logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सुरगाणा तालुक्यातील घागबारी फाटा येथे शुक्रवारी (२४ जुलै) राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामादरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरल्याने तब्बल तीन ते चार तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली. घटनास्थळी तहसीलदार रामजी राठोड, प्रांताधिकारी कश्मिरा संखे, मोहन गांगुर्डे, घागबारीचे पोलीस पाटील गोपाळ गायकवाड, तलाठी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने व चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप नागरिक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विशेषतः नागझरी फाट्यावरील पुलाचे काम पावसाळा सुरू असतानाही अपूर्ण असल्याने भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना आधीच निवेदन देण्यात आले होते. या निवेदनानंतर तहसील कार्यालयात संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि निवेदनकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती; मात्र या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग विभागाचा एकही अधिकारी तसेच मुख्य ठेकेदार उपस्थित न राहिल्याने संताप व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने इशारा दिला आहे की, रस्ता तातडीने दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करण्यात आली नाही किंवा पुढील काळात या खराब रस्त्यामुळे अपघात घडल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. घागबारी परिसरात आतापर्यंत अनेक अपघात घडले असून, या महामार्गाच्या कामावर देखरेख करणारे अधिकारी कोण आहेत याची चौकशी करून त्यांना जबाबदार धरावे आणि निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

3 hrs ago
user_Laxman Kisan bagul
Laxman Kisan bagul
Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
3 hrs ago

सुरगाणा तालुक्यातील घागबारी फाटा येथे शुक्रवारी (२४ जुलै) राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामादरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरल्याने तब्बल तीन ते चार तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली. घटनास्थळी तहसीलदार रामजी राठोड, प्रांताधिकारी कश्मिरा संखे, मोहन गांगुर्डे, घागबारीचे पोलीस पाटील गोपाळ गायकवाड, तलाठी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने व चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप नागरिक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विशेषतः नागझरी फाट्यावरील पुलाचे काम पावसाळा सुरू असतानाही अपूर्ण असल्याने भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना

