logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेची ११८ वर्षांची उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे नाशिक येथील गुरुदक्षिणा इमारतीतील पलाश सभागृहात शुक्रवारी, २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यार्थी गुणगौरव आणि शिक्षक सेवा गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव, खजिनदार व मानव संसाधन संचालिका डॉ. दीप्ती देशपांडे राहणार आहेत. तसेच नाशिक महानगरपालिकेच्या महापौर सौ. हिमगौरी आडके या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, नासा स्पेस एज्युकेटर सौ. अपूर्वा जाखडी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. पी. देशपांडे आणि चेअरमन डॉ. सुहासिनी संत यांची विशेष अतिथी म्हणून प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या समारंभाचे मुख्य आकर्षण म्हणजे संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांतील इयत्ता दहावी आणि बारावीच्या सार्वजनिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. याशिवाय ज्ञानदानातून हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडविणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात निष्ठेने कार्य केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव करून त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैचारिक वाटचालीचे दर्शन घडविणाऱ्या 'स्वयंप्रकाश' आणि 'स्वयंप्रेरणा' या दोन महत्त्वपूर्ण प्रकाशनांचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात ११८ वर्षांचे भरीव योगदान देणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीने या प्रेरणादायी सोहळ्यास विद्यार्थी, पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि सर्व नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांना व सेवानिवृत्त शिक्षकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.

4 hrs ago
user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
दिव्य भारत बीएसएम न्यूज
Spa नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
4 hrs ago

शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेची ११८ वर्षांची उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे नाशिक येथील गुरुदक्षिणा इमारतीतील पलाश सभागृहात शुक्रवारी, २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यार्थी गुणगौरव आणि शिक्षक सेवा गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव, खजिनदार व मानव संसाधन संचालिका डॉ. दीप्ती देशपांडे राहणार आहेत. तसेच नाशिक महानगरपालिकेच्या महापौर सौ. हिमगौरी आडके या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, नासा स्पेस एज्युकेटर सौ. अपूर्वा जाखडी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. पी. देशपांडे आणि चेअरमन डॉ. सुहासिनी संत यांची विशेष अतिथी म्हणून प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या समारंभाचे मुख्य आकर्षण म्हणजे संस्थेच्या विविध शाळा

