logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार कहर केला असून अनेक मार्गांवर पाणी साचल्यामुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या परिस्थितीचा आणि अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन प्रसंगांचा सामना करण्यासाठी NDRF ची पथके तैनात करण्यात आली असून प्रशासनाच्या विविध यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले आहे. पावसाचा जोर पाहता जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व धरणे, नद्या, पूरप्रवण क्षेत्रे तसेच लघुपाटबंधारे प्रकल्पांवर चोवीस तास बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

13 hrs ago
user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
पत्रकार ओमप्रकाश उढाण
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
13 hrs ago

पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार कहर केला असून अनेक मार्गांवर पाणी साचल्यामुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या परिस्थितीचा आणि अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन प्रसंगांचा सामना करण्यासाठी NDRF ची पथके तैनात करण्यात आली असून प्रशासनाच्या विविध यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले आहे. पावसाचा जोर पाहता जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व धरणे, नद्या, पूरप्रवण क्षेत्रे तसेच लघुपाटबंधारे प्रकल्पांवर चोवीस तास बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जालन्यात अपक्ष नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांनी महापौर वंदना मगरे यांच्यावर नियमबाह्य पद्धतीने काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आपण कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नसताना महापौरांनी दबावापोटी नोटीस बजावल्याचा दावा त्यांनी केला. जालना शहरातील हॉटेल आनंदी येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सभेची व्हिडिओ क्लिप पत्रकारांना दाखवली आणि महापौरांना नगरसेवकाला नोटीस बजावण्याचा अधिकारच नसल्याचे स्पष्ट करत ती नोटीस पत्रकार परिषदेतच फाडून केराच्या टोपलीत फेकून दिली. नोटीस बजावून आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असून राजकीय कोंडी करण्यासाठी व अपक्ष असल्यामुळे दबाव आणला जात असल्याचा आरोप पांगारकर यांनी केला. लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो, मात्र जालना मनपामध्ये विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. तसेच, स्वतः महापालिका कार्यालयातच स्वच्छता नाही तर शहर काय स्वच्छ असणार, असा टोलाही त्यांनी मनपा प्रशासनाला लगावला. दरम्यान, महापौरांनी बजावलेल्या या नोटीसला कायदेशीर आणि संविधानिक पद्धतीने उत्तर देणार असल्याचे पांगारकर यांनी स्पष्ट केले. यासोबतच महापौरांनाही कायदेशीर मार्गाने नोटीस बजावणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
    1
    जालन्यात अपक्ष नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांनी महापौर वंदना मगरे यांच्यावर नियमबाह्य पद्धतीने काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आपण कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नसताना महापौरांनी दबावापोटी नोटीस बजावल्याचा दावा त्यांनी केला. जालना शहरातील हॉटेल आनंदी येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सभेची व्हिडिओ क्लिप पत्रकारांना दाखवली आणि महापौरांना नगरसेवकाला नोटीस बजावण्याचा अधिकारच नसल्याचे स्पष्ट करत ती नोटीस पत्रकार परिषदेतच फाडून केराच्या टोपलीत फेकून दिली.

नोटीस बजावून आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असून राजकीय कोंडी करण्यासाठी व अपक्ष असल्यामुळे दबाव आणला जात असल्याचा आरोप पांगारकर यांनी केला. लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो, मात्र जालना मनपामध्ये विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. तसेच, स्वतः महापालिका कार्यालयातच स्वच्छता नाही तर शहर काय स्वच्छ असणार, असा टोलाही त्यांनी मनपा प्रशासनाला लगावला.

