आरोग्य विमा क्लेम मंजुरी व अवाजवी बिलांवर तोडगा शोधण्यासाठी आरोग्यमंत्र्यांची बैठक आरोग्य विमा क्लेम मंजुरी व अवाजवी बिलांवर तोडगा शोधण्यासाठी आरोग्यमंत्र्यांची बैठक रुग्णकल्याणासाठी निश्चित कार्यपद्धती ठरवण्यावर भर रुग्णांना उपचारादरम्यान विमा कंपन्यांकडून क्लेम मंजुरी मिळण्यात येणाऱ्या अडचणी तसेच काही रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी वैद्यकीय बिलांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली. या बैठकीत रुग्णांच्या हितासाठी निश्चित कार्यपद्धती ठरवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यात प्रथमच विमा कंपन्या, खासगी रुग्णालये, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) तसेच आरोग्य विभागाचे प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर येऊन या विषयावर चर्चा केली. रुग्णांना उपचारावेळी येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी तसेच पारदर्शक प्रणाली निर्माण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत विचारमंथन झाले. यावेळी बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, विमा कंपन्या आणि रुग्णालये व्यावसायिक पद्धतीने काम करत असली तरी सामान्य नागरिकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. वैद्यकीय विमा ही अत्यंत महत्त्वाची बाब असून मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांत दर्जेदार आणि अद्ययावत वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णालयांची तसेच खासगी विमाधारकांची संख्या वाढत आहे. राज्यात वैद्यकीय पर्यटनाच्या (मेडिकल टुरिझम) विकासासाठी रुग्णालये व विमा कंपन्यांनी व्यवसायातील विश्वासार्हता वाढवणे गरजेचे आहे. रुग्ण हा केंद्रबिंदू मानून सर्व यंत्रणांनी काम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीमुळे रुग्णांना उपचारावेळी क्लेम मंजुरी मिळण्यात येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी आणि वैद्यकीय बिलांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ठोस कार्यपद्धती निश्चित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

- मुक्या प्राण्याची माणुसकी! रेल्वे रुळावरून चिमुकलीला दूर नेत वाचवले प्राण.. मुक्या प्राण्यांचे माणसांशी असलेले नाते किती घट्ट असते, याचा प्रत्यय देणारी हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. रेल्वे रुळावर एक चिमुकली उभी असताना अचानक भरधाव रेल्वे येत होती. जीवघेण्या क्षणी एका मुक्या प्राण्याने प्रसंगावधान राखत त्या चिमुकलीला रुळांपासून दूर नेले आणि तिचे प्राण वाचवले. या घटनेमुळे परिसरात त्या प्राण्याचे कौतुक होत असून, “मुक्या प्राण्यांमध्येही माणुसकी जिवंत आहे” अशी भावना व्यक्त केली जात आहे.1
- बाबर कॉलनी, नेहरू नगर, कटकट गेट येथील रहिवासी सारिम शफी मिर्झा बेग यांनी गणितीय क्षमतेत प्रावीण्य मिळवले आहे. ६ मिनिटांचा पेपर फक्त १ मिनिटात सोडवला: सारिम बेगने आंतरराष्ट्रीय विक्रम रचला1
- mumbai malad infinity mall1
- 180 लड़कियों से प्रेम… 350 अश्लील वीडियो, अमरावती कांड के आरोपी के घर पर चला बुलडोजर महाराष्ट्र के अमरावती जिले के परतवाड़ा से एक ऐसा मामला सामने आया है, जिसे सुनकर हर कोई हैरान है. दरअसल, मोहम्मद अयाज और मोहम्मद तनवीर नाम के दो युवकों ने 180 युवतियों को प्रेमजाल में फंसाकर 350 अश्लील वीडियो बनाए. फिर आरोपियों ने युवतियों को ब्लैकमेल कर कई बार उनका शोषण किया. फिलाहल पुलिस ने दोनों को हिरासत में ले लिया है. इस मामले में प्रशासन ने बड़ा ऐक्शन लिया है. कांड के आरोपी 19 साल केअयान तनवीर के घर पर बुलडोजर चला है. अदालत ने आरोपी को 21 अप्रैल तक पुलिस कस्टडी में भेजा है. प्राथमिक जांच में पता चला है कि आरोपी AIMIM का कार्यकर्ता है. उसने युवतियों को प्रेम जाल में फंसाकर उनका अश्लील वीडियो बनाया और फिर उन्हें ब्लैकमेल करता था. इतना ही नहीं, आरोपी ने सभी वीडियो सोशल मीडिया पर अपलोड कर दिए. जांच के दौरान ये खुलासा हुआ कि इन आपत्तिजनक वीडियो के जरिए युवतियों को डराकर उनका शोषण किया जा रहा था. पीड़िता डर और सामाजिक दबाव के चलते ये सब कुछ सहती रहीं.1
- महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अभाविप व विद्यार्थ्यांविषयी केलेल्या अपमानास्पद व धमकीजनक वक्तव्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) जालना शाखेच्या वतीने छेडण्यात आलेल्या “विद्यार्थी आत्मसन्मान आंदोलन” ला मोठा प्रतिसाद मिळाला. दिनांक ११ एप्रिल रोजी ‘पक्षी मित्र अभियान’ या उपक्रमादरम्यान संबंधित प्राचार्यांनी अभाविप व कार्यकर्त्यांविषयी अवमानकारक व अशोभनीय भाषा वापरली होती. तसेच, विद्यार्थ्यांनी याचा निषेध केल्यानंतर “तुमचे शैक्षणिक करिअर उद्ध्वस्त करीन” व “जीवे मारीन” अशा स्वरूपाच्या गंभीर धमक्या दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अभाविपने आक्रमक भूमिका घेत संस्थेच्या अध्यक्षांना निवेदन सादर केले होते. आंदोलनाची चाहूल लागताच प्राचार्य रजेवर निघून गेले असतांना सुद्धा आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता संबंधित प्राचार्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल व्हिडिओ कॉल वरून माफी मागितल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, संस्थेकडून या प्रकरणात उद्या योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही समजते. अभाविपची भूमिका पुढीलप्रमाणे स्पष्ट करण्यात आली आहे: • प्राचार्यांची माफी ही सकारात्मक पाऊल असले तरी, केवळ माफी पुरेशी नाही • संबंधित प्राचार्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा • संस्थेकडून ठोस व पारदर्शक कारवाई करण्यात यावी यावेळी अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या आत्मसन्मानावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही. आंदोलनानंतर प्राचार्यांनी माफी मागितली, ही बाब लक्षात घेतली आहे; मात्र इतक्या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात केवळ माफी पुरेशी ठरत नाही. संस्थेकडून उद्या होणाऱ्या कारवाईकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. जर कारवाई समाधानकारक नसेल, तर अभाविप पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलन उभारेल.” अभाविपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी लढा सुरूच राहील आणि न्याय मिळेपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम राहील. यावेळी अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, जालना जिल्हा संयोजक पवन नरवडे, शहर मंत्री गणेश बोंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.1
- वडवणी प्रतिनिधी वडवणी शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी1
- (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जाळपोळ प्रकरणांसह गंभीर गुन्ह्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी बीड जिल्हा कृती समितीने केली आहे. तसेच निनावी पत्रांच्या माध्यमातून प्रशासनाविषयी अविश्वास निर्माण करण्याच्या प्रकारावर तातडीने कारवाई करावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा सामाजिक अस्वस्थतेच्या छायेत वावरत असून, जाळपोळ प्रकरणांमध्ये अपेक्षित ती प्रभावी कारवाई झालेली दिसून येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. दरम्यान, अलीकडील काळात खून, दरोडे, अत्याचार या सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या शिवाय, निनावी पत्रांच्या माध्यमातून समाजात भीती व संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार वाढत असल्याचे निदर्शनास आणून देत, अशा प्रकरणांचा तांत्रिक पद्धतीने तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. जिल्ह्याची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची शक्यता व्यक्त करत, जाळपोळ व इतर गंभीर गुन्ह्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बीड जिल्हा कृती समिती सदस्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, रामनाथ खोड, शेख युनुस, माजी सैनिक अशोक येडे, बाळासाहेब मोरे पाटील, रामधन जमाले, सय्यद सादेक, सुहास जायभाये, किष्किंधा पांचाळ यांच्या वतीने करण्यात आली आहे.1
- हृदयद्रावक व अतिशय दुर्दैवी घटना; पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात आज गुरवारी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना हारूनबाग भागात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात उतरल्याने चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. मुलांना पाण्याची खोली लक्षात न आल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी मुलांचे बूट, चप्पल आणि गणवेश आढळून आले असून मृत मुलांचे वय ८ ते १२ वर्षांदरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सुरू असलेल्या कामामुळे हा खड्डा तयार झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, महापालिका व पोलीस प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू आहे.1