7215ed93-a765-41e6-bc49-18d7e94c7067

व महाविद्यालयांतील इयत्ता दहावी आणि बारावीच्या सार्वजनिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. याशिवाय ज्ञानदानातून हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडविणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात निष्ठेने कार्य केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव करून त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैचारिक वाटचालीचे दर्शन घडविणाऱ्या 'स्वयंप्रकाश' आणि 'स्वयंप्रेरणा' या दोन महत्त्वपूर्ण प्रकाशनांचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात ११८ वर्षांचे भरीव योगदान देणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीने या प्रेरणादायी सोहळ्यास विद्यार्थी, पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि सर्व नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांना व सेवानिवृत्त शिक्षकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसानंतर प्रशासनाने वेळेवर केलेल्या उपाययोजना, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात राहिली असून कोणतीही जीवितहानी अथवा मोठी आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली नाही. पावसाचा जोर कमी झाला असला तरी संभाव्य धोका अद्याप टळलेला नसल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील तातडीच्या पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला आमदार प्रा. देवयानी फरांदे, ॲड. आमदार राहुल ढिकले, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, नाशिक पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे आणि पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला आज ग्रीन अलर्ट दिला असला तरी पाणी साचलेल्या इमारती व परिसरातील नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पावसानंतर डेंग्यू, कॉलरा यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा, तर महानगरपालिकेने स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यांचे प्रभावी नियोजन करावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळे, धबधबे आणि नदीकाठच्या भागात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाला आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गोदावरी नदीपात्रात सध्या सुमारे १९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून परिस्थिती सामान्य होण्यासाठी वेळ लागणार असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रामकुंड परिसर पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील नागरिक व भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महसूल, पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाला संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
    1
    नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसानंतर प्रशासनाने वेळेवर केलेल्या उपाययोजना, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात राहिली असून कोणतीही जीवितहानी अथवा मोठी आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली नाही. पावसाचा जोर कमी झाला असला तरी संभाव्य धोका अद्याप टळलेला नसल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील तातडीच्या पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला आमदार प्रा. देवयानी फरांदे, ॲड. आमदार राहुल ढिकले, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, नाशिक पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे आणि पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला आज ग्रीन अलर्ट दिला असला तरी पाणी साचलेल्या इमारती व परिसरातील नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पावसानंतर डेंग्यू, कॉलरा यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा, तर महानगरपालिकेने स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यांचे प्रभावी नियोजन करावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळे, धबधबे आणि नदीकाठच्या भागात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाला आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गोदावरी नदीपात्रात सध्या सुमारे १९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून परिस्थिती सामान्य होण्यासाठी वेळ लागणार असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रामकुंड परिसर पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील नागरिक व भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महसूल, पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाला संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    20 min ago
  • गुन्हेशाखा युनिट-२ ने आंतरराज्यीय रेकॉर्डवरील तीन सराईत आरोपींना अटक करून तीन घरफोडी आणि एका मोटारसायकल चोरीसह एकूण चार गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपींकडून चोरीची होंडा शाईन मोटारसायकल, घरफोडीचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख १६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना, पेठ रोड परिसरातील मेघराज बेकरीजवळ तीन संशयित व्यक्ती काळ्या रंगाच्या होंडा शाईन (एमएच-१५ ईडब्ल्यू-७५८८) मोटारसायकलवर फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दर्शनसिंग धरमसिंग शिख (रा. अक्कलकुवा, नंदुरबार), समरेशसिंग रणजितसिंग शिकलीकर (रा. वडोदरा, गुजरात) आणि बहादुरसिंग ओमकारसिंग शिकलीकर (रा. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. कसून चौकशीदरम्यान आरोपींनी घरफोडी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. यानंतर म्हसरूळ पोलीस ठाण्यातील एक मोटारसायकल चोरी, तसेच पंचवटी, उपनगर आणि मुंबईनाका पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी एक घरफोडी असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक डॉ. समाधान हिरे, संजय सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे व त्यांच्या पथकाने केली.
    2
    गुन्हेशाखा युनिट-२ ने आंतरराज्यीय रेकॉर्डवरील तीन सराईत आरोपींना अटक करून तीन घरफोडी आणि एका मोटारसायकल चोरीसह एकूण चार गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपींकडून चोरीची होंडा शाईन मोटारसायकल, घरफोडीचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख १६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना, पेठ रोड परिसरातील मेघराज बेकरीजवळ तीन संशयित व्यक्ती काळ्या रंगाच्या होंडा शाईन (एमएच-१५ ईडब्ल्यू-७५८८) मोटारसायकलवर फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दर्शनसिंग धरमसिंग शिख (रा. अक्कलकुवा, नंदुरबार), समरेशसिंग रणजितसिंग शिकलीकर (रा. वडोदरा, गुजरात) आणि बहादुरसिंग ओमकारसिंग शिकलीकर (रा. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे.