दरम्यान, महापौरांनी बजावलेल्या या नोटीसला कायदेशीर आणि संविधानिक पद्धतीने उत्तर देणार असल्याचे पांगारकर यांनी स्पष्ट केले. यासोबतच महापौरांनाही कायदेशीर मार्गाने नोटीस बजावणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
    user_सय्यद अबरार
    सय्यद अबरार
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • दिल्लीतील जंतर-मंतर येथे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या निर्दोष विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या आणि राहुल गांधींवरील अटकेच्या कारवाईच्या निषेधार्थ आज जालन्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. शहरातील महात्मा गांधी चौक येथे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले असून त्यांनी या कारवाईविरोधात जोरदार धरणे आंदोलन छेडले आहे.
    1
    दिल्लीतील जंतर-मंतर येथे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या निर्दोष विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या आणि राहुल गांधींवरील अटकेच्या कारवाईच्या निषेधार्थ आज जालन्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. शहरातील महात्मा गांधी चौक येथे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले असून त्यांनी या कारवाईविरोधात जोरदार धरणे आंदोलन छेडले आहे.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • ढवळेश्वर येथे स्व. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ६७ तरुणांनी रक्तदान केले.
    1
    ढवळेश्वर येथे स्व. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ६७ तरुणांनी रक्तदान केले.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • दिल्लीत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाथरीमध्ये कडकडीत प्रतिसाद मिळाला आहे. या घटनेच्या विरोधात पाथरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
    1
    दिल्लीत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाथरीमध्ये कडकडीत प्रतिसाद मिळाला आहे. या घटनेच्या विरोधात पाथरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • परभणी जिल्ह्यात बहुजन आघाडीच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेला जिल्हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. बहुजन आघाडीच्या आवाहनानंतर संपूर्ण परभणी जिल्हा आज पूर्णपणे बंद राहिला.
    1
    परभणी जिल्ह्यात बहुजन आघाडीच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेला जिल्हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. बहुजन आघाडीच्या आवाहनानंतर संपूर्ण परभणी जिल्हा आज पूर्णपणे बंद राहिला.
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या कथित पोलिस लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जालना शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. गुरुवार, २३ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे शांततेत आवाहन केले. यादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जंतर-मंतर येथील घटनेचा निषेध व्यक्त केला. या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्य बाजारपेठेतील अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली, तर काही ठिकाणी व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जंतर-मंतर येथील आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध करत संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आणि राज्यभरातील बंदला सहकार्य करण्याचे आवाहन केले. माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी भाजप आणि सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपच्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त संपूर्ण देश आणि जनता या लाठीचार्जचा निषेध करत आहे, मात्र सदाभाऊ खोत आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना सर्व जण आतंकवादी दिसत आहेत, असा घणाघाती आरोप घुमारे यांनी केला. भाजपच्या कोणत्याही कृतीला विरोध केला तर भाजप कार्यकर्त्यांना ते आतंकवादी कृत्य असल्याचेच दिसून येते, असेही ते म्हणाले.
    1
    दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या कथित पोलिस लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जालना शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. गुरुवार, २३ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे शांततेत आवाहन केले. यादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जंतर-मंतर येथील घटनेचा निषेध व्यक्त केला. या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्य बाजारपेठेतील अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली, तर काही ठिकाणी व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जंतर-मंतर येथील आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध करत संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आणि राज्यभरातील बंदला सहकार्य करण्याचे आवाहन केले. माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी भाजप आणि सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपच्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त संपूर्ण देश आणि जनता या लाठीचार्जचा निषेध करत आहे, मात्र सदाभाऊ खोत आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना सर्व जण आतंकवादी दिसत आहेत, असा घणाघाती आरोप घुमारे यांनी केला. भाजपच्या कोणत्याही कृतीला विरोध केला तर भाजप कार्यकर्त्यांना ते आतंकवादी कृत्य असल्याचेच दिसून येते, असेही ते म्हणाले.
    user_सय्यद अबरार
    सय्यद अबरार
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • परभणीच्या सेलू तहसील कार्यालयातील कारभारावर नागरिकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महसुली कामांसाठी नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
    1
    परभणीच्या सेलू तहसील कार्यालयातील कारभारावर नागरिकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महसुली कामांसाठी नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • NEET पेपर फूट प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी वडवणी शहरात तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा संपन्न झाला आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या या लाठीहल्ल्याच्या विरोधात नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत तहसील कार्यालयावर धडक देत आपला तीव्र विरोध दर्शवला.
    1
    NEET पेपर फूट प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी वडवणी शहरात तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा संपन्न झाला आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या या लाठीहल्ल्याच्या विरोधात नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत तहसील कार्यालयावर धडक देत आपला तीव्र विरोध दर्शवला.
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    16 hrs ago
  • दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनावरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ बीडच्या वडवणी तालुक्यात हुकूमशाही सरकारविरोधात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात वडवणी तालुक्यातील विद्यार्थी, युवक, शिक्षणप्रेमी, शेतकरी, कामगार, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. संविधानिक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करत मोर्चेकऱ्यांनी वडवणी शहरातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान "शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा", "मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी" आणि "इन्कलाब जिंदाबाद" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांवर कठोर कारवाई व्हावी आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर बलप्रयोग केला जाऊ नये, अशी जोरदार मागणी केली. तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले. या प्रसंगी उपस्थितांनी लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या जनआक्रोश मोर्चात तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
    1
    दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनावरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ बीडच्या वडवणी तालुक्यात हुकूमशाही सरकारविरोधात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात वडवणी तालुक्यातील विद्यार्थी, युवक, शिक्षणप्रेमी, शेतकरी, कामगार, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

संविधानिक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करत मोर्चेकऱ्यांनी वडवणी शहरातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान "शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा", "मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी" आणि "इन्कलाब जिंदाबाद" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांवर कठोर कारवाई व्हावी आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर बलप्रयोग केला जाऊ नये, अशी जोरदार मागणी केली.

तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले. या प्रसंगी उपस्थितांनी लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या जनआक्रोश मोर्चात तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.