logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावातील तरुण शेतकरी यशराज सतीश नलावडे यांनी आपल्या १ एकर शेतात माती आणि उपलब्ध नैसर्गिक साहित्याचा वापर करून विठ्ठलाची अप्रतिम व भव्य प्रतिकृती साकारली आहे. कोणतीही महागडी यंत्रसामग्री किंवा खर्चिक साधने न वापरता, केवळ स्वतःच्या कल्पकतेने आणि अनेक दिवसांच्या मेहनतीतून त्यांनी जमिनीवर ही कलाकृती उभी केली. जमिनीवरून जितकी आकर्षक दिसते, तितकीच वरून पाहिल्यावर ही रचना अधिक भव्य आणि प्रमाणबद्ध भासते. या अनोख्या उपक्रमामुळे येडशी गावाचे नाव संपूर्ण परिसरात चर्चेत आले असून, ही कलाकृती पाहण्यासाठी ग्रामस्थ, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने शेताकडे धाव घेत आहेत. येणाऱ्या नागरिकांनी मोबाईलमध्ये छायाचित्रे टिपून सोशल मीडियावरही या कलाकृतीचे कौतुक केले आहे. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी यशराज यांना आशीर्वाद दिले असून, शेती आणि अध्यात्म यांच्या या संगमामुळे ग्रामीण तरुणांमध्ये परंपरेबद्दल अभिमानाची भावना व नवा उत्साह निर्माण झाला आहे.

3 hrs ago
user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
दिव्य भारत बीएसएम न्यूज
Spa नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
3 hrs ago

धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावातील तरुण शेतकरी यशराज सतीश नलावडे यांनी आपल्या १ एकर शेतात माती आणि उपलब्ध नैसर्गिक साहित्याचा वापर करून विठ्ठलाची अप्रतिम व भव्य प्रतिकृती साकारली आहे. कोणतीही महागडी यंत्रसामग्री किंवा खर्चिक साधने न वापरता, केवळ स्वतःच्या कल्पकतेने आणि अनेक दिवसांच्या मेहनतीतून त्यांनी जमिनीवर ही कलाकृती उभी केली. जमिनीवरून जितकी आकर्षक दिसते, तितकीच वरून पाहिल्यावर ही रचना अधिक भव्य आणि प्रमाणबद्ध भासते. या अनोख्या उपक्रमामुळे येडशी गावाचे नाव संपूर्ण परिसरात चर्चेत आले असून, ही कलाकृती पाहण्यासाठी ग्रामस्थ, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने शेताकडे धाव घेत आहेत. येणाऱ्या नागरिकांनी मोबाईलमध्ये छायाचित्रे टिपून सोशल मीडियावरही या कलाकृतीचे कौतुक केले आहे. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी यशराज यांना आशीर्वाद दिले असून, शेती आणि अध्यात्म यांच्या या संगमामुळे ग्रामीण तरुणांमध्ये परंपरेबद्दल अभिमानाची भावना व नवा उत्साह निर्माण झाला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गुन्हेशाखा युनिट-२ ने आंतरराज्यीय रेकॉर्डवरील तीन सराईत आरोपींना अटक करून तीन घरफोडी आणि एका मोटारसायकल चोरीसह एकूण चार गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपींकडून चोरीची होंडा शाईन मोटारसायकल, घरफोडीचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख १६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना, पेठ रोड परिसरातील मेघराज बेकरीजवळ तीन संशयित व्यक्ती काळ्या रंगाच्या होंडा शाईन (एमएच-१५ ईडब्ल्यू-७५८८) मोटारसायकलवर फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दर्शनसिंग धरमसिंग शिख (रा. अक्कलकुवा, नंदुरबार), समरेशसिंग रणजितसिंग शिकलीकर (रा. वडोदरा, गुजरात) आणि बहादुरसिंग ओमकारसिंग शिकलीकर (रा. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. कसून चौकशीदरम्यान आरोपींनी घरफोडी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. यानंतर म्हसरूळ पोलीस ठाण्यातील एक मोटारसायकल चोरी, तसेच पंचवटी, उपनगर आणि मुंबईनाका पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी एक घरफोडी असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक डॉ. समाधान हिरे, संजय सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे व त्यांच्या पथकाने केली.
    2
    गुन्हेशाखा युनिट-२ ने आंतरराज्यीय रेकॉर्डवरील तीन सराईत आरोपींना अटक करून तीन घरफोडी आणि एका मोटारसायकल चोरीसह एकूण चार गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपींकडून चोरीची होंडा शाईन मोटारसायकल, घरफोडीचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख १६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना, पेठ रोड परिसरातील मेघराज बेकरीजवळ तीन संशयित व्यक्ती काळ्या रंगाच्या होंडा शाईन (एमएच-१५ ईडब्ल्यू-७५८८) मोटारसायकलवर फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दर्शनसिंग धरमसिंग शिख (रा. अक्कलकुवा, नंदुरबार), समरेशसिंग रणजितसिंग शिकलीकर (रा. वडोदरा, गुजरात) आणि बहादुरसिंग ओमकारसिंग शिकलीकर (रा. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे.

