शिरूर येथील पोस्ट कार्यालयात २०२३ पासून बंद असलेले आधार सेवा केंद्र अखेर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. भाजपा महिला आघाडीने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आणि पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष परिस्थिती मांडल्यानंतर हे केंद्र पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपा महिला आघाडीच्या प्रिया बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्ट कार्यालयातील आधार सेवा केंद्र बंद असल्याने नागरिकांना आधार कार्ड अद्ययावत करणे, दुरुस्ती व इतर कामांसाठी खासगी केंद्रांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक पैसे मोजावे लागत असल्याच्या तक्रारी नागरिक सातत्याने करत होते. यासंदर्भात महिला आघाडीने यापूर्वी तहसील कार्यालय तसेच पोस्ट कार्यालयाकडे अनेक वेळा निवेदने देऊन सेवा केंद्र सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती. दरम्याने, पुणे येथील पोस्ट विभागाचे अधीक्षक केतन शित्रे हे शिरूर दौऱ्यावर आले असताना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोस्ट कार्यालयातील वस्तूस्थिती फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर अधीक्षक शित्रे यांनी तात्काळ दखल घेत आधार सेवा केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोस्ट कार्यालयात फलक लावून आधार सेवा अधिकृत दरात पुन्हा सुरू करण्यात आली असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रिया बिरादार यांनी केले आहे.
शिरूर येथील पोस्ट कार्यालयात २०२३ पासून बंद असलेले आधार सेवा केंद्र अखेर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. भाजपा महिला आघाडीने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आणि पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष परिस्थिती मांडल्यानंतर हे केंद्र पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपा महिला आघाडीच्या प्रिया बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्ट कार्यालयातील आधार सेवा केंद्र बंद असल्याने नागरिकांना आधार कार्ड अद्ययावत करणे, दुरुस्ती व इतर कामांसाठी खासगी केंद्रांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक पैसे मोजावे लागत असल्याच्या तक्रारी नागरिक सातत्याने करत होते. यासंदर्भात महिला आघाडीने
यापूर्वी तहसील कार्यालय तसेच पोस्ट कार्यालयाकडे अनेक वेळा निवेदने देऊन सेवा केंद्र सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती. दरम्याने, पुणे येथील पोस्ट विभागाचे अधीक्षक केतन शित्रे हे शिरूर दौऱ्यावर आले असताना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोस्ट कार्यालयातील वस्तूस्थिती फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर अधीक्षक शित्रे यांनी तात्काळ दखल घेत आधार सेवा केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोस्ट कार्यालयात फलक लावून आधार सेवा अधिकृत दरात पुन्हा सुरू करण्यात आली असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रिया बिरादार यांनी केले आहे.
- नीट परीक्षेतील कथित अनियमिततेचा निषेध करण्यासाठी, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता व नैतिक जबाबदारीची मागणी करण्यासाठी शिरूरमध्ये गुरुवारी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक संघटनांच्या वतीने शांततापूर्ण 'लॉग मार्च' काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेली ही रॅली पुणे-नगर महामार्गावरील प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या मार्चमध्ये महाविद्यालयीन युवक-युवती, महिला, डॉक्टर, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' आणि 'जय भीम' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षेतील कथित अनियमिततेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची आणि परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व विश्वासार्ह करण्याची मागणी केली. तसेच शिक्षण व्यवस्थेतील नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध नोंदवण्यात आला असून संबंधितांवर योग्य कारवाई करावी आणि संविधानाने दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या लोकशाही अधिकारांचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनानंतर शिरूर तहसील कार्यालय तसेच शिरूर पोलीस ठाण्यात मागणीचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार अशोक पवार, लोकजागृती संघटनेचे रवींद्र धनक, अविनाश शिंदे, बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोजभाई सय्यद, डॉ. स्वप्ननील भालेराव, शिरूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, डॉ. संदीप कोकरे, डॉ. आकाश सोनवणे, डॉ. अमित कर्नावट, डॉ. आकाश सोमवंशी, डॉ. प्रमोद गायकवाड, वात्सल्य सिंधू फाऊंडेशनच्या उषा वाखारे, प्रा. रमेश गायकवाड, माजी नगरसेविका माया गायकवाड यांच्यासह विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान शिरूर शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.4
- भाजप सरकार आणि पोलीस प्रशासन खाजगी गुंड वृत्तीच्या तरुणांच्या हातात पोलिसांच्या काठ्या देऊन आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला आहे. केंद्रातील सरकार अशा गुंड वृत्तीच्या लोकांना पोलिसांच्या काठ्या देऊन ही मारहाण घडवून आणत आहे. मात्र, सत्ताधारी आणि पोलिसांच्या माध्यमातून निर्माण केली जाणारी ही दहशत भारतातील तरुण मोडून काढतील, असा ठाम इशारा देण्यात आला आहे.1
- संकनपूरी येथे ग्रामपंचायतीचा मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणानंतर स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत थेट सरपंचासोबत चर्चा केली आहे.1
- 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून' ही प्रवृत्ती आता पूर्णपणे बंद करा, असा थेट आणि कडक इशारा देण्यात आला आहे. स्वतःच्या गोष्टी लपवून ठेवायच्या आणि इतरांच्या बाबतीत मात्र डोकावून पाहायचे, या वृत्तीवर तीव्र शब्दांत निशाणा साधत हा प्रकार तातडीने थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.1
- तरुण आंदोलकांना 'ड्रग्ज केस'मध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आंदोलकांना थेट ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे.1
- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) प्रभाग १३ मधील निगडी ओटास्कीम परिसरात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी खडी आणि रॅबिटचा वापर केला जात आहे.1
- शिरूर येथील पोस्ट कार्यालयात २०२३ पासून बंद असलेले आधार सेवा केंद्र अखेर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. भाजपा महिला आघाडीने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आणि पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष परिस्थिती मांडल्यानंतर हे केंद्र पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपा महिला आघाडीच्या प्रिया बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्ट कार्यालयातील आधार सेवा केंद्र बंद असल्याने नागरिकांना आधार कार्ड अद्ययावत करणे, दुरुस्ती व इतर कामांसाठी खासगी केंद्रांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक पैसे मोजावे लागत असल्याच्या तक्रारी नागरिक सातत्याने करत होते. यासंदर्भात महिला आघाडीने यापूर्वी तहसील कार्यालय तसेच पोस्ट कार्यालयाकडे अनेक वेळा निवेदने देऊन सेवा केंद्र सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती. दरम्याने, पुणे येथील पोस्ट विभागाचे अधीक्षक केतन शित्रे हे शिरूर दौऱ्यावर आले असताना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोस्ट कार्यालयातील वस्तूस्थिती फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर अधीक्षक शित्रे यांनी तात्काळ दखल घेत आधार सेवा केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोस्ट कार्यालयात फलक लावून आधार सेवा अधिकृत दरात पुन्हा सुरू करण्यात आली असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रिया बिरादार यांनी केले आहे.2
- दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ पिंपरीमध्ये विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईचा कडक शब्दांत निषेध करत विद्यार्थ्यांनी पिंपरीत आपले आंदोलन छेडले.1