logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खरीप हंगामासाठी हिंगोली जिल्ह्यात खताचे नियोजन पूर्ण शेतकऱ्यांना खताची कमतरता भासणार नाही- कृषी विभाग हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगाम 2026-27 सुरू होण्यापूर्वी कृषी विभागामार्फत खत उपलब्धतेचे नियोजन पूर्ण करण्यात आले असून, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची खतटंचाई भासू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड तसेच लातूर विभागाचे कृषी सहसंचालक महेशकुमार तीर्थकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खरीप हंगामासाठी हिंगोली जिल्ह्यास एकूण 98 हजार 300 मेट्रिक टन खताचे मंजूर आवंटन प्राप्त झाले आहे. याशिवाय संरक्षित साठा म्हणून 1 हजार 950 मेट्रिक टन युरिया व 700 मेट्रिक टन डीएपी खत उपलब्ध ठेवण्यास मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध व्हावे, यासाठी खत कंपन्या, घाऊक विक्रेते व किरकोळ विक्रेत्यांशी समन्वय साधण्यात येत आहे. तसेच खत साठ्याचे नियमित निरीक्षण करून वितरण व्यवस्थेवर देखरेख ठेवली जाणार आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खत खरेदी करावे, पावती घ्यावी तसेच अनावश्यक साठेबाजी किंवा जादा दर आकारणीबाबत तक्रार असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात आवश्यक खत पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी कृषी विभागाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम नियोजन केले असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली यांनी दिली आहे.

14 hrs ago
user_दिपक हैबतराव चोरमले
दिपक हैबतराव चोरमले
Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
14 hrs ago

खरीप हंगामासाठी हिंगोली जिल्ह्यात खताचे नियोजन पूर्ण शेतकऱ्यांना खताची कमतरता भासणार नाही- कृषी विभाग हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगाम 2026-27 सुरू होण्यापूर्वी कृषी विभागामार्फत खत उपलब्धतेचे नियोजन पूर्ण करण्यात आले असून, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची खतटंचाई भासू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड तसेच लातूर विभागाचे कृषी सहसंचालक महेशकुमार तीर्थकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खरीप हंगामासाठी हिंगोली जिल्ह्यास एकूण 98 हजार 300 मेट्रिक टन खताचे मंजूर आवंटन प्राप्त झाले आहे. याशिवाय संरक्षित साठा म्हणून 1 हजार 950 मेट्रिक टन युरिया व 700 मेट्रिक टन डीएपी खत उपलब्ध ठेवण्यास मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध व्हावे, यासाठी खत कंपन्या, घाऊक विक्रेते व किरकोळ विक्रेत्यांशी समन्वय साधण्यात येत आहे. तसेच खत साठ्याचे नियमित निरीक्षण करून वितरण व्यवस्थेवर देखरेख ठेवली जाणार आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खत खरेदी करावे, पावती घ्यावी तसेच अनावश्यक साठेबाजी किंवा जादा दर आकारणीबाबत तक्रार असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात आवश्यक खत पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी कृषी विभागाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम नियोजन केले असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली यांनी दिली आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    12 hrs ago
  • प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर; तक्रारदारांचे तहसीलसमोर अर्धनग्न आंदोलन मंठा (प्रतिनिधी) – पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाबाबत दिलेल्या तक्रारीकडे तहसील प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तक्रारदारांनी अखेर आक्रमक भूमिका घेतली. दि. २८ एप्रिल रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत संताप व्यक्त करण्यात आला. तक्रारदारांचे म्हणणे आहे की, जेसीबी व पोकलॅन्डसारख्या यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून, नियमांची उघडपणे पायमल्ली होत आहे. याबाबत यापूर्वी निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत, दोषी अधिकारी व संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, ड्रोनद्वारे सर्व रेती घाटांचे मोजमाप करून निष्पक्ष चौकशी करावी, तोपर्यंत उत्खनन पूर्णपणे बंद करावे, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ गरम वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने मात्र आंदोलनाची दखल घेऊन प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल का अशी अशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, “तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
    1
    प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर; तक्रारदारांचे तहसीलसमोर अर्धनग्न आंदोलन
मंठा (प्रतिनिधी) – पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाबाबत दिलेल्या तक्रारीकडे तहसील प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तक्रारदारांनी अखेर आक्रमक भूमिका घेतली. दि. २८ एप्रिल रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत संताप व्यक्त करण्यात आला.
