logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत देशात समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आल्याचे मत व्यक्त केले. मुस्लिम महिलांना वारसा हक्कात समान अधिकार मिळावेत, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही टिप्पणी केली.

3 hrs ago
user_अखंड भारत
अखंड भारत
Samaj Sevak लातूर, लातूर, महाराष्ट्र•
3 hrs ago
1f739687-d5c0-407b-bc14-7205dfccfb97

सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत देशात समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आल्याचे मत व्यक्त केले. मुस्लिम महिलांना वारसा हक्कात समान अधिकार मिळावेत, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही टिप्पणी केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भिमाई व्याख्यानमाला मुखेडकरांसाठी एक प्रेरणादायक - डॉ.राहुल कांबळे मातोश्री भिमाई व्याख्यानमाला मुखेड मध्ये हे व्याख्यानाचे वादळ वर्षानुवर्षी वाढत चाललेला आहे आणि याला मुखेडकरानी चांगलाच प्रतिसाद देत आहेत डॉ.दिलीप पुंडे साहेबांनी घेतलेला हा उपक्रम अतिशय प्रेरणादायक आहेत आरोग्य संस्कार व्यवसाय कौटुंबिक व्यवहारिक जीवन जीवनशैली आयुष्य जगत असताना ह्या साऱ्या गोष्टीची गरज आहेत डॉक्टर पुंडे सरांनी हाताची नाडी पकडता पकडता आणि कुटुंबातल्या वेदनाही त्यांनी जाणल्या आणि त्या वेदना उपचारीक करण्याचं काम या ठिकाणी होत आहे या उद्दिष्टनातून ही व्याख्यानमाला आयुष्याला आकार देणारी ठरत आहे मातोश्री भिमाई व्याख्यानमालेचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी झाला. “चला कुटुंब जपूया” या विषयावर युवराज पाटील यांचे मार्गदर्शन समाजासाठी निश्चितच विचारप्रवर्तक ठरले. आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबातील नातेसंबंध जपण्याचा दिलेला संदेश सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. अशा दर्जेदार आणि समाजप्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन केल्याबद्दल आदरणीय डॉ. दिलीप पुंडे सर व तसेच सर्व संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
    2
    भिमाई व्याख्यानमाला मुखेडकरांसाठी एक प्रेरणादायक - डॉ.राहुल कांबळे 
मातोश्री भिमाई व्याख्यानमाला मुखेड मध्ये हे व्याख्यानाचे वादळ वर्षानुवर्षी वाढत चाललेला आहे आणि याला मुखेडकरानी चांगलाच प्रतिसाद देत आहेत डॉ.दिलीप पुंडे साहेबांनी घेतलेला हा उपक्रम अतिशय प्रेरणादायक आहेत आरोग्य संस्कार व्यवसाय कौटुंबिक  व्यवहारिक जीवन जीवनशैली आयुष्य जगत असताना ह्या साऱ्या गोष्टीची गरज आहेत डॉक्टर पुंडे सरांनी हाताची नाडी पकडता पकडता आणि कुटुंबातल्या वेदनाही त्यांनी जाणल्या आणि त्या वेदना उपचारीक करण्याचं काम या ठिकाणी होत आहे या उद्दिष्टनातून ही व्याख्यानमाला आयुष्याला आकार देणारी ठरत आहे
मातोश्री भिमाई व्याख्यानमालेचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी झाला. “चला कुटुंब जपूया” या विषयावर युवराज पाटील यांचे मार्गदर्शन समाजासाठी निश्चितच विचारप्रवर्तक ठरले. आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबातील नातेसंबंध जपण्याचा दिलेला संदेश सर्वांसाठी मार्गदर्शक आहे.
