अमृतच्या वतीने ३१ जुलै रोजी अहिल्यानगर येथे विशेष प्रशासकीय शिबिर महाराजस्व अभियानानिमित्त आयोजनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अपर तहसील कार्यालयाच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत ३१ जुलै रोजी स्वस्तिक चौक येथील लक्ष्मी अहिल्यानगर, दि. २८ :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अपर तहसील कार्यालयाच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत ३१ जुलै रोजी स्वस्तिक चौक येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात विशेष प्रशासकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अमृत संस्थेचे लाभार्थी तसेच लक्ष्यित गटातील महिला, पुरुष, युवक, युवती आणि विद्यार्थ्यांनी अहिल्यानगर शहर मतदारसंघातील या विशेष प्रशासकीय शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले आहे. या शिबिरात अमृत उद्योजकता विकास कार्यक्रमाचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच अमृत संस्थेच्या योजनांचा स्टॉल आणि विविध शासकीय विभागांचे माहिती स्टॉल्स उभारण्यात येणार असून, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, दाखले, अर्ज प्रक्रिया तसेच प्रशासकीय सेवांबाबत नागरिकांना थेट मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय अमृत संस्थेच्या आगामी प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगाराच्या संधी आणि विविध उपक्रमांची माहितीही लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अमृत संस्थेविषयी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा संस्थेचा लक्ष्यित गट आहे. यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी आणि भूमिहार आदी जातींचा समावेश आहे. या जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी नागरिकांनी आपल्या जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक : ९११२२२८७६९ जिल्हा कार्यालय : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्रासमोर, प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर – ४१४००३ #अमृतसंस्था #AmrutSanstha #अहिल्यानगर #Ahilyanagar #महाराजस्वअभियान #MaharajaswaAbhiyan #विशेषप्रशासकीयशिबिर

- अमरापुर येथील सुवर्ण बिंदू अर्बन निधी लिमिटेड पतसंस्था बंद खाते दारांना घातला कोटीचा गंडा पतसंस्था बंद करून संचालक फरार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्या दाखल1
- घोडनदी येथे जैन समाजाच्या चातुर्मासाला उत्साहात प्रारंभ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -24}: घोडनदी येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने यंदाच्या चातुर्मास-2026 सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला आहे. धर्मसभा मंडपात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे. यंदाच्या चातुर्मासात प्रवचन प्रभाविका ज्ञान प्रबोधिनी साध्वी पू. आभाश्रीजी म.सा., आगम ज्योती साध्वी पू. डॉ. महिमाश्रीजी म.सा. तसेच मधुर व्याख्यानी साध्वी पू. डॉ. श्रेयांश्रीजी म.सा. यांचे पावन सान्निध्य लाभले आहे. चातुर्मास काळात दररोज सकाळी ६.३० वाजता प्रार्थना, सकाळी ८.४५ ते ९.४५ या वेळेत प्रवचन, दुपारी २.३० वाजता महिलांसाठी धार्मिक वर्ग तसेच सूर्यास्तानंतर प्रतिक्रमण आयोजित करण्यात आले आहे. चातुर्मासाची सुरुवात धर्मचक्र तपाने करण्यात आली असून अधिकाधिक भाविकांनी एकासना, आयंबिल, उपवास, दया, रात्री संवर व पौषध यांसारख्या धार्मिक कार्यक्रम मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. धर्मचक्र तपस्वींच्या पारण्याची व्यवस्था श्री जैन युवा परिषद करणार असून चातुर्मास कालावधीत गौतम प्रसादीची व्यवस्था पंचायत भवन भोजनशाळेत करण्यात आली आहे. दर्शन, प्रार्थना, प्रवचन, धर्मचर्चा, मांगलिक व प्रतिक्रमणाचा लाभ घेऊन आत्मशुद्धी आणि कर्मनिर्जरा साधावी, असे आवाहन जैन श्रावक संघाने केले आहे. हा कार्यक्रम स्व. श्री सुखलालजी खाबिया धर्मसभा मंडप, पंचायत भवन, घोडनदी येथे होत आहे.2
- वडिलांच्या सामाजिक कार्याचा आदर्श पाहत चिमुकलीने गुरुपौर्णिमा साजरी वडिलांच्या सामाजिक कार्याचा आदर्श पाहत चिमुकलीने गुरुपौर्णिमा साजरी1
- श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे सेवानिवृत्ती विकास अधिकारी नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.3
- जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांना बारामती सत्र न्यायालयातून जामीन मंजूर1
- हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे (३०–४० किमी/तास) वाहण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०१ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०२ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०३ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०४ ऑगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान इशाऱ्यांचे संभाव्य परिणाम (सर्वसाधारण) रस्त्यांवर पाणी साचणे, सखल भागात जलभराव होणे, विशेषतः शहरी अंडरपास बंद होण्याची शक्यता. दृश्यमानता कमी होण्याची शक्यता. कच्च्या रस्त्यांचे किरकोळ नुकसान. असुरक्षित किंवा कमकुवत संरचनांचे नुकसान. स्थानिक पातळीवर भूस्खलन, चिखलयुक्त भूस्खलन किंवा जमीन खचण्याच्या घटना. विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटामुळे: नवीन लागवड, फळबागा व उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता. सर्वसाधारण सूचना जोरदार/अतिजोरदार/मुसळधार पावसाच्या काळात: प्रवासापूर्वी वाहतूक कोंडीची माहिती घ्यावी. प्रशासनाच्या वाहतूक सूचनांचे पालन करावे. पाणी साचणाऱ्या भागात जाणे टाळावे. धोकादायक किंवा कमकुवत बांधकामांमध्ये राहणे टाळावे. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाच्या काळात: मोकळ्या जागेत किंवा शेतात काम करणे टाळावे. झाडाखाली किंवा असुरक्षित बांधकामांचा आसरा घेऊ नये. विद्युत/इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लगमधून वेगळी करावीत. हवामान इशाऱ्यांचा पिकांवर संभाव्य परिणाम बुरशीनाशके व कीटकनाशकांचा परिणाम कमी होणे किंवा वाहून जाणे. भात पिकात मुळांची अपुरी वाढ, पाने पिवळी पडणे व रोपे जळणे. नाचणीमध्ये रोपांचे नुकसान, अन्नद्रव्यांचा ऱ्हास व बुरशीजन्य रोग वाढणे. सोयाबीन व भुईमूगात मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट येणे. भुईमूग व करडईमध्ये झाडे पिवळी पडणे, कोमेजणे व मुळांची वाढ खुंटणे. वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला व फळबागांमध्ये रोपे आडवी पडणे (लॉजिंग) किंवा नुकसान होणे. कृषी सल्ला उभी पिके, फळबागा व भाजीपाला पिकांतील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा. खत व कीड-रोग नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी पुढे ढकलावी. मेघगर्जनेच्या पार्श्वभूमीवर परिपक्व भाजीपाला व फळपिकांची शक्य तितक्या लवकर काढणी करून सुरक्षित साठवण करावी. भाजीपाला पिकांना आवश्यक ते आधार (स्टेकिंग) द्यावा.1
- धाराशिव (उस्मानाबाद) येथील सोनारी जिल्हा परिषद शाळेला कुलुप.?1
- "स्वाभिमानी"च्या जिल्हा अध्यक्षाने बँक मॅनेजरच्या कानशिलात का लगावली !1