तक्रारदारांचे म्हणणे आहे की, जेसीबी व पोकलॅन्डसारख्या यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून, नियमांची उघडपणे पायमल्ली होत आहे. याबाबत यापूर्वी निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत, दोषी अधिकारी व संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, ड्रोनद्वारे सर्व रेती घाटांचे मोजमाप करून निष्पक्ष चौकशी करावी, तोपर्यंत उत्खनन पूर्णपणे बंद करावे, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ गरम वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने मात्र आंदोलनाची दखल घेऊन  प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल का अशी अशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, “तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
    user_Suresh D Dawane Patil
    Suresh D Dawane Patil
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • मंठा तालुक्यातील हेलस येथे एका ७० वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. अचित विश्वनाथराव खराबे (वय ७०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने गळफास घेऊन जीवन संपवले. घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये "माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही" असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे हेलस परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    1
    मंठा तालुक्यातील हेलस येथे एका ७० वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. अचित विश्वनाथराव खराबे (वय ७०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने गळफास घेऊन जीवन संपवले. घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये "माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही" असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे हेलस परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ माहा आंदोलन आझाद मैदान मुंबई
    4
    लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ माहा आंदोलन आझाद मैदान मुंबई
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • नांदेड (प्रतिनिधी) : बिदर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर आज झालेल्या भीषण अपघातात टिप्पर आणि ऑटो यांच्यात जोरदार धडक होऊन अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टिप्पर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ऑटोमधील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमी प्रवासी हे मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरातील बेहारीपूर गावातील असल्याची माहिती पुढे आली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. 👉 अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
    1
    नांदेड (प्रतिनिधी) : बिदर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर आज झालेल्या भीषण अपघातात टिप्पर आणि ऑटो यांच्यात जोरदार धडक होऊन अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टिप्पर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ऑटोमधील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
जखमी प्रवासी हे मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरातील बेहारीपूर गावातील असल्याची माहिती पुढे आली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
👉 अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
    user_MUKRAMABAD MDL
    MUKRAMABAD MDL
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • माजी जि.प. सदस्य श्री संग्राम हयगले यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश कासराळी ता. बिलोली जि. नांदेड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री संग्राम हयगले यांनी दि. 27 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा ठाणे येथील स्व. मातोश्री गंगुबाई शिंदे सभागृहात पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थित श्री. संग्राम हयगले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश करून शिवसेनेशी निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे महाव्यवस्थापक मा. बालाजी पाटील खतगावकर साहेब, संपर्क प्रमुख श्री मडावी, जिल्हा प्रमुख श्री उमेश मुंढे तसेच सेवानिवृत्त सनदी अधिकारी मधुजी गिरगावकर उपस्थित होते. याशिवाय सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री अशोक गोपछडे, लगूळ येथील माजी सरपंच बाबुराव गोसलोड, विजयनगर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी राजकुमार गुरगुरलवार, श्री विनोद निलावार आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे बिलोली तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक राजकारणात या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून आगामी काळात याचा राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.
    1
    माजी जि.प. सदस्य श्री संग्राम हयगले यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश
कासराळी ता. बिलोली जि. नांदेड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री संग्राम हयगले यांनी दि. 27 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा ठाणे येथील स्व. मातोश्री गंगुबाई शिंदे सभागृहात पार पडला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब 
यांच्या उपस्थित  श्री. संग्राम हयगले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश करून शिवसेनेशी निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे महाव्यवस्थापक मा. बालाजी पाटील खतगावकर साहेब, संपर्क प्रमुख श्री मडावी, जिल्हा प्रमुख श्री उमेश मुंढे तसेच सेवानिवृत्त सनदी अधिकारी मधुजी गिरगावकर उपस्थित होते. याशिवाय सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री अशोक गोपछडे, लगूळ येथील माजी सरपंच बाबुराव गोसलोड, विजयनगर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी राजकुमार गुरगुरलवार, श्री विनोद निलावार आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे बिलोली तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक राजकारणात या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून आगामी काळात याचा राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना महत्त्वपूर्ण आवाहन करत सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी जनगणनेचे महत्त्व, प्रशासनाची तयारी आणि नागरिकांची भूमिका यावर प्रकाश टाकला. जिल्हाधिकारी म्हणाले की, जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजणी नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. शासनाच्या विविध योजना, निधी वाटप, तसेच सामाजिक व आर्थिक धोरणांची आखणी ही जनगणनेच्या अचूक आकडेवारीवर आधारित असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे आणि अचूक माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाच्या तयारीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, जनगणनेसाठी जिल्ह्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यावर भर दिला जात आहे. तसेच, नागरिकांनी कोणतीही भीती किंवा गैरसमज न ठेवता जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, याची हमीही त्यांनी दिली. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जनगणना ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून त्यातूनच जिल्ह्याचा आणि देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. त्यामुळे “माझी जनगणना, माझी जबाबदारी” या भावनेतून सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार असून, ग्रामीण व शहरी भागात जनगणनेविषयी जागरूकता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
    1
    आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना महत्त्वपूर्ण आवाहन करत सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी जनगणनेचे महत्त्व, प्रशासनाची तयारी आणि नागरिकांची भूमिका यावर प्रकाश टाकला.
जिल्हाधिकारी म्हणाले की, जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजणी नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. शासनाच्या विविध योजना, निधी वाटप, तसेच सामाजिक व आर्थिक धोरणांची आखणी ही जनगणनेच्या अचूक आकडेवारीवर आधारित असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे आणि अचूक माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रशासनाच्या तयारीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, जनगणनेसाठी जिल्ह्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यावर भर दिला जात आहे.
तसेच, नागरिकांनी कोणतीही भीती किंवा गैरसमज न ठेवता जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, याची हमीही त्यांनी दिली.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जनगणना ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून त्यातूनच जिल्ह्याचा आणि देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. त्यामुळे “माझी जनगणना, माझी जबाबदारी” या भावनेतून सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार असून, ग्रामीण व शहरी भागात जनगणनेविषयी जागरूकता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
    user_MUKRAMABAD MDL
    MUKRAMABAD MDL
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • बळीराजाचा आक्रोश! रस्त्यावर फेकला भाजीपाला; कांदा-भाजीपाल्याला फुकट भाव राज्यात सध्या कांदा व भाजीपाल्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रचंड कष्ट करूनही उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. दरम्यान, एका संतप्त शेतकऱ्याने आपला भाजीपाला थेट रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींची तीव्रता अधोरेखित झाली आहे. शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत जात असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही अशा प्रश्न उभा राहत आहे.
    1
    बळीराजाचा आक्रोश! रस्त्यावर फेकला भाजीपाला; कांदा-भाजीपाल्याला फुकट भाव
राज्यात सध्या कांदा व भाजीपाल्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रचंड कष्ट करूनही उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. दरम्यान, एका संतप्त शेतकऱ्याने आपला भाजीपाला थेट रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींची तीव्रता अधोरेखित झाली आहे.
शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत जात असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही अशा प्रश्न उभा राहत आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.