कसून चौकशीदरम्यान आरोपींनी घरफोडी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. यानंतर म्हसरूळ पोलीस ठाण्यातील एक मोटारसायकल चोरी, तसेच पंचवटी, उपनगर आणि मुंबईनाका पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी एक घरफोडी असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक डॉ. समाधान हिरे, संजय सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे व त्यांच्या पथकाने केली.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेची ११८ वर्षांची उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे नाशिक येथील गुरुदक्षिणा इमारतीतील पलाश सभागृहात शुक्रवारी, २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यार्थी गुणगौरव आणि शिक्षक सेवा गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव, खजिनदार व मानव संसाधन संचालिका डॉ. दीप्ती देशपांडे राहणार आहेत. तसेच नाशिक महानगरपालिकेच्या महापौर सौ. हिमगौरी आडके या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, नासा स्पेस एज्युकेटर सौ. अपूर्वा जाखडी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. पी. देशपांडे आणि चेअरमन डॉ. सुहासिनी संत यांची विशेष अतिथी म्हणून प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या समारंभाचे मुख्य आकर्षण म्हणजे संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांतील इयत्ता दहावी आणि बारावीच्या सार्वजनिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. याशिवाय ज्ञानदानातून हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडविणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात निष्ठेने कार्य केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव करून त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैचारिक वाटचालीचे दर्शन घडविणाऱ्या 'स्वयंप्रकाश' आणि 'स्वयंप्रेरणा' या दोन महत्त्वपूर्ण प्रकाशनांचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात ११८ वर्षांचे भरीव योगदान देणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीने या प्रेरणादायी सोहळ्यास विद्यार्थी, पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि सर्व नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांना व सेवानिवृत्त शिक्षकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.
    2
    शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेची ११८ वर्षांची उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे नाशिक येथील गुरुदक्षिणा इमारतीतील पलाश सभागृहात शुक्रवारी, २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यार्थी गुणगौरव आणि शिक्षक सेवा गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव, खजिनदार व मानव संसाधन संचालिका डॉ. दीप्ती देशपांडे राहणार आहेत. तसेच नाशिक महानगरपालिकेच्या महापौर सौ. हिमगौरी आडके या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, नासा स्पेस एज्युकेटर सौ. अपूर्वा जाखडी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. पी. देशपांडे आणि चेअरमन डॉ. सुहासिनी संत यांची विशेष अतिथी म्हणून प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या समारंभाचे मुख्य आकर्षण म्हणजे संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांतील इयत्ता दहावी आणि बारावीच्या सार्वजनिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. याशिवाय ज्ञानदानातून हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडविणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात निष्ठेने कार्य केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव करून त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैचारिक वाटचालीचे दर्शन घडविणाऱ्या 'स्वयंप्रकाश' आणि 'स्वयंप्रेरणा' या दोन महत्त्वपूर्ण प्रकाशनांचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.

महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात ११८ वर्षांचे भरीव योगदान देणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीने या प्रेरणादायी सोहळ्यास विद्यार्थी, पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि सर्व नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांना व सेवानिवृत्त शिक्षकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.
    user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
    दिव्य भारत बीएसएम न्यूज
    Spa नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • दिल्लीतील जंतर-मंतर येथे सोनम वांगचूक आणि अभिजित दीपके यांच्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २३ जुलै रोजी त्र्यंबकेश्वरमधून विविध संघटना एकत्र आल्या. पुरोगामी चळवळीचे पक्ष, सामाजिक संघटना, आदिवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड आणि क्रूर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. या घटनेच्या विरोधात युवा वर्ग सरकारविरोधात रस्त्यावर उतरला आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. आंदोलकांनी यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन सादर केले. या प्रसंगी विनोद खोडे, अरुण काशीद, अशोक लहांगे, बिरसा ढोरे, गौरव वाघ, विलास कोरडे, नामदेव गांगुर्डे, रमेश गांगुर्डे, किरण मोंढे, मोहन सोनवणे, योगेश कोरडे, राजू पाटील, रोहिदास कोरडे, श्रीपाद येले, नितीन काशीद, मोहन बेंडकोली, पांडुरंग पोटिंदे यांच्यासह पत्रकार बंधू उपस्थित होते.
    1
    दिल्लीतील जंतर-मंतर येथे सोनम वांगचूक आणि अभिजित दीपके यांच्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २३ जुलै रोजी त्र्यंबकेश्वरमधून विविध संघटना एकत्र आल्या. पुरोगामी चळवळीचे पक्ष, सामाजिक संघटना, आदिवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड आणि क्रूर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

