वाळूज महानगरात पायाभूत सुविधा तातडीने विकसित करा – अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता* *वाळूज महानगरात पायाभूत सुविधा तातडीने विकसित करा – अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता* छत्रपती संभाजीनगर, : सिडको वाळूज महानगर परिसर छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाला असून, या परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा तातडीने विकसित करणे आवश्यक आहे. यासाठी विकास आराखड्यासह निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नगर विकास विभागाकडे त्वरीत सादर करावा, असे निर्देश नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांनी दिले. सिडको वाळूज महानगर परिसराच्या विकासासंदर्भात मुंबई येथे असीमकुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस छत्रपती संभाजीनगर येथून विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, सहआयुक्त तसेच संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी गुप्ता यांनी वाळूज महानगर परिसराचा नकाशाव्दारे आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, वडगाव कोल्हाटी, वाळूज आणि बजाजनगर या भागांमध्ये वाढत्या लोकसंख्येला रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधा सुनियोजित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरणाने सविस्तर विकास आराखडा तयार करावा. या आराखड्यासोबत आवश्यक निधीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, असेही त्यांनी निर्देश दिले. तसेच या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांनी सातत्याने पाठपुरावा करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी वाळूज परिसरातील मोठ्या प्रमाणावर साचणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाकडेही लक्ष वेधले. पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच कचरा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- सिल्लोड येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ निवेदन सिल्लोड, ता. — अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आज लहुजी क्रांती सेना, सिल्लोड तालुका तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. सिल्लोड तहसीलचे तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात अनुसूचित जातीतील घटकांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे, तसेच आरक्षणाचा लाभ सर्व स्तरांपर्यंत समान प्रमाणात पोहोचावा, यासाठी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित लहुजी क्रांती सेना प्रदेश अध्यक्ष अशोक कांबळे, मराठवाडा अध्यक्ष सखाराम अहिरे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष बाबुराव अहिरे युवा जिल्हाध्यक्ष फकीरचंद तांबे, युवा जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव अहिरे, युवा तालुकाध्यक्ष किशोर भिसे, शिवदास दणके , विष्णू साळवे ज्ञानेश्वर अहिरे किसन सौदागर संजय मोरे, राजू कांबळे,संजय गायकवाड सोनू सुरडकर संतोष कांबळे आनंद गायकवाड, रघुनाथ अहिरे, संजय निकाळजे, गणपत गायकवाड सुभाष निकाळजे तसेच लहुजी क्रांती सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आपल्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.1
- गंगापूर-वैजापूर रोडवरील शिंगी पाटी येथे दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात शंकर विनायकराव वाघ (वय 30, रा. शिंगी, ता. गंगापूर) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे आणि अनिकेत मुळक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीस उपचारासाठी गंगापूर घाटी येथे दाखल केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या जखमीवर उपचार सुरू असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.1
- संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकीनसंचालक मार्गदर्शन व मैदानी प्रशिक्षण रवी सर संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकिन रवी जाधव सर मो. 9921982615 बिडकिन.ता पैठण.औरगाबाद shaha social media bidkin1
- खुलताबादमध्ये ओमनी कारमध्ये भीषण स्पोर्ट ; कारला आग, गॅस सिलेंडर बाहेर खुलताबाद शहरातील कमला नेहरू भद्रा कॉलनी रोडलगत उभी असलेल्या एका ओमनी कारमध्ये अचानक भीषण स्पोर्ट होऊन आग लागल्याची घटना घडली. आगीदरम्यान गाडीत असलेला गॅस सिलेंडर उडून बाहेर पडल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली. घटनेनंतर अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. तसेच नगरपरिषदेकडून कोणताही आपत्कालीन संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी काही वेळाने पाण्याच्या सहाय्याने आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.नगरपरिषदेकडे अग्निशमन गाडी उपलब्ध असूनही त्यावर प्रशिक्षित फायरमन नसल्याची बाब समोर आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. .1
- Post by Gautam Hiwrale1
- नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1