Shuru
Apke Nagar Ki App…
रोहित पवार यांनी एक व्हिडिओ शेअर करत भाजपवर गंभीर आरोप केला आहे. विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा रोहित पवार यांनी या व्हिडिओद्वारे केला आहे.
Rushikesh pawar
रोहित पवार यांनी एक व्हिडिओ शेअर करत भाजपवर गंभीर आरोप केला आहे. विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा रोहित पवार यांनी या व्हिडिओद्वारे केला आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ अहमदनगर जिल्ह्यातील राशीनमध्ये बंद पाळण्यात आला असून निषेध फेरी काढण्यात आली आहे. आंदोलकांवर केलेल्या या अमानुष लाठीहल्ल्याचा जोरदार निषेध नोंदवण्यासाठीच राशीन शहरात बंद पुकारत ही निषेध फेरी काढण्यात आली आहे.1
- खासदार पार्थ अजितदादा पवार यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे संपन्न होणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. या विवाहसोहळ्यापूर्वी २९ जुलै २०२६ रोजी अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात, मोजक्या नातेवाईक व निमंत्रितांच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ पार पडणार आहे. पार्थ पवार यांच्या होणाऱ्या वधूचे नाव कायनात दारा असे असून त्या मूळच्या चंदीगड येथील आहेत आणि सध्या दिल्ली येथे वास्तव्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून काही माध्यमांमध्ये कायनात दारा यांच्या नावाबाबत व जन्मस्थळाबाबत चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी ही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे.1
- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतले आहे.1
- लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २३ जुलै रोजी गरवा कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे दर कडाडले आहेत. आवक कमी झालेली असली तरी गरवा कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. बाजार समितीत सध्या कांदा नंबर एकला २१०० ते २४०० रुपये, कांदा नंबर दोनला १४०० ते २१०० रुपये आणि कांदा नंबर तीनला ८०० ते १४०० रुपये असे दर मिळत आहेत. या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कांदा चांगल्या प्रतीचा वाळवून आणि योग्य प्रतवारी करूनच विक्रीसाठी आणावा, असे आवाहन उपसभापती सुनील शेळके पाटील, सचिव भानुदास यादव आणि अमोद शेळके पाटील यांनी केले आहे.2
- भाजप सरकार आणि पोलीस प्रशासन खाजगी गुंड वृत्तीच्या तरुणांच्या हातात पोलिसांच्या काठ्या देऊन आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला आहे. केंद्रातील सरकार अशा गुंड वृत्तीच्या लोकांना पोलिसांच्या काठ्या देऊन ही मारहाण घडवून आणत आहे. मात्र, सत्ताधारी आणि पोलिसांच्या माध्यमातून निर्माण केली जाणारी ही दहशत भारतातील तरुण मोडून काढतील, असा ठाम इशारा देण्यात आला आहे.1
- नीट परीक्षेतील कथित अनियमिततेचा निषेध करण्यासाठी, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता व नैतिक जबाबदारीची मागणी करण्यासाठी शिरूरमध्ये गुरुवारी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक संघटनांच्या वतीने शांततापूर्ण 'लॉग मार्च' काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेली ही रॅली पुणे-नगर महामार्गावरील प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या मार्चमध्ये महाविद्यालयीन युवक-युवती, महिला, डॉक्टर, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' आणि 'जय भीम' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षेतील कथित अनियमिततेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची आणि परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व विश्वासार्ह करण्याची मागणी केली. तसेच शिक्षण व्यवस्थेतील नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध नोंदवण्यात आला असून संबंधितांवर योग्य कारवाई करावी आणि संविधानाने दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या लोकशाही अधिकारांचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनानंतर शिरूर तहसील कार्यालय तसेच शिरूर पोलीस ठाण्यात मागणीचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार अशोक पवार, लोकजागृती संघटनेचे रवींद्र धनक, अविनाश शिंदे, बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोजभाई सय्यद, डॉ. स्वप्ननील भालेराव, शिरूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, डॉ. संदीप कोकरे, डॉ. आकाश सोनवणे, डॉ. अमित कर्नावट, डॉ. आकाश सोमवंशी, डॉ. प्रमोद गायकवाड, वात्सल्य सिंधू फाऊंडेशनच्या उषा वाखारे, प्रा. रमेश गायकवाड, माजी नगरसेविका माया गायकवाड यांच्यासह विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान शिरूर शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.4
- दिल्लीत जंतर मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ राशीन शहरात सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. जंतर मंतरवर अभिजीत दिपके यांच्यासह हजार विद्यार्थी अद्याप ठाण मांडून बसलेले आहेत, तर सोनम वांगचूक यांनी सुरू केलेल्या उपोषणामुळे देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. निषेध आंदोलनादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून निषेध फेरी काढण्यात आली. हातात तिरंगा आणि लाठीहल्ल्याच्या निषेधाचे फलक घेऊन ही फेरी महात्मा फुले चौकामार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचली, जिथे निषेध सभा घेण्यात आली. यावेळी संपूर्ण राशीन शहर सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी दणाणून गेले होते. या बंदमध्ये वंचित बहुजन आघाडी, उद्धव ठाकरे शिवसेना, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), बहुजन समाज पार्टी, मातंग एकता आंदोलन आणि समविचारी संघटनांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. सभेत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष पोपटराव शेटे, ॲड. विकी साळवे, ॲड. अक्षय साळवे, मराठा सेवा संघाचे गणेश कदम, शिवसेना ठाकरे गटाचे सुभाष जाधव, शहराध्यक्ष जितेंद्र शेटे, संभाजी ब्रिगेडचे मयूर धनवडे, अतुल साळवे आणि मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मधुकर दंडे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष भीमराव साळवे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर विनाकारण लाठीहल्ला केल्यास आमदार व खासदारांना मतदारसंघात फिरू देणार नाही असा थेट इशारा दिला. यावेळी अंकुश साळवे, दादासाहेब आढाव, ॲड. शुभम पानसरे, दत्ता सोनवणे, अनिल लष्करे, नवनाथ धनवे, सॉलिन शेख, संतोष ढावरे, रुपाली आढाव, विशाखा साळवे आणि मायादेवी मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.1
- रोहित पवार यांनी एक व्हिडिओ शेअर करत भाजपवर गंभीर आरोप केला आहे. विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा रोहित पवार यांनी या व्हिडिओद्वारे केला आहे.1