logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून १२ हजार ६०० क्यूसेक, तर गोदावरी नदीवरील होळकर पुलाजवळून १९ हजार ७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सायंकाळपर्यंत या विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता पोलिस, महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर तालुक्यात मागील २४ तासांत १९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कश्यपी धरण ७१ टक्के आणि गौतमी गोदावरी धरण ९० टक्के भरल्याने गंगापूर धरणात पाण्याची आवक वाढली असून हे धरण ९७ टक्के भरले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून सराफ बाजार परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सायखेडा व चांदोरी परिसरात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच मालेगाव येथे गिरणा नदी काठावरील १६ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गोदावरी नदीतून २००८ मध्ये ४२ हजार क्यूसेक आणि सर्वाधिक ६२ हजार क्यूसेक विसर्गाचा उच्चांक होता, मात्र सध्या तशी परिस्थिती नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पावसामुळे त्र्यंबकेश्वर येथे पत्रा उडाल्याने आठ पर्यटकांपैकी एक जण जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर नदीपात्रात अडकलेल्या एका बसमधील सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली असून बलसाड प्रशासनाशी संपर्क सुरू आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा आपत्ती निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून आरोग्य केंद्रांमध्ये औषधे व सर्पदंश प्रतिबंधक लशींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. महावितरण कंपनीलाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि उपमहापौरांनी नदी परिसराची पाहणी केली आहे. सध्या जिल्ह्यातील सात रस्ते बंद असून ते पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

3 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
3 hrs ago

नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून १२ हजार ६०० क्यूसेक, तर गोदावरी नदीवरील होळकर पुलाजवळून १९ हजार ७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सायंकाळपर्यंत या विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता पोलिस, महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर तालुक्यात मागील २४ तासांत १९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कश्यपी धरण ७१ टक्के आणि गौतमी गोदावरी धरण ९० टक्के भरल्याने गंगापूर धरणात पाण्याची आवक वाढली असून हे धरण ९७ टक्के भरले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून सराफ बाजार परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सायखेडा व चांदोरी परिसरात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच मालेगाव येथे गिरणा नदी काठावरील १६ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गोदावरी नदीतून २००८ मध्ये ४२ हजार क्यूसेक आणि सर्वाधिक ६२ हजार क्यूसेक विसर्गाचा उच्चांक होता, मात्र सध्या तशी परिस्थिती नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पावसामुळे त्र्यंबकेश्वर येथे पत्रा उडाल्याने आठ पर्यटकांपैकी एक जण जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर नदीपात्रात अडकलेल्या एका बसमधील सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली असून बलसाड प्रशासनाशी संपर्क सुरू आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा आपत्ती निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून आरोग्य केंद्रांमध्ये औषधे व सर्पदंश प्रतिबंधक लशींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. महावितरण कंपनीलाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि उपमहापौरांनी नदी परिसराची पाहणी केली आहे. सध्या जिल्ह्यातील सात रस्ते बंद असून ते पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नाशिक येथील नवीन नाशिक सेंटर पार्क येथे स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. दिनांक 22 जुलै 2026 रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांची विशेष उपस्थिती होती. नवीन नाशिक परिसरातील सेंटर पार्कमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा जयंती सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
    1
    नाशिक येथील नवीन नाशिक सेंटर पार्क येथे स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. दिनांक 22 जुलै 2026 रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांची विशेष उपस्थिती होती. नवीन नाशिक परिसरातील सेंटर पार्कमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा जयंती सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
    user_निलेश  शेकोकार NPS न्यूज
    निलेश शेकोकार NPS न्यूज
    Advertising agency नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • दिल्लीतील जंतर-मंतरपासून ते बिहारपर्यंत NEET पेपर लीक आणि परीक्षा व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांचे आंदोलन अत्यंत तीव्र झाले आहे. या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांचे विरोध प्रदर्शन सातत्याने सुरूच आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे विधान समोर आले आहे. या घडामोडींनंतर आता सरकार याप्रकरणी काही मोठी कारवाई करण्यास जात आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    दिल्लीतील जंतर-मंतरपासून ते बिहारपर्यंत NEET पेपर लीक आणि परीक्षा व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांचे आंदोलन अत्यंत तीव्र झाले आहे. या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांचे विरोध प्रदर्शन सातत्याने सुरूच आहे.