अशा दर्जेदार आणि समाजप्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन केल्याबद्दल आदरणीय डॉ. दिलीप पुंडे सर व तसेच सर्व संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • *देगलूर तालुक्यातील येथे सुगाव* अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर जि नांदेड येते भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजारो भाविकांनी कार्यक्रमातील दैनिक आमची शोभा व चांगल्या पद्धतीचे कार्य अतिशय उत्तम पाडत आहे दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, गायनाचार्य रत्न सगितरत्न कैलास महाराज पौळ परभणी,ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली, बंडू गुरुजी ईब्राहिमपुर , उमाकांत महाराज केरळे. निळकंठ महाराज ईब्राहिमपुर गिरीधर महाराज इंगळे , ईब्राहिमपुर नगरीचे सरपंच बालाजी पाटील बामणे यांनी पण महाराजांचे सन्मान करण्यात आले भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित मुसलिम समाजातील ह भ प डॉ.जलाल महाराज त्यांचे मुस्लिम बांधवाने महाराजांचे सन्मान शिल्पक देऊन सन्मान करण्यात आले भाविका भाविकांनी भक्ताने मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील भाविकांनी महाराजांच्या समोर येऊन ते कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे, कीर्तनात व समोर बसून त्यांनी स्वतः कीर्तन प व ऐकले भाविक भक्त हजार भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व कीर्तनाचे आवश्यक लाभ घेतले भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व भजनी मंडळ आजूबाजूचा पंचशीतील भाविक भक्ता मोठ्या संख्येनेक्ष उपस्थित होते , किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, महाराजांनी अभंगाच्या भावातून भाविक भक्तांना हजार भाविक भक्तांना त्याने मंत्रमुक्त केले GS24X7 मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार न्यूज मो 9561062369
    3
    *देगलूर तालुक्यातील येथे सुगाव*
अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर  जि नांदेड येते भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजारो भाविकांनी कार्यक्रमातील दैनिक आमची शोभा व चांगल्या पद्धतीचे कार्य अतिशय उत्तम पाडत आहे  दि. 10-03-2026 रोज मंगळवार
किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, गायनाचार्य रत्न सगितरत्न कैलास महाराज पौळ परभणी,ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली, बंडू गुरुजी  ईब्राहिमपुर , उमाकांत महाराज केरळे. निळकंठ महाराज ईब्राहिमपुर गिरीधर महाराज इंगळे , ईब्राहिमपुर नगरीचे सरपंच बालाजी पाटील बामणे यांनी पण महाराजांचे सन्मान करण्यात आले भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित मुसलिम समाजातील ह भ प डॉ.जलाल महाराज  त्यांचे मुस्लिम बांधवाने महाराजांचे सन्मान शिल्पक देऊन सन्मान करण्यात आले भाविका भाविकांनी  भक्ताने मोठ्या संख्येने  मुस्लिम समाजातील भाविकांनी महाराजांच्या समोर येऊन ते कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे, कीर्तनात व समोर बसून त्यांनी स्वतः कीर्तन प व ऐकले 
भाविक भक्त हजार भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व कीर्तनाचे आवश्यक लाभ घेतले भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व भजनी मंडळ आजूबाजूचा पंचशीतील भाविक भक्ता मोठ्या संख्येनेक्ष  उपस्थित होते ,
किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, महाराजांनी अभंगाच्या भावातून भाविक भक्तांना हजार भाविक भक्तांना त्याने मंत्रमुक्त केले GS24X7 मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार न्यूज मो 9561062369
    user_मारोती  वडजे उंद्रीकर पत्रकार
    मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • ------- (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळुकवाडी ग्राम पंचायत हद्दीतील मुळुकवाडी ते मसेवाडी शिवरस्त्याचा प्रश्न तब्बल २५ वर्षांपासून प्रलंबित होता. भूमी अभिलेख कार्यालयात तीन वर्षांपूर्वी २१ हजार रुपये मोजणी शुल्क भरून ही प्रत्यक्ष मोजणी होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अखेर वस्तीवरील ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या कडे पाठपुरावा केला. त्या नंतर तहसीलदार शेळके यांनी कठोर भूमिका घेत पोलिस बंदोबस्तात रस्त्याच्या खुणा करून देत रस्ता मोकळा करून दिला. सरपंच रामकिसन कदम व पांडुरंग कानडे यांनी पुढाकार घेऊन रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना होणारी अडचण दूर झाली आहे. या बद्दल ग्रामस्थांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे आभार मानले आहेत. ----_---- पावसाळ्यातील अडचण दूर झाली. :– ग्रामस्थ --- पावसाळ्यात शाळा सुरू झाल्यानंतर शाळकरी मुलांना गुडघाभर चिखलातून शाळेत जावे लागत होते. तसेच आठवडी बाजार, भाजीपाला, दूध-दुभते, खत-बियाणे आणणे तसेच दवाखान्यात जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती. तहसीलदार शेळके यांच्या सहकार्यामुळे ही २५ वर्षांपासूनची समस्या दूर झाली असून आम्ही त्यांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. >-:-> शाकींदर काटकर (ग्रामस्थ) >-:-> ----_---- तहसीलदारांच्या कठोर भूमिकेमुळे प्रश्न सुटला... --- गेल्या २५ वर्षांपासून पावसाळ्यात ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. तीन वर्षांपूर्वी भूमी अभिलेख कार्यालयात २१ हजार रुपये मोजणीसाठी भरून ही मोजणी होत नव्हती. त्या मुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देत तहसीलदार शेळके यांच्या कडे पाठपुरावा करण्यात आला. सुरुवातीला खुणा करून ही काही ग्रामस्थ सहकार्य करत नसल्याने शेवटी पोलिस बंदोबस्तात रस्ता मोकळा करण्यात आला. तहसीलदार शेळके साहेब यांच्या ठाम भूमिकेमुळे ग्रामस्थांचा २५ वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागला. >-:-> डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर (सामाजिक कार्यकर्ते) >-:->
    1
    -------
(प्रतिनिधी):-  बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळुकवाडी ग्राम पंचायत हद्दीतील मुळुकवाडी ते मसेवाडी शिवरस्त्याचा प्रश्न तब्बल २५ वर्षांपासून प्रलंबित होता. भूमी अभिलेख कार्यालयात तीन वर्षांपूर्वी २१ हजार रुपये मोजणी शुल्क भरून ही प्रत्यक्ष मोजणी होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अखेर वस्तीवरील ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या कडे पाठपुरावा केला. त्या नंतर तहसीलदार शेळके यांनी कठोर भूमिका घेत पोलिस बंदोबस्तात रस्त्याच्या खुणा करून देत रस्ता मोकळा करून दिला. सरपंच रामकिसन कदम व पांडुरंग कानडे यांनी पुढाकार घेऊन रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना होणारी अडचण दूर झाली आहे. या बद्दल ग्रामस्थांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे आभार मानले आहेत.
----_----
पावसाळ्यातील अडचण दूर झाली. :– ग्रामस्थ
---
पावसाळ्यात शाळा सुरू झाल्यानंतर शाळकरी मुलांना गुडघाभर चिखलातून शाळेत जावे लागत होते. तसेच आठवडी बाजार, भाजीपाला, दूध-दुभते, खत-बियाणे आणणे तसेच दवाखान्यात जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती. तहसीलदार शेळके यांच्या सहकार्यामुळे ही २५ वर्षांपासूनची समस्या दूर झाली असून आम्ही त्यांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. 
>-:-> शाकींदर काटकर (ग्रामस्थ) >-:->
----_----
तहसीलदारांच्या कठोर भूमिकेमुळे प्रश्न सुटला...
---
गेल्या २५ वर्षांपासून पावसाळ्यात ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. तीन वर्षांपूर्वी भूमी अभिलेख कार्यालयात २१ हजार रुपये मोजणीसाठी भरून ही मोजणी होत नव्हती. त्या मुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देत तहसीलदार शेळके यांच्या कडे पाठपुरावा करण्यात आला. सुरुवातीला खुणा करून ही काही ग्रामस्थ सहकार्य करत नसल्याने शेवटी पोलिस बंदोबस्तात रस्ता मोकळा करण्यात आला. तहसीलदार शेळके साहेब यांच्या ठाम भूमिकेमुळे ग्रामस्थांचा २५ वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागला. 
