Shuru
Apke Nagar Ki App…
दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी बंद पुकारला होता. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या या बंदच्या हाकेला उदगीरमध्ये शांततेत प्रतिसाद मिळाला आहे.
अरुण उजेडकर
दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी बंद पुकारला होता. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या या बंदच्या हाकेला उदगीरमध्ये शांततेत प्रतिसाद मिळाला आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी बंद पुकारला होता. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या या बंदच्या हाकेला उदगीरमध्ये शांततेत प्रतिसाद मिळाला आहे.1
- केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत महाराष्ट्र बंदमध्ये मुखेडचाही सहभाग पाहायला मिळत आहे.1
- नांदेडच्या देगलूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.2
- दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर बंद पाळण्यात आला. या आंदोलनामुळे शहरातील सर्व व्यापार आणि व्यवसाय आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले. तिथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपर्यंत मोर्चा काढून व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांना बंदचे आवाहन करण्यात आले. व्यापाऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत दिल्ली येथील विद्यार्थी लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ आपले व्यवहार बंद ठेवले.1
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचा आज ३४ वा दिवस आहे. या प्रसंगी सी जे पी चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत आणि या आंदोलनाबाबत आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे. गुरुवार, २३ जुलै २०२६ रोजी दिलेल्या या विशेष मुलाखतीत अभिजीत दिपके यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. आंदोलनाच्या ३४ व्या दिवशी त्यांनी माध्यमांसमोर नेमके काय मोठे वक्तव्य केले आणि आपली काय भूमिका मांडली, यासंदर्भातील सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे.1
- नीट पेपर फुटी प्रकरणी जंतर मंतर येथील आंदोलनावर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या या महाराष्ट्र बंदला नांदेड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बंददरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनात सर्वपक्षीय नेतेही सहभागी झाले होते.1
- दिल्लीमध्ये घडलेल्या घटनेच्या विरोधात आणि लोकशाहीवर झालेल्या लाठीच्या प्रहाराच्या निषेधार्थ परभणीत वंचित बहुजन आघाडीने एल्गार पुकारला आहे. दिल्लीतील या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडी परभणीत आक्रमक झाली आहे.1
- विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे परभणीमध्ये तीव्र पडसाद उमटले असून या कारवाईचा जोरदार निषेध करण्यात येत आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून त्यांनी या लाठीचार्जविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.1