या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे विधान समोर आले आहे. या घडामोडींनंतर आता सरकार याप्रकरणी काही मोठी कारवाई करण्यास जात आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • 23 जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोगामी चळवळीचे पक्ष, सामाजिक संघटना, आदिवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून युवा वर्ग रस्त्यावर उतरला. आंदोलकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या क्रूर आणि भ्याड घटनेचा तीव्र निषेध नोंदवत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आणि सरकारविरोधात निदर्शने करत तहसीलदारांना निवेदन सादर केले. या वेळी विनोद खोडे, अरुण काशीद, अशोक लहांगे, बिरसा ढोरे, गौरव वाघ, विलास कोरडे, नामदेव गांगुर्डे, रमेश गांगुर्डे, किरण मोंढे, मोहन सोनवणे, योगेश कोरडे, राजू पाटील, रोहिदास कोरडे, श्रीपाद येले, नितीन काशीद, मोहन बेंडकोली, पांडुरंग पोटिंदे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
    1
    23 जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोगामी चळवळीचे पक्ष, सामाजिक संघटना, आदिवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून युवा वर्ग रस्त्यावर उतरला. आंदोलकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या क्रूर आणि भ्याड घटनेचा तीव्र निषेध नोंदवत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आणि सरकारविरोधात निदर्शने करत तहसीलदारांना निवेदन सादर केले.

या वेळी विनोद खोडे, अरुण काशीद, अशोक लहांगे, बिरसा ढोरे, गौरव वाघ, विलास कोरडे, नामदेव गांगुर्डे, रमेश गांगुर्डे, किरण मोंढे, मोहन सोनवणे, योगेश कोरडे, राजू पाटील, रोहिदास कोरडे, श्रीपाद येले, नितीन काशीद, मोहन बेंडकोली, पांडुरंग पोटिंदे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
    user_श्री.भगवान आचारी
    श्री.भगवान आचारी
    त्र्यंबक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • संगमनेर तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सकल मातंग समाजाच्या विविध मागण्या आणि अनुसूचित जाती आरक्षणाचे (अ, ब, क, ड) वर्गीकरण करण्याच्या संदर्भात भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संगमनेर तालुक्यातील मातंग समाजाचे नेते आणि आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनात एकत्र आलेल्या लोकांनी विविध मागण्यांवरून सरकारला थेट जाब विचारला. या जनआक्रोश मोर्च्यादरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण विषयाची दखल घेऊन योग्य तो पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
    4
    संगमनेर तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सकल मातंग समाजाच्या विविध मागण्या आणि अनुसूचित जाती आरक्षणाचे (अ, ब, क, ड) वर्गीकरण करण्याच्या संदर्भात भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संगमनेर तालुक्यातील मातंग समाजाचे नेते आणि आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनात एकत्र आलेल्या लोकांनी विविध मागण्यांवरून सरकारला थेट जाब विचारला.

या जनआक्रोश मोर्च्यादरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण विषयाची दखल घेऊन योग्य तो पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
    user_Amol shelke 1711
    Amol shelke 1711
    Construction Worker संगमनेर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलक मुलांवर झालेल्या पोलीस लाठीचार्जच्या निषेधार्थ आज, 23 जुलै रोजी चांदवड शहर बंद ठेवण्यात आले. या कारवाईच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधायला हवा होता, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात आली.
    1
    दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलक मुलांवर झालेल्या पोलीस लाठीचार्जच्या निषेधार्थ आज, 23 जुलै रोजी चांदवड शहर बंद ठेवण्यात आले. या कारवाईच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार घोषणाबाजी केली.

