logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नीट परीक्षेतील कथित अनियमिततेचा निषेध करण्यासाठी, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता व नैतिक जबाबदारीची मागणी करण्यासाठी शिरूरमध्ये गुरुवारी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक संघटनांच्या वतीने शांततापूर्ण 'लॉग मार्च' काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेली ही रॅली पुणे-नगर महामार्गावरील प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या मार्चमध्ये महाविद्यालयीन युवक-युवती, महिला, डॉक्टर, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' आणि 'जय भीम' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षेतील कथित अनियमिततेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची आणि परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व विश्वासार्ह करण्याची मागणी केली. तसेच शिक्षण व्यवस्थेतील नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध नोंदवण्यात आला असून संबंधितांवर योग्य कारवाई करावी आणि संविधानाने दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या लोकशाही अधिकारांचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनानंतर शिरूर तहसील कार्यालय तसेच शिरूर पोलीस ठाण्यात मागणीचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार अशोक पवार, लोकजागृती संघटनेचे रवींद्र धनक, अविनाश शिंदे, बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोजभाई सय्यद, डॉ. स्वप्ननील भालेराव, शिरूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, डॉ. संदीप कोकरे, डॉ. आकाश सोनवणे, डॉ. अमित कर्नावट, डॉ. आकाश सोमवंशी, डॉ. प्रमोद गायकवाड, वात्सल्य सिंधू फाऊंडेशनच्या उषा वाखारे, प्रा. रमेश गायकवाड, माजी नगरसेविका माया गायकवाड यांच्यासह विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान शिरूर शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

9 hrs ago
user_Satish Dhumal
Satish Dhumal
Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
9 hrs ago

नीट परीक्षेतील कथित अनियमिततेचा निषेध करण्यासाठी, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता व नैतिक जबाबदारीची मागणी करण्यासाठी शिरूरमध्ये गुरुवारी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक संघटनांच्या वतीने शांततापूर्ण 'लॉग मार्च' काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेली ही रॅली पुणे-नगर महामार्गावरील प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या मार्चमध्ये महाविद्यालयीन युवक-युवती, महिला, डॉक्टर, व्यापारी, सामाजिक

d315918f-896b-4448-bc98-efb43bdb6b55

कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' आणि 'जय भीम' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षेतील कथित अनियमिततेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची आणि परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व विश्वासार्ह करण्याची मागणी केली. तसेच शिक्षण व्यवस्थेतील नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी

94d7e8cf-3cda-4be6-a36a-b86076a20c1a

निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध नोंदवण्यात आला असून संबंधितांवर योग्य कारवाई करावी आणि संविधानाने दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या लोकशाही अधिकारांचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनानंतर शिरूर तहसील कार्यालय तसेच शिरूर पोलीस ठाण्यात मागणीचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार अशोक पवार, लोकजागृती संघटनेचे रवींद्र धनक, अविनाश शिंदे, बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोजभाई

