धडाकेबाज कामगिरी करणारे SP घार्गेंची बदली;मुम्मक्का सुदर्शन नवे SP धडाकेबाज कामगिरी करणारे SP घार्गेंची बदली;मुम्मक्का सुदर्शन नवे SP नगर जिल्हयात गो तस्करांना सळो की पळो करून सोडणारे,गुन्हेगारांना हद्दपार करणारे तसेच राज्याला नव्हे देशाला हादरे देणारा लिंगपिसाट भोंदू अशोक खरातचे प्रकरण उजेडात आणणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची आज गुरुवारी सायंकाळी अचानक बदली करण्यात आली.तसे आदेश गृहविभागाने काढले आहेत . एसपी सोमनाथ घार्गे यांच्या काळात जिल्हयातील नगरपालिका व महानगर पालिका निवडणुका शांततेत पार पडल्या. जिल्ह्याला शाप असलेले गोतस्करांचे गुन्हे प्रत्येक तालुक्यात उघड करून धडक कारवाई त्यांनी केली.अनेक गुन्हेगारांना जेरबंद करून हद्दपार केले. राहुरीची विधानसभा पोटनिवडणुक शांततेत पार पडली.नगर शहर,श्रीरामपूर,संगमनेर,नेवासा,ममदापूर, शेवगांव,पाथर्डी, कर्जत ,कोपरगांव या भागात अनेक गोतस्करांना गुन्हे दाखल करून जेरबंद केले.शेकडो गोवंश जणावरांचे प्राण वाचविण्यात त्यांनी नेतृत्व केले. जिल्ह्याचे कार्यक्षेत्र मोठे असतांनाही अनेक प्रमुख गुन्ह्यांची उकल त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली.खोटया तक्रारीची पद्धत जिल्हयात काही राजकारणी व त्याचे हस्तक वापरतात परंतू अशा तक्रारींना एसपी घार्गे यांनी ' भिक ' घातली नाही. त्यांची अनेक कौतुकास्पद कामगीरीची उदाहरणे आहेत.मात्र एसपी सोमनाथ घार्गे यांची बदली झाल्याने लिंगपिसाट भोंदू खरातचे प्रकरण उघड केल्याने त्यांची अचानक बदली करून त्यांना ' बक्षीस ' देण्यात आले का ? असा प्रश्न जिल्हयातील सुज्ञ नागरीकांच्या मनात उपस्थित झाला आहे .
धडाकेबाज कामगिरी करणारे SP घार्गेंची बदली;मुम्मक्का सुदर्शन नवे SP धडाकेबाज कामगिरी करणारे SP घार्गेंची बदली;मुम्मक्का सुदर्शन नवे SP नगर जिल्हयात गो तस्करांना सळो की पळो करून सोडणारे,गुन्हेगारांना हद्दपार करणारे तसेच राज्याला नव्हे देशाला हादरे देणारा लिंगपिसाट भोंदू अशोक खरातचे प्रकरण उजेडात आणणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची आज गुरुवारी सायंकाळी अचानक बदली करण्यात आली.तसे आदेश गृहविभागाने काढले आहेत . एसपी सोमनाथ घार्गे यांच्या काळात जिल्हयातील नगरपालिका व महानगर पालिका निवडणुका शांततेत पार पडल्या. जिल्ह्याला शाप असलेले गोतस्करांचे गुन्हे प्रत्येक तालुक्यात उघड करून धडक कारवाई त्यांनी केली.अनेक गुन्हेगारांना जेरबंद करून हद्दपार केले. राहुरीची विधानसभा पोटनिवडणुक शांततेत पार पडली.नगर शहर,श्रीरामपूर,संगमनेर,नेवासा,ममदापूर, शेवगांव,पाथर्डी, कर्जत ,कोपरगांव या भागात अनेक गोतस्करांना गुन्हे दाखल करून जेरबंद केले.शेकडो गोवंश जणावरांचे प्राण वाचविण्यात त्यांनी नेतृत्व केले. जिल्ह्याचे कार्यक्षेत्र मोठे असतांनाही अनेक प्रमुख गुन्ह्यांची उकल त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली.खोटया तक्रारीची पद्धत जिल्हयात काही राजकारणी व त्याचे हस्तक वापरतात परंतू अशा तक्रारींना एसपी घार्गे यांनी ' भिक ' घातली नाही. त्यांची अनेक कौतुकास्पद कामगीरीची उदाहरणे आहेत.मात्र एसपी सोमनाथ घार्गे यांची बदली झाल्याने लिंगपिसाट भोंदू खरातचे प्रकरण उघड केल्याने त्यांची अचानक बदली करून त्यांना ' बक्षीस ' देण्यात आले का ? असा प्रश्न जिल्हयातील सुज्ञ नागरीकांच्या मनात उपस्थित झाला आहे .
