logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

2 hrs ago
user_Nandkumar Motiram Totewad
Nandkumar Motiram Totewad
हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
2 hrs ago

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • 🔥 गॅस टंचाईवर स्वदेशी उपाय! हिमायतनगरात ‘जुगाड चूल’ चर्चेत गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत असताना हिमायतनगरातील युवक अमोल बद्दापूरवार यांनी अनोखा स्वदेशी जुगाड शोधला आहे. मोबाईलच्या तीन बॅटऱ्यांमधून सुमारे 12 अँपिअर वीज तयार करून डीसी फॅनच्या साहाय्याने कोळसा व लाकूड पेटवणारी ‘जुगाड चूल’ त्यांनी तयार केली आहे. बसस्थानक परिसरातील मार्कंडेय टी अँड टिफिन सेंटरमध्ये या चुलीवर चहा, खिचडी आणि दूध तापवण्यासारखी कामे सहज केली जात आहेत. कमी खर्चात तयार झालेल्या या कल्पक प्रयोगामुळे सध्या हिमायतनगरमध्ये अमोल यांच्या कल्पकतेचे कौतुक होत आहे. संकटातही स्वदेशी कल्पकतेतून मार्ग काढण्याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून ही ‘जुगाड चूल’ चर्चेचा विषय ठरली आहे. 👏 #Himayatnagar #JugaadInnovation #LocalInnovation #IndianJugaad #SmallBusiness TeaStall Nanded Maharashtra PositiveNews MarathiNews
    1
    🔥 गॅस टंचाईवर स्वदेशी उपाय! हिमायतनगरात ‘जुगाड चूल’ चर्चेत
गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत असताना हिमायतनगरातील युवक अमोल बद्दापूरवार यांनी अनोखा स्वदेशी जुगाड शोधला आहे. मोबाईलच्या तीन बॅटऱ्यांमधून सुमारे 12 अँपिअर वीज तयार करून डीसी फॅनच्या साहाय्याने कोळसा व लाकूड पेटवणारी ‘जुगाड चूल’ त्यांनी तयार केली आहे.
बसस्थानक परिसरातील मार्कंडेय टी अँड टिफिन सेंटरमध्ये या चुलीवर चहा, खिचडी आणि दूध तापवण्यासारखी कामे सहज केली जात आहेत. कमी खर्चात तयार झालेल्या या कल्पक प्रयोगामुळे सध्या हिमायतनगरमध्ये अमोल यांच्या कल्पकतेचे कौतुक होत आहे.
संकटातही स्वदेशी कल्पकतेतून मार्ग काढण्याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून ही ‘जुगाड चूल’ चर्चेचा विषय ठरली आहे. 👏
#Himayatnagar #JugaadInnovation #LocalInnovation #IndianJugaad #SmallBusiness TeaStall Nanded Maharashtra PositiveNews MarathiNews
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • हिंगोली जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे एचपीव्ही लस घेण्याविषयी पालकांना आवाहन #Hingoli #HPVvaccine #hpvawareness #cervicalcancer #VaccinesSaveLives #PreventionIsBetterThanCure
    1
    हिंगोली जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे एचपीव्ही लस घेण्याविषयी पालकांना आवाहन #Hingoli #HPVvaccine #hpvawareness #cervicalcancer #VaccinesSaveLives #PreventionIsBetterThanCure
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • 🚨 मुदखेड पोलिसांची मोठी कारवाई नांदेड जिल्ह्यातील मुदखेड पोलिसांनी महसूल पथकासोबत संयुक्त कारवाई करत अवैध रेती उत्खनन प्रकरणात तब्बल 1 कोटी 31 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे गोदावरी नदीपात्र परिसरात छापा टाकून पाच लोखंडी हॉपर ट्रक, एक इंजिन बोट मशीन आणि 35 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सात जणांविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अवैध रेती उत्खननाविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. #Mudkhed #Nanded #SandMining #IllegalSandMining #PoliceAction #MaharashtraPolice #NandedNews #MarathiNews #GodavariRiver #BreakingNews
    1
    🚨 मुदखेड पोलिसांची मोठी कारवाई
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड पोलिसांनी महसूल पथकासोबत संयुक्त कारवाई करत अवैध रेती उत्खनन प्रकरणात तब्बल 1 कोटी 31 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे गोदावरी नदीपात्र परिसरात छापा टाकून पाच लोखंडी हॉपर ट्रक, एक इंजिन बोट मशीन आणि 35 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सात जणांविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अवैध रेती उत्खननाविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
#Mudkhed #Nanded #SandMining #IllegalSandMining #PoliceAction #MaharashtraPolice #NandedNews #MarathiNews #GodavariRiver #BreakingNews
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    6 hrs ago
  • नांदेड (प्रतिनिधी) – पीपल्स कॉलेज, नांदेड येथे जागतिक महिला दिनानिमित्त पीपल्स कॉलेज नांदेड व राष्ट्र सेविका समितीच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम काही विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला. या कार्यक्रमाला सहाय्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि एस.एफ.आय. या संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला. विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केल्यामुळे अखेर महाविद्यालय प्रशासनाने कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. पीपल्स कॉलेजचे प्राचार्य यांनी याबाबत अधिकृत पत्र देत कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती दिली. तसेच भविष्यात महाविद्यालयात आरएसएसशी संबंधित कार्यक्रम होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात अक्षयकुमार गायकवाड, कुलदीप राक्षसमारे, प्रबुद्ध काळे, आतिश ढगे, साई पाटील, प्रथम तारु, प्रज्ञा साळवे, नम्रता निवडंगे , आदित्य कांबळे, प्रशिक ढगे, प्रशांत गाडेकर,प्रफुल कोंडकर, मीना आरसे, निखिल महाबळे आणि आदी विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
    4
    नांदेड (प्रतिनिधी) – पीपल्स कॉलेज, नांदेड येथे जागतिक महिला दिनानिमित्त पीपल्स कॉलेज नांदेड व राष्ट्र सेविका समितीच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम काही विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला.
