा हा देखावा तयार केला आहे. एकदा या देखाव्याला आपण नक्कीच भेट द्यावी. या देखाव्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्याला digambaragivale music या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल.1