- भारताची १६ वी जनगणना – नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा भारताची १६ वी जनगणना देशभरात सुरू असून, यावर्षी नागरिकांना ‘Self Enumeration’ अर्थात स्वतःची माहिती स्वतः नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांनी 15 मेपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. त्यानंतर प्रगणक प्रत्येक घरापर्यंत पोहोचून जनगणनेची माहिती संकलित करतील. या प्रक्रियेदरम्यान नागरिकांनी अचूक माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले. जनगणनेतून संकलित होणारा डेटा हा शासनाच्या विविध विकास योजनांचे नियोजन, धोरणनिर्मिती आणि निर्णय प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या राष्ट्रीय उपक्रमात जबाबदारीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 🔗 Self Enumeration साठी संकेतस्थळ: 👉 https://se.census.gov.in 📢 चला, अचूक माहिती देऊया – विकसित भारत घडवूया ! #जनगणना2026 #CensusIndia #SelfEnumeration #DigitalIndia #ViksitBharat #Ahilyanagar #PublicParticipation #CitizenFirst #DataForDevelopment #माझीजनगणना #IndiaCounts1
- शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शिरूर पोलीस उपविभागात पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. साईदीप सह्याद्री हॉस्पिटल, अहिल्यानगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तपासण्या केल्या. या शिबिरात डॉ. अनिकेत कुऱ्हाडे, डॉ. कस्तुरी कुऱ्हाडे, डॉ. स्मिता वाघमोडे, डॉ. गौरी कोठारी, डॉ. हेमांगी चव्हाण व अक्षय वाघमोडे यांनी सहभागी होत उपस्थितांची बीपी, शुगर, ईसीजी तसेच रक्त तपासण्या करून आवश्यक समुपदेशन व मार्गदर्शन केले. शिरूर तालुक्यातील पोलीस ठाण्यांतील सुमारे ११५ पोलीस अधिकारी व अंमलदारांनी कुटुंबीयांसह या शिबिराचा लाभ घेतला. तसेच पत्रकारांनीही सहभाग नोंदविला. कार्यक्रमास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.2
- नाशिकच्या येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. येवला तालुक्यातील वडगाव येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला, मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला2
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- *महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन उत्साहात* *सर्वांच्या सहभागातून प्रगतीची वाटचाल- पालकमंत्री संजय शिरसाट* छत्रपती संभाजीनगर,दि,१(जिमाका)- महाराष्ट्राला प्रगतीची परंपरा आहे. ही संतांची भुमि आहे. आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांसाठी नेहमीच पहिली पसंती ठरला असुन जिल्ह्याची औद्योगिक वाढ लक्षणीय आहे. रोजगाराच्या अनेक संधी याठिकाणी निर्माण होत आहेत. सर्व घटकांच्या सहभागामुळे ही प्रगतीची वाटचाल होत आहे,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला. देवगिरी या पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय सोहळा पार पडला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रचे विशेष महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक हर्षदा शिरसाट, किशोर नागरे तसेच अन्य अधिकारी, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीत झाले. राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर शानदार संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. पालकमंत्री शिरसाट यांनी परेडचे निरीक्षण केले. झालेल्या संचलनात होमगार्ड, बँड पथक, शहर वाहतूक शाखा ,महाराष्ट्र सुरक्षा बल, पोलीस आयुक्तालय आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकांनी सहभाग घेतला. पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांची प्रथम पसंती ठरत आहे. जिल्ह्यात होत असलेल्या औद्योगिक विकासात कामगार वर्गाचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी होत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यात विविध प्रशासकिय सुधारणांमुळे प्रलंबितता कमी होऊन सामान्य नागरिकांना सेवा देण्यातही आपला जिल्हा अग्रेसर ठरला आहे, त्याबद्दल पालकमंत्री शिरसाट यांनी प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, समाजातील सर्व घटकांच्या सहयोगातून आपल्याला जिल्ह्याचा विकास करावयाचा आहे. राज्याचा प्रगतीचा वारसा पुढे न्यायचा आहे, त्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले. सर्वांच्या हिताच्या योजनांच्या अंमलबजावण्यासाठी निधी उपलब्ध केल जात आहे, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वजण यात योगदान देऊ; जिल्ह्याचे नाव प्रगतीपथावर नेऊ,असा संकल्प आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्व मिळून करू, असे आवाहन पालकमंत्री शिरसाट यांनी केले. *जनगणनेत सहभागाचे आवाहन* देशात जनगणना सुरु होत आहे. त्याचा पहिला टप्पा आजपासून (दि.