logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लग्ना साठी मुलगी मिळेना, नैराश्य वाढलं; तरुणाची आत्महत्या लग्ना साठी मुलगी मिळेना, नैराश्य वाढलं; तरुणाची आत्महत्या, संग्रामपूर हादरलं बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. हरिष अरुण वानखडे (वय २८) या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरातील हलाखीची आर्थिक परिस्थितीमुळे हरिष याला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही वारंवार नकार मिळत असल्याने तो मानसिक तणावात होता. या नैराश्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना समाजासाठी चिंताजनक असून आर्थिक अडचणी आणि सामाजिक दबावामुळे तरुणांनी अशा टोकाच्या निर्णयापर्यंत जाऊ नये, यासाठी कुटुंब व समाजाने वेळेत आधार देणे गरजेचे आहे. 👉 जर कोणी मानसिक तणावात असेल, तर त्यांना एकटे सोडू नका. संवाद आणि आधार यामुळे जीव वाचू शकतो.

22 hrs ago
user_RahimKhan Pathan
RahimKhan Pathan
Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
22 hrs ago
8bfec178-3c3c-443e-970e-6215dff6753d

लग्ना साठी मुलगी मिळेना, नैराश्य वाढलं; तरुणाची आत्महत्या लग्ना साठी मुलगी मिळेना, नैराश्य वाढलं; तरुणाची आत्महत्या, संग्रामपूर हादरलं बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. हरिष अरुण वानखडे (वय २८) या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरातील हलाखीची आर्थिक परिस्थितीमुळे हरिष याला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही वारंवार नकार मिळत असल्याने तो मानसिक तणावात होता. या नैराश्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना समाजासाठी चिंताजनक असून आर्थिक अडचणी आणि सामाजिक दबावामुळे तरुणांनी अशा टोकाच्या निर्णयापर्यंत जाऊ नये, यासाठी कुटुंब व समाजाने वेळेत आधार देणे गरजेचे आहे. 👉 जर कोणी मानसिक तणावात असेल, तर त्यांना एकटे सोडू नका. संवाद आणि आधार यामुळे जीव वाचू शकतो.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जामनेर महामार्गावर काळाचा घाला; सावळदबारा येथील पती-पत्नी जागीच ठार १ वर्षाची चिमुकली चमत्कारिकरित्या बचावली सोयगांव , *बातमी सोयगाव* जामनेर–महामार्गावर तोरणाळा येथील स्मशानभूमीजवळ दि. २२ च्या रात्री अंदाजे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील रहिवासी पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या सोबत असलेली एक वर्षाची चिमुकली मुलगी सुदैवाने बचावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल वासुदेव खडके (वय ३५) व सोनाली गोपाल खडके (वय ३०, रा. सावळदबारा, ता. सोयगाव) हे दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जामनेर येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
    1
    जामनेर महामार्गावर काळाचा घाला; सावळदबारा येथील पती-पत्नी जागीच ठार
१ वर्षाची चिमुकली चमत्कारिकरित्या बचावली सोयगांव ,  
*बातमी सोयगाव*
जामनेर–महामार्गावर तोरणाळा येथील स्मशानभूमीजवळ दि. २२ च्या रात्री अंदाजे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील रहिवासी पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या सोबत असलेली एक वर्षाची चिमुकली मुलगी सुदैवाने बचावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल वासुदेव खडके (वय ३५) व सोनाली गोपाल खडके (वय ३०, रा. सावळदबारा, ता. सोयगाव) हे दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जामनेर येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    31 min ago
  • 😡 Owaisi Ka Powerful Debate Reaction 🔥💥
    1
    😡 Owaisi Ka Powerful Debate Reaction 🔥💥
    user_Haq Ki Baat
    Haq Ki Baat
    City Star सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • सिल्लोड येथील तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले असल्याने अनेक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अनेक नागरिक शासकीय कार्यालयामध्ये चक्र मारत आहे मात्र अधिकारी संपला गेले असल्याने कार्यालयात शुभ सकाळ आहे
    1
    सिल्लोड येथील तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले असल्याने अनेक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अनेक नागरिक शासकीय कार्यालयामध्ये चक्र मारत आहे मात्र अधिकारी संपला गेले असल्याने कार्यालयात शुभ सकाळ आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    user_अब तक न्यूज महाराष्ट्र
    अब तक न्यूज महाराष्ट्र
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • नमस्कार मित्रांनो... बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नाव जोरदार चर्चेत आले आहे... ते नाव म्हणजे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा! जनतेशी थेट नाळ जोडणारा, गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणून सानंदा यांची ओळख निर्माण झाली आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघात त्यांनी केलेल्या कामांची चर्चा आजही नागरिकांमध्ये होताना दिसते. गरीब, शेतकरी, युवक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सानंदा यांची कार्यशैली ही शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध मानली जाते. वेळेचे महत्त्व, संघटनेची ताकद आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हे त्यांच्या नेतृत्वाचे मुख्य गुण मानले जातात. अलीकडच्या काळात त्यांच्या राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला आहे. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार तसेच खासदार पार्थ पवार यांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांची भूमिका चर्चेत राहिली. सध्या ते बारामती येथे सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारासाठी सक्रिय असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पक्षात त्यांच्यावर असलेला विश्वास अधिक दृढ झाल्याचे बोलले जात आहे. इतकेच नाही... आगामी विधान परिषद निवडणुकीत त्यांचे नावही चर्चेत असून, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. समर्थक काय म्हणतात? सानंदा म्हणजे गरीबांचा आधार... कार्यकर्त्यांची ताकद... आणि बुलढाणा जिल्ह्याचा दमदार आवाज! एकूणच काय तर... राणा दिलीपकुमार सानंदा यांची राजकीय गाडी आता पुन्हा वेगाने धावताना दिसत आहे... आणि आगामी काळात ते मोठी भूमिका बजावतील, अशी चर्चा रंगली आहे.
