Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिकमधील गोदावरी परिसरातील पूरग्रस्त भागाची महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी आपत्कालीन कक्षाला भेट दिली आणि परिस्थितीचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी मनपा प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले.
PRASIDHI PRAMUKH NEWS
नाशिकमधील गोदावरी परिसरातील पूरग्रस्त भागाची महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी आपत्कालीन कक्षाला भेट दिली आणि परिस्थितीचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी मनपा प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- गुन्हेशाखा युनिट-२ ने आंतरराज्यीय रेकॉर्डवरील तीन सराईत आरोपींना अटक करून तीन घरफोडी आणि एका मोटारसायकल चोरीसह एकूण चार गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपींकडून चोरीची होंडा शाईन मोटारसायकल, घरफोडीचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख १६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना, पेठ रोड परिसरातील मेघराज बेकरीजवळ तीन संशयित व्यक्ती काळ्या रंगाच्या होंडा शाईन (एमएच-१५ ईडब्ल्यू-७५८८) मोटारसायकलवर फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दर्शनसिंग धरमसिंग शिख (रा. अक्कलकुवा, नंदुरबार), समरेशसिंग रणजितसिंग शिकलीकर (रा. वडोदरा, गुजरात) आणि बहादुरसिंग ओमकारसिंग शिकलीकर (रा. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. कसून चौकशीदरम्यान आरोपींनी घरफोडी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. यानंतर म्हसरूळ पोलीस ठाण्यातील एक मोटारसायकल चोरी, तसेच पंचवटी, उपनगर आणि मुंबईनाका पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी एक घरफोडी असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक डॉ. समाधान हिरे, संजय सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे व त्यांच्या पथकाने केली.2
- शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेची ११८ वर्षांची उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे नाशिक येथील गुरुदक्षिणा इमारतीतील पलाश सभागृहात शुक्रवारी, २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यार्थी गुणगौरव आणि शिक्षक सेवा गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव, खजिनदार व मानव संसाधन संचालिका डॉ. दीप्ती देशपांडे राहणार आहेत. तसेच नाशिक महानगरपालिकेच्या महापौर सौ. हिमगौरी आडके या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, नासा स्पेस एज्युकेटर सौ. अपूर्वा जाखडी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. पी. देशपांडे आणि चेअरमन डॉ. सुहासिनी संत यांची विशेष अतिथी म्हणून प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या समारंभाचे मुख्य आकर्षण म्हणजे संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांतील इयत्ता दहावी आणि बारावीच्या सार्वजनिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. याशिवाय ज्ञानदानातून हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडविणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात निष्ठेने कार्य केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव करून त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैचारिक वाटचालीचे दर्शन घडविणाऱ्या 'स्वयंप्रकाश' आणि 'स्वयंप्रेरणा' या दोन महत्त्वपूर्ण प्रकाशनांचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात ११८ वर्षांचे भरीव योगदान देणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीने या प्रेरणादायी सोहळ्यास विद्यार्थी, पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि सर्व नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांना व सेवानिवृत्त शिक्षकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.2
- नाशिकमधील गोदावरी परिसरातील पूरग्रस्त भागाची महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी आपत्कालीन कक्षाला भेट दिली आणि परिस्थितीचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी मनपा प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले.1
- नाशिक शहरात २३ जुलै रोजी दिवसभर सतत जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिक शहर परिसरात आज दिवसभरात पावसाची जोरदार संततधार सुरूच आहे.3
- 23 जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोगामी चळवळीचे पक्ष, सामाजिक संघटना, आदिवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून युवा वर्ग रस्त्यावर उतरला. आंदोलकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या क्रूर आणि भ्याड घटनेचा तीव्र निषेध नोंदवत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आणि सरकारविरोधात निदर्शने करत तहसीलदारांना निवेदन सादर केले. या वेळी विनोद खोडे, अरुण काशीद, अशोक लहांगे, बिरसा ढोरे, गौरव वाघ, विलास कोरडे, नामदेव गांगुर्डे, रमेश गांगुर्डे, किरण मोंढे, मोहन सोनवणे, योगेश कोरडे, राजू पाटील, रोहिदास कोरडे, श्रीपाद येले, नितीन काशीद, मोहन बेंडकोली, पांडुरंग पोटिंदे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.1
- नाशिकमध्ये संततधार पावसामुळे दाणादाण उडाली असून ठिकठिकाणी झाडे कोसळून मोठे नुकसान झाले आहे. सखल भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले असून अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. अशोका मार्गावरील 'मधुबन स्वीट्स'जवळ काल रात्री एका गाडीवर आणि रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळले. रात्री साडेअकरा वाजता अग्निशमन मुख्यालयाच्या जवानांनी झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. याशिवाय भारत नगरमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अग्निशमन दलाचे जवान तातडीने मदतकार्यासाठी दाखल झाले आहेत. तसेच नाशिक जिल्हा न्यायालय परिसरात गाड्यांवर पडलेले झाडही जवानांनी तातडीने धाव घेत हटवले आहे. रात्रीच्या वेळीही स्वतःचा जीव धोक्यात घालून मदतकार्य करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे.3
- नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पार्किंग परिसरात एक मोठे झाड अचानक कोसळल्याने तेथे उभ्या असलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. झाड कोसळल्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे हे झाड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर प्रशासनाने तत्काळ कोसळलेले झाड हटवून परिसरातील वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था पूर्ववत करण्याचे काम हाती घेतले आहे.1