नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या (एम.एस.जी.एस.) वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून अंदरसूल नगरीत वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीला आणि सहकार महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून झाली. या प्रसंगी अंदरसूल ग्रामपालिकेच्या माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या विनिता अमोल सोनवणे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी प्रा. राजेंद्र गायकवाड हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका शर्मिला पवार यांनी केले. सोहळ्यात विविध भक्तीगीतांचे सादरीकरण करण्यात आले. शिक्षिका निलिमा देशमुख यांनी "ये ओ विठ्ठल माझे माऊली हो", शिक्षिका शोभा निकम यांनी "अलीकडे ये मला पलीकडे ने" हे गीत, तर विद्यार्थिनी जानवी सौंदाणे हिने स्वरचित "आला आषाढीचा मास" हे गीत सादर केले. हरिभाऊ सोमासे यांनी अभंग सादर केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. राजेंद्र गायकवाड यांनी उपस्थितांना आषाढी एकादशीची सविस्तर माहिती दिली. यानंतर अंदरसूल गावातून अत्यंत भक्तिमय वातावरणात ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी काढण्यात आली. यामध्ये राजवीर सोनवणे व कृष्णा पुंड यांनी विठ्ठल-रखुमाईची पालखी संपूर्ण गावात मिरवली. विद्यार्थी आर्यन घोंगाणे व श्रुती दाभाडे यांनी विठ्ठल व रुक्मिणीचा पोशाख परिधान केला होता. डोक्यावर तुळस, हातामध्ये वृक्ष, ग्रंथ आणि टाळ घेऊन बाल विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या नामाचा गजर केला. याप्रसंगी संस्थेचे सहचिटणीस मयूर सोनवणे, संचालक जीवनशेठ गाडे, डॉ. भागीनाथ जाधव, प्रिन्सिपल अल्ताफ खान यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अर्चना एंडाईत यांनी केले, तर आभार दीपक खैरनार यांनी मानले.
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या (एम.एस.जी.एस.) वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून अंदरसूल नगरीत वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीला आणि सहकार महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून झाली. या प्रसंगी अंदरसूल ग्रामपालिकेच्या माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या विनिता अमोल सोनवणे प्रमुख पाहुण्या
म्हणून उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी प्रा. राजेंद्र गायकवाड हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका शर्मिला पवार यांनी केले. सोहळ्यात विविध भक्तीगीतांचे सादरीकरण करण्यात आले. शिक्षिका निलिमा देशमुख यांनी "ये ओ विठ्ठल माझे माऊली हो", शिक्षिका शोभा निकम यांनी "अलीकडे ये मला पलीकडे ने" हे गीत, तर विद्यार्थिनी जानवी सौंदाणे हिने
स्वरचित "आला आषाढीचा मास" हे गीत सादर केले. हरिभाऊ सोमासे यांनी अभंग सादर केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. राजेंद्र गायकवाड यांनी उपस्थितांना आषाढी एकादशीची सविस्तर माहिती दिली. यानंतर अंदरसूल गावातून अत्यंत भक्तिमय वातावरणात ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी काढण्यात आली. यामध्ये राजवीर सोनवणे व कृष्णा पुंड यांनी विठ्ठल-रखुमाईची पालखी संपूर्ण गावात मिरवली. विद्यार्थी आर्यन घोंगाणे व श्रुती दाभाडे यांनी विठ्ठल व
रुक्मिणीचा पोशाख परिधान केला होता. डोक्यावर तुळस, हातामध्ये वृक्ष, ग्रंथ आणि टाळ घेऊन बाल विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या नामाचा गजर केला. याप्रसंगी संस्थेचे सहचिटणीस मयूर सोनवणे, संचालक जीवनशेठ गाडे, डॉ. भागीनाथ जाधव, प्रिन्सिपल अल्ताफ खान यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अर्चना एंडाईत यांनी केले, तर आभार दीपक खैरनार यांनी मानले.
- नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या (एम.एस.जी.एस.) वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून अंदरसूल नगरीत वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीला आणि सहकार महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून झाली. या प्रसंगी अंदरसूल ग्रामपालिकेच्या माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या विनिता अमोल सोनवणे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी प्रा. राजेंद्र गायकवाड हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका शर्मिला पवार यांनी केले. सोहळ्यात विविध भक्तीगीतांचे सादरीकरण करण्यात आले. शिक्षिका निलिमा देशमुख यांनी "ये ओ विठ्ठल माझे माऊली हो", शिक्षिका शोभा निकम यांनी "अलीकडे ये मला पलीकडे ने" हे गीत, तर विद्यार्थिनी जानवी सौंदाणे हिने स्वरचित "आला आषाढीचा मास" हे गीत सादर केले. हरिभाऊ सोमासे यांनी अभंग सादर केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. राजेंद्र गायकवाड यांनी उपस्थितांना आषाढी एकादशीची सविस्तर माहिती दिली. यानंतर अंदरसूल गावातून अत्यंत भक्तिमय वातावरणात ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी काढण्यात आली. यामध्ये राजवीर सोनवणे व कृष्णा पुंड यांनी विठ्ठल-रखुमाईची पालखी संपूर्ण गावात मिरवली. विद्यार्थी आर्यन घोंगाणे व श्रुती दाभाडे यांनी विठ्ठल व रुक्मिणीचा पोशाख परिधान केला होता. डोक्यावर तुळस, हातामध्ये वृक्ष, ग्रंथ आणि टाळ घेऊन बाल विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या नामाचा गजर केला. याप्रसंगी संस्थेचे सहचिटणीस मयूर सोनवणे, संचालक जीवनशेठ गाडे, डॉ. भागीनाथ जाधव, प्रिन्सिपल अल्ताफ खान यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अर्चना एंडाईत यांनी केले, तर आभार दीपक खैरनार यांनी मानले.4
- वैजापूर तालुक्यातील बोर दहेगांव येथील कै. दादासाहेब पाटील पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मुलांची दिंडी आणि देखावा अत्यंत उत्साहात पार पडला आहे.1
- आपल्या स्वप्नातील जोडीदार निवडताना बहिणींचे प्रेम आणि त्यांचा परस्परांवरील विश्वास पाहून जनता पूर्णपणे भारावून गेली आहे. काही नातेसंबंधांमध्ये स्वतःच्याच हाताने मुलीचे घर उद्ध्वस्त करण्याचे अनेक प्रयत्न केले जातात, अशा परिस्थितीत ही घटना समोर आली आहे. लग्नाबाबत बहिणींच्या हट्टामुळे तिन्ही बहिणींनी एकत्र येत एकाच मुलासोबत हिंदू चालीरिती आणि रितीरिवाजांनुसार विवाह केला आहे. बहिणींचे हे प्रेम आणि हा निर्णय समस्त पुरुष जातीसाठी अत्यंत अभिमानाची सर्वात मोठी बातमी ठरत आहे.1
- मालेगावमध्ये ११ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महारॅलीची तयारी अत्यंत वेगाने सुरू आहे. या रॅलीच्या नियोजनासाठी आणि तयारीसाठी लियाकत शैदा सर आणि रिझवान बॅटरीवाला आपल्या संपूर्ण टीमसह नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.1
- कॉक्रोज जनता पक्षाकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर अमृता फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.1
- धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावातील तरुण शेतकरी यशराज सतीश नलावडे यांनी आपल्या १ एकर शेतात माती आणि उपलब्ध नैसर्गिक साहित्याचा वापर करून विठ्ठलाची अप्रतिम व भव्य प्रतिकृती साकारली आहे. कोणतीही महागडी यंत्रसामग्री किंवा खर्चिक साधने न वापरता, केवळ स्वतःच्या कल्पकतेने आणि अनेक दिवसांच्या मेहनतीतून त्यांनी जमिनीवर ही कलाकृती उभी केली. जमिनीवरून जितकी आकर्षक दिसते, तितकीच वरून पाहिल्यावर ही रचना अधिक भव्य आणि प्रमाणबद्ध भासते. या अनोख्या उपक्रमामुळे येडशी गावाचे नाव संपूर्ण परिसरात चर्चेत आले असून, ही कलाकृती पाहण्यासाठी ग्रामस्थ, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने शेताकडे धाव घेत आहेत. येणाऱ्या नागरिकांनी मोबाईलमध्ये छायाचित्रे टिपून सोशल मीडियावरही या कलाकृतीचे कौतुक केले आहे. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी यशराज यांना आशीर्वाद दिले असून, शेती आणि अध्यात्म यांच्या या संगमामुळे ग्रामीण तरुणांमध्ये परंपरेबद्दल अभिमानाची भावना व नवा उत्साह निर्माण झाला आहे.1
- आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना अमृता फडणवीस यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली आहे. "आम्हाला आणि मलाही महाराष्ट्रातच राहायचे आहे, आम्ही दिल्लीला जाणार नाही आणि देवेंद्रजींनाही महाराष्ट्रातच ठेवणार," असे त्या म्हणाल्या. मुंबई, नागपूर किंवा कुठेही असलो तरी विठ्ठलाची पूजा कायम करत राहणार असल्याचे सांगत त्यांनी देवेंद्रजी, मोदीजी, राज्यकर्ते आणि प्रशासनाला लोकांसाठी आयुष्यभर झटण्याची सद्बुद्धी मिळो, अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. राजकीय घडामोडींवर बोलताना, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त मोर्चाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, इतके दिवस वेगळे होते आणि आता एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. ते दोघे मिळून काहीतरी करत आहेत. याशिवाय राज्य सरकार पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा आणत असल्याचेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केले की, काही अँटी सोशल लोकांनी पोलिसांवर हल्ला केला होता, ज्यामध्ये काही विद्यार्थीही जखमी झाले. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि काळा क्षण होता असे सांगत भविष्यात अशी घटना घडू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.4
- नवी दिल्लीत संसद भवन परिसरात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध करत विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशातील विद्यार्थी आणि तरुणांसाठी जे काही सहन करावे लागेल, ते सहन करण्याची आमची तयारी आहे. विद्यार्थ्यांसाठी लढताना प्राण गेला तरी त्याची पर्वा नाही; विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सर्व काही सहन करण्यास आम्ही तयार आहोत. हे सरकार अहंकारी झाले असून कोणाचेही ऐकून घेण्यास तयार नाही तसेच संविधान आणि लोकशाहीच्या मूल्यांचा आदर केला जात नाही, असा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांवर आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पोलीस ज्या प्रकारे अत्याचार करत आहेत, ते अत्यंत निषेधार्ह असल्याचे सांगत त्यांनी नमूद केले की या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. हा रोष आता जनआंदोलनाचे रूप घेत असून ही क्रांतीची सुरुवात आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि सभागृहात चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव मंजूर करावा, ही आपली ठाम मागणी असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.1