महापुराचा तडाखा! जळगाव जामोद हादरले! अनेक गावांत घरांमध्ये पाणी; शेतीचेही प्रचंड नुकसान.जीवितहानीच्या घडल्या घटना..! महापुराचा तडाखा! जळगाव जामोद हादरले! अनेक गावांत घरांमध्ये पाणी; शेतीचेही प्रचंड नुकसान.जीवितहानीच्या घडल्या घटना..! जळगाव जामोद (प्रतिनिधी): दिनांक ३० जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जळगाव जामोद तालुक्यात अक्षरशः हाहाकार माजवला. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील लहान-मोठे नदी-नाले दुथडी भरून लागले, तर अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना महापूर आला. पुराचे पाणी गावांतील वस्त्यांसह अनेकांच्या घरांमध्ये शिरल्याने संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे व इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले. या महापुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.सुनगांव येथील लेंडी नाल्याला आलेल्या पुरामुळे परिसरातील सर्व घरांमध्ये पाणी गेल्याने जीवनावश्यक साहित्य नष्ट झाले.तसेच जामोद, जळगाव जामोद तालुक्यातील जामोद सर्कल,वडशिंगी सर्कल, आसलगाव सर्कल, पिंपळगाव सर्कल तसेच जळगाव जामोद शहर यांना पुराचा मोठा फटका बसला आहे.अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य भिजून खराब झाले. काही ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागला. रस्ते जलमय झाल्याने तसेच पुलांवरून पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती.महापुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने सोयाबीन, कापूस, तूर यांसह विविध खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतांमधील बांध, सिंचन व्यवस्था आणि शेतीसाठी लागणारे साहित्य वाहून गेले.तसेच मोठ्या प्रमाणात शेती खरडुन गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.काही शेतकऱ्यांच्या पशुधनाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.महापुराच्या तडाख्यात महावितरणच्या वीजवाहिन्या आणि विद्युत खांबांचे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.वीजपुरवठा बंद असल्याने पिण्याचे पाणी, मोबाईल चार्जिंग, दळणवळण आणि नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे.दरम्यान, तहसीलदार पवन पाटील यांनी रात्री सुमारे ३ वाजल्यापासून पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. ________________ आपत्तीग्रस्त नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन करत त्यांनी महसूल, आपत्ती व्यवस्थापन व संबंधित विभागांना तातडीने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त भागांमध्ये प्राथमिक पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांकडून होत आहे. सुनगावात पुरस्थितीची पाहणी करून तात्काळ घटनास्थळी पंचनामे करण्यात आले.पूरपरिस्थितीच्या पाहणी व मदतकार्यात स्वतः तहसीलदार पवन पाटील, मंडळ अधिकारी शिंदे, तलाठी वाघ, तलाठी चौरे, ग्राम महसूल सहाय्यक सचिन कपले, तुकाराम ढोले, सुनील भगत, पत्रकार अनिल भगत, कृषीमित्र मोहनसिंह राजपूत आदी उपस्थित होते. ____________________ नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन... हवामान विभागाने पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नदी-नाले, पूरग्रस्त पूल आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. ____________________ २०७.४ मिलिमीटर झालेल्या या धुवाधार पावसामुळे नदी नाल्यांना महापूर आल्याने तालुक्यात मोठे नुकसान झाले असून, महापुरात वाहून गेल्याने चार म्हशी,५ शेळ्यांचा दगावल्या आहेत.तसेच मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. ____________________ महापुरामध्ये जळगाव जामोद शहरातील महादेव वाघोदे नामक ५५ वर्षीय इसम बाहेर शौचास जातो असे सांगून घरून निघून गेला होता, त्याचा नदीपात्रात पाय घसरून बुडून मृत्यू झाला आहे. त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न नगरसेवक सय्यद नफीस व इरफान यांनी केले परंतु केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.. ____________________ महापुरामध्ये प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या पंचनाम्यांनंतर नुकसानीची नेमकी आकडेवारी स्पष्ट होणार आहे. ___________________ गोराडा लघुप्रकल्प ओव्हर फ्लो... सातपुड्याच्या पायथ्याशी जळगाव जामोद शहरापासून ७ किमीच्या अंतरावरील गोराडा लघु प्रकल्प या रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे १०० टक्के भरला असून सांडवा ओसंडून वाहत आहे. या ठिकाणी तहसीलदार पवन पाटील, ठाणेदार सचिन बागुल यांनी भेटी देऊन आढावा घेतला..