>-:-> डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर (सामाजिक कार्यकर्ते) >-:->
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • माजी सैनिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या (AICC) माजी सैनिक विभागाच्या वतीने नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देशभरातील मोठ्या संख्येने माजी सैनिकांसह सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. या आंदोलनादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी माजी सैनिकांच्या विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. विशेषतः डिसएबिलिटी पेन्शन कायम ठेवणे, ECHS (एक्स-सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीम) अधिक प्रभावीपणे राबविणे, अग्निवीर योजना रद्द करणे तसेच सैनिकांवरील अन्यायकारक वागणूक थांबविणे या प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत माजी सैनिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी केली. देशाच्या सुरक्षेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे योग्य नसून त्यांना न्याय मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. या धरणे आंदोलनात काँग्रेसचे विविध नेते, माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत माजी सैनिकांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
    1
    माजी सैनिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या (AICC) माजी सैनिक विभागाच्या वतीने नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देशभरातील मोठ्या संख्येने माजी सैनिकांसह सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
या आंदोलनादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी माजी सैनिकांच्या विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. विशेषतः डिसएबिलिटी पेन्शन कायम ठेवणे, ECHS (एक्स-सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीम) अधिक प्रभावीपणे राबविणे, अग्निवीर योजना रद्द करणे तसेच सैनिकांवरील अन्यायकारक वागणूक थांबविणे या प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत माजी सैनिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी केली. देशाच्या सुरक्षेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे योग्य नसून त्यांना न्याय मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या धरणे आंदोलनात काँग्रेसचे विविध नेते, माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत माजी सैनिकांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Press reporter अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • *नांदेडमध्ये 13 ते 18 मार्च कालावधीत मिनी सरस रेणुका महोत्सवाचे आयोजन;* *महिला बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री* *मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी* नांदेड दि. 10 मार्च :- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद नांदेड यांच्यावतीने रेणुका महोत्सव 2026 निमित्त ‘मिनी सरस’प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा नांदेड येथील मल्टीपर्पज हायस्कूल, वजीराबाद येथे 13 ते 18 मार्च 2026 या कालावधीत दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत भरविण्यात येणार आहे. या मिनी सरस मेळाव्यात महाराष्ट्रातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध दर्जेदार वस्तू व खाद्यपदार्थांचे भव्य प्रदर्शन व विक्री होणार आहे. यामध्ये बाजरीची खारोडी, व्हेज आम्लेट, अमरावतीची मांड्यावर मडक्यात तयार केलेली पुरणपोळी, बाजरीची भाकरी-बेसन-ठेचा, काजू, मँगो पल्प, पापड, कुरडई, विविध प्रकारची लोणची, मसाले, शेवया, नाचणीचे पदार्थ, डाळी, मनुका आदी खाद्यपदार्थांचा समावेश आहे. तसेच घोंगडी, बंजारा ड्रेस, कोल्हापुरी चप्पल, पुरुषांचे कपडे, साड्या, खेळणी, घर सजावटीच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने, बेन्टेक्स दागिने, हस्तनिर्मित वस्तू, जयपुरी टोपी, लाकडी वस्तू, भांडी अशा विविध प्रकारच्या वस्तूही विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. मेळाव्यात दररोज संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून नांदेडकरांना सांस्कृतिक मेजवानीचा आनंदही घेता येणार आहे. दर्जेदार साहित्य व माफक दरात उपलब्ध असलेल्या या मेळाव्याला भेट देऊन महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक मेघना कावली तसेच उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ संजय तुबाकले व जिल्हा प्रशासन नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे. नांदेड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
    1
    *नांदेडमध्ये 13 ते 18 मार्च कालावधीत मिनी सरस रेणुका महोत्सवाचे आयोजन;* 
*महिला बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री*
*मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी*
नांदेड दि. 10 मार्च :- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद नांदेड यांच्यावतीने रेणुका महोत्सव 2026 निमित्त ‘मिनी सरस’प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा नांदेड येथील मल्टीपर्पज हायस्कूल, वजीराबाद येथे 13 ते 18 मार्च 2026 या कालावधीत दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत भरविण्यात येणार आहे.
या मिनी सरस मेळाव्यात महाराष्ट्रातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध दर्जेदार वस्तू व खाद्यपदार्थांचे भव्य प्रदर्शन व विक्री होणार आहे. यामध्ये बाजरीची खारोडी, व्हेज आम्लेट, अमरावतीची मांड्यावर मडक्यात तयार केलेली पुरणपोळी, बाजरीची भाकरी-बेसन-ठेचा, काजू, मँगो पल्प, पापड, कुरडई, विविध प्रकारची लोणची, मसाले, शेवया, नाचणीचे पदार्थ, डाळी, मनुका आदी खाद्यपदार्थांचा समावेश आहे.