कसून चौकशीदरम्यान आरोपींनी घरफोडी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. यानंतर म्हसरूळ पोलीस ठाण्यातील एक मोटारसायकल चोरी, तसेच पंचवटी, उपनगर आणि मुंबईनाका पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी एक घरफोडी असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक डॉ. समाधान हिरे, संजय सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे व त्यांच्या पथकाने केली.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेची ११८ वर्षांची उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे नाशिक येथील गुरुदक्षिणा इमारतीतील पलाश सभागृहात शुक्रवारी, २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यार्थी गुणगौरव आणि शिक्षक सेवा गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव, खजिनदार व मानव संसाधन संचालिका डॉ. दीप्ती देशपांडे राहणार आहेत. तसेच नाशिक महानगरपालिकेच्या महापौर सौ. हिमगौरी आडके या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, नासा स्पेस एज्युकेटर सौ. अपूर्वा जाखडी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. पी. देशपांडे आणि चेअरमन डॉ. सुहासिनी संत यांची विशेष अतिथी म्हणून प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या समारंभाचे मुख्य आकर्षण म्हणजे संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांतील इयत्ता दहावी आणि बारावीच्या सार्वजनिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. याशिवाय ज्ञानदानातून हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडविणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात निष्ठेने कार्य केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव करून त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैचारिक वाटचालीचे दर्शन घडविणाऱ्या 'स्वयंप्रकाश' आणि 'स्वयंप्रेरणा' या दोन महत्त्वपूर्ण प्रकाशनांचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात ११८ वर्षांचे भरीव योगदान देणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीने या प्रेरणादायी सोहळ्यास विद्यार्थी, पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि सर्व नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांना व सेवानिवृत्त शिक्षकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.
    2
    शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेची ११८ वर्षांची उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे नाशिक येथील गुरुदक्षिणा इमारतीतील पलाश सभागृहात शुक्रवारी, २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यार्थी गुणगौरव आणि शिक्षक सेवा गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव, खजिनदार व मानव संसाधन संचालिका डॉ. दीप्ती देशपांडे राहणार आहेत. तसेच नाशिक महानगरपालिकेच्या महापौर सौ. हिमगौरी आडके या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, नासा स्पेस एज्युकेटर सौ. अपूर्वा जाखडी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. पी. देशपांडे आणि चेअरमन डॉ. सुहासिनी संत यांची विशेष अतिथी म्हणून प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या समारंभाचे मुख्य आकर्षण म्हणजे संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांतील इयत्ता दहावी आणि बारावीच्या सार्वजनिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. याशिवाय ज्ञानदानातून हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडविणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात निष्ठेने कार्य केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव करून त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैचारिक वाटचालीचे दर्शन घडविणाऱ्या 'स्वयंप्रकाश' आणि 'स्वयंप्रेरणा' या दोन महत्त्वपूर्ण प्रकाशनांचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.

महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात ११८ वर्षांचे भरीव योगदान देणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीने या प्रेरणादायी सोहळ्यास विद्यार्थी, पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि सर्व नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांना व सेवानिवृत्त शिक्षकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.
    user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
    दिव्य भारत बीएसएम न्यूज
    Spa नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • नाशिकमधील गोदावरी परिसरातील पूरग्रस्त भागाची महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी आपत्कालीन कक्षाला भेट दिली आणि परिस्थितीचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी मनपा प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले.
    1
    नाशिकमधील गोदावरी परिसरातील पूरग्रस्त भागाची महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी आपत्कालीन कक्षाला भेट दिली आणि परिस्थितीचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी मनपा प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले.
    user_PRASIDHI PRAMUKH NEWS
    PRASIDHI PRAMUKH NEWS
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नाशिक शहरात २३ जुलै रोजी दिवसभर सतत जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिक शहर परिसरात आज दिवसभरात पावसाची जोरदार संततधार सुरूच आहे.
    3
    नाशिक शहरात २३ जुलै रोजी दिवसभर सतत जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिक शहर परिसरात आज दिवसभरात पावसाची जोरदार संततधार सुरूच आहे.
    user_निलेश  शेकोकार NPS न्यूज
    निलेश शेकोकार NPS न्यूज
    Advertising agency नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • दिनांक २९ जून २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान केलेला विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी दिंडी सोहळा २६ दिवसांच्या प्रवासानंतर आज सायंकाळी सुमारे ४ वाजता भूवैकुंठ पंढरपूरमध्ये अत्यंत भक्तिभावाने दाखल झाला आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा कळस दर्शनास पडताच वारकऱ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम", "जय जय राम कृष्ण हरी" आणि "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" या जयघोषांनी परिसर दुमदुमून टाकला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड घोषात सर्व वारकऱ्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वीणेकरी, भालदार, चोपदार, तुळशीधारी महिला, टाळकरी तसेच पालखीच्या रथाचे पंढरपूरकरांनी उत्स्फूर्त आणि भव्य स्वागत केले. या पालखी सोहळ्यासोबत सुमारे ७० ते ७५ दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या असून नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील अंदाजे दीड ते दोन लाख वारकरी भाविक आज पंढरपूर नगरीत पोहोचले आहेत. सध्या संपूर्ण पंढरपूर नगरी हरिनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने पूर्णपणे भारावून गेली असून उद्या होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्याची उत्सुकता सर्वांची शिगेला पोहोचली आहे.
    1
    दिनांक २९ जून २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान केलेला विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी दिंडी सोहळा २६ दिवसांच्या प्रवासानंतर आज सायंकाळी सुमारे ४ वाजता भूवैकुंठ पंढरपूरमध्ये अत्यंत भक्तिभावाने दाखल झाला आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा कळस दर्शनास पडताच वारकऱ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम", "जय जय राम कृष्ण हरी" आणि "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" या जयघोषांनी परिसर दुमदुमून टाकला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड घोषात सर्व वारकऱ्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वीणेकरी, भालदार, चोपदार, तुळशीधारी महिला, टाळकरी तसेच पालखीच्या रथाचे पंढरपूरकरांनी उत्स्फूर्त आणि भव्य स्वागत केले. या पालखी सोहळ्यासोबत सुमारे ७० ते ७५ दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या असून नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील अंदाजे दीड ते दोन लाख वारकरी भाविक आज पंढरपूर नगरीत पोहोचले आहेत.

