Shuru
Apke Nagar Ki App…
विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ अहमदनगर जिल्ह्यातील राशीनमध्ये बंद पाळण्यात आला असून निषेध फेरी काढण्यात आली आहे. आंदोलकांवर केलेल्या या अमानुष लाठीहल्ल्याचा जोरदार निषेध नोंदवण्यासाठीच राशीन शहरात बंद पुकारत ही निषेध फेरी काढण्यात आली आहे.
प्रा .किशोरकुमार कांबळे
विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ अहमदनगर जिल्ह्यातील राशीनमध्ये बंद पाळण्यात आला असून निषेध फेरी काढण्यात आली आहे. आंदोलकांवर केलेल्या या अमानुष लाठीहल्ल्याचा जोरदार निषेध नोंदवण्यासाठीच राशीन शहरात बंद पुकारत ही निषेध फेरी काढण्यात आली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त स्मृतीस्थळावर दर्शन घेण्यासाठी आले असता युगेंद्र पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी बोलताना युगेंद्र पवार यांनी सांगितले की, विलीनीकरण झाल्यावर सर्व सूत्रे अजितदादांकडेच जाणार होती.1
- ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्याचा भाग म्हणून अहिल्यानगरमधील पारनेर येथील राळेगण सिद्धी येथे त्यांनी मौन आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून अण्णा हजारे यांनी सर्व विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन केले आहे.1
- शिरूर येथील पोस्ट कार्यालयात २०२३ पासून बंद असलेले आधार सेवा केंद्र अखेर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. भाजपा महिला आघाडीने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आणि पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष परिस्थिती मांडल्यानंतर हे केंद्र पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपा महिला आघाडीच्या प्रिया बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्ट कार्यालयातील आधार सेवा केंद्र बंद असल्याने नागरिकांना आधार कार्ड अद्ययावत करणे, दुरुस्ती व इतर कामांसाठी खासगी केंद्रांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक पैसे मोजावे लागत असल्याच्या तक्रारी नागरिक सातत्याने करत होते. यासंदर्भात महिला आघाडीने यापूर्वी तहसील कार्यालय तसेच पोस्ट कार्यालयाकडे अनेक वेळा निवेदने देऊन सेवा केंद्र सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती. दरम्याने, पुणे येथील पोस्ट विभागाचे अधीक्षक केतन शित्रे हे शिरूर दौऱ्यावर आले असताना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोस्ट कार्यालयातील वस्तूस्थिती फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर अधीक्षक शित्रे यांनी तात्काळ दखल घेत आधार सेवा केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोस्ट कार्यालयात फलक लावून आधार सेवा अधिकृत दरात पुन्हा सुरू करण्यात आली असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रिया बिरादार यांनी केले आहे.2
- महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्यात आल्यानंतर वीज ग्राहकांच्या विविध तक्रारी समोर येत आहेत. स्मार्ट मीटर बसवल्याच्या या कारभारावर ग्राहकांकडून थेट तक्रारी दाखल केल्या जात आहेत.1
- बीड नगरपालिकेची निवडणूक होऊन काही महिने झाले आहेत, मात्र नागरिक जेव्हा आपल्या समस्या आणि प्रश्न घेऊन जातात, तेव्हा "आम्ही आत्ताच आलो, आम्हाला काहीच महिने झाले आहेत" असे उत्तर नगरसेवक देत आहेत. लोकप्रतिनिधींच्या या उत्तरामुळे जनतेचे प्रश्न नेमके कधी सुटणार, असा सवाल निर्माण झाला आहे. बीडकरांसाठी हा प्रश्न मुक्त पत्रकार एस. एम. युसुफ यांनी पाठवला आहे.1
- पालखी सोहळ्यात विठ्ठल आणि रुक्मिणी थेट दुचाकीवर स्वार होऊन अवतरल्याचे अनोखे दृश्य पाहायला मिळाले आहे. वेशभूषा करून दुचाकीवरून आलेल्या या विठ्ठल-रुक्मिणीच्या अनोख्या एंट्रीने पालखी सोहळ्यातील वातावरण विशेष आकर्षित केले आहे.1
- नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे २० जुलै २०२६ रोजी शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी कथितपणे केलेल्या बळाच्या वापराचा निषेध करत बीड जिल्हा बार असोसिएशनच्या वकिलांनी भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सविस्तर निवेदन सादर केले आहे. या निवेदनात भारतीय संविधानातील कलम १९(१)(अ), १९(१)(ब) आणि २१ अंतर्गत मिळालेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्ण आंदोलनाचा हक्क व सन्मानाने जगण्याचा अधिकार अधोरेखित करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला देत आंदोलकांवर अतिरिक्त किंवा बेकायदेशीर बळाचा वापर घटनाविरोधी असल्याचे बार असोसिएशनने नमूद केले आहे. या घटनेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, दोषी पोलीस अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, जखमी विद्यार्थ्यांना वैद्यकीय व कायदेशीर मदत द्यावी, भविष्यात आंदोलनकर्त्यांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करावे, आंदोलकांशी सन्मानाने चर्चा करावी आणि विद्यार्थ्यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या प्रसंगी बीड जिल्हा बार असोसिएशनचे सर्व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन आणि असहकाराचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.1
- पैठण तालुक्यातील बिडकीन येथे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेले जाहीर शांततापूर्ण निषेध आंदोलन यशस्वीरीत्या पार पडले. या आंदोलनाला संपूर्ण विद्यार्थीवर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला. या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये आदिवासी चक्रीवादळ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप सुरेश गायकवाड, संघर्ष अकॅडमीचे रवी सर जाधव, बिडकीनचे सामाजिक कार्यकर्ते अमोल भाऊ पवार, टायगर ग्रुपचे अध्यक्ष संदीप भाऊ गायकवाड आणि हिंदवी स्वराज्य सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बप्पासाहेब पाटील आमले (रांजणगाव खुरी) उपस्थित होते. याशिवाय लोहगावचे दीपक जगधने व आंद्रेश पगारे, महाराष्ट्र उपाध्यक्ष रवी भाऊ बोरसे, महाराष्ट्र सचिव रविंद्र भाऊ गायकवाड, गंगापूर तालुका सदस्य किशोर पवार, गंगापूरचे अजय खुरसने, बिडकीनचे सामाजिक कार्यकर्ते अजय भाऊ भिवसाने, वंचित बहुजन आघाडीचे ढोले सर आणि सामाजिक कार्यकर्ते अफसर तडवी या मान्यवरांनीही आंदोलनाला उपस्थिती लावली.2
- बारामतीत विकास कामांची पाहणी करत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एका अपघातग्रस्त विद्यार्थिनीच्या मदतीसाठी आपला ताफा थांबवला. जळोची-एमआयडीसी रस्त्यावर एका टेम्पोच्या धडकेत ही विद्यार्थिनी जखमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ उपचाराची व्यवस्था करत तिला रुग्णालयात पाठवले. सुनेत्रावहिनींनी दाखवलेली ही तत्परता उपस्थितांना अजितदादांची आठवण करून देणारी ठरली.1