6de547c5-15ea-4efb-b01f-21c9ed4b8731

आधीच निवेदन देण्यात आले होते. या निवेदनानंतर तहसील कार्यालयात संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि निवेदनकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती; मात्र या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग विभागाचा एकही अधिकारी तसेच मुख्य ठेकेदार उपस्थित न राहिल्याने संताप व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने इशारा दिला आहे की, रस्ता तातडीने दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करण्यात आली नाही किंवा पुढील काळात या खराब रस्त्यामुळे अपघात घडल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. घागबारी परिसरात आतापर्यंत अनेक अपघात घडले असून, या महामार्गाच्या कामावर देखरेख करणारे अधिकारी कोण आहेत याची चौकशी करून त्यांना जबाबदार धरावे आणि निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सुरगाणा तालुक्यातील घागबारी फाटा येथे शुक्रवारी (२४ जुलै) राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामादरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरल्याने तब्बल तीन ते चार तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली. घटनास्थळी तहसीलदार रामजी राठोड, प्रांताधिकारी कश्मिरा संखे, मोहन गांगुर्डे, घागबारीचे पोलीस पाटील गोपाळ गायकवाड, तलाठी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने व चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप नागरिक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विशेषतः नागझरी फाट्यावरील पुलाचे काम पावसाळा सुरू असतानाही अपूर्ण असल्याने भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना आधीच निवेदन देण्यात आले होते. या निवेदनानंतर तहसील कार्यालयात संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि निवेदनकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती; मात्र या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग विभागाचा एकही अधिकारी तसेच मुख्य ठेकेदार उपस्थित न राहिल्याने संताप व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने इशारा दिला आहे की, रस्ता तातडीने दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करण्यात आली नाही किंवा पुढील काळात या खराब रस्त्यामुळे अपघात घडल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. घागबारी परिसरात आतापर्यंत अनेक अपघात घडले असून, या महामार्गाच्या कामावर देखरेख करणारे अधिकारी कोण आहेत याची चौकशी करून त्यांना जबाबदार धरावे आणि निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
    2
    सुरगाणा तालुक्यातील घागबारी फाटा येथे शुक्रवारी (२४ जुलै) राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामादरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरल्याने तब्बल तीन ते चार तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली. घटनास्थळी तहसीलदार रामजी राठोड, प्रांताधिकारी कश्मिरा संखे, मोहन गांगुर्डे, घागबारीचे पोलीस पाटील गोपाळ गायकवाड, तलाठी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने व चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप नागरिक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विशेषतः नागझरी फाट्यावरील पुलाचे काम पावसाळा सुरू असतानाही अपूर्ण असल्याने भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना आधीच निवेदन देण्यात आले होते. या निवेदनानंतर तहसील कार्यालयात संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि निवेदनकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती; मात्र या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग विभागाचा एकही अधिकारी तसेच मुख्य ठेकेदार उपस्थित न राहिल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेने इशारा दिला आहे की, रस्ता तातडीने दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करण्यात आली नाही किंवा पुढील काळात या खराब रस्त्यामुळे अपघात घडल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. घागबारी परिसरात आतापर्यंत अनेक अपघात घडले असून, या महामार्गाच्या कामावर देखरेख करणारे अधिकारी कोण आहेत याची चौकशी करून त्यांना जबाबदार धरावे आणि निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • दिनांक २९ जून २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान केलेला विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी दिंडी सोहळा २६ दिवसांच्या प्रवासानंतर आज सायंकाळी सुमारे ४ वाजता भूवैकुंठ पंढरपूरमध्ये अत्यंत भक्तिभावाने दाखल झाला आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा कळस दर्शनास पडताच वारकऱ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम", "जय जय राम कृष्ण हरी" आणि "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" या जयघोषांनी परिसर दुमदुमून टाकला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड घोषात सर्व वारकऱ्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वीणेकरी, भालदार, चोपदार, तुळशीधारी महिला, टाळकरी तसेच पालखीच्या रथाचे पंढरपूरकरांनी उत्स्फूर्त आणि भव्य स्वागत केले. या पालखी सोहळ्यासोबत सुमारे ७० ते ७५ दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या असून नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील अंदाजे दीड ते दोन लाख वारकरी भाविक आज पंढरपूर नगरीत पोहोचले आहेत. सध्या संपूर्ण पंढरपूर नगरी हरिनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने पूर्णपणे भारावून गेली असून उद्या होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्याची उत्सुकता सर्वांची शिगेला पोहोचली आहे.
    1
    दिनांक २९ जून २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान केलेला विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी दिंडी सोहळा २६ दिवसांच्या प्रवासानंतर आज सायंकाळी सुमारे ४ वाजता भूवैकुंठ पंढरपूरमध्ये अत्यंत भक्तिभावाने दाखल झाला आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा कळस दर्शनास पडताच वारकऱ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम", "जय जय राम कृष्ण हरी" आणि "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" या जयघोषांनी परिसर दुमदुमून टाकला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड घोषात सर्व वारकऱ्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वीणेकरी, भालदार, चोपदार, तुळशीधारी महिला, टाळकरी तसेच पालखीच्या रथाचे पंढरपूरकरांनी उत्स्फूर्त आणि भव्य स्वागत केले. या पालखी सोहळ्यासोबत सुमारे ७० ते ७५ दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या असून नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील अंदाजे दीड ते दोन लाख वारकरी भाविक आज पंढरपूर नगरीत पोहोचले आहेत.

सध्या संपूर्ण पंढरपूर नगरी हरिनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने पूर्णपणे भारावून गेली असून उद्या होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्याची उत्सुकता सर्वांची शिगेला पोहोचली आहे.
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावातील तरुण शेतकरी यशराज सतीश नलावडे यांनी आपल्या १ एकर शेतात माती आणि उपलब्ध नैसर्गिक साहित्याचा वापर करून विठ्ठलाची अप्रतिम व भव्य प्रतिकृती साकारली आहे. कोणतीही महागडी यंत्रसामग्री किंवा खर्चिक साधने न वापरता, केवळ स्वतःच्या कल्पकतेने आणि अनेक दिवसांच्या मेहनतीतून त्यांनी जमिनीवर ही कलाकृती उभी केली. जमिनीवरून जितकी आकर्षक दिसते, तितकीच वरून पाहिल्यावर ही रचना अधिक भव्य आणि प्रमाणबद्ध भासते. या अनोख्या उपक्रमामुळे येडशी गावाचे नाव संपूर्ण परिसरात चर्चेत आले असून, ही कलाकृती पाहण्यासाठी ग्रामस्थ, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने शेताकडे धाव घेत आहेत. येणाऱ्या नागरिकांनी मोबाईलमध्ये छायाचित्रे टिपून सोशल मीडियावरही या कलाकृतीचे कौतुक केले आहे. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी यशराज यांना आशीर्वाद दिले असून, शेती आणि अध्यात्म यांच्या या संगमामुळे ग्रामीण तरुणांमध्ये परंपरेबद्दल अभिमानाची भावना व नवा उत्साह निर्माण झाला आहे.
    1
    धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावातील तरुण शेतकरी यशराज सतीश नलावडे यांनी आपल्या १ एकर शेतात माती आणि उपलब्ध नैसर्गिक साहित्याचा वापर करून विठ्ठलाची अप्रतिम व भव्य प्रतिकृती साकारली आहे. कोणतीही महागडी यंत्रसामग्री किंवा खर्चिक साधने न वापरता, केवळ स्वतःच्या कल्पकतेने आणि अनेक दिवसांच्या मेहनतीतून त्यांनी जमिनीवर ही कलाकृती उभी केली. जमिनीवरून जितकी आकर्षक दिसते, तितकीच वरून पाहिल्यावर ही रचना अधिक भव्य आणि प्रमाणबद्ध भासते.