तसेच घोंगडी, बंजारा ड्रेस, कोल्हापुरी चप्पल, पुरुषांचे कपडे, साड्या, खेळणी, घर सजावटीच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने, बेन्टेक्स दागिने, हस्तनिर्मित वस्तू, जयपुरी टोपी, लाकडी वस्तू, भांडी अशा विविध प्रकारच्या वस्तूही विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत.
मेळाव्यात दररोज संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून नांदेडकरांना सांस्कृतिक मेजवानीचा आनंदही घेता येणार आहे. दर्जेदार साहित्य व माफक दरात उपलब्ध असलेल्या या मेळाव्याला भेट देऊन महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक  मेघना कावली तसेच उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ संजय तुबाकले व जिल्हा प्रशासन नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे. नांदेड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
  • ⚡ उपोषणाचा तिसरा दिवस… आणि मन हेलावून टाकणारा प्रसंग आज माझ्या उपोषण स्थळी एक ६५ वर्षांच्या आजी भेटायला आल्या. महावितरणकडून होत असलेल्या त्रासामुळे त्या अक्षरशः डोळ्यात पाणी आणून रडू लागल्या. सामान्य गोरगरीब नागरिकांना वीज बिल, कनेक्शन व इतर समस्यांमुळे किती हाल सहन करावे लागत आहेत, याचे हे जिवंत उदाहरण आहे. एमएसईबी महावितरणच्या प्रांगणातच एका वृद्ध मायेला अश्रू ढाळावे लागतात, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. जोपर्यंत गोरगरीब वीज ग्राहकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार. #Mahavitaran #Himayatnagar #Uposhan #ElectricityIssues #CommonPeople #JusticeForConsumers #NandedNews #MaharashtraNews #PublicVoice ⚡
    1
    ⚡ उपोषणाचा तिसरा दिवस… आणि मन हेलावून टाकणारा प्रसंग
आज माझ्या उपोषण स्थळी एक ६५ वर्षांच्या आजी भेटायला आल्या. महावितरणकडून होत असलेल्या त्रासामुळे त्या अक्षरशः डोळ्यात पाणी आणून रडू लागल्या.
सामान्य गोरगरीब नागरिकांना वीज बिल, कनेक्शन व इतर समस्यांमुळे किती हाल सहन करावे लागत आहेत, याचे हे जिवंत उदाहरण आहे.
एमएसईबी महावितरणच्या प्रांगणातच एका वृद्ध मायेला अश्रू ढाळावे लागतात, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे.
जोपर्यंत गोरगरीब वीज ग्राहकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार.
#Mahavitaran #Himayatnagar #Uposhan #ElectricityIssues #CommonPeople #JusticeForConsumers #NandedNews #MaharashtraNews #PublicVoice ⚡
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    7 hrs ago
  • (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळुकवाडी शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी वर बुधवारी (दि.११) दुपारी सुमारे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत एक काळवीट गंभीर जखमी झाले. मुळुकवाडी येथील सुखदेव वाणी व ग्रामस्थांनी जखमी काळवीटाला पाणी पाजून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र गंभीर दुखापत झाल्याने काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. काळवीट मृत्यूमुखी पडल्याची माहिती त्यांनी फोनद्वारे वनरक्षक महेश मेटे यांना दिली तसेच वनकर्मचारी तातडीने पाठविण्याची विनंती केली. राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी वर हरिण व काळवीट अज्ञात वाहनांच्या धडकेत जखमी होण्याच्या किंवा मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वाढत आहेत. गेल्या महिन्यातही याच मुळुकवाडी शिवारात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या हरिणाला ग्रामस्थांच्या मदतीने वाचविण्यात यश आले होते. मात्र या वेळी काळवीटाचा जागीच मृत्यू झाला. या ठिकाणी वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी सावधानतेचे फलक लावावेत व वाहनचालकांना वेग मर्यादा पाळण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
    1