या घटनेच्या विरोधात युवा वर्ग सरकारविरोधात रस्त्यावर उतरला आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. आंदोलकांनी यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन सादर केले.

या प्रसंगी विनोद खोडे, अरुण काशीद, अशोक लहांगे, बिरसा ढोरे, गौरव वाघ, विलास कोरडे, नामदेव गांगुर्डे, रमेश गांगुर्डे, किरण मोंढे, मोहन सोनवणे, योगेश कोरडे, राजू पाटील, रोहिदास कोरडे, श्रीपाद येले, नितीन काशीद, मोहन बेंडकोली, पांडुरंग पोटिंदे यांच्यासह पत्रकार बंधू उपस्थित होते.
    user_श्री.भगवान आचारी
    श्री.भगवान आचारी
    त्र्यंबक, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • सुरगाणा तालुक्यातील घागबारी फाटा येथे शुक्रवारी (२४ जुलै) राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामादरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरल्याने तब्बल तीन ते चार तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली. घटनास्थळी तहसीलदार रामजी राठोड, प्रांताधिकारी कश्मिरा संखे, मोहन गांगुर्डे, घागबारीचे पोलीस पाटील गोपाळ गायकवाड, तलाठी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने व चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप नागरिक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विशेषतः नागझरी फाट्यावरील पुलाचे काम पावसाळा सुरू असतानाही अपूर्ण असल्याने भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना आधीच निवेदन देण्यात आले होते. या निवेदनानंतर तहसील कार्यालयात संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि निवेदनकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती; मात्र या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग विभागाचा एकही अधिकारी तसेच मुख्य ठेकेदार उपस्थित न राहिल्याने संताप व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने इशारा दिला आहे की, रस्ता तातडीने दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करण्यात आली नाही किंवा पुढील काळात या खराब रस्त्यामुळे अपघात घडल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. घागबारी परिसरात आतापर्यंत अनेक अपघात घडले असून, या महामार्गाच्या कामावर देखरेख करणारे अधिकारी कोण आहेत याची चौकशी करून त्यांना जबाबदार धरावे आणि निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
    2
    सुरगाणा तालुक्यातील घागबारी फाटा येथे शुक्रवारी (२४ जुलै) राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामादरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरल्याने तब्बल तीन ते चार तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली. घटनास्थळी तहसीलदार रामजी राठोड, प्रांताधिकारी कश्मिरा संखे, मोहन गांगुर्डे, घागबारीचे पोलीस पाटील गोपाळ गायकवाड, तलाठी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने व चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप नागरिक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विशेषतः नागझरी फाट्यावरील पुलाचे काम पावसाळा सुरू असतानाही अपूर्ण असल्याने भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना आधीच निवेदन देण्यात आले होते. या निवेदनानंतर तहसील कार्यालयात संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि निवेदनकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती; मात्र या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग विभागाचा एकही अधिकारी तसेच मुख्य ठेकेदार उपस्थित न राहिल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेने इशारा दिला आहे की, रस्ता तातडीने दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करण्यात आली नाही किंवा पुढील काळात या खराब रस्त्यामुळे अपघात घडल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. घागबारी परिसरात आतापर्यंत अनेक अपघात घडले असून, या महामार्गाच्या कामावर देखरेख करणारे अधिकारी कोण आहेत याची चौकशी करून त्यांना जबाबदार धरावे आणि निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आपल्या स्वप्नातील जोडीदार निवडताना बहिणींचे प्रेम आणि त्यांचा परस्परांवरील विश्वास पाहून जनता पूर्णपणे भारावून गेली आहे. काही नातेसंबंधांमध्ये स्वतःच्याच हाताने मुलीचे घर उद्ध्वस्त करण्याचे अनेक प्रयत्न केले जातात, अशा परिस्थितीत ही घटना समोर आली आहे. लग्नाबाबत बहिणींच्या हट्टामुळे तिन्ही बहिणींनी एकत्र येत एकाच मुलासोबत हिंदू चालीरिती आणि रितीरिवाजांनुसार विवाह केला आहे. बहिणींचे हे प्रेम आणि हा निर्णय समस्त पुरुष जातीसाठी अत्यंत अभिमानाची सर्वात मोठी बातमी ठरत आहे.
    1
    आपल्या स्वप्नातील जोडीदार निवडताना बहिणींचे प्रेम आणि त्यांचा परस्परांवरील विश्वास पाहून जनता पूर्णपणे भारावून गेली आहे. काही नातेसंबंधांमध्ये स्वतःच्याच हाताने मुलीचे घर उद्ध्वस्त करण्याचे अनेक प्रयत्न केले जातात, अशा परिस्थितीत ही घटना समोर आली आहे.