सध्या संपूर्ण पंढरपूर नगरी हरिनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने पूर्णपणे भारावून गेली असून उद्या होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्याची उत्सुकता सर्वांची शिगेला पोहोचली आहे.
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नाशिकमध्ये संततधार पावसामुळे दाणादाण उडाली असून ठिकठिकाणी झाडे कोसळून मोठे नुकसान झाले आहे. सखल भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले असून अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. अशोका मार्गावरील 'मधुबन स्वीट्स'जवळ काल रात्री एका गाडीवर आणि रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळले. रात्री साडेअकरा वाजता अग्निशमन मुख्यालयाच्या जवानांनी झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. याशिवाय भारत नगरमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अग्निशमन दलाचे जवान तातडीने मदतकार्यासाठी दाखल झाले आहेत. तसेच नाशिक जिल्हा न्यायालय परिसरात गाड्यांवर पडलेले झाडही जवानांनी तातडीने धाव घेत हटवले आहे. रात्रीच्या वेळीही स्वतःचा जीव धोक्यात घालून मदतकार्य करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    3
    नाशिकमध्ये संततधार पावसामुळे दाणादाण उडाली असून ठिकठिकाणी झाडे कोसळून मोठे नुकसान झाले आहे. सखल भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले असून अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.

अशोका मार्गावरील 'मधुबन स्वीट्स'जवळ काल रात्री एका गाडीवर आणि रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळले. रात्री साडेअकरा वाजता अग्निशमन मुख्यालयाच्या जवानांनी झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. याशिवाय भारत नगरमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अग्निशमन दलाचे जवान तातडीने मदतकार्यासाठी दाखल झाले आहेत. तसेच नाशिक जिल्हा न्यायालय परिसरात गाड्यांवर पडलेले झाडही जवानांनी तातडीने धाव घेत हटवले आहे.

रात्रीच्या वेळीही स्वतःचा जीव धोक्यात घालून मदतकार्य करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या विरोधात महाराष्ट्र बंद दरम्यान नाशिक येथील गरवारे पॉईंटवर जोरदार निदर्शने करण्यात आली. मार्शल ग्रुप आणि संघर्षयोद्धा प्रशांत भाऊ खरात यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात प्रदर्शनकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली व विद्यार्थ्यांसाठी न्यायाची मागणी केली. या रास्ता रोको आंदोलनादरम्यान पोलिसांनी प्रशांत भाऊ खरात यांच्यासह अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
    1
    दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या विरोधात महाराष्ट्र बंद दरम्यान नाशिक येथील गरवारे पॉईंटवर जोरदार निदर्शने करण्यात आली. मार्शल ग्रुप आणि संघर्षयोद्धा प्रशांत भाऊ खरात यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात प्रदर्शनकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली व विद्यार्थ्यांसाठी न्यायाची मागणी केली.

या रास्ता रोको आंदोलनादरम्यान पोलिसांनी प्रशांत भाऊ खरात यांच्यासह अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.