- सेवापूर्ती सोहळा उत्साहात नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार *सेवापूर्ती सोहळा उत्साहात* *नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ* *लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार* नगरपरिषद शेगाव येथे वरिष्ठलिपिक म्हणून सलग ३५ वर्षे प्रामाणिक व निष्ठापूर्वक सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या मा. श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा नगरपरिषद क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून श्री अशोकराव नंदाने यांना निरोगी, आनंदी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात केलेल्या प्रामाणिक कार्याचा गौरव उपस्थित मान्यवरांनी केला. याच प्रसंगी भोई समाज शेगाव शहर यांच्या वतीने श्री अशोकराव नंदाने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. समाजाप्रती त्यांचे योगदान व सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढील आयुष्य सुख, समृद्धी व उत्तम आरोग्याने भरलेले जावो, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषद शेगाव येथील नगराध्यक्ष मा.श्री प्रकाशभाऊ शेगोकार हे होते कार्यक्रमास, भोई समाज कर्मचारी संघटनेचे शहराध्यक्ष श्री गजाननजी ढोके, श्री हरिदासजी नंदाने भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, समाजसेवक श्री भास्करराव नंदाने, समाजसेविका सौ. नर्मदाताई बावणे, समाजसेवक श्री देविदासजी कुसुंबे, समाजसेवक श्री रामरावजी बावणे, श्री रवींद्र पाटील,श्रीकांत लोंळे, श्री धनराज आटोळे, तसेच भाजपा शेगाव शहर मच्छीमार सेलचे संयोजक, भाजपा शेगाव शहर सोशल मीडिया प्रमुख व भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश सुरेशराव राजगुरे , श्री अविनाश नंदाने, नगरपरिषद कार्यालय येथील कर्मचारी नानारावजी इंगळे , राहुल सुरवाडे, सुरेश घुले, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.4
- जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ1
- बुलढाणा :-आमदार संजय गायकवाड व नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन; येळगाव धरण १०० टक्के भरल्याने बुलढाण्यात आनंदोत्सव!1
- महापुराचा तडाखा! जळगाव जामोद हादरले! अनेक गावांत घरांमध्ये पाणी; शेतीचेही प्रचंड नुकसान.जीवितहानीच्या घडल्या घटना..! महापुराचा तडाखा! जळगाव जामोद हादरले! अनेक गावांत घरांमध्ये पाणी; शेतीचेही प्रचंड नुकसान.जीवितहानीच्या घडल्या घटना..! जळगाव जामोद (प्रतिनिधी): दिनांक ३० जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जळगाव जामोद तालुक्यात अक्षरशः हाहाकार माजवला. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील लहान-मोठे नदी-नाले दुथडी भरून लागले, तर अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना महापूर आला. पुराचे पाणी गावांतील वस्त्यांसह अनेकांच्या घरांमध्ये शिरल्याने संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे व इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले. या महापुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.सुनगांव येथील लेंडी नाल्याला आलेल्या पुरामुळे परिसरातील सर्व घरांमध्ये पाणी गेल्याने जीवनावश्यक साहित्य नष्ट झाले.तसेच जामोद, जळगाव जामोद तालुक्यातील जामोद सर्कल,वडशिंगी सर्कल, आसलगाव सर्कल, पिंपळगाव सर्कल तसेच जळगाव जामोद शहर यांना पुराचा मोठा फटका बसला आहे.अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य भिजून खराब झाले. काही ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागला. रस्ते जलमय झाल्याने तसेच पुलांवरून पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती.महापुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने सोयाबीन, कापूस, तूर यांसह विविध खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतांमधील बांध, सिंचन व्यवस्था आणि शेतीसाठी लागणारे साहित्य वाहून गेले.तसेच मोठ्या प्रमाणात शेती खरडुन गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.काही शेतकऱ्यांच्या पशुधनाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.महापुराच्या तडाख्यात महावितरणच्या वीजवाहिन्या आणि विद्युत खांबांचे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.वीजपुरवठा बंद असल्याने पिण्याचे पाणी, मोबाईल चार्जिंग, दळणवळण आणि नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे.दरम्यान, तहसीलदार पवन पाटील यांनी रात्री सुमारे ३ वाजल्यापासून पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. ________________ आपत्तीग्रस्त नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन करत त्यांनी महसूल, आपत्ती व्यवस्थापन व संबंधित विभागांना तातडीने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त भागांमध्ये प्राथमिक पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांकडून होत आहे. सुनगावात पुरस्थितीची पाहणी करून तात्काळ घटनास्थळी पंचनामे करण्यात आले.पूरपरिस्थितीच्या पाहणी व मदतकार्यात स्वतः तहसीलदार पवन पाटील, मंडळ अधिकारी शिंदे, तलाठी वाघ, तलाठी चौरे, ग्राम महसूल सहाय्यक सचिन कपले, तुकाराम ढोले, सुनील भगत, पत्रकार अनिल भगत, कृषीमित्र मोहनसिंह राजपूत आदी उपस्थित होते. ____________________ नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन... हवामान विभागाने पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नदी-नाले, पूरग्रस्त पूल आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. ____________________ २०७.४ मिलिमीटर झालेल्या या धुवाधार पावसामुळे नदी नाल्यांना महापूर आल्याने तालुक्यात मोठे नुकसान झाले असून, महापुरात वाहून गेल्याने चार म्हशी,५ शेळ्यांचा दगावल्या आहेत.तसेच मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. ____________________ महापुरामध्ये जळगाव जामोद शहरातील महादेव वाघोदे नामक ५५ वर्षीय इसम बाहेर शौचास जातो असे सांगून घरून निघून गेला होता, त्याचा नदीपात्रात पाय घसरून बुडून मृत्यू झाला आहे. त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न नगरसेवक सय्यद नफीस व इरफान यांनी केले परंतु केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.. ____________________ महापुरामध्ये प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या पंचनाम्यांनंतर नुकसानीची नेमकी आकडेवारी स्पष्ट होणार आहे. ___________________ गोराडा लघुप्रकल्प ओव्हर फ्लो... सातपुड्याच्या पायथ्याशी जळगाव जामोद शहरापासून ७ किमीच्या अंतरावरील गोराडा लघु प्रकल्प या रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे १०० टक्के भरला असून सांडवा ओसंडून वाहत आहे. या ठिकाणी तहसीलदार पवन पाटील, ठाणेदार सचिन बागुल यांनी भेटी देऊन आढावा घेतला..1