Shuru
Apke Nagar Ki App…
दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर बंद पाळण्यात आला. या आंदोलनामुळे शहरातील सर्व व्यापार आणि व्यवसाय आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले. तिथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपर्यंत मोर्चा काढून व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांना बंदचे आवाहन करण्यात आले. व्यापाऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत दिल्ली येथील विद्यार्थी लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ आपले व्यवहार बंद ठेवले.
Sunil Gawali
दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर बंद पाळण्यात आला. या आंदोलनामुळे शहरातील सर्व व्यापार आणि व्यवसाय आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले. तिथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपर्यंत मोर्चा काढून व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांना बंदचे आवाहन करण्यात आले. व्यापाऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत दिल्ली येथील विद्यार्थी लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ आपले व्यवहार बंद ठेवले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर बंद पाळण्यात आला. या आंदोलनामुळे शहरातील सर्व व्यापार आणि व्यवसाय आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले. तिथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपर्यंत मोर्चा काढून व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांना बंदचे आवाहन करण्यात आले. व्यापाऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत दिल्ली येथील विद्यार्थी लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ आपले व्यवहार बंद ठेवले.1
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचा आज ३४ वा दिवस आहे. या प्रसंगी सी जे पी चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत आणि या आंदोलनाबाबत आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे. गुरुवार, २३ जुलै २०२६ रोजी दिलेल्या या विशेष मुलाखतीत अभिजीत दिपके यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. आंदोलनाच्या ३४ व्या दिवशी त्यांनी माध्यमांसमोर नेमके काय मोठे वक्तव्य केले आणि आपली काय भूमिका मांडली, यासंदर्भातील सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे.1
- दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी बंद पुकारला होता. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या या बंदच्या हाकेला उदगीरमध्ये शांततेत प्रतिसाद मिळाला आहे.1
- दिल्लीत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाथरीमध्ये कडकडीत प्रतिसाद मिळाला आहे. या घटनेच्या विरोधात पाथरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.1
- दिल्लीमध्ये घडलेल्या घटनेच्या विरोधात आणि लोकशाहीवर झालेल्या लाठीच्या प्रहाराच्या निषेधार्थ परभणीत वंचित बहुजन आघाडीने एल्गार पुकारला आहे. दिल्लीतील या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडी परभणीत आक्रमक झाली आहे.1
- परभणी जिल्ह्यात बहुजन आघाडीच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेला जिल्हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. बहुजन आघाडीच्या आवाहनानंतर संपूर्ण परभणी जिल्हा आज पूर्णपणे बंद राहिला.1
- NEET पेपर फूट प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी वडवणी शहरात तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा संपन्न झाला आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या या लाठीहल्ल्याच्या विरोधात नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत तहसील कार्यालयावर धडक देत आपला तीव्र विरोध दर्शवला.1
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनावरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ बीडच्या वडवणी तालुक्यात हुकूमशाही सरकारविरोधात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात वडवणी तालुक्यातील विद्यार्थी, युवक, शिक्षणप्रेमी, शेतकरी, कामगार, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. संविधानिक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करत मोर्चेकऱ्यांनी वडवणी शहरातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान "शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा", "मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी" आणि "इन्कलाब जिंदाबाद" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांवर कठोर कारवाई व्हावी आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर बलप्रयोग केला जाऊ नये, अशी जोरदार मागणी केली. तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले. या प्रसंगी उपस्थितांनी लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या जनआक्रोश मोर्चात तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.1