    (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळुकवाडी शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी वर बुधवारी (दि.११) दुपारी सुमारे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत एक काळवीट गंभीर जखमी झाले. मुळुकवाडी येथील सुखदेव वाणी व ग्रामस्थांनी जखमी काळवीटाला पाणी पाजून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र गंभीर दुखापत झाल्याने काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. काळवीट मृत्यूमुखी पडल्याची माहिती त्यांनी फोनद्वारे वनरक्षक महेश मेटे यांना दिली तसेच वनकर्मचारी तातडीने पाठविण्याची विनंती केली. राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी वर हरिण व काळवीट अज्ञात वाहनांच्या धडकेत जखमी होण्याच्या किंवा मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वाढत आहेत. गेल्या महिन्यातही याच मुळुकवाडी शिवारात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या हरिणाला ग्रामस्थांच्या मदतीने वाचविण्यात यश आले होते. मात्र या वेळी काळवीटाचा जागीच मृत्यू झाला. या ठिकाणी वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी सावधानतेचे फलक लावावेत व वाहनचालकांना वेग मर्यादा पाळण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने विविध विषयाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बैठक आज समाज कल्याण केंद्र रंगभवन या ठिकाणी संपन्न झाला. या बैठकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एपस्टीन फाईल मध्ये आलेला आहे. त्याबद्दल कोणीही चकार शब्द काढत नसून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात 2 मार्चला मुंबईला मुद्रा मोदी ते मुजरा मोदी या नावाने आंदोलन करून पंतप्रधान पदाचा राजीनामा मागितला होता. त्याच अनुषंगाने सोलापूर वंचित बहुजन आघाडी शहर व जिल्ह्याच्या वतीने दिनांक 16 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद कार्यालय पुनम गेट समोर मोठ्या प्रमाणात निदर्शने व धरणे आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे गॅस दरवाढीचा निषेध, अमेरिकेचा मंत्री भारतात येऊन गेलेल्या बडबडाचा निषेध, एफस्टिन फाईल मध्ये भाजपाचे तीन मंत्र्यांचे नाव आलेले असून त्यांच्या राजीनामा मागणीच्या संदर्भात, आणि ग्राहकाच्या पूर परवानगी न घेता जोर जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे त्याच्या निषेधार्थ 16 तारखेला वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने आंदोलन घेण्यात येणार असून या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हा व शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. या.
    1
    वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने विविध विषयाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बैठक आज समाज कल्याण केंद्र रंगभवन या ठिकाणी संपन्न झाला. या बैठकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एपस्टीन फाईल मध्ये आलेला आहे. त्याबद्दल कोणीही चकार शब्द काढत नसून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात 2 मार्चला मुंबईला मुद्रा मोदी ते मुजरा मोदी या नावाने आंदोलन करून पंतप्रधान पदाचा राजीनामा मागितला होता. त्याच अनुषंगाने सोलापूर वंचित बहुजन आघाडी शहर व जिल्ह्याच्या वतीने दिनांक 16 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद कार्यालय पुनम गेट समोर मोठ्या प्रमाणात निदर्शने व धरणे आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 
त्याचप्रमाणे गॅस दरवाढीचा निषेध, अमेरिकेचा मंत्री भारतात येऊन गेलेल्या बडबडाचा निषेध, एफस्टिन फाईल मध्ये भाजपाचे तीन मंत्र्यांचे नाव आलेले असून त्यांच्या राजीनामा मागणीच्या संदर्भात, आणि ग्राहकाच्या पूर परवानगी न घेता जोर जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे त्याच्या निषेधार्थ 16 तारखेला वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने आंदोलन घेण्यात येणार असून या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हा व शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. 
