पिंपळगाव येथे महात्मा बसेश्वर महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नेर तालुक्यात पिंपळगाव काळे येथे महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती उत्साहात साजरी नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे आज महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय काका मदन आप्पा मांडूळकर हे होते. त्यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून महात्मा बसवेश्वर यांच्या महान विचारसरणी, समाज सुधारक कार्य आणि मानवतेचा संदेश याबाबत उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात किशोर मांडूळकर, राहुल मांडूळकर तसेच अनेक कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत महात्मा बसवेश्वर महाराजांना अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प केला.