१ मे) स्वगणना सुरु होत आहे. त्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन आपली माहिती भरावी. जनगणनेत माहिती द्यावी. ही माहिती गोपनीय असते. या माहितीचा उपयोग करुन देशाच्या, राज्याच्या कल्याणाच्या योजना, धोरणे आखली जातात. जनगणनेत सहभाग नोंदवावा. आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकाला माहिती द्या,असे आवाहन यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी केले. *पुरस्कार वितरण* याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात १५० दिवसाच्या कृती आराखड्या अंतर्गत सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरने प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे, महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अश्विनी लखमले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त कविता वाघ यांना सन्मानीत करण्यात आले. उत्कृष्ट कामगीरीबद्द्ल पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रविणा यादव , सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद अविनाश बागुल, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवलदार ओमप्रकाश बनकर आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस हवालदार दीपक इंगळे व देवीसिंग ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले. सोहळा संपन्न झाल्यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, नागरिक, अधिकारी यांना भेटून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रवीण कन्नडकर यांनी केले. ०००००1
- 📍 स्थान – नवापुर नंदुरबार जिले के नवापुर तालुका में बर्ड फ्लू यानी एच5एन1 संक्रमण की गंभीर पुष्टि होने के बाद प्रशासन पूरी तरह अलर्ट मोड पर आ गया है। डायमंड, डॉन और तसरीन नाम के तीन पोल्ट्री फार्म में संक्रमण मिलने के बाद तुरंत आपात प्रतिबंधात्मक कार्रवाई शुरू कर दी गई है। प्रशासन ने कानून के तहत सख्त कदम उठाते हुए प्रभावित क्षेत्र को 1 किलोमीटर संक्रमित क्षेत्र और 10 किलोमीटर निगरानी क्षेत्र घोषित कर दिया है। इन आदेशों का उल्लंघन करने वालों पर आपदा प्रबंधन अधिनियम और पशु रोग नियंत्रण कानून के तहत कठोर कार्रवाई की चेतावनी दी गई है। संक्रमण फैलाव रोकने के लिए प्रभावित क्षेत्र में सभी पोल्ट्री पक्षियों का कुलिंग ऑपरेशन (निर्मूलन) जारी है और पशुपालन विभाग द्वारा बड़े स्तर पर सैनिटाइजेशन और जांच अभियान चलाया जा रहा है। स्थिति की गंभीरता को देखते हुए प्रशासन ने मुर्गी और अन्य पोल्ट्री पक्षियों की खरीद-फरोख्त, परिवहन और बाजारों को अस्थायी रूप से बंद करने के आदेश जारी किए हैं। यह निर्णय सार्वजनिक स्वास्थ्य और संक्रमण नियंत्रण के लिए अनिवार्य बताया गया है। नागरिकों के लिए स्पष्ट चेतावनी जारी की गई है: • अफवाहें फैलाने से बचें • संक्रमित क्षेत्र में अनावश्यक आवाजाही न करें • बीमार या मृत पक्षी दिखने पर तुरंत प्रशासन को सूचना दें प्रशासन ने जनता से सतर्क रहने और सरकारी निर्देशों का सख्ती से पालन करने की अपील की है। नियमों का उल्लंघन करने पर कानूनी कार्रवाई तय है।4
- नाशिक येथे महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आला, तर पोलिस दलाने मानवंदना दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, विविध उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस बॅन्डने वंदे मातरम्, राष्ट्रगीत व राज्यगीताच्या धून सादर केल्या.1
- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने येवला शहरात आयोजित करण्यात आलेला 'झांज-ढोल' पथकाचा विराट सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. डॉ. कविता कुणाल दराडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्याचा समारोप शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आला. शुक्रवारी सकाळी 8 वाजता टिळक मैदान येथून या भव्य मिरवणुकीचा प्रारंभ झाला. यावेळी मराठी अभिनेत्री मानसी नाईक यांची प्रमुख उपस्थिती नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. पारंपारिक नऊवारी साड्या आणि फेटे परिधान केलेल्या शेकडो महिलांनी झांज पथकाच्या तालावर सादर केलेले कसब पाहून येवलेकर मंत्रमुग्ध झाले. ढोल-ताशांच्या कडकडाटाने आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने अवघे शहर शिवमय झाले होते. ही मिरवणूक आझाद चौक, राणाप्रताप पुतळा आणि मेनरोड मार्गे विंचूर चौफुलीवरून शिवसृष्टी येथे पोहोचली. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. "महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता जतन करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे," अशी भावना आयोजक कुणाल दराडे यांनी व्यक्त केली. या सोहळ्यासाठी येवल्यातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.4