50866d69-4ab6-4df4-85d9-c53f4ca50374

सय्यद, डॉ. स्वप्ननील भालेराव, शिरूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, डॉ. संदीप कोकरे, डॉ. आकाश सोनवणे, डॉ. अमित कर्नावट, डॉ. आकाश सोमवंशी, डॉ. प्रमोद गायकवाड, वात्सल्य सिंधू फाऊंडेशनच्या उषा वाखारे, प्रा. रमेश गायकवाड, माजी नगरसेविका माया गायकवाड यांच्यासह विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान शिरूर शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नीट परीक्षेतील कथित अनियमिततेचा निषेध करण्यासाठी, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता व नैतिक जबाबदारीची मागणी करण्यासाठी शिरूरमध्ये गुरुवारी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक संघटनांच्या वतीने शांततापूर्ण 'लॉग मार्च' काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेली ही रॅली पुणे-नगर महामार्गावरील प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या मार्चमध्ये महाविद्यालयीन युवक-युवती, महिला, डॉक्टर, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' आणि 'जय भीम' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षेतील कथित अनियमिततेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची आणि परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व विश्वासार्ह करण्याची मागणी केली. तसेच शिक्षण व्यवस्थेतील नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध नोंदवण्यात आला असून संबंधितांवर योग्य कारवाई करावी आणि संविधानाने दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या लोकशाही अधिकारांचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनानंतर शिरूर तहसील कार्यालय तसेच शिरूर पोलीस ठाण्यात मागणीचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार अशोक पवार, लोकजागृती संघटनेचे रवींद्र धनक, अविनाश शिंदे, बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोजभाई सय्यद, डॉ. स्वप्ननील भालेराव, शिरूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, डॉ. संदीप कोकरे, डॉ. आकाश सोनवणे, डॉ. अमित कर्नावट, डॉ. आकाश सोमवंशी, डॉ. प्रमोद गायकवाड, वात्सल्य सिंधू फाऊंडेशनच्या उषा वाखारे, प्रा. रमेश गायकवाड, माजी नगरसेविका माया गायकवाड यांच्यासह विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान शिरूर शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
    4
    नीट परीक्षेतील कथित अनियमिततेचा निषेध करण्यासाठी, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता व नैतिक जबाबदारीची मागणी करण्यासाठी शिरूरमध्ये गुरुवारी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक संघटनांच्या वतीने शांततापूर्ण 'लॉग मार्च' काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेली ही रॅली पुणे-नगर महामार्गावरील प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या मार्चमध्ये महाविद्यालयीन युवक-युवती, महिला, डॉक्टर, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' आणि 'जय भीम' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षेतील कथित अनियमिततेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची आणि परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व विश्वासार्ह करण्याची मागणी केली. तसेच शिक्षण व्यवस्थेतील नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध नोंदवण्यात आला असून संबंधितांवर योग्य कारवाई करावी आणि संविधानाने दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या लोकशाही अधिकारांचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनानंतर शिरूर तहसील कार्यालय तसेच शिरूर पोलीस ठाण्यात मागणीचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार अशोक पवार, लोकजागृती संघटनेचे रवींद्र धनक, अविनाश शिंदे, बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोजभाई सय्यद, डॉ. स्वप्ननील भालेराव, शिरूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, डॉ. संदीप कोकरे, डॉ. आकाश सोनवणे, डॉ. अमित कर्नावट, डॉ. आकाश सोमवंशी, डॉ. प्रमोद गायकवाड, वात्सल्य सिंधू फाऊंडेशनच्या उषा वाखारे, प्रा. रमेश गायकवाड, माजी नगरसेविका माया गायकवाड यांच्यासह विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान शिरूर शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • भाजप सरकार आणि पोलीस प्रशासन खाजगी गुंड वृत्तीच्या तरुणांच्या हातात पोलिसांच्या काठ्या देऊन आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला आहे. केंद्रातील सरकार अशा गुंड वृत्तीच्या लोकांना पोलिसांच्या काठ्या देऊन ही मारहाण घडवून आणत आहे. मात्र, सत्ताधारी आणि पोलिसांच्या माध्यमातून निर्माण केली जाणारी ही दहशत भारतातील तरुण मोडून काढतील, असा ठाम इशारा देण्यात आला आहे.
    1
    भाजप सरकार आणि पोलीस प्रशासन खाजगी गुंड वृत्तीच्या तरुणांच्या हातात पोलिसांच्या काठ्या देऊन आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला आहे. केंद्रातील सरकार अशा गुंड वृत्तीच्या लोकांना पोलिसांच्या काठ्या देऊन ही मारहाण घडवून आणत आहे. मात्र, सत्ताधारी आणि पोलिसांच्या माध्यमातून निर्माण केली जाणारी ही दहशत भारतातील तरुण मोडून काढतील, असा ठाम इशारा देण्यात आला आहे.
    user_जनतेचा आवाज 24x7
    जनतेचा आवाज 24x7
    Doctor पारनेर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • संकनपूरी येथे ग्रामपंचायतीचा मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणानंतर स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत थेट सरपंचासोबत चर्चा केली आहे.
    1
    संकनपूरी येथे ग्रामपंचायतीचा मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणानंतर स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत थेट सरपंचासोबत चर्चा केली आहे.