या वेळी नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधायला हवा होता, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात आली.
    user_Samadhan shinde
    Samadhan shinde
    Fruit & Vegetable Trader चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • नाशिकच्या जयभवानी रोड परिसरात कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार विजय उर्फ छंगा बेहनवाल आणि त्याच्या टोळीतील तिघांना गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथून अटक केली आहे. २० जुलै रोजी रात्री जुन्या वादातून फिर्यादीच्या भावावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर घरावर कोयत्याने वार करून आणि सार्वजनिक रस्त्यावर शस्त्रांचे प्रदर्शन करत परिसरात दहशत निर्माण करण्यात आली होती. या प्रकरणी २१ जुलै रोजी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यानंतर आरोपी शहरातून फरार झाले होते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सिन्नर, संगमनेर मार्गे नारायणगावपर्यंत आरोपींचा पाठलाग केला. सिन्नरमधील दोन कला केंद्रांवर छापे टाकल्यानंतर अखेर नारायणगाव येथील एका कला केंद्रात आरोपी लपल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी वेढा घातला. तेथून विजय उर्फ छंगा सरजित बेहनवाल (२८), योगेश उर्फ काका प्रल्हाद आहेर (४३), प्रदीप उर्फ गणेश विठ्ठल काळे (२६) आणि सचिन उर्फ अन्नू राधेकिशन गवंडर (३२) या चौघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी सिन्नरहून पुण्याकडे जाताना संगमनेरमधील एका बारमध्ये "आम्ही नाशिकचे भाई आहोत, आम्हाला फुकट दारू द्या" अशी दमदाटी करून बारचालकाला शिवीगाळ केल्याचे निष्पन्न झाले, ज्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विजय उर्फ छंगा आणि त्याच्या साथीदारांवर नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यांत तोडफोड, मारामारी आणि दहशत माजविणे यांसारखे १० ते १२ गंभीर गुन्हे नोंद आहेत. ही टोळी फर्नाडीस वाडी परिसरातील बेरोजगार तरुणांना हाताशी धरून गुन्हेगारी करत होती. गुंडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व त्यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे जयभवानी रोड, नाशिकरोड आणि उपनगर परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला असून अटक केलेल्या चौघांना पुढील तपासासाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
    1
    नाशिकच्या जयभवानी रोड परिसरात कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार विजय उर्फ छंगा बेहनवाल आणि त्याच्या टोळीतील तिघांना गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथून अटक केली आहे. २० जुलै रोजी रात्री जुन्या वादातून फिर्यादीच्या भावावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर घरावर कोयत्याने वार करून आणि सार्वजनिक रस्त्यावर शस्त्रांचे प्रदर्शन करत परिसरात दहशत निर्माण करण्यात आली होती. या प्रकरणी २१ जुलै रोजी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यानंतर आरोपी शहरातून फरार झाले होते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सिन्नर, संगमनेर मार्गे नारायणगावपर्यंत आरोपींचा पाठलाग केला. सिन्नरमधील दोन कला केंद्रांवर छापे टाकल्यानंतर अखेर नारायणगाव येथील एका कला केंद्रात आरोपी लपल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी वेढा घातला. तेथून विजय उर्फ छंगा सरजित बेहनवाल (२८), योगेश उर्फ काका प्रल्हाद आहेर (४३), प्रदीप उर्फ गणेश विठ्ठल काळे (२६) आणि सचिन उर्फ अन्नू राधेकिशन गवंडर (३२) या चौघांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत आरोपींनी सिन्नरहून पुण्याकडे जाताना संगमनेरमधील एका बारमध्ये "आम्ही नाशिकचे भाई आहोत, आम्हाला फुकट दारू द्या" अशी दमदाटी करून बारचालकाला शिवीगाळ केल्याचे निष्पन्न झाले, ज्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विजय उर्फ छंगा आणि त्याच्या साथीदारांवर नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यांत तोडफोड, मारामारी आणि दहशत माजविणे यांसारखे १० ते १२ गंभीर गुन्हे नोंद आहेत. ही टोळी फर्नाडीस वाडी परिसरातील बेरोजगार तरुणांना हाताशी धरून गुन्हेगारी करत होती. गुंडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व त्यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे जयभवानी रोड, नाशिकरोड आणि उपनगर परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला असून अटक केलेल्या चौघांना पुढील तपासासाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला यंदाचा दुसरा पूर आला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. निफाड तालुक्यातील चांदोरी गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री खंडेराव महाराज मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. तसेच चांदोरी आणि सायखेडा गावाला जोडणाऱ्या पुलाजवळ मोठ्या प्रमाणात पानवेल अडकल्याने नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला असून परिसरातील शेती आणि पुलाच्या पायांना धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निफाड प्रशासन तातडीने अलर्ट मोडवर आले आहे. चांदोरी व गोदाकाठच्या सर्व सरपंचांसह चांदोरी आणि सायखेडा येथील प्रशासकीय अधिकारी व समाजसेवकांनी पानवेल काढण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून प्रशासनाने पानवेल काढण्याचे काम सुरू केले आहे. सर्व प्रशासकीय अधिकारी सध्या घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या परिसरात न जाण्याचे आवाहन केले असून आज चांदोरी-सायखेडा पूल दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
    1
    गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला यंदाचा दुसरा पूर आला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. निफाड तालुक्यातील चांदोरी गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री खंडेराव महाराज मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. तसेच चांदोरी आणि सायखेडा गावाला जोडणाऱ्या पुलाजवळ मोठ्या प्रमाणात पानवेल अडकल्याने नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला असून परिसरातील शेती आणि पुलाच्या पायांना धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निफाड प्रशासन तातडीने अलर्ट मोडवर आले आहे. चांदोरी व गोदाकाठच्या सर्व सरपंचांसह चांदोरी आणि सायखेडा येथील प्रशासकीय अधिकारी व समाजसेवकांनी पानवेल काढण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून प्रशासनाने पानवेल काढण्याचे काम सुरू केले आहे. सर्व प्रशासकीय अधिकारी सध्या घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या परिसरात न जाण्याचे आवाहन केले असून आज चांदोरी-सायखेडा पूल दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
    user_निलेश  शेकोकार NPS न्यूज
    निलेश शेकोकार NPS न्यूज
    Advertising agency नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • नाशिकरोड परिसरात दुपारच्या वेळी घरात एकट्या असलेल्या महिलांना लक्ष्य करून विनयभंग करणाऱ्या 'सायको' आरोपीला गुन्हेशाखा युनिट-२ ने अवघ्या दोन दिवसांत अटक केली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ३३३ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलांच्या सुरक्षेशी संबंधित संवेदनशील गुन्हा असल्याने गुन्हेशाखा युनिट-२ ने तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान घटनास्थळ व परिसरातील तब्बल ७५ सीसीटीव्ही फुटेजची बारीक पडताळणी करण्यात आली. याद्वारे काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर फिरणाऱ्या संशयिताचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख अभिलाष अंकुश थोरात (वय ३५, रा. संजयगांधी नगर, उपनगर, नाशिकरोड) अशी पटली. गुन्हेशाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे विहीतगाव येथील आण्णा गणपती पुलाजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली सुमारे ५० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपीला पुढील तपासासाठी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, संजय सानप, शंकर काळे व त्यांच्या पथकाने केली.
    2
    नाशिकरोड परिसरात दुपारच्या वेळी घरात एकट्या असलेल्या महिलांना लक्ष्य करून विनयभंग करणाऱ्या 'सायको' आरोपीला गुन्हेशाखा युनिट-२ ने अवघ्या दोन दिवसांत अटक केली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ३३३ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलांच्या सुरक्षेशी संबंधित संवेदनशील गुन्हा असल्याने गुन्हेशाखा युनिट-२ ने तातडीने तपास सुरू केला.

तपासादरम्यान घटनास्थळ व परिसरातील तब्बल ७५ सीसीटीव्ही फुटेजची बारीक पडताळणी करण्यात आली. याद्वारे काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर फिरणाऱ्या संशयिताचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख अभिलाष अंकुश थोरात (वय ३५, रा. संजयगांधी नगर, उपनगर, नाशिकरोड) अशी पटली. गुन्हेशाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे विहीतगाव येथील आण्णा गणपती पुलाजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली सुमारे ५० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपीला पुढील तपासासाठी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, संजय सानप, शंकर काळे व त्यांच्या पथकाने केली.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.