या.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Press reporter अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • महापालिकेच्या 'अतिक्रमण' मोहिमेचा फार्स; स्वतःच्या दारातील स्वच्छता, मात्र शहरात अतिक्रमणाचा विळखा कायम! नांदेड: महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची सध्याची कार्यपद्धती म्हणजे 'दिवाखाली अंधार' अशी झाली आहे. महापालिका प्रशासन केवळ आपल्या मुख्य कार्यालयाच्या आसपासच्या भागातील अतिक्रमण हटवून कारवाईचा मोठा गाजावाजा करत आहे. मात्र, शहरातील इतर मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमध्ये अतिक्रमणाने रौद्र रूप धारण केले असून, पथक मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. पक्षपाती कारवाईचा संताप महानगरपालिकेचे पथक ठराविक भागांतच फिरताना दिसते. केवळ महापालिकेच्या बाजूचे रस्ते मोकळे करून आपण खूप मोठे काम केले आहे, अशा आविर्भावात प्रशासन वावरत आहे. या 'कलगीतुऱ्या'मुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. प्रशासनाला फक्त आपल्या कार्यालयाचा परिसर सुशोभित ठेवायचा आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. शहराच्या इतर भागांत अतिक्रमणाचे साम्राज्य शहरातील महत्त्वाचे चौक, बाजारपेठा आणि रहिवासी भागांत पदपथांवर फेरीवाले, टपऱ्या आणि अनधिकृत बांधकामांनी पाय ठेवायला जागा उरलेली नाही. * वाहतूक कोंडी: रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून, वाहनांच्या रांगा लागत आहेत. * पथक आहे की सुस्त? शहराच्या इतर भागात जेव्हा नागरिक तक्रारी करतात, तेव्हा अतिक्रमण पथक कुंभकर्णी झोपेत असल्याचे भासते. नागरिकांची मागणी "अतिक्रमण काढायचे असेल तर ते संपूर्ण शहराचे काढावे, फक्त स्वतःच्या इमारतीभोवती कारवाई करून प्रशासन काय साध्य करत आहे?" असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. जर लवकरच शहरातील मुख्य रस्त्यांवरील हे अतिक्रमण हटवले नाही, तर नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आता महापालिका आयुक्त या सुस्त यंत्रणेला जागे करून संपूर्ण शहरात समान कारवाई करण्याचे आदेश देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    महापालिकेच्या 'अतिक्रमण' मोहिमेचा फार्स; स्वतःच्या दारातील स्वच्छता, मात्र शहरात अतिक्रमणाचा विळखा कायम!
नांदेड:
महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची सध्याची कार्यपद्धती म्हणजे 'दिवाखाली अंधार' अशी झाली आहे. महापालिका प्रशासन केवळ आपल्या मुख्य कार्यालयाच्या आसपासच्या भागातील अतिक्रमण हटवून कारवाईचा मोठा गाजावाजा करत आहे. मात्र, शहरातील इतर मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमध्ये अतिक्रमणाने रौद्र रूप धारण केले असून, पथक मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.
पक्षपाती कारवाईचा संताप
महानगरपालिकेचे पथक ठराविक भागांतच फिरताना दिसते. केवळ महापालिकेच्या बाजूचे रस्ते मोकळे करून आपण खूप मोठे काम केले आहे, अशा आविर्भावात प्रशासन वावरत आहे. या 'कलगीतुऱ्या'मुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. प्रशासनाला फक्त आपल्या कार्यालयाचा परिसर सुशोभित ठेवायचा आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
शहराच्या इतर भागांत अतिक्रमणाचे साम्राज्य
शहरातील महत्त्वाचे चौक, बाजारपेठा आणि रहिवासी भागांत पदपथांवर फेरीवाले, टपऱ्या आणि अनधिकृत बांधकामांनी पाय ठेवायला जागा उरलेली नाही.
* वाहतूक कोंडी: रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून, वाहनांच्या रांगा लागत आहेत.
* पथक आहे की सुस्त? शहराच्या इतर भागात जेव्हा नागरिक तक्रारी करतात, तेव्हा अतिक्रमण पथक कुंभकर्णी झोपेत असल्याचे भासते.
नागरिकांची मागणी
"अतिक्रमण काढायचे असेल तर ते संपूर्ण शहराचे काढावे, फक्त स्वतःच्या इमारतीभोवती कारवाई करून प्रशासन काय साध्य करत आहे?" असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. जर लवकरच शहरातील मुख्य रस्त्यांवरील हे अतिक्रमण हटवले नाही, तर नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
आता महापालिका आयुक्त या सुस्त यंत्रणेला जागे करून संपूर्ण शहरात समान कारवाई करण्याचे आदेश देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.