23 जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोगामी चळवळीचे पक्ष, सामाजिक संघटना, आदिवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून युवा वर्ग रस्त्यावर उतरला. आंदोलकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या क्रूर आणि भ्याड घटनेचा तीव्र निषेध नोंदवत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आणि सरकारविरोधात निदर्शने करत तहसीलदारांना निवेदन सादर केले. या वेळी विनोद खोडे, अरुण काशीद, अशोक लहांगे, बिरसा ढोरे, गौरव वाघ, विलास कोरडे, नामदेव गांगुर्डे, रमेश गांगुर्डे, किरण मोंढे, मोहन सोनवणे, योगेश कोरडे, राजू पाटील, रोहिदास कोरडे, श्रीपाद येले, नितीन काशीद, मोहन बेंडकोली, पांडुरंग पोटिंदे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
23 जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोगामी चळवळीचे पक्ष, सामाजिक संघटना, आदिवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून युवा वर्ग रस्त्यावर उतरला. आंदोलकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या क्रूर आणि भ्याड घटनेचा तीव्र निषेध नोंदवत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आणि सरकारविरोधात निदर्शने करत तहसीलदारांना निवेदन सादर केले. या वेळी विनोद खोडे, अरुण काशीद, अशोक लहांगे, बिरसा ढोरे, गौरव वाघ, विलास कोरडे, नामदेव गांगुर्डे, रमेश गांगुर्डे, किरण मोंढे, मोहन सोनवणे, योगेश कोरडे, राजू पाटील, रोहिदास कोरडे, श्रीपाद येले, नितीन काशीद, मोहन बेंडकोली, पांडुरंग पोटिंदे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
- 23 जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोगामी चळवळीचे पक्ष, सामाजिक संघटना, आदिवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून युवा वर्ग रस्त्यावर उतरला. आंदोलकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या क्रूर आणि भ्याड घटनेचा तीव्र निषेध नोंदवत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आणि सरकारविरोधात निदर्शने करत तहसीलदारांना निवेदन सादर केले. या वेळी विनोद खोडे, अरुण काशीद, अशोक लहांगे, बिरसा ढोरे, गौरव वाघ, विलास कोरडे, नामदेव गांगुर्डे, रमेश गांगुर्डे, किरण मोंढे, मोहन सोनवणे, योगेश कोरडे, राजू पाटील, रोहिदास कोरडे, श्रीपाद येले, नितीन काशीद, मोहन बेंडकोली, पांडुरंग पोटिंदे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.1
- नाशिकमध्ये संततधार पावसामुळे दाणादाण उडाली असून ठिकठिकाणी झाडे कोसळून मोठे नुकसान झाले आहे. सखल भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले असून अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. अशोका मार्गावरील 'मधुबन स्वीट्स'जवळ काल रात्री एका गाडीवर आणि रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळले. रात्री साडेअकरा वाजता अग्निशमन मुख्यालयाच्या जवानांनी झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. याशिवाय भारत नगरमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अग्निशमन दलाचे जवान तातडीने मदतकार्यासाठी दाखल झाले आहेत. तसेच नाशिक जिल्हा न्यायालय परिसरात गाड्यांवर पडलेले झाडही जवानांनी तातडीने धाव घेत हटवले आहे. रात्रीच्या वेळीही स्वतःचा जीव धोक्यात घालून मदतकार्य करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे.3
- नाशिकमधील गोदावरी परिसरातील पूरग्रस्त भागाची महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी आपत्कालीन कक्षाला भेट दिली आणि परिस्थितीचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी मनपा प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले.1
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुदखेड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंदला काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), बहुजन समाज पार्टी आणि महाविकास आघाडीतील समविचारी पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला. यामुळे शहरातील मुख्य व्यापारी पेठ दिवसभर कडकडीत बंद राहिली. कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत शांततेत सहकार्याची विनंती केली आणि व्यापाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून पाठिंबा दर्शवला. सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले. निवेदनात केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणावी अशा मागण्या करण्यात आल्या. याशिवाय लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच नांदेड मतदारसंघाचे खासदार प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्याशी संबंधित कारवाईबाबत निषेध व्यक्त करत विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना न्याय्य वागणूक देण्याची भूमिका मांडण्यात आली. आंदोलनाच्या सुरुवातीला आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या एका तरुण विद्यार्थिनीला दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आणि तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करून कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुदखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.2
- नाशिक शहरात २३ जुलै रोजी दिवसभर सतत जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिक शहर परिसरात आज दिवसभरात पावसाची जोरदार संततधार सुरूच आहे.3
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे सोनम वांगचूक आणि अभिजित दीपके यांच्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २३ जुलै रोजी त्र्यंबकेश्वरमधून विविध संघटना एकत्र आल्या. पुरोगामी चळवळीचे पक्ष, सामाजिक संघटना, आदिवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड आणि क्रूर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. या घटनेच्या विरोधात युवा वर्ग सरकारविरोधात रस्त्यावर उतरला आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. आंदोलकांनी यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन सादर केले. या प्रसंगी विनोद खोडे, अरुण काशीद, अशोक लहांगे, बिरसा ढोरे, गौरव वाघ, विलास कोरडे, नामदेव गांगुर्डे, रमेश गांगुर्डे, किरण मोंढे, मोहन सोनवणे, योगेश कोरडे, राजू पाटील, रोहिदास कोरडे, श्रीपाद येले, नितीन काशीद, मोहन बेंडकोली, पांडुरंग पोटिंदे यांच्यासह पत्रकार बंधू उपस्थित होते.1
- नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पार्किंग परिसरात एक मोठे झाड अचानक कोसळल्याने तेथे उभ्या असलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. झाड कोसळल्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे हे झाड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर प्रशासनाने तत्काळ कोसळलेले झाड हटवून परिसरातील वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था पूर्ववत करण्याचे काम हाती घेतले आहे.1