दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुदखेड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंदला काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), बहुजन समाज पार्टी आणि महाविकास आघाडीतील समविचारी पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला. यामुळे शहरातील मुख्य व्यापारी पेठ दिवसभर कडकडीत बंद राहिली. कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत शांततेत सहकार्याची विनंती केली आणि व्यापाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून पाठिंबा दर्शवला. सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले. निवेदनात केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणावी अशा मागण्या करण्यात आल्या. याशिवाय लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच नांदेड मतदारसंघाचे खासदार प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्याशी संबंधित कारवाईबाबत निषेध व्यक्त करत विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना न्याय्य वागणूक देण्याची भूमिका मांडण्यात आली. आंदोलनाच्या सुरुवातीला आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या एका तरुण विद्यार्थिनीला दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आणि तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करून कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुदखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुदखेड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंदला काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), बहुजन समाज पार्टी आणि महाविकास आघाडीतील समविचारी पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला. यामुळे शहरातील मुख्य व्यापारी पेठ दिवसभर कडकडीत बंद राहिली. कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत शांततेत सहकार्याची विनंती केली आणि व्यापाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून पाठिंबा दर्शवला. सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले. निवेदनात केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर
कारवाई करावी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणावी अशा मागण्या करण्यात आल्या. याशिवाय लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच नांदेड मतदारसंघाचे खासदार प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्याशी संबंधित कारवाईबाबत निषेध व्यक्त करत विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना न्याय्य वागणूक देण्याची भूमिका मांडण्यात आली. आंदोलनाच्या सुरुवातीला आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या एका तरुण विद्यार्थिनीला दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आणि तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करून कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुदखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुदखेड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंदला काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), बहुजन समाज पार्टी आणि महाविकास आघाडीतील समविचारी पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला. यामुळे शहरातील मुख्य व्यापारी पेठ दिवसभर कडकडीत बंद राहिली. कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत शांततेत सहकार्याची विनंती केली आणि व्यापाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून पाठिंबा दर्शवला. सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले. निवेदनात केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणावी अशा मागण्या करण्यात आल्या. याशिवाय लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच नांदेड मतदारसंघाचे खासदार प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्याशी संबंधित कारवाईबाबत निषेध व्यक्त करत विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना न्याय्य वागणूक देण्याची भूमिका मांडण्यात आली. आंदोलनाच्या सुरुवातीला आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या एका तरुण विद्यार्थिनीला दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आणि तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करून कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुदखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.2
- नाशिक शहरात २३ जुलै रोजी दिवसभर सतत जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिक शहर परिसरात आज दिवसभरात पावसाची जोरदार संततधार सुरूच आहे.3
- नाशिक शहरातील भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत कथितपणे सुरू असलेल्या अवैध जुगार, मटका आणि सट्टा व्यवसायाविरोधात कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी आवामी विकास पक्षाचे नाशिक शहर अध्यक्ष सरफराज पठाण यांनी पोलिस प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. हे निवेदन पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त आणि भद्रकाली पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना संबोधित करून देण्यात आले आहे. भद्रकाली परिसरातील काही ठिकाणी अशा बेकायदेशीर हालचाली चालत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या अवैध धंद्यांमुळे स्थानिक नागरिक आणि विशेषतः तरुणांवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. वेळीच यावर प्रभावी कारवाई न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेसह सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो. निवेदनाद्वारे सरफराज पठाण यांनी या तक्रारींची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. आरोप सत्य आढळल्यास संबंधित चालक, यात सहभागी व्यक्ती आणि अशा कामांसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्यांवर महाराष्ट्र जुगार बंदी कायदा व इतर लागू कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अवैध जुगार आणि सट्ट्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडतात आणि तरुणांचे भविष्य प्रभावित होते, त्यामुळे यावर वेळेत आणि प्रभावी कारवाई होणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आवामी विकास पक्षाने पोलिस प्रशासनाकडे या परिसरात नियमित गस्त, विशेष मोहीम आणि देखरेख वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच, नागरिकांनी आपल्या भागात असा कोणताही अवैध धंदा आढळल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता या प्रकरणी पोलिस प्रशासनाच्या आगामी कारवाईकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.1
- नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात आणि पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध भावली धरण १००% भरून ओव्हरफ्लो झाले आहे. पावसाची संततधार कायम राहिल्याने जलसाठा पूर्ण क्षमतेने भरला असून धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पावसामुळे परिसरातील निसर्गरम्य भाग जलमय झाला आहे. धरण पूर्ण भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याची आणि शेतीची चिंता मिटल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, प्रशासनाकडून भावली व भाम नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परिसरात निसर्गसौंदर्य खुलले असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पर्यटकांनी पाण्यात उतरणे व हुल्लडबाजी करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.1
- दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या विरोधात महाराष्ट्र बंद दरम्यान नाशिक येथील गरवारे पॉईंटवर जोरदार निदर्शने करण्यात आली. मार्शल ग्रुप आणि संघर्षयोद्धा प्रशांत भाऊ खरात यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात प्रदर्शनकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली व विद्यार्थ्यांसाठी न्यायाची मागणी केली. या रास्ता रोको आंदोलनादरम्यान पोलिसांनी प्रशांत भाऊ खरात यांच्यासह अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.1