या अनोख्या उपक्रमामुळे येडशी गावाचे नाव संपूर्ण परिसरात चर्चेत आले असून, ही कलाकृती पाहण्यासाठी ग्रामस्थ, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने शेताकडे धाव घेत आहेत. येणाऱ्या नागरिकांनी मोबाईलमध्ये छायाचित्रे टिपून सोशल मीडियावरही या कलाकृतीचे कौतुक केले आहे. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी यशराज यांना आशीर्वाद दिले असून, शेती आणि अध्यात्म यांच्या या संगमामुळे ग्रामीण तरुणांमध्ये परंपरेबद्दल अभिमानाची भावना व नवा उत्साह निर्माण झाला आहे.
    user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
    दिव्य भारत बीएसएम न्यूज
    Spa नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना अमृता फडणवीस यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली आहे. "आम्हाला आणि मलाही महाराष्ट्रातच राहायचे आहे, आम्ही दिल्लीला जाणार नाही आणि देवेंद्रजींनाही महाराष्ट्रातच ठेवणार," असे त्या म्हणाल्या. मुंबई, नागपूर किंवा कुठेही असलो तरी विठ्ठलाची पूजा कायम करत राहणार असल्याचे सांगत त्यांनी देवेंद्रजी, मोदीजी, राज्यकर्ते आणि प्रशासनाला लोकांसाठी आयुष्यभर झटण्याची सद्बुद्धी मिळो, अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. राजकीय घडामोडींवर बोलताना, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त मोर्चाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, इतके दिवस वेगळे होते आणि आता एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. ते दोघे मिळून काहीतरी करत आहेत. याशिवाय राज्य सरकार पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा आणत असल्याचेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केले की, काही अँटी सोशल लोकांनी पोलिसांवर हल्ला केला होता, ज्यामध्ये काही विद्यार्थीही जखमी झाले. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि काळा क्षण होता असे सांगत भविष्यात अशी घटना घडू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
    4
    आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना अमृता फडणवीस यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली आहे. "आम्हाला आणि मलाही महाराष्ट्रातच राहायचे आहे, आम्ही दिल्लीला जाणार नाही आणि देवेंद्रजींनाही महाराष्ट्रातच ठेवणार," असे त्या म्हणाल्या. मुंबई, नागपूर किंवा कुठेही असलो तरी विठ्ठलाची पूजा कायम करत राहणार असल्याचे सांगत त्यांनी देवेंद्रजी, मोदीजी, राज्यकर्ते आणि प्रशासनाला लोकांसाठी आयुष्यभर झटण्याची सद्बुद्धी मिळो, अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केली.

