Shuru
Apke Nagar Ki App…
बीड नगरपालिकेची निवडणूक होऊन काही महिने झाले आहेत, मात्र नागरिक जेव्हा आपल्या समस्या आणि प्रश्न घेऊन जातात, तेव्हा "आम्ही आत्ताच आलो, आम्हाला काहीच महिने झाले आहेत" असे उत्तर नगरसेवक देत आहेत. लोकप्रतिनिधींच्या या उत्तरामुळे जनतेचे प्रश्न नेमके कधी सुटणार, असा सवाल निर्माण झाला आहे. बीडकरांसाठी हा प्रश्न मुक्त पत्रकार एस. एम. युसुफ यांनी पाठवला आहे.
AapTak Hindi News Channel
बीड नगरपालिकेची निवडणूक होऊन काही महिने झाले आहेत, मात्र नागरिक जेव्हा आपल्या समस्या आणि प्रश्न घेऊन जातात, तेव्हा "आम्ही आत्ताच आलो, आम्हाला काहीच महिने झाले आहेत" असे उत्तर नगरसेवक देत आहेत. लोकप्रतिनिधींच्या या उत्तरामुळे जनतेचे प्रश्न नेमके कधी सुटणार, असा सवाल निर्माण झाला आहे. बीडकरांसाठी हा प्रश्न मुक्त पत्रकार एस. एम. युसुफ यांनी पाठवला आहे.
More news from Beed and nearby areas
- NEET पेपर फूट प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी वडवणी शहरात तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा संपन्न झाला आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या या लाठीहल्ल्याच्या विरोधात नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत तहसील कार्यालयावर धडक देत आपला तीव्र विरोध दर्शवला.1
- पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार कहर केला असून अनेक मार्गांवर पाणी साचल्यामुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या परिस्थितीचा आणि अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन प्रसंगांचा सामना करण्यासाठी NDRF ची पथके तैनात करण्यात आली असून प्रशासनाच्या विविध यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले आहे. पावसाचा जोर पाहता जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व धरणे, नद्या, पूरप्रवण क्षेत्रे तसेच लघुपाटबंधारे प्रकल्पांवर चोवीस तास बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.1
- परभणीच्या सेलू तहसील कार्यालयातील कारभारावर नागरिकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महसुली कामांसाठी नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.1
- परभणी जिल्ह्यात बहुजन आघाडीच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेला जिल्हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. बहुजन आघाडीच्या आवाहनानंतर संपूर्ण परभणी जिल्हा आज पूर्णपणे बंद राहिला.1
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या निर्दोष विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या आणि केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या कारवाईच्या निषेधार्थ जालन्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. शहरातील महात्मा गांधी चौक येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार धरणे आंदोलन छेडले. महात्मा गांधी पुतळ्याजवळ झालेल्या या आंदोलनामुळे परिसरातील वातावरण काही काळ तापले होते. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारभारावर जोरदार हल्लाबोल करत केंद्र सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. देशातील विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत NEET पेपरफुटी या संपूर्ण प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी या वेळी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे आणि शहर जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.1
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर, महिलांवर आणि चिमुकल्या मुलांवर झालेला लाठीहल्ला अत्यंत अमानुष व संविधानविरोधी असल्याचा आरोप करत जालन्यातील सामाजिक कार्यकर्ते साद बीन मुबारक व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. गुरुवारी, 23 जुलै रोजी दुपारी सादर केलेल्या या निवेदनाद्वारे पीडितांना तात्काळ न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, जंतर-मंतर येथे गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू होते. हे उपोषण मोडून काढण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून बळाचा वापर करत उपोषणकर्त्यांवर अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आला तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. आंदोलकांच्या रास्त मागण्यांवर तोडगा काढण्याऐवजी त्यांना मारहाण करण्यात आली, ही खेदाची बाब आहे. एकीकडे शासन 'बेटी बचाव, बेटी पढाओ'चा नारा देते आणि दुसरीकडे आंदोलन करणाऱ्या महिला व विद्यार्थ्यांना पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण केली जाते, ज्यावेळी पोलिसांनी केवळ प्रेक्षकाची भूमिका घेतली असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली असून प्रशासनाकडे काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. जंतर-मंतर येथील पीडित महिला, मुले व उपोषणकर्त्यांना शासनाने त्वरित न्याय द्यावा, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर होणारे अत्याचार थांबवावेत आणि देशातील वातावरण पूर्ववत करून कायदा व सुव्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर साद बीन मुबारक, मोईज अन्सारी, मोहसीन अफजल खान व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.1
- मंठ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जालना जिल्ह्यातील मंठ्यात या बंद आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले आहे.1
- जालन्यात अपक्ष नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांनी महापौर वंदना मगरे यांच्यावर नियमबाह्य पद्धतीने काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आपण कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नसताना महापौरांनी दबावापोटी नोटीस बजावल्याचा दावा त्यांनी केला. जालना शहरातील हॉटेल आनंदी येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सभेची व्हिडिओ क्लिप पत्रकारांना दाखवली आणि महापौरांना नगरसेवकाला नोटीस बजावण्याचा अधिकारच नसल्याचे स्पष्ट करत ती नोटीस पत्रकार परिषदेतच फाडून केराच्या टोपलीत फेकून दिली. नोटीस बजावून आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असून राजकीय कोंडी करण्यासाठी व अपक्ष असल्यामुळे दबाव आणला जात असल्याचा आरोप पांगारकर यांनी केला. लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो, मात्र जालना मनपामध्ये विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. तसेच, स्वतः महापालिका कार्यालयातच स्वच्छता नाही तर शहर काय स्वच्छ असणार, असा टोलाही त्यांनी मनपा प्रशासनाला लगावला. दरम्यान, महापौरांनी बजावलेल्या या नोटीसला कायदेशीर आणि संविधानिक पद्धतीने उत्तर देणार असल्याचे पांगारकर यांनी स्पष्ट केले. यासोबतच महापौरांनाही कायदेशीर मार्गाने नोटीस बजावणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.1
- रोहित पवार यांनी एक व्हिडिओ शेअर करत भाजपवर गंभीर आरोप केला आहे. विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा रोहित पवार यांनी या व्हिडिओद्वारे केला आहे.1