‘ऊस गुराळ ते इथेनॉल’ या विषयावर पुस्तक लेखनासाठी ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर आंदोलन अंकुश संघटनेत सविस्तर चर्चा शिरोळ / प्रतिनिधी शेतीसमोरील विविध प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी पुणे येथील ज्येष्ठ लेखक व समीक्षक सोमीनाथ घोळवे यांनी आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यालयाला भेट दिली. मूळ बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे रहिवासी असलेले घोळवे सध्या ऊस उत्पादकांच्या समस्यांवर आधारित ‘ऊस गुराळ ते इथेनॉल’ या विषयावर पुस्तक लेखन करीत आहेत. त्याच अनुषंगाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी सविस्तर संवाद साधला.या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोरील आर्थिक, तांत्रिक व धोरणात्मक अडचणींचा आढावा घेण्यात आला. ऊस दरनिर्धारण, एफआरपी, थकीत बिले, वाढते उत्पादन खर्च, पाणीटंचाई, तसेच इथेनॉल निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधी आणि आव्हानांवर सखोल चर्चा झाली. शासनाच्या सध्याच्या धोरणांचा शेतकऱ्यांवर होणारा परिणाम आणि त्यामध्ये आवश्यक सुधारणा यावरही मतांची देवाणघेवाण झाली.संघटनेची भूमिका स्पष्ट करताना पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देण्याची भूमिका मांडली. इथेनॉल धोरणामुळे साखर कारखानदारीला नवे पर्याय उपलब्ध होत असले तरी त्याचा थेट फायदा ऊस उत्पादकांना मिळावा, यासाठी ठोस हमी यंत्रणा आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, दत्तात्रय जगदाळे, बाळासाहेब भोगावे, डॉ. शिवाजी पाटील आदी उपस्थित होते. सर्वांनी आपापले अनुभव आणि शेतकऱ्यांच्या अडचणी मांडत विधायक सूचना केल्या.घोळवे यांनी सांगितले की, प्रत्यक्ष शेतकरी, संघटना व तज्ञ यांच्याशी संवाद साधूनच पुस्तकाची मांडणी करण्यात येणार आहे, जेणेकरून ऊस उद्योगातील वास्तव परिस्थिती समोर येईल. या चर्चेमुळे पुस्तकाला दिशादर्शक माहिती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.बैठकीचा समारोप शेतकरी प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्याच्या निर्धाराने झाला.

- Post by Akash mane1
- कुडाळ: केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने सुरक्षेच्या नावाखाली अनिवार्य केलेली 'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' (HSRP) आता वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वाहनांच्या नंबरप्लेटवरील अक्षरे आणि अंक अवघ्या काही महिन्यांतच पुसले जात असल्याचे समोर आले असून, ६३० रुपये खर्चूनही निकृष्ट दर्जाचे साहित्य मिळत असल्याच पाहायला मिळत आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना HSRP प्लेट लावणे बंधनकारक आहे. या प्लेट्स ॲल्युमिनियमच्या असून त्यावर क्रोमियम होलोग्राम आणि लेसर-ब्रँडेड १० अंकी कोड असतो. चोरी आणि बनावटगिरी रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात धावणाऱ्या अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या प्लेट्सवरील काळा रंग उडून जात असून, प्लेट पूर्णपणे कोरी (धूसर) दिसत आहे. महागडी प्लेट, पण दर्जा शून्य? एका नंबरप्लेटसाठी शासनाने साधारण ६३० रुपये दर निश्चित केला आहे. रिवेट्स मारून घट्ट बसवलेली ही प्लेट 'छेडछाड-प्रतिरोधक' असल्याचा दावा केला जातो. पण जर नंबरच वाचता येत नसेल, तर या सुरक्षेचा उपयोग काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. "आम्ही दंडाच्या भीतीने पैसे भरून नंबरप्लेट लावली, पण आता नंबरच दिसत नाहीये. उद्या वाहतूक पोलिसांनी आम्हाला थांबवले, तर नंबर दिसत नसल्याचा दंड आम्ही का भरायचा? अशी संतप्त प्रतिक्रिया वाहन धारकांकडून उमटत आहे. HSRP प्लेटची प्रमुख वैशिष्ट्ये (जी कागदावरच उरली आहेत): * होलोग्राम: डाव्या कोपऱ्यात निळ्या रंगाचा अशोक चक्र होलोग्राम. लेसर कोड: १०-अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर. सुरक्षितता: काढता न येणारे रिवेट्स. दंड: प्लेट नसल्यास १,००० ते १०,००० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद. निकृष्ट दर्जाच्या प्लेट्स पुरवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार का? आणि ज्यांच्या प्लेट्स खराब झाल्या आहेत, त्यांना विनामूल्य नवीन प्लेट्स मिळणार का? याकडे आता सर्व सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत मात्र 'नंबर' गायब झालेल्या गाड्या घेऊन फिरणे वाहनधारकांसाठी टांगती तलवार ठरत आहे.1
- वर्धा–नागपूर रेल्वे महामार्गावर तुळजापूर रेल्वे स्टेशनजवळ जीटी एक्सप्रेसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- AJITDADA STATUE : बारामतीच्या तिरंगा सर्कल येथील नटराज कलामंडळासमोर अजितदादांचा १० फुटी पुतळा उभारला जाणार आहे.. संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी याबद्दल माहिती देत पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलंय.. #AjitPawar #politics #baramatikar #viralpost #viralvideo #maharashtra #development #fypシ #explore #BreakingNews #MaharashtraPolitics1
- विक्रम शिंदे /भोर दि.17 भोरमधील मोरवाडी पाचलिंगे परिसरात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून डोंगरांची बेसुमार कत्तल होतं असल्याचा प्रकार सुरू आहे.मात्र तलाठी- मंडलाधिकाऱ्यांचे याकडे डोळेझाक करत असून पर्यावरण प्रेमींनी कारवाईची मागणी केली आहे.1
- Post by Raju Bawdiwale1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1