*लोहारी खुर्द येथे सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ*अकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील पहिला उपक्रम *लोहारी खुर्द येथे सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ* अकोट तालुका प्रतिनिधी.... देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे संविधानिक पदावरील कारकीर्दिला २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शासन निर्देशानुसार पं स अकोट अंतर्गत सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ लोहारी खुर्द येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. दि. १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हे अभियान संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांपर्यंत विविध शासकीय व सामाजिक सेवांचा, योजनांचा लाभ पोहोचविण्यासोबतच जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सेवा संकल्प अभियानाचे उद्घाटन अकोट पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश खुमकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट ग्रामपंचायत लोहारी खुर्द च्या सरपंच सौ पूजा प्रफुल म्हैसने होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मदनसिंग बहुरे विस्तार अधिकारी पंचायत, रविंद्र चौथमल विस्तार अधिकारी शिक्षण , ग्रामविकास अधिकारी शैलजा पाटील, वैशाली म्हैसने, दिनेश वानखडे तसेच पटवारी वाळके, राम म्हैसने यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम गावातून सेवा ज्योत लावून प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर जि. प. शाळेत आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश खुमकर यांनी सेवा संकल्प अभियानाचे महत्त्व अधोरेखित करत समाजातील विविध घटकांनी या उपक्रमात सहभागी होऊन शासनाच्या योजनांचा व उपक्रमांचा लाभ घ्यावा अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. तर विस्तार अधिकारी बहुरे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चित करण्यात आलेल्या विविध बाबींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सेवा संकल्प अभियान असल्याचे सांगितले. यावेळी सेवाभावातून समाजाच्या विकासाला हातभार लावण्याचा संकल्प कार्यक्रमाच्या अध्यक्ष पूजा म्हैसने यांनी व्यक्त केला. याप्रसंगी स्वच्छता हीच सेवा, मानवी रांगोळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच *आर्शिवादाचा दिवा* अर्थात नवीन घरकुल प्रवेश यामध्ये रुपराव डिक्कर यांचा गृहप्रवेश कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी रविंद्र चौथमल यांनी, संचालन मुख्याध्यापक नितीन धोरण यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश वानखडे यांनी केले कार्यक्रमाला अजाबराव वानखडे, मुरलीधर म्हैसने, विपुल ठाकरे, रमेश डिक्कर,अतुल येवतकार, ज्ञानेश्वर डिक्कर, गौरव डोबाळे, अमोल वानखडे, ज्ञानेश्वर म्हैसने, अभिषेक म्हैसने, ज्ञानेश्वर खोंड, अभि डिक्कर, श्रीहरी डिक्कर, शिक्षिका सोनाली निचळ, सोनाली उज्जैनकर, भुजिंगराव इंगळे तसेच सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, ग्रामसखी, महिला बचतगट, मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पदाधिकारी, कर्मचारी, युवा मंडळ, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती लाभली.

- अकोट तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळून देण्यासाठी अकोट तालुका व शहर काँग्रेस च्या वतीने एक दिवसीय उपोषण अकोट तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळून देण्यासाठी अकोट तालुका व शहर काँग्रेस च्या वतीने एक दिवसीय उपोषण अकोट तालुका प्रतिनिधी... अकोट काँग्रेसच्या वतीने 16 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे संदर्भात एक दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात येऊन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना अकोट उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटल्याप्रमाणे अकोला जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प व अनियमित पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद तसेच इतर पिकांचे उत्पादन अत्यंत घटले असून शेतकरी व शेतमजूर गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक भागांमध्ये पिके पूर्णपणे हातची गेली असून शेतकऱ्यांवर कर्जबाजारीपणाचे मोठे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली अकोट तालुका काँग्रेस कमिटी व अकोट शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने प्रशांत पाचडे, अनोख राहणे, सारंग मालाणी, बादल अहिर, विकास देशमुख ,संजय आठवले, यांच्या उपस्थितीत अकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एक दिवसीय उपोषण करण्यात आले. सदर निवेदनातील मागण्या संपूर्ण अकोला जिल्हा तात्काळ कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा. सर्व बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान ₹५०,००० आर्थिक मदत देण्यात यावी. पीक विमा योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना तातडीने व संपूर्ण नुकसानभरपाई मिळावी. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची वसुली स्थगित करून कर्जमाफीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. शेतमजुरांसाठी विशेष आर्थिक सहाय्य व रोजगार हमी योजनेंतर्गत अतिरिक्त कामे उपलब्ध करून द्यावीत.महसूल विभागामार्फत तातडीने पंचनामे करून वास्तविक नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावा. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित सर्व घटकांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करण्यात यावे.शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून वरील मागण्यांवर तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या निवेदनावर अफजल खान ,प्रमोद चोरे, पांडुरंग खवले, दिनेश ताडे, शिवदास मुऱ्हेकार, सय्यद कलीम, ओंकार टवलारे ,हैदर अली, महेंद्र पवार ,आजम खा पठाण ,केशव हेन्ड, सय्यद सोहेल अली, धनराज कहार, मोती तेजवानी ,रोशन चिंचोलकर, मिलिंद नितोने ,नुसरत अली, मिलिंद झाडे, अविनाश जायले, अचल बेलसरे, दशरथ खवले, राजु पंडित , अविनाश डिक्कर ,अफजल खान, शेख खाजा,अब्दुल जमिल अब्दुल खलिक, अब्दुल आबीद अब्दुल अहाब,सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत.4