लग्नाबाबत बहिणींच्या हट्टामुळे तिन्ही बहिणींनी एकत्र येत एकाच मुलासोबत हिंदू चालीरिती आणि रितीरिवाजांनुसार विवाह केला आहे. बहिणींचे हे प्रेम आणि हा निर्णय समस्त पुरुष जातीसाठी अत्यंत अभिमानाची सर्वात मोठी बातमी ठरत आहे.
    user_Amol shelke 1711
    Amol shelke 1711
    Construction Worker संगमनेर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • नाशिकमध्ये संततधार पावसामुळे दाणादाण उडाली असून ठिकठिकाणी झाडे कोसळून मोठे नुकसान झाले आहे. सखल भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले असून अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. अशोका मार्गावरील 'मधुबन स्वीट्स'जवळ काल रात्री एका गाडीवर आणि रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळले. रात्री साडेअकरा वाजता अग्निशमन मुख्यालयाच्या जवानांनी झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. याशिवाय भारत नगरमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अग्निशमन दलाचे जवान तातडीने मदतकार्यासाठी दाखल झाले आहेत. तसेच नाशिक जिल्हा न्यायालय परिसरात गाड्यांवर पडलेले झाडही जवानांनी तातडीने धाव घेत हटवले आहे. रात्रीच्या वेळीही स्वतःचा जीव धोक्यात घालून मदतकार्य करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    3
    नाशिकमध्ये संततधार पावसामुळे दाणादाण उडाली असून ठिकठिकाणी झाडे कोसळून मोठे नुकसान झाले आहे. सखल भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले असून अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.

अशोका मार्गावरील 'मधुबन स्वीट्स'जवळ काल रात्री एका गाडीवर आणि रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळले. रात्री साडेअकरा वाजता अग्निशमन मुख्यालयाच्या जवानांनी झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. याशिवाय भारत नगरमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अग्निशमन दलाचे जवान तातडीने मदतकार्यासाठी दाखल झाले आहेत. तसेच नाशिक जिल्हा न्यायालय परिसरात गाड्यांवर पडलेले झाडही जवानांनी तातडीने धाव घेत हटवले आहे.