या कार्यक्रमाला सहाय्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि एस.एफ.आय. या संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला. विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केल्यामुळे अखेर महाविद्यालय प्रशासनाने कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला.
पीपल्स कॉलेजचे प्राचार्य यांनी याबाबत अधिकृत पत्र देत कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती दिली. तसेच भविष्यात महाविद्यालयात आरएसएसशी संबंधित कार्यक्रम होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात अक्षयकुमार गायकवाड, कुलदीप राक्षसमारे, प्रबुद्ध काळे, आतिश ढगे, साई पाटील, प्रथम तारु, प्रज्ञा साळवे, नम्रता निवडंगे , आदित्य कांबळे, प्रशिक ढगे, प्रशांत गाडेकर,प्रफुल कोंडकर, मीना आरसे, निखिल महाबळे आणि  आदी विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    10 hrs ago
  • जि.प.अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला शिवसेना शिंदे गटाचा पत्रकार परिषदेत आरोप
    1
    जि.प.अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला शिवसेना शिंदे गटाचा पत्रकार परिषदेत आरोप
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
  • दारव्हा–कारंजा मार्गावरील भुलाई–भांडेगाव दरम्यान सुरू करण्यात आलेला वादग्रस्त टोल नाका  बंद करावा म्हणून महाविकास आघाडीने 11 मार्चला टोलनाका तोडफोड आंदोलन केल्यानंतर दि. १३ मार्चला जिल्हाधिकारी यांच्या कक्षात आंदोलनकर्त्याची बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये नॅशनल हायवे अथोरिटी दिल्ली पुढील आदेश देईपर्यंत टोल नाका बंद करण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. परंतु कुठल्यातरी  अदृश्य शक्तीमुळे प्रशासनाने हा निर्णय फिरवला असल्याचे मत यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे  यांनी  मंगळवार दि. १८ मार्चला स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. टोल नाका त्वरित बंद करण्यात न आल्यास दि.२३ मार्चला  उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला  दारव्हा–कारंजा मार्गावरील रस्त्याची सद्यस्थिती अत्यंत खराब असून अनेक ठिकाणी खड्डे, अपूर्ण कामे तसेच कुठे सिमेंट तर कुठे डांबरीकरण अशा विस्कळीत अवस्थेत रस्ता आहे. अशा परिस्थितीत टोल वसुली करणे अन्यायकारक असल्याबाबत दि.२ मार्चला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. दारव्हा परिसरातील शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी कारंजा व दारव्हा बाजारपेठेत नेत असताना या टोलनाक्यावर पूर्ण टोल आकारला जात असल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची मोठी पिळवणूक होत आहे.या मार्गावरील एकूण अंतर सुमारे ४८ किमी असून त्यातील बहुतांश खर्च दिग्रस ते दारव्हा या भागावर करण्यात आला आहे. दारव्हा ते भांडेगाव या केवळ १२ किमी अंतरावर कमी खर्च होऊनही १०० टक्के टोल वसुली केली जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत  करण्यात आला आहे. याशिवाय नियमानुसार दोन टोलनाक्यांतील अंतर किमान ६० किमी असणे आवश्यक असताना, भुलाई–भांडेगाव टोलनाका व खेर्डा (ता. कारंजा) टोलनाक्यांतील अंतर केवळ ४५ किमी असल्याने हा टोलनाका नियमबाह्य असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.दरम्यान, ११ मार्च रोजी या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर १३ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठकही पार पडली. बैठकीत टोल नाका बंद करण्याबाबत सकारात्मक निर्देश देण्यात आले होते.तरी सुद्धा टोल वसुली सुरूच असल्याने दि.१६ मार्च रोजी महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन पुन्हा अर्ज सादर केला. परिसरातील धार्मिक स्थळे, शैक्षणिक गरजा आणि ग्रामीण भागातील नागरिकांची अडचण लक्षात घेता टोल वसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.दरम्यान, २२ मार्चपर्यंत टोल नाका बंद न झाल्यास २३ मार्च रोजी टोलनाक्यावर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही यावेळी माजी  जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे यांनी मत व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश नवरंगे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अतुल राऊत, शिवसेना उबाठा  पक्षाचे  उपजिल्हाप्रमुख अजय गाडगे, शहर प्रमुख अमोल दुधे, नगरसेवक मनोहर नवरंगे  आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    1
    दारव्हा–कारंजा मार्गावरील भुलाई–भांडेगाव दरम्यान सुरू करण्यात आलेला वादग्रस्त टोल नाका  बंद करावा म्हणून महाविकास आघाडीने 11 मार्चला टोलनाका तोडफोड आंदोलन केल्यानंतर दि. १३ मार्चला जिल्हाधिकारी यांच्या कक्षात आंदोलनकर्त्याची बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये नॅशनल हायवे अथोरिटी दिल्ली पुढील आदेश देईपर्यंत टोल नाका बंद करण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. परंतु कुठल्यातरी  अदृश्य शक्तीमुळे प्रशासनाने हा निर्णय फिरवला असल्याचे मत यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे  यांनी  मंगळवार दि. १८ मार्चला स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. टोल नाका त्वरित बंद करण्यात न आल्यास दि.२३ मार्चला  उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला 
दारव्हा–कारंजा मार्गावरील रस्त्याची सद्यस्थिती अत्यंत खराब असून अनेक ठिकाणी खड्डे, अपूर्ण कामे तसेच कुठे सिमेंट तर कुठे डांबरीकरण अशा विस्कळीत अवस्थेत रस्ता आहे. अशा परिस्थितीत टोल वसुली करणे अन्यायकारक असल्याबाबत दि.२ मार्चला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.
