दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनावरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ बीडच्या वडवणी तालुक्यात हुकूमशाही सरकारविरोधात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात वडवणी तालुक्यातील विद्यार्थी, युवक, शिक्षणप्रेमी, शेतकरी, कामगार, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. संविधानिक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करत मोर्चेकऱ्यांनी वडवणी शहरातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान "शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा", "मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी" आणि "इन्कलाब जिंदाबाद" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांवर कठोर कारवाई व्हावी आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर बलप्रयोग केला जाऊ नये, अशी जोरदार मागणी केली. तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले. या प्रसंगी उपस्थितांनी लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या जनआक्रोश मोर्चात तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

- दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ बीड शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला सकाळपासून सुरुवात झाली आहे. या बंदला विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख बाजारपेठा, व्यापारी आस्थापने व व्यावसायिक प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली असून कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागांत फिरून शांततेत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने शहरातील प्रमुख चौक, संवेदनशील ठिकाणे आणि बाजारपेठांमध्ये कडक बंदोबस्त तैनात केला आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा बंद पुकारल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशील भूमिका घेऊन त्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी केले आहे.1
- परभणीच्या सेलू तहसील कार्यालयातील कारभारावर नागरिकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महसुली कामांसाठी नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.1
- पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार कहर केला असून अनेक मार्गांवर पाणी साचल्यामुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या परिस्थितीचा आणि अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन प्रसंगांचा सामना करण्यासाठी NDRF ची पथके तैनात करण्यात आली असून प्रशासनाच्या विविध यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले आहे. पावसाचा जोर पाहता जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व धरणे, नद्या, पूरप्रवण क्षेत्रे तसेच लघुपाटबंधारे प्रकल्पांवर चोवीस तास बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.1
- दिल्लीमध्ये घडलेल्या घटनेच्या विरोधात आणि लोकशाहीवर झालेल्या लाठीच्या प्रहाराच्या निषेधार्थ परभणीत वंचित बहुजन आघाडीने एल्गार पुकारला आहे. दिल्लीतील या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडी परभणीत आक्रमक झाली आहे.1
- पैठण तालुक्यातील बिडकीन येथे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेले जाहीर शांततापूर्ण निषेध आंदोलन यशस्वीरीत्या पार पडले. या आंदोलनाला संपूर्ण विद्यार्थीवर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला. या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये आदिवासी चक्रीवादळ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप सुरेश गायकवाड, संघर्ष अकॅडमीचे रवी सर जाधव, बिडकीनचे सामाजिक कार्यकर्ते अमोल भाऊ पवार, टायगर ग्रुपचे अध्यक्ष संदीप भाऊ गायकवाड आणि हिंदवी स्वराज्य सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बप्पासाहेब पाटील आमले (रांजणगाव खुरी) उपस्थित होते. याशिवाय लोहगावचे दीपक जगधने व आंद्रेश पगारे, महाराष्ट्र उपाध्यक्ष रवी भाऊ बोरसे, महाराष्ट्र सचिव रविंद्र भाऊ गायकवाड, गंगापूर तालुका सदस्य किशोर पवार, गंगापूरचे अजय खुरसने, बिडकीनचे सामाजिक कार्यकर्ते अजय भाऊ भिवसाने, वंचित बहुजन आघाडीचे ढोले सर आणि सामाजिक कार्यकर्ते अफसर तडवी या मान्यवरांनीही आंदोलनाला उपस्थिती लावली.2
- मंठ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जालना जिल्ह्यातील मंठ्यात या बंद आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले आहे.1
- विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे परभणीमध्ये तीव्र पडसाद उमटले असून या कारवाईचा जोरदार निषेध करण्यात येत आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून त्यांनी या लाठीचार्जविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.1
- दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर बंद पाळण्यात आला. या आंदोलनामुळे शहरातील सर्व व्यापार आणि व्यवसाय आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले. तिथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपर्यंत मोर्चा काढून व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांना बंदचे आवाहन करण्यात आले. व्यापाऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत दिल्ली येथील विद्यार्थी लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ आपले व्यवहार बंद ठेवले.1
- परिवाराच्या साथीने यशाचे शिखर गाठत ज्योती पवार यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. या यशाबद्दल स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात या प्रबोधिनीने आतापर्यंत ६५० हून अधिक विद्यार्थ्यांना यशाची दिशा दाखवली आहे.1