Shuru
Apke Nagar Ki App…
आपल्या स्वप्नातील जोडीदार निवडताना बहिणींचे प्रेम आणि त्यांचा परस्परांवरील विश्वास पाहून जनता पूर्णपणे भारावून गेली आहे. काही नातेसंबंधांमध्ये स्वतःच्याच हाताने मुलीचे घर उद्ध्वस्त करण्याचे अनेक प्रयत्न केले जातात, अशा परिस्थितीत ही घटना समोर आली आहे. लग्नाबाबत बहिणींच्या हट्टामुळे तिन्ही बहिणींनी एकत्र येत एकाच मुलासोबत हिंदू चालीरिती आणि रितीरिवाजांनुसार विवाह केला आहे. बहिणींचे हे प्रेम आणि हा निर्णय समस्त पुरुष जातीसाठी अत्यंत अभिमानाची सर्वात मोठी बातमी ठरत आहे.
Amol shelke 1711
आपल्या स्वप्नातील जोडीदार निवडताना बहिणींचे प्रेम आणि त्यांचा परस्परांवरील विश्वास पाहून जनता पूर्णपणे भारावून गेली आहे. काही नातेसंबंधांमध्ये स्वतःच्याच हाताने मुलीचे घर उद्ध्वस्त करण्याचे अनेक प्रयत्न केले जातात, अशा परिस्थितीत ही घटना समोर आली आहे. लग्नाबाबत बहिणींच्या हट्टामुळे तिन्ही बहिणींनी एकत्र येत एकाच मुलासोबत हिंदू चालीरिती आणि रितीरिवाजांनुसार विवाह केला आहे. बहिणींचे हे प्रेम आणि हा निर्णय समस्त पुरुष जातीसाठी अत्यंत अभिमानाची सर्वात मोठी बातमी ठरत आहे.
- Amol shelke 1711संगमनेर, अहमदनगर, महाराष्ट्र🤝4 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- आपल्या स्वप्नातील जोडीदार निवडताना बहिणींचे प्रेम आणि त्यांचा परस्परांवरील विश्वास पाहून जनता पूर्णपणे भारावून गेली आहे. काही नातेसंबंधांमध्ये स्वतःच्याच हाताने मुलीचे घर उद्ध्वस्त करण्याचे अनेक प्रयत्न केले जातात, अशा परिस्थितीत ही घटना समोर आली आहे. लग्नाबाबत बहिणींच्या हट्टामुळे तिन्ही बहिणींनी एकत्र येत एकाच मुलासोबत हिंदू चालीरिती आणि रितीरिवाजांनुसार विवाह केला आहे. बहिणींचे हे प्रेम आणि हा निर्णय समस्त पुरुष जातीसाठी अत्यंत अभिमानाची सर्वात मोठी बातमी ठरत आहे.1
- नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या (एम.एस.जी.एस.) वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून अंदरसूल नगरीत वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीला आणि सहकार महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून झाली. या प्रसंगी अंदरसूल ग्रामपालिकेच्या माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या विनिता अमोल सोनवणे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी प्रा. राजेंद्र गायकवाड हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका शर्मिला पवार यांनी केले. सोहळ्यात विविध भक्तीगीतांचे सादरीकरण करण्यात आले. शिक्षिका निलिमा देशमुख यांनी "ये ओ विठ्ठल माझे माऊली हो", शिक्षिका शोभा निकम यांनी "अलीकडे ये मला पलीकडे ने" हे गीत, तर विद्यार्थिनी जानवी सौंदाणे हिने स्वरचित "आला आषाढीचा मास" हे गीत सादर केले. हरिभाऊ सोमासे यांनी अभंग सादर केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. राजेंद्र गायकवाड यांनी उपस्थितांना आषाढी एकादशीची सविस्तर माहिती दिली. यानंतर अंदरसूल गावातून अत्यंत भक्तिमय वातावरणात ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी काढण्यात आली. यामध्ये राजवीर सोनवणे व कृष्णा पुंड यांनी विठ्ठल-रखुमाईची पालखी संपूर्ण गावात मिरवली. विद्यार्थी आर्यन घोंगाणे व श्रुती दाभाडे यांनी विठ्ठल व रुक्मिणीचा पोशाख परिधान केला होता. डोक्यावर तुळस, हातामध्ये वृक्ष, ग्रंथ आणि टाळ घेऊन बाल विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या नामाचा गजर केला. याप्रसंगी संस्थेचे सहचिटणीस मयूर सोनवणे, संचालक जीवनशेठ गाडे, डॉ. भागीनाथ जाधव, प्रिन्सिपल अल्ताफ खान यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अर्चना एंडाईत यांनी केले, तर आभार दीपक खैरनार यांनी मानले.4
- धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावातील तरुण शेतकरी यशराज सतीश नलावडे यांनी आपल्या १ एकर शेतात माती आणि उपलब्ध नैसर्गिक साहित्याचा वापर करून विठ्ठलाची अप्रतिम व भव्य प्रतिकृती साकारली आहे. कोणतीही महागडी यंत्रसामग्री किंवा खर्चिक साधने न वापरता, केवळ स्वतःच्या कल्पकतेने आणि अनेक दिवसांच्या मेहनतीतून त्यांनी जमिनीवर ही कलाकृती उभी केली. जमिनीवरून जितकी आकर्षक दिसते, तितकीच वरून पाहिल्यावर ही रचना अधिक भव्य आणि प्रमाणबद्ध भासते. या अनोख्या उपक्रमामुळे येडशी गावाचे नाव संपूर्ण परिसरात चर्चेत आले असून, ही कलाकृती पाहण्यासाठी ग्रामस्थ, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने शेताकडे धाव घेत आहेत. येणाऱ्या नागरिकांनी मोबाईलमध्ये छायाचित्रे टिपून सोशल मीडियावरही या कलाकृतीचे कौतुक केले आहे. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी यशराज यांना आशीर्वाद दिले असून, शेती आणि अध्यात्म यांच्या या संगमामुळे ग्रामीण तरुणांमध्ये परंपरेबद्दल अभिमानाची भावना व नवा उत्साह निर्माण झाला आहे.1
- आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना अमृता फडणवीस यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली आहे. "आम्हाला आणि मलाही महाराष्ट्रातच राहायचे आहे, आम्ही दिल्लीला जाणार नाही आणि देवेंद्रजींनाही महाराष्ट्रातच ठेवणार," असे त्या म्हणाल्या. मुंबई, नागपूर किंवा कुठेही असलो तरी विठ्ठलाची पूजा कायम करत राहणार असल्याचे सांगत त्यांनी देवेंद्रजी, मोदीजी, राज्यकर्ते आणि प्रशासनाला लोकांसाठी आयुष्यभर झटण्याची सद्बुद्धी मिळो, अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. राजकीय घडामोडींवर बोलताना, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त मोर्चाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, इतके दिवस वेगळे होते आणि आता एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. ते दोघे मिळून काहीतरी करत आहेत. याशिवाय राज्य सरकार पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा आणत असल्याचेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केले की, काही अँटी सोशल लोकांनी पोलिसांवर हल्ला केला होता, ज्यामध्ये काही विद्यार्थीही जखमी झाले. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि काळा क्षण होता असे सांगत भविष्यात अशी घटना घडू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.4
- नवी दिल्लीतील 'जंतर मंतर' मैदानावर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस व सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात आलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी टॉर्च मोर्चा काढून तीव्र संताप व्यक्त केला. नाशिकमधील शालिमार येथून काढण्यात आलेल्या या निषेध फेरीत शेकडो विद्यार्थी आणि तरुण सहभागी झाले होते. यावेळी हातात निषेधाचे फलक झळकावत विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दिल्लीतील या पोलीस कारवाईचा निषेध करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली. याशिवाय लाठीचार्ज करणाऱ्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांचे रक्षण करून त्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली जावी, या प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांनी लावून धरल्या आहेत. लवकरात लवकर या मागण्यांची दखल घेतली गेली नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.1
- नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसानंतर प्रशासनाने वेळेवर केलेल्या उपाययोजना, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात राहिली असून कोणतीही जीवितहानी अथवा मोठी आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली नाही. पावसाचा जोर कमी झाला असला तरी संभाव्य धोका अद्याप टळलेला नसल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील तातडीच्या पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला आमदार प्रा. देवयानी फरांदे, ॲड. आमदार राहुल ढिकले, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, नाशिक पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे आणि पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला आज ग्रीन अलर्ट दिला असला तरी पाणी साचलेल्या इमारती व परिसरातील नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पावसानंतर डेंग्यू, कॉलरा यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा, तर महानगरपालिकेने स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यांचे प्रभावी नियोजन करावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळे, धबधबे आणि नदीकाठच्या भागात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाला आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गोदावरी नदीपात्रात सध्या सुमारे १९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून परिस्थिती सामान्य होण्यासाठी वेळ लागणार असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रामकुंड परिसर पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील नागरिक व भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महसूल, पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाला संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.1
- वैजापूर तालुक्यातील बोर दहेगांव येथील कै. दादासाहेब पाटील पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मुलांची दिंडी आणि देखावा अत्यंत उत्साहात पार पडला आहे.1
- एका २५ वर्षीय मराठी तरुणीने पोलिसांच्या कारवाईवर सडकून टीका करत व्यवस्थेबद्दल तीव्र चीड व्यक्त केली आहे. डोळ्यात अश्रू आणून "ही लढाई जातीची नाही, तर प्रस्थापित विरुद्ध गरिबांची आहे," असा टाहो तिने फोडला. पोलिसांच्या या भूमिकेवर आणि व्यवस्थेवर संताप व्यक्त करताना तरुणीचा हा आक्रोश खरोखरच मन सुन्न करणारा आहे.1