दारव्हा परिसरातील शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी कारंजा व दारव्हा बाजारपेठेत नेत असताना या टोलनाक्यावर पूर्ण टोल आकारला जात असल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची मोठी पिळवणूक होत आहे.या मार्गावरील एकूण अंतर सुमारे ४८ किमी असून त्यातील बहुतांश खर्च दिग्रस ते दारव्हा या भागावर करण्यात आला आहे. दारव्हा ते भांडेगाव या केवळ १२ किमी अंतरावर कमी खर्च होऊनही १०० टक्के टोल वसुली केली जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत  करण्यात आला आहे. याशिवाय नियमानुसार दोन टोलनाक्यांतील अंतर किमान ६० किमी असणे आवश्यक असताना, भुलाई–भांडेगाव टोलनाका व खेर्डा (ता. कारंजा) टोलनाक्यांतील अंतर केवळ ४५ किमी असल्याने हा टोलनाका नियमबाह्य असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.दरम्यान, ११ मार्च रोजी या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर १३ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठकही पार पडली. बैठकीत टोल नाका बंद करण्याबाबत सकारात्मक निर्देश देण्यात आले होते.तरी सुद्धा टोल वसुली सुरूच असल्याने दि.१६ मार्च रोजी महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन पुन्हा अर्ज सादर केला. परिसरातील धार्मिक स्थळे, शैक्षणिक गरजा आणि ग्रामीण भागातील नागरिकांची अडचण लक्षात घेता टोल वसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.दरम्यान, २२ मार्चपर्यंत टोल नाका बंद न झाल्यास २३ मार्च रोजी टोलनाक्यावर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही यावेळी माजी  जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे यांनी मत व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश नवरंगे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अतुल राऊत, शिवसेना उबाठा  पक्षाचे  उपजिल्हाप्रमुख अजय गाडगे, शहर प्रमुख अमोल दुधे, नगरसेवक मनोहर नवरंगे  आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • हिमायतनगरमध्ये पवित्र रमजान महिन्यानिमित्त दावते-इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली. लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफीक शेख महबूब यांच्या पुढाकारातून गेल्या १० वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवला जात असून यंदाही हिंदू-मुस्लिम एकोप्याचा सुंदर संदेश देण्यात आला. दावते -इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाला माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हाके, पोलीस निरीक्षक अमोल भगत, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, व्यापारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमातून बंधुभाव, एकता आणि सामाजिक सलोखा यांचा सुंदर संदेश हिमायतनगर शहरातून पुन्हा एकदा दिला गेला. रमजान महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌙 #Himayatnagar #IftarParty #Ramzan2026 #RamzanMubarak #HinduMuslimUnity Nanded Maharashtra SocialHarmony MarathiNews Iftar2026
    1
    हिमायतनगरमध्ये पवित्र रमजान महिन्यानिमित्त दावते-इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली.
लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफीक शेख महबूब यांच्या पुढाकारातून गेल्या १० वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवला जात असून यंदाही हिंदू-मुस्लिम एकोप्याचा सुंदर संदेश देण्यात आला.
दावते -इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाला माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हाके, पोलीस निरीक्षक अमोल भगत, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, व्यापारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमातून बंधुभाव, एकता आणि सामाजिक सलोखा यांचा सुंदर संदेश हिमायतनगर शहरातून पुन्हा एकदा दिला गेला.
रमजान महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌙
#Himayatnagar #IftarParty #Ramzan2026 #RamzanMubarak #HinduMuslimUnity Nanded Maharashtra SocialHarmony MarathiNews Iftar2026
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.