- वनहक्क दाव्यांना आता गती; १७ सप्टेंबरपासून राज्यभर विशेष अभियान वनहक्क दाव्यांना आता गती; १७ सप्टेंबरपासून राज्यभर विशेष अभियान पात्र वनपट्टेधारकांना ‘७/१२ ई’ उतारे देण्यास शासनाची कालबद्ध मोहीम; २ ऑक्टोबरपर्यंत दावे निकाली काढण्याचे उद्दिष्ट मुंबई : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वनहक्क दाव्यांच्या निपटाऱ्याला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यभर विशेष अभियान हाती घेतले आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत पात्र वनहक्कधारकांना वनहक्क अभिलेख उपलब्ध करून देण्यासह संबंधित नोंदी अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार आहे. वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची अधिकृत नोंद मिळावी, तसेच प्रलंबित दाव्यांचा कालबद्ध पद्धतीने निपटारा व्हावा, यासाठी महसूल यंत्रणेला विशेष कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वनपट्टेधारकांच्या जमिनीशी संबंधित अभिलेख दुरुस्ती आणि हक्क नोंदणीच्या प्रक्रियेला वेग येण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विशेष अभियानाचा निर्णय घेतला आहे. अभियानाच्या कालावधीत संबंधित विभागांकडून प्रलंबित वनहक्क प्रकरणांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांना आवश्यक अभिलेख उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. या मोहिमेमुळे वनहक्कधारकांना आपल्या जमिनीवरील हक्काची अधिकृत कागदोपत्री नोंद मिळण्याचा मार्ग सुकर होणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांना अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील वनहक्कधारकांसाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.1
- दुष्काळाच्या छायेत जळगाव जामोद मतदारसंघ; काँग्रेसचा आमदार निवासस्थानी बैठा सत्याग्रह! जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी... दुष्काळाच्या छायेत जळगाव जामोद मतदारसंघ; काँग्रेसचा आमदार निवासस्थानी बैठा सत्याग्रह! जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी... जळगाव जामोद (प्रतिनिधी) : गेल्या सुमारे ४० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यांतील खरीप पिके संकटात सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर तिन्ही तालुके तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष ॲड. भाऊराव भालेराव यांच्या नेतृत्वाखाली आमदार डॉ. संजय कुटे यांच्या निवासस्थानी बैठा सत्याग्रह करण्यात आला. आमदार डॉ. कुटे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.प्रत्येक गावात पिकांचे तातडीने पंचनामे, पीक नुकसानभरपाई, वीजबिलात सवलत, सुरळीत वीजपुरवठा, पिण्याचे व जनावरांसाठी पाणी, चारा व्यवस्था, कर्जवसुलीस स्थगिती तसेच विशेष दुष्काळी मदत पॅकेज देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी काँग्रेस पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर, रामविजय बुरुंगले, पंचायत राजचे प्रदेशाध्यक्ष अविनाश उमरकर, शैलेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष ॲड. भाऊराव भालेराव, प्रकाश बाप्पू देशमुख, तेजराव मारोडे, दादा पाटील करमोडा, कलदार पाटील, समाधान दामधर, शेख नासीर, शहराध्यक्ष अमर पाचपोर, ज्ञानेश्वर शेजोळे, प्रमोद पाटील, श्याम पालीवाल, सतीश टाकळकर, जुबेर पटेल, जुनेद शेख, वैभव सारोकार, अजहर देशमुख, अंबादास बाठे, ॲड. रतन इंगळे, डॉ. शाकीर, डॉ. प्रशांत राजपूत, अजय राजपूत, अर्जुन घोलप, कैलास बोडखे, तुकाराम गटमणे पाटील, विनोद भिवटे, प्रकाश साबे, प्रमोद गोळे, सय्यद अफ्रोज, अर्शद जमदार यांच्यासह तालुका काँग्रेस समितीचे पदाधिकारी, शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- खामगावात गणेश विसर्जन मिरवणुकीचा चिमुकली काढला लकी ड्रॉ खामगाव: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. यामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या रांगेत प्रथम मानाचा लाकडी गणपती , तानाजी गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ, व राणा गणेश मंडळ असतात तर त्यानंतर लकी ड्रॉ प्रमाणे इतर मंडळे सहभागी होत असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लकी ड्रॉ नुसार विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे. यंदा गणेशोत्सव 12 दिवसांचा असून अनंत चतुर्दशीला शहरातून गणेश विसर्जन मिरवणुक निघणार आहे.यामध्ये शिवाजी नगर पोलिस स्टेशन तर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत अशा एकूण 28 गणेश मंडळांचा समावेश राहणार आहे. या अनुषंगाने जाहीर केल्याप्रमाणे आज शहर पोलिस स्टेशनच्या प्रांगणात अप्पर पोलीस अधीक्षक पीयुष जगताप , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पो.स्टे.चे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर ,शिवाजी नगर पो.स्टे.चे ठाणेदार मंदार पुरी व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रिश अनुपकुमार छतवाणी वय 3 व आर्यन संतोष श्रीनाथ वय या लहान मूल्यांच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी ने लकी ड्रॉ काढून मंडळाची क्रमवारी जाहीर करण्यात आली.4
- १६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;1
- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाडमध्ये पोलिसांचा रूट मार्च; शांतता व सलोख्याचे आवाहन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाडमध्ये पोलिसांचा रूट मार्च; शांतता व सलोख्याचे आवाहन1
- अमरावतीत गणेश विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी; २२ कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था1
- धारणी में अवैध रेत माफियाओं की दबंगई: विरोध करने पर आदिवासी नेता पर ट्रैक्टर चढ़ाने का प्रयास, वीडियो वायरल1