    1
    नमस्कार मित्रांनो...
बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नाव जोरदार चर्चेत आले आहे... ते नाव म्हणजे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा!
जनतेशी थेट नाळ जोडणारा, गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणून सानंदा यांची ओळख निर्माण झाली आहे.
खामगाव विधानसभा मतदारसंघात त्यांनी केलेल्या कामांची चर्चा आजही नागरिकांमध्ये होताना दिसते. गरीब, शेतकरी, युवक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
सानंदा यांची कार्यशैली ही शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध मानली जाते. वेळेचे महत्त्व, संघटनेची ताकद आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हे त्यांच्या नेतृत्वाचे मुख्य गुण मानले जातात.
अलीकडच्या काळात त्यांच्या राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला आहे. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार तसेच खासदार पार्थ पवार यांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांची भूमिका चर्चेत राहिली.
सध्या ते बारामती येथे सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारासाठी सक्रिय असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पक्षात त्यांच्यावर असलेला विश्वास अधिक दृढ झाल्याचे बोलले जात आहे.
इतकेच नाही... आगामी विधान परिषद निवडणुकीत त्यांचे नावही चर्चेत असून, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
समर्थक काय म्हणतात?
सानंदा म्हणजे गरीबांचा आधार... कार्यकर्त्यांची ताकद... आणि बुलढाणा जिल्ह्याचा दमदार आवाज!
एकूणच काय तर...
राणा दिलीपकुमार सानंदा यांची राजकीय गाडी आता पुन्हा वेगाने धावताना दिसत आहे... आणि आगामी काळात ते मोठी भूमिका बजावतील, अशी चर्चा रंगली आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    11 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील मारुंजी आणि लगतच्या परिसरात (हिंजवडी, आयटी पार्क परिसर) ​उकाड्यापासून सुटका: गेल्या काही दिवसांपासून पुणेकर 38°C ते 40°C तापमानाचा सामना करत होते. या पावसामुळे वातावरणात निर्माण झालेला गारवा स्थानिकांसाठी वरदान ठरला आहे. ​आयटी हबमध्ये चैतन्य: कामाच्या व्यापात आणि ट्रॅफिकच्या कचाट्यात असलेल्या हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नोकरदारांना या मृदगंधामुळे मोठा मानसिक दिलासा मिळाला. ​तात्पुरता दिलासा: जरी हा पाऊस तात्पुरता असला, तरी वाढत्या उष्णतेच्या लाटेला त्याने काही काळ लगाम घातला आहे.
    2
    पुणे जिल्ह्यातील मारुंजी आणि लगतच्या परिसरात (हिंजवडी, आयटी पार्क परिसर) ​उकाड्यापासून सुटका: गेल्या काही दिवसांपासून पुणेकर 38°C ते 40°C तापमानाचा सामना करत होते. या पावसामुळे वातावरणात निर्माण झालेला गारवा स्थानिकांसाठी वरदान ठरला आहे.
​आयटी हबमध्ये चैतन्य: कामाच्या व्यापात आणि ट्रॅफिकच्या कचाट्यात असलेल्या हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नोकरदारांना या मृदगंधामुळे मोठा मानसिक दिलासा मिळाला.
​तात्पुरता दिलासा: जरी हा पाऊस तात्पुरता असला, तरी वाढत्या उष्णतेच्या लाटेला त्याने काही काळ लगाम घातला आहे.
    user_Santossh Javare
    Santossh Javare
    Aklud•
    20 hrs ago
  • दुसरबीड ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहारांविरोधात आमरण उपोषण तीव्र; तीसऱ्या दिवशीही ग्रामस्थांचा ठाम निर्धार
    1
    दुसरबीड ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहारांविरोधात आमरण उपोषण तीव्र; तीसऱ्या दिवशीही ग्रामस्थांचा ठाम निर्धार
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • “स्कॅनर घोटाळ्यावर न्याय मागण्यासाठी आयुक्त कार्यालय गाठले; मंगेश साबळे आक्रमक”
    1
    “स्कॅनर घोटाळ्यावर न्याय मागण्यासाठी आयुक्त कार्यालय गाठले; मंगेश साबळे आक्रमक”
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.