राजकीय घडामोडींवर बोलताना, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त मोर्चाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, इतके दिवस वेगळे होते आणि आता एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. ते दोघे मिळून काहीतरी करत आहेत. याशिवाय राज्य सरकार पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा आणत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केले की, काही अँटी सोशल लोकांनी पोलिसांवर हल्ला केला होता, ज्यामध्ये काही विद्यार्थीही जखमी झाले. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि काळा क्षण होता असे सांगत भविष्यात अशी घटना घडू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • नवी दिल्लीतील 'जंतर मंतर' मैदानावर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस व सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात आलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी टॉर्च मोर्चा काढून तीव्र संताप व्यक्त केला. नाशिकमधील शालिमार येथून काढण्यात आलेल्या या निषेध फेरीत शेकडो विद्यार्थी आणि तरुण सहभागी झाले होते. यावेळी हातात निषेधाचे फलक झळकावत विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दिल्लीतील या पोलीस कारवाईचा निषेध करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली. याशिवाय लाठीचार्ज करणाऱ्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांचे रक्षण करून त्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली जावी, या प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांनी लावून धरल्या आहेत. लवकरात लवकर या मागण्यांची दखल घेतली गेली नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.
    1
    नवी दिल्लीतील 'जंतर मंतर' मैदानावर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस व सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात आलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी टॉर्च मोर्चा काढून तीव्र संताप व्यक्त केला. नाशिकमधील शालिमार येथून काढण्यात आलेल्या या निषेध फेरीत शेकडो विद्यार्थी आणि तरुण सहभागी झाले होते. यावेळी हातात निषेधाचे फलक झळकावत विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दिल्लीतील या पोलीस कारवाईचा निषेध करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली. याशिवाय लाठीचार्ज करणाऱ्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांचे रक्षण करून त्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली जावी, या प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांनी लावून धरल्या आहेत. लवकरात लवकर या मागण्यांची दखल घेतली गेली नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसानंतर प्रशासनाने वेळेवर केलेल्या उपाययोजना, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात राहिली असून कोणतीही जीवितहानी अथवा मोठी आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली नाही. पावसाचा जोर कमी झाला असला तरी संभाव्य धोका अद्याप टळलेला नसल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील तातडीच्या पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला आमदार प्रा. देवयानी फरांदे, ॲड. आमदार राहुल ढिकले, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, नाशिक पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे आणि पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला आज ग्रीन अलर्ट दिला असला तरी पाणी साचलेल्या इमारती व परिसरातील नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पावसानंतर डेंग्यू, कॉलरा यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा, तर महानगरपालिकेने स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यांचे प्रभावी नियोजन करावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळे, धबधबे आणि नदीकाठच्या भागात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाला आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गोदावरी नदीपात्रात सध्या सुमारे १९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून परिस्थिती सामान्य होण्यासाठी वेळ लागणार असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रामकुंड परिसर पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील नागरिक व भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महसूल, पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाला संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
    1
    नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसानंतर प्रशासनाने वेळेवर केलेल्या उपाययोजना, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात राहिली असून कोणतीही जीवितहानी अथवा मोठी आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली नाही. पावसाचा जोर कमी झाला असला तरी संभाव्य धोका अद्याप टळलेला नसल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील तातडीच्या पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला आमदार प्रा. देवयानी फरांदे, ॲड. आमदार राहुल ढिकले, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, नाशिक पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे आणि पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला आज ग्रीन अलर्ट दिला असला तरी पाणी साचलेल्या इमारती व परिसरातील नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पावसानंतर डेंग्यू, कॉलरा यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा, तर महानगरपालिकेने स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यांचे प्रभावी नियोजन करावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळे, धबधबे आणि नदीकाठच्या भागात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाला आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गोदावरी नदीपात्रात सध्या सुमारे १९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून परिस्थिती सामान्य होण्यासाठी वेळ लागणार असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रामकुंड परिसर पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील नागरिक व भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महसूल, पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाला संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • नाशिकमधील गोदावरी परिसरातील पूरग्रस्त भागाची महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी आपत्कालीन कक्षाला भेट दिली आणि परिस्थितीचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी मनपा प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले.
    1
    नाशिकमधील गोदावरी परिसरातील पूरग्रस्त भागाची महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी आपत्कालीन कक्षाला भेट दिली आणि परिस्थितीचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी मनपा प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले.
    user_PRASIDHI PRAMUKH NEWS
    PRASIDHI PRAMUKH NEWS
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • एका २५ वर्षीय मराठी तरुणीने पोलिसांच्या कारवाईवर सडकून टीका करत व्यवस्थेबद्दल तीव्र चीड व्यक्त केली आहे. डोळ्यात अश्रू आणून "ही लढाई जातीची नाही, तर प्रस्थापित विरुद्ध गरिबांची आहे," असा टाहो तिने फोडला. पोलिसांच्या या भूमिकेवर आणि व्यवस्थेवर संताप व्यक्त करताना तरुणीचा हा आक्रोश खरोखरच मन सुन्न करणारा आहे.
    1
    एका २५ वर्षीय मराठी तरुणीने पोलिसांच्या कारवाईवर सडकून टीका करत व्यवस्थेबद्दल तीव्र चीड व्यक्त केली आहे. डोळ्यात अश्रू आणून "ही लढाई जातीची नाही, तर प्रस्थापित विरुद्ध गरिबांची आहे," असा टाहो तिने फोडला. पोलिसांच्या या भूमिकेवर आणि व्यवस्थेवर संताप व्यक्त करताना तरुणीचा हा आक्रोश खरोखरच मन सुन्न करणारा आहे.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.