घरभाडे लाटण्यासाठी खोटे दस्तऐवज दाखल केले शिक्षिकेविरुध्द न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल खामगाव : तालुक्यातील आवार येथील जिल्हा परीषद शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षिकेने घरभाडे लाटण्यासाठी गावातीलच व्यक्तीच्या घराचे खोटे दस्ताऐवज सादर केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई १६ फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे.आवार येथील जिल्हा परीषद शाळेवर श्रीमती मानसी निलेश अडबे रा. यशोधा रेसीडेन्सी डीपी रोड सुटाळा ह्या कार्यरत आहेत. त्यांनी गावातीलचनिलेश सुरेश गवई यांच्या परात भाड्याने राहात असल्याचे खोटे दस्तऐवज दाखल करून गेल्या दोन वर्षापासून शासनाकडून घरभाडे घेत आहेत, याबाबत प्रथम पोस्टेला व नंतर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरुन न्यायालयाने श्रीमती मानसी अडवे यांच्या विरुध्द कलम ३१६ (२), ३१६ (५), ३१८ (१), ३३६, ३३७ भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश खामगाव ग्रामीण पोस्टेला दिले होते. त्यामुळे खामगाव ग्रामीण पोलिसांनी उपरोक्त कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत अधिक तपास खामगाव ग्रामीण पोस्टेचे महिला पोहेकों प्रतीक्षा जाधव करीत आहेत.
घरभाडे लाटण्यासाठी खोटे दस्तऐवज दाखल केले शिक्षिकेविरुध्द न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल खामगाव : तालुक्यातील आवार येथील जिल्हा परीषद शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षिकेने घरभाडे लाटण्यासाठी गावातीलच व्यक्तीच्या घराचे खोटे दस्ताऐवज सादर केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई १६ फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे.आवार येथील जिल्हा परीषद शाळेवर श्रीमती मानसी निलेश अडबे रा. यशोधा रेसीडेन्सी डीपी रोड सुटाळा ह्या कार्यरत आहेत. त्यांनी गावातीलचनिलेश सुरेश गवई यांच्या परात भाड्याने राहात असल्याचे खोटे दस्तऐवज दाखल करून गेल्या दोन वर्षापासून शासनाकडून घरभाडे घेत आहेत, याबाबत प्रथम पोस्टेला व नंतर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरुन न्यायालयाने श्रीमती मानसी अडवे यांच्या विरुध्द कलम ३१६ (२), ३१६ (५), ३१८ (१), ३३६, ३३७ भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश खामगाव ग्रामीण पोस्टेला दिले होते. त्यामुळे खामगाव ग्रामीण पोलिसांनी उपरोक्त कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत अधिक तपास खामगाव ग्रामीण पोस्टेचे महिला पोहेकों प्रतीक्षा जाधव करीत आहेत.
- आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या जगभरात चिंतेचे वातावरण आहे. याचे पडसाद आता आपल्या महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवडा भासत असल्याच्या चर्चा आहेतबुलढाणा जिल्ह्यात सध्या गॅस टंचाईची परिस्थिती नाही. जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री ठाकरे यांनी माहिती दिली आहे की, संपूर्ण जिल्ह्यात किमान आठवडाभर पुरेल एवढा सिलेंडरचा साठा सध्या उपलब्ध आहे. यामध्ये घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही सिलेंडरचा समावेश आहे.आखाती देशांतील युद्धामुळे राज्याच्या इतर भागांत गॅस आणि इंधन टंचाईच्या तक्रारी येत आहेत. काही ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याची ओरड आहे.1
- जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे किरणोत्सव पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांचा पर्यटकांनी आज रोजी मोठी गर्दी केली होती सदरील सोहळा असल्यामुळे वेरूळ पोलीस ठाणे यांच्या वतीने सदरील ठिकाणी मोठा बंदोबस्त देण्यात आला होता1
- मंदिरातील दानपेटी चोरणारा चोरट्या पोलिसांच्या जाळ्यात मालेगाव शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गुणवंत बाबा मंदिरातील दानपेटी व मलानेश्वर हॉटेल दिनांक ९व१० च्या मध्यरात्री चोरट्याने चोरल्याची घटना घडली होती. याबाबत पोलीस स्टेशन मालेगाव मध्ये गुन्हा क्र.219/2026 कलम 334(1) BNS व गुन्हा क्र. 220/2026 कलम 303(2)BNS मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा दिनांक 09/03/2026 ते 10/03/2026 चे रात्री दरम्यान चोरी झाली होती सदर गुन्ह्यात संशयावरून दोन आरोपी यांना अटक करुन त्यांचे कडून दोन्ही गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करुन दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. मालनेश्वर हॉटेलमधील चोरीस गेलेले चांदीचे दोन नाणे,सिगारेटचे पाकीट, चिल्लर खुर्दा, नगदी रुपये व संग्रही असलेले जुने चलनी नोटा.तसेच संत श्री गुणवंत बाबा मंदिरातील दान पेटी व नगदी रुपये एकुण 8675/₹ चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपी नाव*मंगेश शेषराव बदर वय 25 वर्षे रा.गांधीनगर,मालेगाव,2) राहुल दौलत गायकवाड वय 31 वर्षे रा. चांडस ता. मालेगाव या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पी आय श राजेश खेरडे यांचे मार्गदर्शनात पी एस आय रवी सैबेवार जमादार सुनिल पवार, किशोर चिंचोळकर शिवाजी काळे, जितु पाटील,मनिष राठोड, पोलिस शिपाई आमोल पवार, गणेश मेटांगळे, प्रशांत चौधरी, मिलिंद राजगुरु, मारोती गायकवाड.सैनिक महादेव मुठाळ. पोलीस स्टेशन मालेगाव यांनी कारवाई केल आहे.1
- सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख1
- जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन असलेल्या वेरूळ लेणीतील दहा नंबरच्या लेणीतील बौद्ध मूर्तिवर किरणोत्सव या सोळाव्याला मोठ्या संख्येने पर्यटकासह भाविकांना अनुभवयास मिळाला. स्थापत्य कलेचा अद्धभुत नमूना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये एकूण चौतीस लेण्या आहेत. यामध्ये बारा बौद्ध लेणी आहेत. तर यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी या विहार असून यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरणे येत असतात. हीच सूर्यकिरणें मूर्तिच्या चेहऱ्यावरती आले. आगामी पाच ते सहा दिवस हा सोहळा भाविकासह पर्यटकाना अनुभवता येईल..1
- लाखोच्या संख्येने भाविकांची उपस्थिती1
- मार्चची चाहूल; डोक्यावर कुलर घेऊन निघालेला शेतकरी सांगतो उन्हाळ्याची सुरुवात... शेगांव : मार्च महिन्याची सुरुवात होताच संत नगरी शेगांवमध्ये उन्हाळ्याची चाहूल स्पष्ट जाणवू लागली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी तयारी सुरू केली असून बाजारात कुलर खरेदीची लगबग वाढली आहे. याचे जिवंत चित्र म्हणजे शहराच्या रस्त्यावर डोक्यावर कुलर घेऊन जात असलेला शेतकरी — जो बदलत्या हवामानाचा आणि ग्रामीण वास्तवाचा प्रतीकात्मक संदेश देताना दिसतो. कडक उन्हाची सुरुवात होताच एसी परवडत नसलेल्या सर्वसामान्य व शेतकरी वर्गासाठी कुलर हा “गरिबांचा एसी” ठरत आहे. कमी खर्च, कमी वीज वापर आणि तात्काळ थंडावा यामुळे कुलरची मागणी वाढली असून इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसत आहे. दुपारच्या वेळी वाढणारा उकाडा, गरम वारे आणि उन्हाची तीव्रता लक्षात घेता यंदाचा उन्हाळा अधिक कडक जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मार्चपासूनच नागरिकांनी उष्णतेविरुद्ध तयारी सुरू केली असून शेगांवमध्ये उन्हाळ्याचा हंगाम अधिकृतपणे सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.1
- अर्थसंकल्पातून ग्रामीण भाग 'आउट': आमदार सिद्धार्थ खरात यांची सरकारवर टीका. *ग्रामीण भागाकडे अर्थसंकल्पात दुर्लक्ष; शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी ठोस तरतूद नाही – आमदार सिद्धार्थ खरात* मेहकर दि. ११: राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अर्थसंकल्पात मोठमोठ्या योजना आणि आकडेवारीचा पाऊस पाडला असला, तरी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे त्यांनी नमूद केले. *१. घोषणांचा पाऊस आणि डिजिटलचा दिखावा:* कृषी क्षेत्रासाठी ५ अब्ज डॉलरचे उद्दिष्ट आणि १५ पिकांसाठी मूल्यसाखळी उभारण्याचा संकल्प मांडला आहे. 'अॅग्रो स्टॅक' अंतर्गत १ कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून ३ कोटींचे लक्ष्य आहे. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि व्हिडिओ मार्गदर्शनापेक्षा शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदतीची जास्त गरज असल्याचे खरात यांनी सांगितले. *२. शहर विरुद्ध ग्रामीण: निधीचा मोठा असमतोल:* मुंबई-पुणे सारख्या शहरांतील मेट्रो आणि हायवेसाठी सरकारकडे हजारो कोटींचा निधी आहे, परंतु ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षण यांसाठ ठोस तरतूद नाही.* शहरांसाठी उदारपणे निधी दिला जातो, मात्र ग्रामीण भाग या विकासापासून मैलोन्मैल दूर फेकला जात आहे *३. अर्थसंकल्पीय आकडेवारीचे वास्तव:* राज्याचा अर्थसंकल्प सुमारे ७ लाख कोटींचा असला, तरी प्रत्यक्ष विभागांना मिळणारा निधी केवळ २.८८ लाख कोटी आहे. अनेक विभागांना दिलेला निधी पूर्णपणे खर्चच होत नाही, त्यामुळे योजनांची अंमलबजावणी केवळ कागदावरच राहते. *४. शेती, दूध आणि कर्जमाफीचा मुद्दा:* दुग्ध व्यवसाय: दुधाला केवळ १ रुपया प्रोत्साहन भत्ता देणे ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या डेअरी विकासासाठी जुन्या करारांप्रमाणे ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. कर्जमाफी: मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यात स्पष्टता नाही. केवळ पीक कर्ज नव्हे, तर ट्रॅक्टर आणि स्प्रिंकलरच्या कर्जाचाही यात समावेश असावा. *५. आर्थिक विषमतेची दरी:* महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांचे प्रति व्यक्ती उत्पन्न राज्याच्या आणि देशाच्या सरासरीपेक्षाही कमी आहे. विकास केवळ काही औद्योगिक जिल्ह्यांपुरता मर्यादित असून, उर्वरित महाराष्ट्र आजही आर्थिकदृष्ट्या मागासलेलाच राहिल्याची टीका खरात यांनी केली.1
- अंधारी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाली आहे तर कुत्रा गंभीर जखमी झाला आहे सदरील प्रकारमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण या परिसरात बघण्यात येत आहे1