Shuru
Apke Nagar Ki App…
NEET पेपर फूट प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी वडवणी शहरात तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा संपन्न झाला आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या या लाठीहल्ल्याच्या विरोधात नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत तहसील कार्यालयावर धडक देत आपला तीव्र विरोध दर्शवला.
शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
NEET पेपर फूट प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी वडवणी शहरात तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा संपन्न झाला आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या या लाठीहल्ल्याच्या विरोधात नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत तहसील कार्यालयावर धडक देत आपला तीव्र विरोध दर्शवला.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- बीड नगरपालिकेची निवडणूक होऊन काही महिने झाले आहेत, मात्र नागरिक जेव्हा आपल्या समस्या आणि प्रश्न घेऊन जातात, तेव्हा "आम्ही आत्ताच आलो, आम्हाला काहीच महिने झाले आहेत" असे उत्तर नगरसेवक देत आहेत. लोकप्रतिनिधींच्या या उत्तरामुळे जनतेचे प्रश्न नेमके कधी सुटणार, असा सवाल निर्माण झाला आहे. बीडकरांसाठी हा प्रश्न मुक्त पत्रकार एस. एम. युसुफ यांनी पाठवला आहे.1
- नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे २० जुलै २०२६ रोजी शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी कथितपणे केलेल्या बळाच्या वापराचा निषेध करत बीड जिल्हा बार असोसिएशनच्या वकिलांनी भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सविस्तर निवेदन सादर केले आहे. या निवेदनात भारतीय संविधानातील कलम १९(१)(अ), १९(१)(ब) आणि २१ अंतर्गत मिळालेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्ण आंदोलनाचा हक्क व सन्मानाने जगण्याचा अधिकार अधोरेखित करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला देत आंदोलकांवर अतिरिक्त किंवा बेकायदेशीर बळाचा वापर घटनाविरोधी असल्याचे बार असोसिएशनने नमूद केले आहे. या घटनेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, दोषी पोलीस अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, जखमी विद्यार्थ्यांना वैद्यकीय व कायदेशीर मदत द्यावी, भविष्यात आंदोलनकर्त्यांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करावे, आंदोलकांशी सन्मानाने चर्चा करावी आणि विद्यार्थ्यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या प्रसंगी बीड जिल्हा बार असोसिएशनचे सर्व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन आणि असहकाराचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.1
- दिल्लीत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाथरीमध्ये कडकडीत प्रतिसाद मिळाला आहे. या घटनेच्या विरोधात पाथरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.1
- देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि दिल्लीत आंदोलनाला बसलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज कुंभार पिंपळगाव शहर कडकडीत बंद पाळण्यात आले. ग्रामस्थांनी आणि स्थानिक व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या या 'गाव बंद'च्या हाकेला संपूर्ण गावातून १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच मुख्य बाजारपेठ, सर्व लहान-मोठी दुकाने, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून व्यवहार बंद ठेवले. वैद्यकीय सेवा आणि औषधांची दुकाने यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता गावात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला असून नेहमी गजबजणाऱ्या मुख्य चौकांमध्ये आज पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. पेपरफुटीच्या तीव्र निषेधार्थ आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ कुंभार पिंपळगावची संपूर्ण बाजारपेठ पूर्णपणे बंद राहिली.1
- परभणी जिल्ह्यात बहुजन आघाडीच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेला जिल्हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. बहुजन आघाडीच्या आवाहनानंतर संपूर्ण परभणी जिल्हा आज पूर्णपणे बंद राहिला.1
- NEET पेपर फूट प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी वडवणी शहरात तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा संपन्न झाला आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या या लाठीहल्ल्याच्या विरोधात नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत तहसील कार्यालयावर धडक देत आपला तीव्र विरोध दर्शवला.1
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनावरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ बीडच्या वडवणी तालुक्यात हुकूमशाही सरकारविरोधात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात वडवणी तालुक्यातील विद्यार्थी, युवक, शिक्षणप्रेमी, शेतकरी, कामगार, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. संविधानिक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करत मोर्चेकऱ्यांनी वडवणी शहरातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान "शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा", "मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी" आणि "इन्कलाब जिंदाबाद" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांवर कठोर कारवाई व्हावी आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर बलप्रयोग केला जाऊ नये, अशी जोरदार मागणी केली. तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले. या प्रसंगी उपस्थितांनी लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या जनआक्रोश मोर्चात तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.1