Shuru
Apke Nagar Ki App…
मालेगावमध्ये ११ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महारॅलीची तयारी अत्यंत वेगाने सुरू आहे. या रॅलीच्या नियोजनासाठी आणि तयारीसाठी लियाकत शैदा सर आणि रिझवान बॅटरीवाला आपल्या संपूर्ण टीमसह नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
SACH TAK TV NEWS MALEGAON
मालेगावमध्ये ११ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महारॅलीची तयारी अत्यंत वेगाने सुरू आहे. या रॅलीच्या नियोजनासाठी आणि तयारीसाठी लियाकत शैदा सर आणि रिझवान बॅटरीवाला आपल्या संपूर्ण टीमसह नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मालेगावमध्ये ११ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महारॅलीची तयारी अत्यंत वेगाने सुरू आहे. या रॅलीच्या नियोजनासाठी आणि तयारीसाठी लियाकत शैदा सर आणि रिझवान बॅटरीवाला आपल्या संपूर्ण टीमसह नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.1
- धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या २१ फुटी भव्य पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. शिवरायांच्या या भव्य पुतळ्याच्या स्थापनेमुळे संपूर्ण परिसरातील शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या (एम.एस.जी.एस.) वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून अंदरसूल नगरीत वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीला आणि सहकार महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून झाली. या प्रसंगी अंदरसूल ग्रामपालिकेच्या माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या विनिता अमोल सोनवणे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी प्रा. राजेंद्र गायकवाड हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका शर्मिला पवार यांनी केले. सोहळ्यात विविध भक्तीगीतांचे सादरीकरण करण्यात आले. शिक्षिका निलिमा देशमुख यांनी "ये ओ विठ्ठल माझे माऊली हो", शिक्षिका शोभा निकम यांनी "अलीकडे ये मला पलीकडे ने" हे गीत, तर विद्यार्थिनी जानवी सौंदाणे हिने स्वरचित "आला आषाढीचा मास" हे गीत सादर केले. हरिभाऊ सोमासे यांनी अभंग सादर केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. राजेंद्र गायकवाड यांनी उपस्थितांना आषाढी एकादशीची सविस्तर माहिती दिली. यानंतर अंदरसूल गावातून अत्यंत भक्तिमय वातावरणात ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी काढण्यात आली. यामध्ये राजवीर सोनवणे व कृष्णा पुंड यांनी विठ्ठल-रखुमाईची पालखी संपूर्ण गावात मिरवली. विद्यार्थी आर्यन घोंगाणे व श्रुती दाभाडे यांनी विठ्ठल व रुक्मिणीचा पोशाख परिधान केला होता. डोक्यावर तुळस, हातामध्ये वृक्ष, ग्रंथ आणि टाळ घेऊन बाल विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या नामाचा गजर केला. याप्रसंगी संस्थेचे सहचिटणीस मयूर सोनवणे, संचालक जीवनशेठ गाडे, डॉ. भागीनाथ जाधव, प्रिन्सिपल अल्ताफ खान यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अर्चना एंडाईत यांनी केले, तर आभार दीपक खैरनार यांनी मानले.4
- वैजापूर तालुक्यातील बोर दहेगांव येथील कै. दादासाहेब पाटील पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मुलांची दिंडी आणि देखावा अत्यंत उत्साहात पार पडला आहे.1
- पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी मध्यस्थी केल्यानंतर बंजारा समाजाने आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे.1
- दिनांक २९ जून २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान केलेला विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी दिंडी सोहळा २६ दिवसांच्या प्रवासानंतर आज सायंकाळी सुमारे ४ वाजता भूवैकुंठ पंढरपूरमध्ये अत्यंत भक्तिभावाने दाखल झाला आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा कळस दर्शनास पडताच वारकऱ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम", "जय जय राम कृष्ण हरी" आणि "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" या जयघोषांनी परिसर दुमदुमून टाकला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड घोषात सर्व वारकऱ्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वीणेकरी, भालदार, चोपदार, तुळशीधारी महिला, टाळकरी तसेच पालखीच्या रथाचे पंढरपूरकरांनी उत्स्फूर्त आणि भव्य स्वागत केले. या पालखी सोहळ्यासोबत सुमारे ७० ते ७५ दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या असून नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील अंदाजे दीड ते दोन लाख वारकरी भाविक आज पंढरपूर नगरीत पोहोचले आहेत. सध्या संपूर्ण पंढरपूर नगरी हरिनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने पूर्णपणे भारावून गेली असून उद्या होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्याची उत्सुकता सर्वांची शिगेला पोहोचली आहे.1
- धुळे जिल्ह्यातील पांझरा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.1
- दिल्लीच्या जंतर-मंतर येथे आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला धुळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी शासनाचा तीव्र निषेध नोंदवला आहे. आंदोलनादरम्यान धुळ्यातील कराचीवाला खुंटा आणि चाळीसगाव चौफुली येथे जोरदार 'रास्ता रोको' करण्यात आला. कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमा हातात धरून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.1