रात्रीच्या वेळीही स्वतःचा जीव धोक्यात घालून मदतकार्य करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून १२ हजार ६०० क्यूसेक, तर गोदावरी नदीवरील होळकर पुलाजवळून १९ हजार ७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सायंकाळपर्यंत या विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता पोलिस, महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर तालुक्यात मागील २४ तासांत १९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कश्यपी धरण ७१ टक्के आणि गौतमी गोदावरी धरण ९० टक्के भरल्याने गंगापूर धरणात पाण्याची आवक वाढली असून हे धरण ९७ टक्के भरले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून सराफ बाजार परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सायखेडा व चांदोरी परिसरात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच मालेगाव येथे गिरणा नदी काठावरील १६ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गोदावरी नदीतून २००८ मध्ये ४२ हजार क्यूसेक आणि सर्वाधिक ६२ हजार क्यूसेक विसर्गाचा उच्चांक होता, मात्र सध्या तशी परिस्थिती नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पावसामुळे त्र्यंबकेश्वर येथे पत्रा उडाल्याने आठ पर्यटकांपैकी एक जण जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर नदीपात्रात अडकलेल्या एका बसमधील सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली असून बलसाड प्रशासनाशी संपर्क सुरू आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा आपत्ती निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून आरोग्य केंद्रांमध्ये औषधे व सर्पदंश प्रतिबंधक लशींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. महावितरण कंपनीलाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि उपमहापौरांनी नदी परिसराची पाहणी केली आहे. सध्या जिल्ह्यातील सात रस्ते बंद असून ते पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.
    1
    नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून १२ हजार ६०० क्यूसेक, तर गोदावरी नदीवरील होळकर पुलाजवळून १९ हजार ७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सायंकाळपर्यंत या विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता पोलिस, महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात मागील २४ तासांत १९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कश्यपी धरण ७१ टक्के आणि गौतमी गोदावरी धरण ९० टक्के भरल्याने गंगापूर धरणात पाण्याची आवक वाढली असून हे धरण ९७ टक्के भरले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून सराफ बाजार परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सायखेडा व चांदोरी परिसरात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच मालेगाव येथे गिरणा नदी काठावरील १६ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गोदावरी नदीतून २००८ मध्ये ४२ हजार क्यूसेक आणि सर्वाधिक ६२ हजार क्यूसेक विसर्गाचा उच्चांक होता, मात्र सध्या तशी परिस्थिती नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पावसामुळे त्र्यंबकेश्वर येथे पत्रा उडाल्याने आठ पर्यटकांपैकी एक जण जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर नदीपात्रात अडकलेल्या एका बसमधील सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली असून बलसाड प्रशासनाशी संपर्क सुरू आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा आपत्ती निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून आरोग्य केंद्रांमध्ये औषधे व सर्पदंश प्रतिबंधक लशींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. महावितरण कंपनीलाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि उपमहापौरांनी नदी परिसराची पाहणी केली आहे. सध्या जिल्ह्यातील सात रस्ते बंद असून ते पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • दिल्लीतील जंतर-मंतर येथे सोनम वांगचूक सर आणि अभिजित दिपके यांच्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २३ जुलै रोजी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोगामी चळवळीचे पक्ष, सामाजिक संघटना, आदिवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येत रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड आणि क्रूर हल्ल्याचा जाहीर निषेध नोंदवत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. या क्रूर घटनेच्या विरोधात युवा वर्गाने सरकारविरोधात आक्रोश व्यक्त करत तहसीलदारांना थेट निवेदन सुपूर्द केले. या प्रसंगी विनोद खोडे, अरुण काशीद, अशोक लहांगे, बिरसा ढोरे, गौरव वाघ, विलास कोरडे, नामदेव गांगुर्डे, रमेश गांगुर्डे, किरण मोंढे, मोहन सोनवणे, योगेश कोरडे, राजू पाटील, रोहिदास कोरडे, श्रीपाद येले, नितीन काशीद, मोहन बेंडकोली, पांडुरंग पोटिंदे यांच्यासह पत्रकार बंधू उपस्थित होते.
    1
    दिल्लीतील जंतर-मंतर येथे सोनम वांगचूक सर आणि अभिजित दिपके यांच्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २३ जुलै रोजी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोगामी चळवळीचे पक्ष, सामाजिक संघटना, आदिवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येत रस्त्यावर उतरले.

आंदोलकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड आणि क्रूर हल्ल्याचा जाहीर निषेध नोंदवत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. या क्रूर घटनेच्या विरोधात युवा वर्गाने सरकारविरोधात आक्रोश व्यक्त करत तहसीलदारांना थेट निवेदन सुपूर्द केले.

या प्रसंगी विनोद खोडे, अरुण काशीद, अशोक लहांगे, बिरसा ढोरे, गौरव वाघ, विलास कोरडे, नामदेव गांगुर्डे, रमेश गांगुर्डे, किरण मोंढे, मोहन सोनवणे, योगेश कोरडे, राजू पाटील, रोहिदास कोरडे, श्रीपाद येले, नितीन काशीद, मोहन बेंडकोली, पांडुरंग पोटिंदे यांच्यासह पत्रकार बंधू उपस्थित होते.
    user_श्री.भगवान आचारी
    श्री.भगवान आचारी
    त्र्यंबक, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पार्किंग परिसरात एक मोठे झाड अचानक कोसळल्याने तेथे उभ्या असलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. झाड कोसळल्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे हे झाड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर प्रशासनाने तत्काळ कोसळलेले झाड हटवून परिसरातील वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था पूर्ववत करण्याचे काम हाती घेतले आहे.
    1
    नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पार्किंग परिसरात एक मोठे झाड अचानक कोसळल्याने तेथे उभ्या असलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. झाड कोसळल्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे हे झाड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर प्रशासनाने तत्काळ कोसळलेले झाड हटवून परिसरातील वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था पूर्ववत करण्याचे काम हाती घेतले आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.