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    खेड, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून' ही प्रवृत्ती आता पूर्णपणे बंद करा, असा थेट आणि कडक इशारा देण्यात आला आहे. स्वतःच्या गोष्टी लपवून ठेवायच्या आणि इतरांच्या बाबतीत मात्र डोकावून पाहायचे, या वृत्तीवर तीव्र शब्दांत निशाणा साधत हा प्रकार तातडीने थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून' ही प्रवृत्ती आता पूर्णपणे बंद करा, असा थेट आणि कडक इशारा देण्यात आला आहे. स्वतःच्या गोष्टी लपवून ठेवायच्या आणि इतरांच्या बाबतीत मात्र डोकावून पाहायचे, या वृत्तीवर तीव्र शब्दांत निशाणा साधत हा प्रकार तातडीने थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • तरुण आंदोलकांना 'ड्रग्ज केस'मध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आंदोलकांना थेट ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे.
    1
    तरुण आंदोलकांना 'ड्रग्ज केस'मध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आंदोलकांना थेट ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • pcmc प्रभाग 13 निगडी ओटास्कीम खड्डे बुजावताना खडी रॅबिट च वापर
    1
    pcmc प्रभाग 13 निगडी ओटास्कीम खड्डे बुजावताना खडी रॅबिट च वापर
    user_Durgeshbhau khade Sarkar
    Durgeshbhau khade Sarkar
    Political party office Pimpri Chanchwad, Pune•
    3 hrs ago
  • आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना "तुमच्या बॅगेत ५० ग्रॅम कोकेन टाकून तुम्हाला अडकवीन" अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप एका पोलिस अधिकाऱ्यावर होत आहे. सर्वसामान्यांचे आणि कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडूनच विद्यार्थ्यांना अशा प्रकारे गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनीच अशी भूमिका घेणे हा लोकशाहीवरील अत्यंत गंभीर आघात मानला जात आहे. या धक्कादायक प्रकारानंतर, संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर मुख्यमंत्री काही कारवाई करणार का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
    1
    आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना "तुमच्या बॅगेत ५० ग्रॅम कोकेन टाकून तुम्हाला अडकवीन" अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप एका पोलिस अधिकाऱ्यावर होत आहे. सर्वसामान्यांचे आणि कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडूनच विद्यार्थ्यांना अशा प्रकारे गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनीच अशी भूमिका घेणे हा लोकशाहीवरील अत्यंत गंभीर आघात मानला जात आहे. या धक्कादायक प्रकारानंतर, संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर मुख्यमंत्री काही कारवाई करणार का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Pest control service पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • शिरूर येथील पोस्ट कार्यालयात २०२३ पासून बंद असलेले आधार सेवा केंद्र अखेर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. भाजपा महिला आघाडीने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आणि पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष परिस्थिती मांडल्यानंतर हे केंद्र पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपा महिला आघाडीच्या प्रिया बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्ट कार्यालयातील आधार सेवा केंद्र बंद असल्याने नागरिकांना आधार कार्ड अद्ययावत करणे, दुरुस्ती व इतर कामांसाठी खासगी केंद्रांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक पैसे मोजावे लागत असल्याच्या तक्रारी नागरिक सातत्याने करत होते. यासंदर्भात महिला आघाडीने यापूर्वी तहसील कार्यालय तसेच पोस्ट कार्यालयाकडे अनेक वेळा निवेदने देऊन सेवा केंद्र सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती. दरम्याने, पुणे येथील पोस्ट विभागाचे अधीक्षक केतन शित्रे हे शिरूर दौऱ्यावर आले असताना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोस्ट कार्यालयातील वस्तूस्थिती फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर अधीक्षक शित्रे यांनी तात्काळ दखल घेत आधार सेवा केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोस्ट कार्यालयात फलक लावून आधार सेवा अधिकृत दरात पुन्हा सुरू करण्यात आली असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रिया बिरादार यांनी केले आहे.
    2
    शिरूर येथील पोस्ट कार्यालयात २०२३ पासून बंद असलेले आधार सेवा केंद्र अखेर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. भाजपा महिला आघाडीने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आणि पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष परिस्थिती मांडल्यानंतर हे केंद्र पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भाजपा महिला आघाडीच्या प्रिया बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्ट कार्यालयातील आधार सेवा केंद्र बंद असल्याने नागरिकांना आधार कार्ड अद्ययावत करणे, दुरुस्ती व इतर कामांसाठी खासगी केंद्रांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक पैसे मोजावे लागत असल्याच्या तक्रारी नागरिक सातत्याने करत होते. यासंदर्भात महिला आघाडीने यापूर्वी तहसील कार्यालय तसेच पोस्ट कार्यालयाकडे अनेक वेळा निवेदने देऊन सेवा केंद्र सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती.

दरम्याने, पुणे येथील पोस्ट विभागाचे अधीक्षक केतन शित्रे हे शिरूर दौऱ्यावर आले असताना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोस्ट कार्यालयातील वस्तूस्थिती फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर अधीक्षक शित्रे यांनी तात्काळ दखल घेत आधार सेवा केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोस्ट कार्यालयात फलक लावून आधार सेवा अधिकृत दरात पुन्हा सुरू करण्यात आली असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रिया बिरादार यांनी केले आहे.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.